Skip to main content

कॉकटेल लाउंज : गाथा लिक्युर्सची (Liqueur)

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 14/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कॉकटेल लाउंज 1 कॉकटेल लाउंज : गाथा व्हिस्कीची मागच्या धाग्यात व्हिस्कीची गाथा मांडली होती, आता ह्या भागात लिक्युर्सची गाथा मांडतोय. डिस्क्लेमर: माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी खरडत आहे, चूकभुल देणे घेणे ज्या काळात किमयागार कुठल्याही धातुचे सोन्यात रुपांतर करणार्‍या परीसाच्या शोधात होते तेव्हा Bénédictine किंवा Monk (भिक्षु) ही मंडळी रामबाण अशी मात्रा (Potion) तयार करण्यात दंग होती. वेगवेगळ्या प्रकारच्या जडीबुटी, झाडपाला, मुळ्या, बीया, मसाले, फुले, फळे अश्या गोष्टींच्या मिश्रणापासून तयार होणारी ही मात्रा (Potion) हे मॉन्क्स औषधी उपचारांसाठी वापरत. पण मणुष्यप्राणी हा जात्याच उठाठेवी करण्यात पारंगत आहे. (अगदी बाबा आदमपासून, त्याच्या ‘ उठा ’ठेवींमुळेच तर तुम्ही (मीही) हा धागा वाचण्यास ह्या जगात आहोत ;) ) इटली, फ्रांस इथल्या काही चळवळ्या, उठाठेवी आणि कलाकार आत्म्यांनी लगेच ह्या मात्रेपासून मेंदुला झिंग आणणारे, मादक असे काहीतरी बनविण्याचे प्रयत्न चालू केले आणि त्यांच्या ‘प्रयत्ने वाळू रगडीता...’ ह्या चालीवर ‘प्रयत्ने मिश्रणॆ करता...’ अशा प्रयत्नांना यश येउन, मित्रांनो, लिक्युर तयार झाली. तर ‘हर्बल मेडीसीन’ ह्या वैद्यशास्त्राच्या शाखेपासून अचानकपणॆ मनुष्यप्राण्याला प्राप्त झालेला हा अदभुत चमत्कार म्हणजे ‘लिक्युर्स’ होय. लिक्युर हा शब्द ‘Liquefacere’ ह्या लॅटीन क्रियापदापासून घेण्यात आला आहे. ‘Liquefacere’ म्हणजे To extract Aroma and Flavor (मराठीत नाही हो हे लिहीता आले :( ) लिक्युर तयार करण्याची पद्धत ही अशीच असल्यामुळे त्या मादक मिश्रणाला लिक्युर हे नाव सार्थ झाले. लिक्युर ही मुख्यत्वे फळांपासून तयार होत असल्यामुळॆ ही चवीला गोड असते. त्यामुळे लिक्युर ही ‘आफ्टर डीनर’ ड्रींक म्हणून वापरात येउ लागली. क़ॉकटेल्सचे तर पानच हीच्यावाचून हलू शकत नाही. क़ॉकटेल्स मधे वापरण्यात येणारी काही लिक्युर्स (माझ्या माहितीतील) आता बघुयात. 1. हर्ब बेस्ड लिक्युर्स 1.1 बेनेडीक्टाइन (Benedictine) ही फ्रेंच लिक्युर 26 ते 27 प्रकरच्या औषधि वनस्पतींनपासून बनवली जाते. 