Skip to main content

मरणाची अवस्था

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 20/07/2011 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
विषय तसा बोजड, सर्वसामान्यांना न आवडणारा आहे. या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक सजीव कधीना कधी मरतोच. त्याच्या मरण्याच्या तर्‍हा, कारणे वेगवेगळी असू शकतात. पण होणारा मृत्यू एक शाश्वत घटना असते. एकांतात मनात मृत्यूविषयी विचार कधीकधी येतात. रातीच्या वेळी अर्धवट झोपेत कधीकधी मरतांनाची स्थितीची कल्पना येवू शकते. माझा झोपेत श्वास अडकतो. झोपेत चुकून छातीवर झोपल्या गेले तर हमखास असे होते. मोठ्याने ओरडून जागे व्हावे लागते. नेटवर पाहिले असता जीभ मागे जावून श्वासमार्गात अडथळा आणते असे काहीतरी आजाराचे स्वरूप आहे. अर्थात मला त्यावर उपाय काय असले काही येथे विचारायचे नाही. तर येणारा मृत्यू, त्यावेळची मनाची अवस्था काही मृत्यूबाबतीत फारच भयानक असू शकते. एकतर मानवाला बुद्धी अन स्मृती यांची देणगी आहे. त्यामुळे आपण मर्त्य लोक त्याचा विचार करू शकतो. पशू पक्षी यांना मरणाच्यावेळी वेदना होत असतीलच पण संवेदना फारशा येत नसाव्यात किंवा बुद्धी अन स्मृती त्याच्या आड येत नसाव्यात. म्हातारपणी आजारपणातून येणारा मृत्यू फारच वेदना देत असतो. खंगत खंगत मरणे, मरणाची वाट पाहत झिजून मरणे या अवस्था भयानक असतात. कायद्याने इच्छामरण नाही. तसे ते नसावेही या मताची मी आहे. एखाद्याला म्हातारपणी मृत्यूला कवटाळायचेच असेल पण शरीराचे शक्यते हाल न व्हावे, संवेदना न व्हाव्यात अन शांतपणे मृत्यूच्या अधीन व्हावे यासाठी काही उपाय निश्चीतच मानव संस्कृतीत आहेत. जैन लोकांमध्ये ती उपवासांची पद्धत आहे (नाव आठवत नाही). आपल्याकडेही संजीवन समाधी आहेच. याबाबत अधीक माहीती काय आहे?

वाचने 14038
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

In reply to by मराठी_माणूस

जैन लोकांमध्ये ती उपवासांची पद्धत आहे (नाव आठवत नाही). "सन्थारा" व्रत म्हणतात त्याला

"जबतक जिंदा हूं, मरा नही; जब मर गया तो साला मैंही नही. फिर डर काहे का?" -इति आनंद (ऊर्फ राजेश खन्ना)

प्रतिसाद देऊ शकतोय त्यावरुन मला मरणाचा अनुभव नाही हे स्पष्टच आहे. पण मला कधी मरणांत यातनाही झालेल्या नाहीत, त्यामुळे तो ही काही अनुभव नाही. मागे एकदा काही जुन्या खोडांची "इच्छा मरण कायदेशीर केले पाहिजे" यावर चर्चा ऐकली होती. ( मी वृध्द नाही ) चर्चा करणारे वृध्द सैन्य, बँकींग वगैरे मधून से. नि. होते. त्यात त्यांनी मरणाचे अनेक सोपे उपाय चर्चिले होते. त्यातील एका मतानुसार सायनाईड खाऊन मरण्याचा उपाय सर्वात सोपा, वेदना रहीत व झटक्यात मोकळा करणारा आहे. मी म्हणलो मरताना एवढी मोठी मानवी यंत्रणा निकामी होत असते तेव्हा कुठेतरी, काहीतरी फाटत असेल, तुटत असेलच.. त्यामुळे सायनाईड खा की काहीही खा वेदना होणारच! ते म्हणे बेशुध्द झाल्याने वेदना होणार नाहीत. त्या वृध्दांपैकी अजून तरी कुणी सायनाईड खाल्लेले नाही.. दर महिन्यात एकमेकांचा वाढदिवस काँट्रिब्युशन करुन साजरा करतात व इडली-डोसा वगैरे खातात. जैन समाजात जीव जाण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रकाराला यम सल्लेखना किंवा धर्म संथारा व्रत म्हणतात. गगनविहारींना मरण या विषयावर लिहिण्याचे आकर्षण असल्याचा इथे उगाच गवगवा झाला असल्याने गविंच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

