बळी कान पिळी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मुंबई .. मायानगरी मुंबई.. हिची काय महती.. एक रात्र्रीत रंकाला राव आणि रावाला रंक बनविणारी ही जादू नगरी... ह्या नगरीत राहणारे लोकही असेच, हरहुन्नरी!! याच नगरीच्या कुठल्याश्या कोपर्यात घडलेली हि कथा.. कहाणी एक प्रेमाची!
“काय आज कामावर नाही जायचं का?”, आईचा वरच्या पट्टीतला सूर ऐकून विशाल आळस झटकून एकदाचा उठला. उठला कि पहिला भटक्या, SMS कुणाकुणाचे .. ८:०४ च्या लोकल आधी स्टेशनवर भेट .. नाव: ती .. हो तीच, ती आठवली आणि झटकन एक हास्याची लकेर त्याच्या चेहऱ्यावर झळकून गेली. मात्र पाणी भरणाऱ्या आईच्या नजरेतून नाही सुटली. पुन्हा तिचा टेप चालू होताच, विशाल पळाला.. तसेही त्याला लोकल गाठायची होती..
धावतच तो बिल्डींगच्या पायऱ्या उतरल्या.. कितीही प्रयत्न केला तरी उशीर झालाच होता. स्टेशन घरापासून फार लांब नव्हते, धापा टाकत तो स्टेशनवर पोचला.. लोकल तर कधीच निघून गेली होती. पण ती थांबली असेल अशी अंधुक आशा त्याच्या मनात होती. प्लँटफोर्मवर पोचून त्याने दूरपर्यंत नजर टाकली.. गर्दी नसल्याने ती दिसेल अशी अपेक्षा होती.. पण ती नव्हती. तेवढ्यात भटक्या कुरकुरला.. प्लँटफोर्मवर काय करतोयस, टपरीच्या मागे ये .. ती. दोन सेकंद हा बधीर.. हिला एक्से कळले.. भानावर येऊन त्याने रस्ता पकडला.. स्टेशनच्या समोरच टपरी.. तिला सहज समजल असणार! आणि ती समोर .. त्याचा स्वतःवर विश्वास बसेना, ही खरच समोर उभी आहे.. तो खुळ्यासारखा तिच्या कडे पाहत राहिला.. अनिमिष नजरेने! तिच्या गोऱ्या गालावर पूर्वेचा रक्तिमा पसरला, आधीच गुलाबी असलेले गाल.. अजूनच गहिरे झाले.
“साले, सिर्फ देखता हि रहेगा या कुछ बात भी करेगा?”, मागून थाप मारत अविनाश बोलला, अतसे दोघे वास्तवात आले. “तेरे लिये मैने स्वातीसे कहके, इसको रोका.. मुझे पता था तू हमेशा की तऱ्ह लेट होगा”, अविनाशची गाडी थांबायला तयार नव्हती. तशी स्वाती तिच्या जवळ जाऊन जाऊन तिला घेऊन आली, विशालने खिशातून सांभाळून आणलेला गुलाब तिला दिला.. तिने ही मंद हसून तो स्वीकारला. काही बोलायची गरज ओठांना वाटलेच नाही.... सगळा संवाद नजरेतून हृदयाशी हृदयाचा!!
अविनाशच्या आग्रहावरून ते हॉटेलात आले. वाटेत साहेबाला एसमेस करून, विशालनी सुट्टी सांगितली. अंजली, म्हंजे ती, कॉलेजला जाणारी, स्वाती तिची मैत्रीण आणि अविनाशची सखी. विशाल आणि अविनाश एकाच बिल्डींगमध्ये पण वेगवगळ्या ऑफिसात काम करायचे. बिडी-काडीची ओळख घट्ट मैत्री केव्हा झाली, त्यांनाही कळले नसेल. नास्ता करून अविनाश स्वातीला घेऊन बाईकवर निघून गेला. रोज फोन, एसेम्स वरून नको इतके बोलणाऱ्या या दोघांना बोलायला विषय सापडत नव्हता. शेवटी स्वातीची गाडी घेऊन, दोघे निघाले .. निवांत ठिकाणी जाऊन दोन शब्द बोलायला.
