Skip to main content

पुढील तपास सुरु आहे...

लेखक जयनीत यांनी सोमवार, 18/07/2011 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
गावात बलात्काराची घटना घडली. आरोपी फरार होता. जनमानस संतप्त होते. पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांची लोकां प्रती सहानुभूती होतीच. कठोर कारवाईचे आश्वासन मिळाले. जाणकारांच्या मते कितीही कठोर कारवाई झाली, तरीही आरोपीला जास्तीत जास्त सात वर्षे शिक्षा होणार होती. काय! फक्त सात वर्षे? अशांना तर भर चौकात ठेचून काढायला हवे. लोकांचे मत पडले. दूस-याच दिवशी गावा जवळील शिवारात आरोपीचा मृतदेह सापडला. प्रार्थमिक चौकशी नंतर आरोपीला लाठया, काठया आणि दगडांनी ठेचून मारण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. घटना स्थळी कुणीही सापडले नव्हते. अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गाव हळूहळू पुर्वपदा वर आले. घटने नंतर दोनच महिन्यांनी बलात्कारित मुलीने मात्र आत्महत्या केली. यंत्रणा पुनश्च सक्रीय झाली. आत्महत्ये मागील कारणे शोधून काढण्याचे आदेश निघाले. पुढील तपास सुरु आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1927
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हमममम...