In reply to by यकु

मागे एकदा काही जुन्या खोडांची "इच्छा मरण कायदेशीर केले पाहिजे" यावर चर्चा ऐकली होती. ( मी वृध्द नाही ) चर्चा करणारे वृध्द सैन्य, बँकींग वगैरे मधून से. नि. होते. त्यात त्यांनी मरणाचे अनेक सोपे उपाय चर्चिले होते. त्यातील एका मतानुसार सायनाईड खाऊन मरण्याचा उपाय सर्वात सोपा, वेदना रहीत व झटक्यात मोकळा करणारा आहे.
कोण आहे रे तिकडे? कोणी दखल घेऊन, काय हवेनको ते विचारून यांची व्यवस्था करेल काय? (सायनाईड काय भाव आहे हो हल्ली?)
त्या वृध्दांपैकी अजून तरी कुणी सायनाईड खाल्लेले नाही.. दर महिन्यात एकमेकांचा वाढदिवस काँट्रिब्युशन करुन साजरा करतात व इडली-डोसा वगैरे खातात.
कसे खातील? कोणी आणून द्यायला नको का? (काही खातबीत नाहीत. या असल्या गोष्टींच्या फक्त गप्पा मारायच्या असतात. जाहीर चर्चा म्हणे! वेळ जात नसला, की बरे असते असे काहीबाही बरळायला.) ('क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' हे कोणी यांना कधी ऐकवले नाही आहे काय?)
गगनविहारींना मरण या विषयावर लिहिण्याचे आकर्षण असल्याचा इथे उगाच गवगवा झाला असल्याने गविंच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
हं? काय सांगताय काय? तसे तरुण वाटले मला, एकंदर लिहिण्याच्या पद्धतीवरून... अरेरे!
या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक सजीव कधीना कधी मरतोच. त्याच्या मरण्याच्या तर्‍हा, कारणे वेगवेगळी असू शकतात. पण होणारा मृत्यू एक शाश्वत घटना असते.
(यावरून एक सुभाषित आठवले. "मौत और टट्टी, किसी को भी, कहीं भी और किसी भी वक़्त आ सकती है|")