40% अल्कोहोल असलेली ही लिक्युर पंधराव्या शतकात शोधली गेली. ह्या लिक्युरच्या बाटलीवर D.O.M Deo Optimo Maximo असे लिहीलेले असते, त्याचा अर्थ To God, Most Good, Most Great असा होतो. मी ही लिक्युर वापरलेली नाही, त्यामुळॆ जास्त काही माहित नाही चवीबद्दल. 1.2 चारत्रुस (Chartreuse): ही लिक्युर फ्रेंच चारथुसिअन मॉन्क्सनी 130 वेगवेगळ्या औषधि वनस्पतींनपासून बनवली. फारच छान आणि ऎरोमॅटीक चव असते. शॉट ग्लास मधे घेउन एक एक सीप घेउन चव जीभेवर रेंगाळत ठेउन आजमावयाची चीज आहे ही लिक्युर. मी ही लिक्युर एका दारू सेशन (4-5 पेग डाउन) नंतर घेतली होती, एक मित्र घेउन आला होता. त्यानंतर जे काही झाले ते मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये ;) 50-55% अल्कोहोल असते ह्या लिक्युर मधे. एका आठवड्यानंतर धीट होउन मग छान चवीचा आस्वाद घेतला. 2. संत्रा लिक्युर्स 2.1 ग्रॅंड मार्निअर (Grand Marnier): मोस्ट पॉपुलर आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी लिक्युर संत्र्यापासून बनवतात. कोन्यॅक ह्या ब्रॅंडीच्या आणि दर्जेदार कॅरेबिअन कडू संत्र्याचा सुकवलेल्या सालीच्या मिश्रणापासून ही लिक्युर बनवली जाते. 40% अल्कोहोल कंटेंट असते ह्या लिक्युर मधे.स्वतःची एक ओळख आहे ह्या लिक्युरची म्हणूनच ग्रेड 1 ची ऑरेंज लिक्युर म्हणून गणली जाते आनि भयानक महाग असते. 2.2 कॉइंत्रु (Cointreau): मोस्ट पॉपुलर अशी ही लिक्युर संत्र्यापासून बनवतात. कॉइंत्रु हे नाव ही लिक्युर शोधणार्‍या आणि बनविनार्‍या कुटुंबाच्या आडनावावरून पडलेले नाव आहे. बहुतेक प्रख्यात क्लासिक कॉकटेल्समधे ही लिक्युर वापरली जाते. ही ऑन दी रॉक्स सुद्धा रात्रीच्या जेवणानंतर भारी असते. 2.3 ट्रिपल सेक (Triple Sec): सगळ्या 40% अल्कोहोल असणार्‍या ट्रिपल डिस्टील्ड ऑरेंज लिक्युर जनरली ट्रिपल सेक म्हणून ओळखल्या जातात. ह्या गरीबांच्या कॉइंत्रु किंवा ग्रॅंड मर्निअर असतात. 2.4 ब्लु कुरासाओ (Blue Curacao): कॅरेबिअन बेटांवर मिळणार्‍या कडू संत्र्याचा सुकवलेल्या सालीपासून ही लिक्युर बनबवली जाते. हीचा रंग निळा असतो. निळ्या रंगांची कॉकटेल्स जर दिसली किंवा प्यायलात तर खुशाल समजा कि त्यात ब्लु कुरासाओ आहे म्हणून. बोल्स हा नेदरलॅंड्चा ब्रॅन्ड फेमस आहे ब्लु कुरासाओसाठी. 3. इतर फळांच्या लिक्युर्स 3.1 ऎमरेटो (Amaretto): ही इटालीअन लिक्युर आहे. (इटलीची ऎलर्जी असणार्‍या ‘चड्डीवाल्यांना’ कदचित ह्या लिक्युरचीसुद्धा ऎलर्जी येण्याची शक्यता आहे ;)  ह.घ्या. हे सांगणे न लगे) ही लिक्युर बदाम किंवा ऎप्रिकॉट (जर्दाळू) पासून बनवली जाते. व्हिस्की बेस्ड किंवा स्ट्रॉंग चव असणार्‍या लिकर बेस्ड कॉकटेल्स मधे गोडवा आणण्यासाठी ही लिक्युर वापरतात. 3.2 शॅम्बोर्ड (Chambord): फ्रान्समधे बननारी ही लिक्युर रास्पबेरी फळापासून बनवितात. 3.3 ग्रेनेडाइन (Grenadine): डाळिंबापासून बनवलेली ही लिक्युर कॉकटेल्स साठी मस्ट असलेली आणि मिक्सिंगसाठी जास्त वापरली जाणारी लिक्युर आहे. ऑरंज ज्युस वापरून ‘सनराइज’ किंवा ‘सनसेट’ असा इफेक्ट आणण्यासाठी ह्या लिक्युरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.  