एक मस्त आयुष्य सुरु झाले.. प्रेमात पडल्यावर माणूस सुधारतो हे खर असेल सुध्दा.. रोज आईनी शंख केल्यावर उठणारा विशाल.. वेळेच्या आधी तयार होऊन स्टेशनवर वाट पहायचा! रोजचा प्रवास एकाच लोकलनी .. स्टेशनवरच त्याने तिला पहिले होते.. पहाताच प्रेमात पडावे अशीच होती ती.. ह पण पडलाच. पण अविनाशनी प्रयत्न पूर्वक त्यांची भेट घडवून आणली, स्वातीने पुढाकार घेतला.. म्हणून आज ते दोघे एकत्र होते. दिवस कसे भुरकन उडून जातात.. बघता बघता ह्यांची लव्ह स्टोरी जुनी सुध्दा झाली. पण त्यांचे प्रेम तितकेच नवीन होते.
१५ ऑगस्ट .. लागून सुटटया आल्या, तसा अविनाशनी प्लॅन बनवला, अलिबागचा !! दोन दिवस जाऊन मजा करून यायचं असा ठरलं. बुकिंग वैगरे त्यानेच सांभाळून घेतला.. आणि सगळे निघाले. पनवेल सोडून गोवा हायवेला गाडी लागली.. पावसाने न्हाऊ-माखू घालून सृष्टी पुन्हा टवटवीत झाली होती. मस्त फोटोसेशन करत, गप्पा झोडत प्रवास करताना अलिबाग कधी मागे पडले हे त्यांना समजले नाही. प्रत्यक्षात अविनाशने एक सरप्राईझ द्यायचे ठरवले होते. काशीद – मुरुड रस्त्यावर एका गावात समुद्र किनार्या पासून जरा लांब त्याने एक छोटेखानी घर शोधून काढले होते. तिथे तो सर्वाना घेऊन आला. मुख रस्त्यापासून काहीसे आत असलेले, आजूबाजूला फारशी वस्ती नसलेले.. पण पुरेपूर निसर्ग सौदार्याने नटलेले ते हॉटेल भद्रकाली अंजलीला फार आवडले. विशाल थोडासा नाराज झाला, त्याला एवढा एकांत रुचट नव्हता. मुंबईची सवय.. पण अंजली खुश आहे हे पहाताच तोही विरघळला..
म्हणायला हॉटेल, खरतर ते एक बसक घर होते. प्रवेश केल्यावर समोर छोटा व्हरांडा कम हॉल.. तिथेच चेक-इन, आणि थंडगार कोकम सराबतानी स्वागत करण्यात आले. हॉल मध्येच उजवीकडचा जीना चढला की वरच्या मजल्यावर ३ प्रशस्त रुम. खालच्या मजल्यावर डावीकडे किचन आणि अजून १ -२ खोल्या असाव्यात. प्रवासाचा थकवा वैगरे भानगड ह्या पोरांना कुठून ठावूक असायला.. चेक-एन करून फ्रेश झाले आणि परिसर पहायला बाहेर पडले ही. सुरवातीला सोबत असलेले चौघे, जोडीने पांगले.
विशाल-अंजली चालता चालता, त्या घराच्या मागच्या बाजूला आले. तिथे मस्त फुलबाग फुलवली होती. गुलाब, अबोली, जाई, जास्वंद, अनंत, चाफा सगळी झाडे फुलानी डवरली होती. त्या फुलाबागेचा आनंद लुटत, हे प्रणयी जोडप मुक्त वावरत होत. थोड पुढे गेल्यावर, बागेच्या मध्यभागी एक सुबक बांधलेली विहीर होती.. गम्मत म्हणून विहिरीत वाकून पाहणार तोच मागून आवाज आला.. “ए पोरी, जीव प्यारा नाय का तुला, काय बघातीयास त्यात??” .. दोघेही दचकले. मागे वळून पहातात तो तिथे कोणीच नाही. अंजली घामाघूम झाली, विशालच्या तळहाताला फुटलेला घा, त्याची परिस्थिती सांगून गेला. आजूबाजूला असलेला हवाहवासा एकांत त्यांना आता भेडसावू लागला, मंद वार्याने होणारी पानांची सळसळ नकोशी झाली. कापऱ्या आवाजात विशाल ओरडला “हरामखोर कोण आहे तिकडे?” त्याच्या अवाजातली भीती लपत नव्हती. २ -३ मिनिट काहीच उत्तर येईना, तसा विशालचा धीर परत आला. त्याने परत आवाज दिला. अंजली घाबरून त्याला बिलगली होती..वेळ ओळखून तो आल्या वाटेवर परत फिरले. तसा झाडामागून अविनाश आणि स्वाती हसत हसत बाहेर आले. त्यांचा आवाज ऐकून विशाल थबकला, त्याने मागे वळून पाहिले.. दोघाना हसताना पाहून, त्याचे लाईट लागले .. आपला मामा केला हे लक्षात येताच तो ही हसू लागला. अंजलीला मात्र हे चेष्टा बिलकुल आवडली नव्हती. ती तशीच फणकार्यानी प्पुढे निघून गेली. तिला समजावायला म्हणून हे तिघे तिच्या मागोमाग निघाले. जेवणाची वेळ झालीच होती, तेव्हा अंजलीचा राग शांत करून सगळे जेवायला आले.