In reply to by यकु

गगनविहारींना मरण या विषयावर लिहिण्याचे आकर्षण असल्याचा इथे उगाच गवगवा झाला असल्याने गविंच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. यशवंता. पूर्वी लिहिलेलंच इथे देतोय. मूळ पोस्टपेक्षा प्रतिक्रिया मोठी याबद्दल क्षमस्व. पण हेच म्हणायचं आहे या विषयावर. जिवंतपणी विचार करायला आणि हजारो रोमँटिक, हॉरर, सायंटिफिक अशा अनेक प्रकारच्या थियरीज मांडायला मृत्यू हा अगदी उत्तम विषय आहे. पण प्रत्यक्ष आला की तो सुंदर असेलच असं नाही.. हिडीसही असू शकेल. आपली त्यावेळी सारी बोलती बंद होऊन जाम फाटेल.. काही सांगता येत नाही. तोपर्यंत थॉट एक्सपिरिमेंट. त्यावर पूर्वी लिहिलं होतं. ....... फिजिक्स हे बेसिक सायन्सेसपैकी एक मानलं गेलंय. मी ग्राज्वेट होताना ते थोडंफार शिकलोही. असं वाटलं की फिजिक्सचा उपयोग करून जेवढ्या गोष्टी सिद्ध करता येतात त्याहून जास्त गोष्टींवर प्रश्न उभे होतात. कळत गेलेल्या नवीन “शोधां”चा उपयोग काहीतरी सुखकारक वस्तू बनवायला होतोच. पण ते काही ज्ञान नव्हे. ती तर शिकलेली नवीन युक्ती असते फक्त. खरंखुरं नवीन ज्ञान मिळवणं म्हणजेच अज्ञानाचा खड्डा खोल करत जाणं हे फिजिक्सकडून शिकावं. मरण, देव, ईश्वरी शक्ती या विषयांवर “शास्त्रीय दृष्टिकोनातून काय बोलावं..?? आनंदच आहे सगळा. पण फिजिक्समधे, आणि एकूण मूलभूत शास्त्रांमधे वापरल्या जाणार्‍या “थॉट एक्स्पिरिमेंट्स”चा वापर इथे कामाला येतो. मरणाविषयी आपण जिवंतपणी काहीच सांगू शकत नाही. आपण कसेही जगलो तरी स्वतःचं मरण हा एक नॉन-ऑप्शनल कार्यभाग आपल्याला पार पाडायचाच आहे. मरण म्हणजे काय असेल त्याविषयी जगभर खूप थियरीज मांडल्या जातात. “निअर डेथ” अनुभव घेऊन “परतलेले” लोक सुरस अनुभव सांगतात. त्यांची रेंज “आपण आपलंच शरीर उंचावरून पाहिलं”, इथपासून “एका तेजस्वी रस्त्यावरुन चार घोड्यांचा रथ दौडत येत होता..” पर्यंत एकदम व्हर्सटाईल असते. अर्थातच ते लोक मेलेले नसतात त्यामुळे या कथा मनोरंजक असल्या तरी पुढे त्याचं काही “करता” येत नाही. आपण मेल्यावर आपलं काय होणार याला उत्तर आमच्या शाळेतल्या एका धड्यात होतं. “आप मेला जग बुडाले..” आपलं जग, दुसर्‍याचं जग असं काही वेगळं वेगळं दाखवणं शक्यच नाही. त्यामुळे, जे काही फील होतंय ते “आपलं” जग आपल्यासोबत अस्तित्वात आलं आणि म्हणूनच ते आपल्यासोबत नष्ट होणार ही एक थियरी. ही थियरी बिनतोड आहे. आणि तसं असेल तर चांगलंच. पण आत्तापर्यंत तरी आपण असं समजतोय की जग ही आपली कल्पना अतएव “माया” नसून ती खरीखुरी वस्तू आहे आणि ती आपण नसतानाही (आपल्यानंतर..!!!) शिल्लक राहीलच. झोप लागल्यावर जसं आपल्याला थोड्या वेळासाठी काही कळत नाही तशीच अवस्था कायम राहाणं म्हणजे मरण अशीही एक थियरी असू शकेल. पण झोपेतही आपलं मन किंवा कॉन्शसनेस खूप जागा असतो. स्वप्नं पडतात. मेंदूचा काही भाग आणि ब-याच शरीर यंत्रणा काम करत असतात. मेल्यावर तसं काही होत नाही. म्हणजे अनंतकाळ झोप म्हणजे मरण हे काही खरं नव्हे. बाय द वे.. कशा(ला) या भिंतीवर धडका द्यायच्या? येईल तेव्हा आणि तसं येऊ दे.. नाही.. तसं नाहीये..या सर्वाचा विचार करायला हवा तो यासाठी की ते मरण शांत, आनंददायक वगैरे असेलच असं नाही. आणि त्यानंतर सगळं सगळं संपून मुक्तता असंही असेलच असं नाही. “होतं काय की आपण सोयीस्कर आणि एकाच बाजूची शक्यता पकडून बसतो आणि दुसरी शक्यता कधी बघतच नाही.“ सॉरी.. कन्फ्युजन पुरे. आपण थॉट एक्पिरिमेंटच्या मार्गाने विचार करू: समजा मरणाच्या क्षणाच्या आधीच मेंदूला रक्तपुरवठा बंद होऊन सर्व संवेदना (त्यासोबत वेदनाही) नष्ट होऊन प्रत्यक्ष मरणक्षणी शांत आरामदायक वाटत असेल तर ठीकच. पण तसं नसेल तर? (वाईट शक्यता गृहीत धरत जाऊन पहायचं..!!) आपण आपली शक्यता नंबर एक गृहित धरूया की:- मरणाच्या क्षणी संवेदना जागृत असतात.. आता दुसरा प्रश्न. त्या (मरणा) नंतर आपली विचारशक्ती, अस्तित्व यांचं काय होणार? ते नष्ट होत असेल तर बरंच. पण त्याचं शिल्लक न राहणं हे आपल्या कल्पनेच्या पलिकडचं आहे. आपल्या शरीराला पूर्ण “खेरीज” करुनही आयुष्यभर आपलं मन (अस्तित्व, आत्मा, कॉन्शसनेस काहीही म्हणा) अस्तित्वात असतो आणि तोच “पाहणे, ऐकणे, वास घेणे, स्पर्श अनुभवणे” अशा सगळ्या इनपुट्स ना सामोरा जात असतो. शरीराचा प्रत्येक भाग हे फक्त इन्द्रियच आहे. प्रत्यक्ष अनुभव घेणारा वेगळाच असतो आणि म्हणून तो शरीरासोबत नष्ट होईलच असं गृहित धरता येत नाही. म्हणून शक्यता नंबर दोन गृहित धरूया: मरणानंतर आपलं अस्तित्व (कॉन्शसनेस, फील करणारा भाग) शरीराच्या मदतीखेरीजही टिकून राहील. अर्थात आता शरीराकडून त्याला इनपुट्स मिळत नसल्यामुळे त्याला नवीन स्पर्श, वास वगैरे नक्कीच मिळणार नाहीत. पण आधी शरीराकडून मिळालेल्या जुन्या इनपुट्सचं काय? म्हणून शक्यता नंबर तीन गृहित धरूया: मरणानंतरही शिल्लक राहिलेल्या आपल्या अस्तित्वाला नव्याने सेन्सेस होणार नाहीत पण जुन्या सेन्सेसची आठवण त्यात शिल्लक राहील. सर्व सेन्सेस कोण्या एका जादूने मागे सुटत असतील तर छानच.. पण तसं नसेल तर? फार फार तर जुन्या सेन्सेसच्या मेमरीज (मेंदूपेशींत साठवलेल्या असल्यामुळे) मेंदूसोबत नाहीशा होत असतील. पण मरणाच्या क्षणी झालेल्या जाणिवेचं काय? म्हणजेच मरणाच्या शेवटच्या क्षणीची जाणीव आपल्या अस्तित्वासोबत कायमची “फ्रीझ” होऊन राहील. त्याचा घाव कमी करायला आता “खपली धरणारं” शरीर नसेल. मरण्याच्या क्षणी आपण आत्यंतिक वेदनेने पिळवटलेले असलो तर शरीर वजा झाल्यावर आपण तशाच वेदनेत त्यापुढे कायम राहू.. सेन्सेस देणारं आणि नंतर भरून बरं करणारं शरीर नसल्यामुळे आंधळं, बहिरं, मुकं, स्पर्शसंवेदनाहीन, हालचाल करु न शकणारं आपलं अस्तित्व अशा वेदनेसोबत कायम शिल्लक राहील. …………………………………………………… हे सर्व होईलच असं नाही. पण कदाचित होत असेलही. आणि ते सांगायला कोणी परत येणार नाही.. म्हणून आपला आणि इतरांचा मरण्याचा क्षण जास्तीतजास्त वेदनारहित कसा करता येईल याची काळजी आपण घेऊ शकतो..त्या क्षणीची जाणीव कदाचित अनंतकाळपर्यंत आपली साथ करेल असं आधीच गृहित धरून.. टू बी ऑन द सेफर साईड हं… सुरुवातीला म्हटलं ना… “होतं काय की आपण सोयीस्कर आणि एकाच बाजूची शक्यता पकडून बसतो आणि दुसरी शक्यता कधी बघतच नाही.“ म्हणून हा थॉट एक्स्पिरिमेंट.. शेवटचा दिस गोड व्हावा असं पहिल्यांदा म्हणणार्‍याने हाच थॉट एक्स्पिरिमेंट केला असावा..

