चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा बोलेना, चाफा चालेना
खर आहे चाफा कधी बोलला नाही, कधी चालला नाही पण बालपणीच्या मधुर आठवणी मात्र मनात साठवुन आहे अजुन. लहानपणी घराच्या पडविला लागुनच एक चाफ्याचे झाड होते. इतके जुने होते की एखाद्या देवळातल्या पुरातन खांबाइतके जाडे होते. आजीला त्याची फुले देवाला वाहण्यासाठी लागायची. ती खाली पडलेली किंवा काठीने काढता येतील अशी फुले घेउन देवाला वाहायची. मग तिला फुले काढून द्यायची म्हणून मी कधी कधी झाडावर चढायचे. झाडावर चढणे सोपे होते कारण झाड थोडे बैठे आणि पडविच्या पत्र्यावर आलेले होते. त्यामुळे पत्र्यावर चढून ही फुले काढता यायची. हे झाड म्हणजे पत्र्यावर चढण्याचा जिनाच होता. पत्र्यावर चढण्याच्या आकर्षणामुळे मला ही फुले काढायला खुप आवडायची.
फुले नसली काढायची तरी कधी कधी खेळ म्हणून मी ह्या झाडावर चढून पडविच्या पत्र्यावर जाउन बसायचे. त्या चाफ्याच्या पाकळ्या काठायच्या त्याचे हार बनवायचे, असे उद्योगही चालायचे. चाफ्याचे झाड ठिसुळ असते, फांदी कधीही तुटू शकते म्हणून घरचे काळजीने ओरडायचे. पण लहानपणीचा हट्ट, जिज्ञासा आणि उस्तुकतेने मला ह्या झाडावर चढायला कधी आळा घातला नाही.
काही दिवसांनी आमच्या घराच्या डागडुगीचे काम निघाले. त्यात पडविचा पत्रा काढून स्लॅप टाकायचा ठरले. मी आनंदात होते. आता पत्र्या ऐवजी स्लॅपवर चढून फुले काढता येतील, व स्लॅपवर खेळायला मिळेल. पण माझ्या बाल मनाला हे लक्षातच आले नाही कि हे झाड पत्र्यावर पुर्ण झुकल्यामुले पत्रे काढताना व स्लॅब घालताना अडथळा आणेल. दुर्देवाने ते झाड काढावे लागले व आता फक्त त्या झाडाच्या आठवणी माझ्या मनात आहेत.
चाफा बोलला नाही, चालला नाही तरी त्याचे अस्तित्व मात्र लगेच जाणवते. दुरवर डोंगरात असलेला चाफा त्याच्या रुपावरुनच ओळखता येतो. ग्रिष्मात ह्या चाफ्यावर पाने कमी असुन फुलेच ह्या झाडाचे रुप, रंग, आकार नावारुपाला आणतात. चाफ्याचा मंद सुगंधही मोहक असतो. ह्या चाफ्याच्या झाडाला क्वचित शेंगा लागतात. त्या शेंगा खाण्यासाठी साप ह्या झाडावर येतात असे म्हणतात. तसेच ह्या शेंगेतील बीचा साप चावल्यावर होणार्या दंशावर औषधी आहे असेही म्हणतात.
ग्रामिण भागात कृष्ण्जन्म, रामजन्माला ह्या चाफ्याला विशेष महत्व असते. चाफयाच्या फांद्या अगदी ठिसुळ असतात. पुर्वी पांढरा आणि मध्ये पिवळा असा चाफा डोंगर, रानात व इतरत्र दिसुन यायचा ज्याच्या फुलांबरुनच तो दुरवरुन ओळखला जायचा व अजुनही काही भागात दिसतो. आता ह्या चाफ्याचे विविध रंग व रुपही आले आहेत. त्यांची लागवड बागेतही केली जाते. पण ह्या झाडांचा पर्णसंभारही जास्त असतो.
लाल चाफा
हे गुलाबी चाफ्याचे झाड
ह्या चाफ्याची गगनाला भिडण्याची इच्छा पहा.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
फ्रेश!
जागु तै, कलादालनात तुम्ही जे
मलाही अंगठीच आठवली..
:)
अप्रतिम!! तुझ्या लिखाणात
मला 'चाफा' हा धडा आठवला..
छान..
छान आणी माहितीपूर्ण लेख!
मस्त
छान .. पांढरी फुले माझी
चाफा आणि केवड्याचे बन
जागु ताई मी जम्मूला एका बागेत
मस्त...
स्वैर परी, मस्त कलंदर, किसन,
जागुताई! अगदी आनंदाने..
शेराचा चीक
वाह वा. छान.
अप्रतिम!
चिंतामणी, योगप्रभु नाही नाही
ओ के.