माश्यांचे झणझणीत कालवण, तांदळाची गरम भाकरी, सोबत दही-कांदा असा साधाच पण फक्कड बेत पाहून, त्यांना पोटातल्या वड्वानालाची आठवण झाले, प्रेम मनाची भूक भाव्गावतो.. पोटाची आग विझवायला अन्नाच लागतं. जेवणावर आडवा हात मारून आपापल्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेलेले चौघ डायरेक्ट दिवेलागानीलाच जागे झाले. एवढी झोप कशी लागली, याचा विचार करत विशाल गच्चीत आला.. तर समोरचा सूर्यास्ताचा अनुपम देखावा त्याचे मन मोहून गेला. ते विलक्षण सौंदर्य पहात तो काही क्षण तिथेच रेंगाळला. मागून येऊन अंजलीने त्याला मिठी मारली, तसा तो सावरला. त्याने तिला पुढ्यात घेतले, गुजगोष्टी करत दोघे सूर्यास्ताची मजा घेत होते. स्वाती, अविनाश बाजूला येऊन उभे राहिल्याचे त्यानी पाहिलेही नाही.. प्रेमी युगुल स्वतःत दंग असते, आजूबाजूला काय चालले आहे, याचे भान त्याना सहसा रहात नाही. त्यांना एकेमेकात दंग झालेले पाहताना स्वातीच्या डोळ्यात दाटलेला विखार लालबुंद तेजोनिधीलाही लाजवत होता, हे एकाद्या अजान बालकालाही कळले असते.
असाच काही वेळ गेला, विशालचे लक्ष अविनाश कडे गेले आणि त्यानी अंजलीची मिठी सैल केली. काहीश्या नाराजीने विशालकडे पहाताना, तिला त्या दोघांच्या अस्तित्वाची जाणीव झाली. तशी ती जरा दूर सरकली. थोडा वेळ बीचवर फिरण्यासाठी चौघे निघाले. जाताना हॉटेल मालकाने चहा-नाश्ता विचारला नाही, हे त्यांच्या ध्यानात नाही आले किंवा तो जागेवर होता कि नाही हे सुध्दा ते खात्रीशीर पणे सांगू शकले नसते. बीचवर जाताना अंजली काहीशी गप्पच होती, रूम मध्ये गेल्य्वर तिची समजूत घालताना विशालच्या नाकी-नऊ आले होते. अविनाशनी केलेली चेष्टा तिला फारशी रुचली नव्हती, आणि त्याला तू किती ओळखतोस ह्या प्रश्नाला विशालाकडे समर्पक उत्तर नव्हते. जरी त्यांच्या नात्याची विन ह्या दोघांनी घातली होती, अविनाश-स्वाती बद्दल पुरेशी माहिती दोघांनाहे नव्हती. विचित्र असले तरी हेच सत्य होते. घरच्या लोकांचा विषय कधी त्यांच्यात फारसा आला नव्हता, आणि त्यानी कधी एकमेकांना घरी बोलावले नव्हते. अचानकपणे एक पोकळी, एक अविश्वासाची भावना त्यांच्यात निर्माण झाली होती. पुरुषी बेफिकीर स्वभाव आणि तारुण्याची मस्ती यामुळे विशाल परत त्यांच्यात एकरूप झाला होता, अंजली काहीशी अस्वस्थच होती. मग तिच्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही.