In reply to by गवि

यशवंता. पूर्वी लिहिलेलंच इथे देतोय. मूळ पोस्टपेक्षा प्रतिक्रिया मोठी याबद्दल क्षमस्व.
गवि गवि गवि ... अहो इतके दिवस मिपावर राहून काय शिकलात हो मग ? लेखापेक्षा प्रतिक्रिया मोठी झाली की लगेच तिचा धागा बनवायचा असतो. गवि तुम्हारा चुक्याच. यौवननिहारी

In reply to by परिकथेतील राजकुमार

यौवननिहारी???????????????? =)) =)) खपलो साफ गवि थेअरी छानच (कुठे वाचलीत ;) ) अजून वाचायला आवडेल.. वेगळा धागा काढा हवंतर

In reply to by गवि

येस्स. थोड थोड आवाक्यात असणारं, समजणार उत्तर आहे. >>> म्हणून आपला आणि इतरांचा मरण्याचा क्षण जास्तीतजास्त वेदनारहित कसा करता येईल याची काळजी आपण घेऊ शकतो आता आपला मृत्यू आलाय पण त्याला जास्तीत जास्त वेदनारहीत असणारी सोपी पद्धत/ कृती कोणती किंवा असल्या बाबतीत मला म्हणायचे/ विचारायचे होते.

In reply to by पाषाणभेद

शुद्ध वृद्धत्वाने आलेल्या नैसर्गिक मृत्यूखेरीज काहीही वेदनारहित नसणारच. कारण आपण प्रोसेस मधेच किल करतो आहोत. तेव्हा अचानक बर्‍याच नीट चालू असलेल्या अंतर्गत प्रक्रियाही थांबवाव्या लागणार (विष, आघात, हायपॉक्सिया, किंवा अन्य कोणत्यातरी मार्गाने) त्यामुळे ठरवून काही करणे अवघड. त्यातून अगदी मरण जवळ आले म्हणून काही करुन ते वेदनारहित व्हावे असा प्रयत्न करणे म्हटले तरी काहीना काही वेदना अपरिहार्य. फक्त त्याचे ड्युरेशन कमी व्हावे अशी इच्छा/प्रयत्न करता येतील विशेषतः निव्वळ जीवरक्षक उपचार चालू असतील तर ते थांबवून.