3.4 पॅसोआ (Passoa): पॅशन फ्रुटपासून बनवली जाणारी ही एक फ्रेच लिक्युर आहे. मागे गोव्यावरून पॅशन फ्रुटची Passion अशी ह्या Passoa ची भ्रष्ट नक्कल असलेली लिक्युर मी आणाली (स्वस्तात मिळाली हो) चवीला आणि इफेक्टला छान आहे, पैसा वसूल आहे. 3.5 मिदोरी (Midori): जपानची लिक्युर कॅटेगरीला दिलेली ही देणगी आहे. मेलनपासून बनवलेली ही लिक्युर जपानच्या प्रख्यात सांतोरी डिस्टीलरी मधे बनवली जाते. जपानी भाषेत हिरव्या रंगाला मिदोरी म्हणतात. ह्या लिक्युरच्या हिरव्या रंगावरून हीला मीदोरी हे नाव देण्यात आले आहे. 3.6 सदर्न कंफर्ट (Southern Comfort): ही अमेरीकन लिक्युर बर्बन व्हिस्की, सायट्रस आणि पीच ह्यांच्या मिश्रणाने बनवतात. 3.7 मालिबु (Malibu) ही लिक्युर रम आणि नारळाच्या पाण्यापासून बनवली जाते. डार्क रम बेस्ड कॉकटेल्स मधे ही लिक्युर प्रामुख्याने वापरली जाते. 4. क़्रीम (Crème) लिक्युर्स: ह्या लिक्युर्स Cream लिक्युर्स पेक्षा वेगळ्या असतात, फळांपासून बनवलेल्या. ह्यांमधे डेअरी प्रोडक्ट्स नसतात. 4.1 क्रीम दे कसाओ (Crème De Cacao) Cocoa च्या बीयांपासून (Beans) ही लिक्युर बनवतात. 4.2 क्रीम दे कॅसिस (Crème De Cassis) जांभळ्या रंगाच्या ब्लॅककरंट फळापासून बनवलेली ही एक फ्रेंच लिक्युर आहे. 4.3 क्रीम दे मेन्थ (Crème De Menthe) पुदीन्या पासून बनवलेली ही एक हिरव्या रंगाची गोड लिक्युर आहे. 5. डेअरी प्रोडक्ट लिक्युर्स ही कॅटेगरी माझी भयंकर आवडती आहे. 5.1 बेलीज आयरीश क्रीम (Bailey’s Irish Cream): जगात सर्वात जास्त आवडली जाणारी आणि प्रख्यात अशी ही लिक्युर आयरीश व्हिस्की, चॉकलेट आणि क्रीम (आयरीश साय) ह्यांच्या मिश्रणाने बनवली जाते. 17% अल्कोहोल असलेली ही लिक्युर कॉफी बेस्ड किंवा क्रीम बेस्ड कॉकटेल्स मधे वापरली जाते. ऑन दी रॉक्स सुद्धा अतिशय चवीष्ट असते, आणि सर्रास ऑन दी रॉक्स घेतली जाते. माझी स्वतःची अत्यंत आवडती लिक्युर आहे ही. 5.2 कलुआ (Kahlua): अरेबिका कॉफी बीन्सपासून बनवली जाणारी ही एक प्रसिद्ध आणि अतिशय चवदार अशी लिक्युर आहे. ऑन दी रॉक्स तर भारीच लागते ही लिक्युर.  आफ्टर डीनर कॉकटेल्ससाठी जास्त उअपयोग केला जातो. ( मालिकेतील पुढचे कॉकटेल ह्या लिक्युर वर आधारीत आहे.)   अश्या प्रकारे लिक्युर्सची गाथा इथेच संपवतो. नोट: सर्व इमेजीस आंतरजालावरून साभार.

