Skip to main content

होतकरू झाड

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 18/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
होतकरू झाड मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा                                                  गंगाधर मुटे ----------------------------------------------------- (नव्या यमांची नवीन भाषा    या गझलेतील शेर)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3229
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

तुमच्या निरीक्षणशक्तीला सलाम! उत्तम फोटो, आणि समर्पक संदर्भ. (अशाच दुर्दम्य चिकाटीची भारताच्या समाजमनाला गरज आहे असं वाटून गेलं.)

विसुनाना आणि बहुगुणी या दोघांशीही सहमत.

दगडाच्या सांदीकपाऱ्यांतून खोलवर गेलेली मुळं झाडाच्या जीजिवीषेविषयी खूप काही सांगून जातात. दाद मागतात. हे चित्र काहींना शेतकऱ्याच्या तगून राहाण्याचं प्रतीक वाटेल. काहींना ते भारतीय लोकशाहीसाठीचं रूपक वाटेल. काहींना त्यात एकंदरीतच जीवनाच्या चिकाटीचं चित्र दिसेल.

असे झाड, मुळं पाहिली नाहित कधी.