In reply to by गवि

मरणानंतरही शिल्लक राहिलेल्या आपल्या अस्तित्वाला नव्याने सेन्सेस होणार नाहीत पण जुन्या सेन्सेसची आठवण त्यात शिल्लक राहील.
गवी, वाक्य फार रोचक वाटतय. पण जिवंतपणी काळ हा सर्वावर औषध आहे असं म्हटलं जातं, म्हणजेच आनंद असो वा दूखः ती भावना तीव्रता हळू हळू कमी कमी व बधीर होत जाते अथवा आठवणीत रहाणं बंद होतं. मग नवीन आनूभव आपण घ्या वा तीकडे दूर्लक्ष करा भूतकाळ सतत पून्ह पून्हा जसाच्या तसा जगणे अशक्य. म्हणतात ना गॉड डीडंट गेव मी एव्हरीठींग आय वांट बट एव्हरीठींग आय नीड, वगैरे वगैरे. चर्चेसाठी इथ ग्वाड च्या जागी न्येचर पकडा. म्हणजे मेल्या नंतर जर आपण आंधळे, बहीरे मूके वगैरे वगैरे रहाणार असू तर अर्थातच या ज्ञानेंद्रीयांची आपल्याला मृत्यूनंतर गरजही नसेल (वि विल नॉट लूज अवर कंफर्ट) असा एक तर्क होतो. सेन्सेसची शिल्लक आठवण त्यात कीती व कीती काळ परीणाम करेल ही शंकाच आहे. कारण आपण चंचल आहोत ;)

In reply to by आत्मशून्य

>>>> मरणानंतरही शिल्लक राहिलेल्या आपल्या अस्तित्वाला नव्याने सेन्सेस होणार नाहीत पण जुन्या सेन्सेसची आठवण त्यात शिल्लक राहील. आपले शरीर हेच सारे दु:खाचे कारण आहे. काटा टोचला, खरचटले, गोळी घुसली, हार्ट फेल झाले, यकृत बिघडले, फुप्पुसे खराब झाली, किडनी फेल झाली, मुत्रखडे तयार झाले एक ना अनेक व्याधी, दुखणी मानवाला होतात. असली दुखणी पशू पक्षांनाही होतातच यात वाद नाही. पण या सगळ्या वेदनांची संपृक्त अवस्था म्हणजे मुत्यू. मग ते मरण अंथरूणाला खिळलेले राहिल्याने असो किंवा एखाद्या अपघाताने आलेले असो. शरीराला या ज्या काही वेदना होतात त्या चेतासंस्थेद्वारे मेंदूपर्यंत जातात व आपल्याला त्या जाणवतात. म्हणजेच जर शांतपणे मरणाच्या अधीन व्हायचे असेल तर चेतासंस्थांचे कार्य खंडीत केले तर? पण तरीही शरीराचे कार्य चालूच राहील असेही होवू शकते. म्हातारपणीच्या नैसर्गीक मृत्यूत शरीर एक एक अवयव त्याचे कार्य थांबवत जाते. नजर जाते, कान जातात, जेवण खाण टळते आदी. नंतर संवेदनाही जाते? माझ्या मामाचा मृत्यू असाच झाला होता. त्याचा जीव निघता निघत नव्हता. मरणाची भिती अगदी डोळ्यात दिसत होती पण एकदाचा जीव जात नव्हता. शेवटी शेवटी तो भिंतीवर चढल्यासारखे करायला लागला, धावायला लागला. खुप वेदना देवून त्याचा जीव गेला. इतर जीवन जगणार्‍या प्राण्यांच्या बाबतीतही असल्या नैसर्गीक मरणांत असे होते की केवळ मानवाला बुद्धी-स्मृती-मन आहे म्हणून त्याला त्याची जाणीव होते? की केवळ मन आपल्या शरीराच्या आड येते? माझ्या विचारकरण्याच्या आवाक्याबाहेरचे प्रश्न आहे सारे.

In reply to by पाषाणभेद

काटा टोचला, खरचटले, गोळी घुसली, हार्ट फेल झाले, यकृत बिघडले, फुप्पुसे खराब झाली, किडनी फेल झाली, मुत्रखडे तयार झाले
(ही यादी यथाशक्ति वाढवून हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपया गोड मानून घ्यावा.) ... अजीर्णाने अतिसार झाले, लोकलमधून पडला, कारने उडवले, उंच इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली, विमान कोसळले, कोणीतरी कडेलोट केला, खून झाला (यात गळा घोटला, चाकूने भोसकले, डोक्यात दगड घातला वगैरे अनेक उपप्रकार), फाशी झाली, शिरच्छेद झाला, जीव दिला (हेही अनेक प्रकारे करता येते), विजेच्या सॉकेटमध्ये बोटे घातली (किंवा न जमल्यास खिळा घातला), बुडून मेला... (तूर्तास एवढेच आठवले. जसजसे आठवत जाईल, तसतसा नवीन प्रतिसादांतून यादीत भर घालत जाईनच.)