वाचने 13990
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

आमच्या सारख्या न पिणार्‍यांनाही उतम माहिती मिळवून दिलेली आहे आणि या माहितीबद्दल अत्यंत आभारी आहे. यांची चव घेणे, इस जनममें ना सही, सगळी माहिती बाकी फार्फार आवडली. एक शंका -
ऎप्रिकॉट (नारिंगी)
इथे कंसात जर्दाळू हवं होतं का?

In reply to by प्रास

काल गुगलल्यावर चुकीचे उत्तर मिळाले म्हणायचे. जर्दाळू हवे कंसात. दुरुस्तीबद्दल धन्यवाद. चीयर्स :beer: - (चुकाखोर) सोकाजी

लिक्युअर.. हं. केनियातून आलेल्या कोणीतरी हत्तीचं चित्र असलेली छोटीशी बाटली दिली होती. चॉकोलेट लिक्युअर म्हणून लिहिलेली.. नुसतीच पिऊन पाहिली तर घशात फारच लागली. तशीच हत्तीच्या चित्राची अजून एका फळाचं नाव लिहिलेली पण बाटली होती. नावच विसरलो च्यामारी..

In reply to by गवि

केनियातून आलेल्या कोणीतरी हत्तीचं चित्र असलेली छोटीशी बाटली दिली होती. चॉकोलेट लिक्युअर म्हणून
ही तर नाही? "अमारुला"

In reply to by गवि

चॉकलेट लिक्युअर (काही लोक 'लिकर' सुद्धा म्हणतात) जेवणान^तरन्तर सहसा घ्यायची असते-अपोष्णी घेतल्यासारखी! ___________________________________

कोणाला कशाचा छंद आणि व्यासंग असेल सांगता येत नाही, पण ही माहिती खूपच उपयोगी पडेल असं वाटतंय. उत्तम लेखमालेबद्दल धन्यु. पूर्वी एकदा एका मित्राने त्याच्या घरी जेवायला बोलावले होते तेव्हा कुठलीशी 'प्लम वाईन' दिली होती. मी ह्या क्षेत्रातला (खरं तर कुठल्याच क्षेत्रातला) दर्दी नसल्याने नाव आणि प्रकार लक्षात नाही, पण 'चव' मात्र चांगलीच लक्षात आहे, चक्क 'गोड' लागत होती. पण हे सांगितलं तर दर्दी लोक वेड्यात काढतात ... :)

In reply to by योगेश गाडगीळ

>>स्वीट वाईन्स गोडच लागनार ना! ऑ ? स्वीट वाईन गोड लागते ? काय चेष्टा करता राव, उद्या बियर 'कडू' लागते असे म्हणाल ;) - छोटा डॉन

हा ही लेख झ का स ! वाचनखूण साठवील्या गेली आहे. आपण तर बॉ लिक्युअर चॉकोलेटस बरीच खाल्ली आहेत. *चित्तार अंतरजावरून साभार.

In reply to by गवि

१) कुठेशी मिळतात - पुण्यात कॅंपात, दोराबजी मधे मिळतात. तुम्ही घरीही करू शकता. कॅंपात चॉकलेट स्लब्स आणि मोल्ड मिळतात. २) चढतात का? - ज़नरली चढण्यासाठी खाल्ली जात नाहित. पण साधारण 5-10 मिली लिकर किंवा लिक्युर असते त्यात. ३) चढत असल्यास किती खाल्ल्यावर? - वरच्या क्वांटीटी नुसार तुम्हाला किती खावी लगतील ते बघा, पण त्याबरोबर किती भरमसाठ कॅलरीज पोटात जातील ह्याचाही विचार करून ठेवा ;) - (लिक्युर चॉकलेटमय) सोकाजी

In reply to by सोत्रि

१) कुठेशी मिळतात - पुण्यात कॅंपात, दोराबजी मधे मिळतात. तुम्ही घरीही करू शकता. कॅंपात चॉकलेट स्लब्स आणि मोल्ड मिळतात
पण मला तर हे रम बॉल्स वाट्त आहेत

(इटलीची ऎलर्जी असणार्‍या ‘चड्डीवाल्यांना’ कदचित ह्या लिक्युरचीसुद्धा ऎलर्जी येण्याची शक्यता आहे Wink ह.घ्या. हे सांगणे न लगे) हे लिहून आपण चाचांच्या अथवा भौंच्या गटात आहोत हे दाखवायचा प्रयत्न केवीलवाणा वाटला.

In reply to by चिंतामणी

चिंतामणीभौ, तुम्ही नावाला एक्दम जागता का हो? फारच चिंता ब्वॉ तुम्हाला माझा कंपु शोधण्याची. पण चिंता करू नका, मी कोणाच्याही गटात नाही आणि केविलवाणे प्रयत्न तर मी कधीच करत नाही. एक घाव दोन तुकडे हा मराठमोळा खाक्या आहे आपला. पण आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद, तुम्हाला धागा छान वाटला ह्याचा आनंदही झाला. - ( चिंता'खणी', 'अ'कंपुबाज आणि 'अ'केविलवाणा ) सोकाजी

In reply to by चिंतामणी

पण चड्डीवाल्यांचे (पैकी काहींचे) मूळ इटलीदेखिल असू शकते, असे इथेच कुणीतरी लेख लिहून म्हटले होते ना? मग त्यांना इटलीची अ‍ॅलर्जी ती कशापायी?

In reply to by सुनील

पण चड्डीवाल्यांचे (पैकी काहींचे) मूळ इटलीदेखिल असू शकते
ह्यांचे मूळ तर हाँगकाँग पर्यंत देखील पसरल्याचे नुकतेच आढळले आहे.