In reply to by पाषाणभेद

इतर जीवन जगणार्‍या प्राण्यांच्या बाबतीतही असल्या नैसर्गीक मरणांत असे होते की केवळ मानवाला बुद्धी-स्मृती-मन आहे म्हणून त्याला त्याची जाणीव होते? की केवळ मन आपल्या शरीराच्या आड येते?
वरवर पाहीलं तर माझी प्रतीक्रीया गविंनी सागीतलेल्या थीअरीचा व्यवस्थीत अभ्यास न करताच दीलीय असं वाटेल पण , सार इतकच काढता येइल की जर मनाच अस्तीत्व शरीरानंतरही टीकून राहीलं तर ते शेवटची आठवण नक्कीच कूरवाळत राहणार नाही कारण ते चंचलच आहे. व जर शरीरच सर्व सूखःदूखाच्या मनाला येणार्‍या भोगाचे व म्हनूनच मनाच्या अस्तीत्वाचे कारण मानले तर तर ते नश्ट झाल्या झाल्या मनही काम करणे थांबवेल म्हणजेच शेवटची आठवणही कायम राहणार नाही, इतकच सूचवायचं आहे. केवळ नूसत्या वेदनेमूळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो वा बेशूध्दी येऊ शकते असं वाचलं आहे, तेव्हाम जर वेदना प्रचंड असतील तर चेतासंस्था नीकामी होते असं गृहीत धरायला हरकत नाही. ज्यासहजतेने झोपेचा अंमल आपसूक चढतो अगदी त्याच नैसर्गीक सहजतेने (आपलं मन जागृत असो वा नसो जाणीव असो वा नसो...) आयूष्याचा अंमल उतरतो इतकच म्हणता येइलं. शेवटच्या अवस्थेत शरीराच्या झटापटीची फारशी जाणीव होत नसावी. पाल मेली तरी शेपटी वळवळ करतेच... @पंगा, मी सूध्दा थोडा हात्भार लाऊ म्हंतो... जसकी नाकतोड्यांनी भरलेल्या पोत्यामधे कोणी कोंबून ठेवले गेले. आतून खिळे लावलेल्या बॅरलमधे आपल्याला बंदीस्त करून तो उतारावर गडगडत सोडला. जमिनीत कंबरेपर्यंत पूरल्यानंतर दगडांनी ठेचून मरणे नशीबी आले... वगैरे वगैरे....

पाभे, तब्येत ठीक आहे ना? गेल्या दोन-चार दिवसांपासून कैच्याकैच लेख यायला लागलेत!!

In reply to by सुनील

हो.. खरंच. सर्व ठीक आहे ना? उगीच चर्चा म्हणून करायला जायची आणि कोणीतरी सिरियसली घेत असायचं. सर्वांना विनंती की मृत्यूचा सिरियसली आणि सतत विचार करु नये आणि या धाग्यात काही माहिती आली तरी ती फक्त माहितीच रहावी.

In reply to by गवि

मरणात जग जगते /का मृत्यूमधेच जग जगए अशा काही नावाचं पूस्तक मी मित्राला सहज वाचायला दीलं होतं, त्यावर मृत्यूच्या विविध रूपावर चर्चा केली आहे, जस की आत्महत्या, अपघात, खून, आजारपण, बलीदान वगैरे व इतर बर्‍याच काही गोश्टी.... तो झपाटल्या सारख ते पूस्तक एकांतात ३ दीवस वाचत होता, भेटला तेंव्हा फारच केवीलवाणा झाला होता, सदिव अत्यंत गूर्मीत वावरणारा भूता खेतांच्य गोश्टींची मनसोक्त खिल्ली ऊडवणारा व येता जाता फंकांफूकूम टाइप शिव्या झाडणारा तो विज्ञाननीश्ठ प्राणी असला हबकलेला जाणवत होता व अचानक सर्वांशी(च) इतक्या हळूवारता व प्रेमाचा अतिरेक ठेऊन वागायला लागल होता जणू त्याला तासाभरात जन्मठेपेच्या शिक्षेला पाठवले जाणार आहे. त्याला खास औषधावर सतत आठवडाभर ठेवलं आणी नॉर्मल झाला.

In reply to by मराठी_माणूस

"खास औषध" हेच पूरेसं नाही काय ? शेवटी औषध खास असलं तरी प्रत्येकाला वेगवेगळा ब्रँड कामी येत असल्याने उगीच एकाच कंपनीची जाहीरात कशाला ?

पाभेंनी लिहिल्याप्रमाणे मलाही कधीकधी झोपे मध्ये असे होते. पण मरणाची किंवा त्या वेळी होउ शकेल अशा अवस्थेची कल्पना करणेसुध्दा मला जाम भीती दायक वाटते.

In reply to by सविता००१

अगदी क्वचितच ठीक आहे. वरचेवर होत असेल तर आता अनेक स्लीप स्पेशालिस्ट उपलब्ध आहेत. त्यांना दाखवून घ्या. स्लीप अ‍ॅप्नीआ आणि क्वचित रिलेटेड नार्कोलेप्सी वगैरे नाही ना ते.

साडी खरेदी वरुन डायरेक्ट मरणाची अवस्था ? बाब्बो... शिफॉनचा रेट जास्तच झालाय काय ? ;) बाकी खपायचं असेल तर स्वीझर्लडला जा तिथे कायदेशीर गचकणाची व्यवस्था केली जाते. डेथ टुरिझम इन स्वीझर्लड असे गुगलवर टाईप केल्यास मरण्याच्या सुंदर वाटेची बहुमोल माहिती मिळेल... (यमाला टरकणारा) ;)

अच्छा ! त्यासाठी साडी खरेदीचे आमंत्रण होते तर ! पा.भे., काळजी करत बसू नको बाबा इतकी आताच.१००वर्षांच्यावर चिन्तारहित जगशील हो. पण माझ्या मते 'हार्ट फेल' सारखे सुखाचे मरण दुसरे (स्वतःसाठी) नसावे! अवांतर - तसे ते नसावेही या मताची मी आहे. (...मताचा ?)

वेड लागणार नसेल तर कोणतीही अवस्था मस्तच. आनं मृत्यू म्हनजे कायमच वेडं लागून र्‍हान निश्चीतच न्हव, कारन तेयासाठे मंग वेगळं मरायची काय गरज ? ते तर जितपनीच यवस्थीत लागतया... तवा घाबरायच कारन नाय .. रोज आपन झोपतूच की आपलं अस्तीत्व राहील की नाय याची कालजी न करता... मग काय टेंश्न हाय मृत्यूबाबत त्योच विचार बी पकडायचं ? बस मरताना डोस्क जमेल तेव्हडं थार्‍यावर रायल पायजेल.. तर मृत्यू लय झाक उपभोगता यील असत वाटतय... बाकी नंतर सम्द वोक्के व्हत जातं असाव अस वाटतं.. .. पन आपल्याला या जन्मी तर मरनाचा अनूभव नाय.... ते अ‍ॅस्टलबॉडी प्रोजेक्षन वगैरे बी जमत नाय त्यामूळं काय कल्पना नाय....
याबाबत अधीक माहीती काय आहे?
मरणाच्या अवस्थेची अधीक माहीती मिपाकरांना कशी ठावं असणार ? प्लांशेट करा, ऑटोरायटींग शिका, माननीय विंग कमांडर शशीकांत ओक साहे ऑटोरायटींग करत होते असं त्यांनी वेबसाइटवर नमूद केलयं त्यांना इथे बोलवा वा व्यनी करा .. कारण याबाबत कम्यूनीकेशन झाल्यावर कोणीतरी जाणकार मृतात्मेच यावर जास्त उजेड टाकू शकतील... धागेकाडून सूरू होणारा इशय न्हाय वाटत यो.. मग संपेल तर कसा ?

In reply to by आत्मशून्य

कारण याबाबत कम्यूनीकेशन झाल्यावर कोणीतरी जाणकार मृतात्मेच यावर जास्त उजेड टाकू शकतील
पिडां काका व वेताळ ह्यांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत. मरणांशु देहरिक्तकर

मस्त निवांत झोपेत माझी प्राण ज्योत मावळावी अशी माझी ईच्छा आहे घरच्यांना त्रास नको कोणी रडु नये बोंबाबोंब करु नये दहाव्या बाराव्याला खर्च करु नये पिंडाला कावळा शिवला नाही म्हणुन हळ्हळु नये ;) जगाव का मराव ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असलेला:-कोतवाल

एकतर ना या गविंना चांगले फटके द्यायला हवेत.. सगळ्या विषयांबद्दल कसं काय ईतकं आणि इतकं छान छान लिहु शकतात? वा रे वा? आम्च्या हातात स्वतःच्या जिंदगानीवर थुत करण्यावाचून दुसरं काही म्हणजे काही रहात नाही. (आमच्या म्हणजे माझ्या असं म्हणायचय मला म्हणजे आम्हाला)

मेल्यावर यम भेटला आणि त्याच्याशी संवाद साधता आला तर यम-यमी हे काय प्रकरण आहे ते विचारायचे आहे मनांत. गविंचा प्रतिसाद वाचनीय.

आपला तर या मरणाला भेटायचा प्रवास सुरु झालाय, साधारण हिशोबानं ४९.२४ कोटी सेकंद राहिलेत फक्त, तो पर्यंत मजा करायची आहेच, त्यामुळं काहीच वाटत नाही, एका ठिकाणाहुन निघालेली गाडी दुसरीकडे पोहोचवणा-या ड्रायव्हरला भिती असते ती रस्त्यात होणा-या अपघाताची, जिथं जायचं त्या ठिकाणाची नाही. उलट तिथं गेल्यावर हायसं वाटतं.

In reply to by सूड

''डेथक्लॉकवर क्यालक्युलेट'' ही काय भानगड आहे कळेल काय रे , हे काय नाही वापरलं, आपला जुनाच करार आहे ना मरणाशी, भेटायची वे़ळ ठरवलेलीच आहे.

खरच खुप गहन विषय आहे. या जगात अस्तीत्वात असणार्‍या प्रत्येकाला मॄत्युला कधीना कधी तरी सामोरे जावेच लागणार आहे. आणि केवळ हेच एकमेव शाश्वत सत्य आहे. मानवाला बुध्दीचे वरदान (?) मिळाल्या मुळे अनंत काळा पासुन प्रत्येक मानवाचा औत्सुक्याचा हा विषय आहे. मरण जरी निश्र्चित असले तरी मरणा नंतर काय याचे खात्रीलायक उत्तर अजुन कोणालाही देता आले नाही. पण काही तर्क नक्कीच करता येउ शकतात. आपली पृथ्वी सुर्यापासुन निर्माण झाली आहे असे मानले (तसे पुरावेही उपलब्ध आहेत. पण मला सिध्द करता येणार नाही म्हणुन मानले) आणि आपले शरीर या पॄथ्वीतत्वा (पंचतत्व) पासुन बनले आहे. म्हणजेच पॄथ्वी अस्तीत्वात यायच्या आधी पण आपण अस्तीत्वात होतो. दुसर्‍या कोणत्या तरी स्वरुपा मधे. सध्याच्या आवस्थे मधे आपल्याला त्याची कल्पना करता येत नाही कारण आपली ज्ञानेंद्रीय एका मर्यादेत बांधली गेली आहेत. पण आपल्याला माहीत आहे ते म्हणजे संपुर्ण जग आहे असे मानण्यात काहीच अर्थ नाही. विज्ञानाचा दुसरा सिध्दांत. उर्जा ही कधीच नष्ट होत नाही. फक्त उर्जेचे स्वरुप बदलत असते. पण उर्जेचा मुळ स्त्रोत शाश्वत असतो. वर म्हणल्या प्रमाणे आपण एका उर्जेपासुनच तयार झालो आहोत. मरण म्हणजे फक्त आपण ज्या उर्जे मुळे अस्तीत्वात आहोत त्याचे दुसर्‍या कोणत्यातरी स्वरुपात स्थीत्यंतरण असावे. मरण म्हणजे स्थीत्यंतर घडणे / सध्याचे अस्तीत्व संपून नविन स्वरुपात बदलणे या अर्थाने आपण घेतले, तर जसे मी वर म्हणालो की "या जगात अस्तीत्वात असणार्‍या प्रत्येकाला मॄत्युला कधीना कधी तरी सामोरे जावेच लागणार आहे", तसे मरण प्रत्येकालाच येणार आहे. म्हणजे फक्त मानव, प्राणी पशु पक्षी, झाडेच नाही तर आजुबाजुचे दगड, माती, डोंगर, नद्या, समुद्र, सुर्य, चंद्र, ग्रह तारे सगळ्यांना मरण अटळ आहे. कारण सतत बदलत रहाणे हाच या विश्र्वाचा शाश्वत गुणधर्म आहे. याचाच अर्थे मॄत्यु म्हणजे केवळ एक बदल आहे.
वासांसि जीर्णानी यथा विहाय, नवानि गॄहीणान्तीं नरोsपराणि, तथा शरीराणि विहाय जिर्णान्य न्यानी संयाती नवानी देही
धरणात साठलेल्या पाण्या सारखी आपली सध्याची आवस्था आहे. आपण सुध्दा या धरणात फार रहाणार नाही. पण धरणाच्या भिंतीपलीकडे काय आहे ते आपल्याला माहीत नाही. अणि आपण कीतीही लाटा उसळवुन उंच जायचा प्रयत्न केला तरी धरणाच्या उंच भिंतीपलीकडे आपण काही पाहु शकत नाही. दरवाजा कधी उघडतो याची वाट पहाणे आपल्या हातात आहे. एकदा दरवाजा उघडला की आपली कितीही इच्छा असली तरी आपल्याला धरणात थांबता येत नाही. म्हणुन आपण आपले उसळणे थांबवायचे का? तर नाही कारण धरणातल्या थोड्यातरी पाण्याची वाफ होतच असते ना? न जाणो आपल्याला ही अशी आवस्था कधी तरी प्राप्त होईल आणि या साठी सगळ्यांपेक्षा सतत वरती तयारीत रहाणे गरजेचे आहे. अर्थात मला माहीत आहे हे सगळे लिहायला वाचायला फार छान वाटत असले तरी माझ्या मरणाच्या वेळी माझी प्रतिक्रीया कशी असेल ते मी आत्ताच ठाम पणे सांगु शकत नाही.