अपेक्षे प्रमाणे बीचवर येताच, मोकळ्या हवेत अंजलीही खुलली. चौघांनी बीचवर धिंगाणा घातला. संपूर्णपणे मोकळा बीच असल्याने, पोरीनाही संकोच वाटला नाही. चेष्टा-मस्करीत अंधार झाला, मग ते घाई घाईत निघाले. रुमवर येताच सगळ्यांनी आंघोळी केल्या आणि परत कोकणी जेवणाची मजा घ्यायला खाली आले. आत्ताही बेत साधाच पण रुचकर होता. शेवटी वाढलेली गोड लापशी विशालला फारशी आवडली नव्हती, पण अंजलीने लाडाने त्याला भरवली. विशालला अंजलीचे हे वागणे जरा विचित्र वाटले, नेहमी काहीशी लाजरी असणारी अंजली अचानक एवढी लाडात कशी आली, हे कोडे त्याला काही उलगडेना. पण प्रेमात सगळे चालून जाते.. तिच्या मोहक हास्यानी तो पुरता पागल झाला. जेवण झाल्यावर फेरफटका मारण्याचा अविनाशचा प्लॅन सगळ्यांना पसंत पडला, पण या वेळी अंजलीच्या आग्रहाखातर सगळे एकत्र फिरून आले. अंगणात बसून गप्प मारता मारता गाण्याच्या भेंड्याही रंगल्या. फिरून आल्यानंतर हॉटेलचे दार उघडेच होते, वास्तविक पाहता एवढ्या उशिरा दार उघडे ठेवण्याची गरज नव्हती. पण या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज होती कुणाला? दिवसभर असणारे ३ नोकर, मालक, दिसत नव्हते, त्यांची चाहूलही नव्हती. चौघे आपल्याच विश्वात मश्गुल होते.
रिमझी पुन पडू लागला आणि स्वाती कुरकुर करायला लागली तसे, सगळे उठले आणि आपापल्या रूम मध्ये आले. खिडकीतून येनारा थंड वारा.. रिमझिम पडणारा पाउस, सोबत अंजली सारखी सुंदर प्रेयसी... विशालला जणू स्वर्ग दोन बोटे उरला होता.
अंजलीला कुशीत घेऊन झोपलेल्या विशालला रात्री कधीतरी जाग आली .. ती कसल्याश्या आवाजाने! थोड्या रागातच तो उठला, तर अंजली तर रूम मध्ये दिसली नाही.. बाथरूमचा दिवा बंद होता. आता रागाची जागा काहीश्या चिंतेने घेतली. तो दरवाजा उघडून बाहेर आला, बाहेरही कुणाची चाहूल लागली नाही. तसा तो गच्चीत गेला.. कठड्याला टेकून अंजली उभी होती.. नक्की अंजलीच का .. हो तीच ती!! त्याने लाडात येऊन तिच्या कमरेभोवती हात गुंफले... काही बोलणार इतक्यात.. एक जीवघेणी वेदना संपूर्ण शरीरभर पसरत गेली. संधी साधून डोक्यावर केलेला वार अचूक होता. “गाढवा, जरा हळू की, मेला तर नसती पंचाईत.. ६ महिने सहन करतेय ह्याला, तसा खूप चांगला आहे”, अंजली अविनाशवर खेकसली. तसा अविनाश निर्लज्जपणे हसला, एका हाताने अंजलीला त्याने कवटाळण्याचा प्रयत्न केला.. तशी ती ओरडली.. “वेळ कमी आहे, आधी त्या बयेकडे बघू, सारखी तुला चिकटलेली असते”. तसा तो म्हणाला, “तिच्या लापाशीत संधी साधून झोपेची अर्धी गोळी टाकली होती, ती निवांत झोपलीय.”
त्याच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून, ती स्वातीच्या खोलीत आली. नाईटलॅम्पच्या प्रकाशात शांत झोपलेली स्वाती.. खरेच नक्षत्रासारखी दिसत होती. तिचे ते रूप पाहून, अंजली पण थबकली. अविनाशनी धक्का देताच, पुढे झाली. तिने स्वातीचे हात पाय बांधले. अविनाश विशालच्या मुसक्या आवळून आला होता. स्वातीला बांधून होताच, तिने किश्याला आवाज दिला. हॉटेलचा जुजबी मालक.. किश्या, येताना ५ नोकर घेऊन आला. अंजलीने इशारा करताच त्याने नोकरांकडून दोघांची मुटकुळी उचलली. पुढचे काही सांगायची त्याला गरज नव्हती. आजची रात्र शेवटची, मग किश्याचा किसन सेठ होणार होता. मुटकुळी घेऊन नोकर विहिरीपाशी आले. वाकून न पाहता त्यानी मुटकुळी फेकून दिली, आणि परस्पर निघून गेले. ती विहीर म्हणजे एक आधुनिक विज्ञानाचा उत्कृष्ठ नमुना! वरून पाहणाऱ्याला पाणी दिसायचे, पण खरेतर विहीर पूर्ण कोरडी होती. आत अविनाशची खास माणसे भुयारातून पोहीचली होतीच. त्यानी ती मुटकुळी वरच्यावर पकडली. दोघांना मोकळे केले.
विशाल, स्वाती अजून गुंगीतच होती. विहिरीत टाकल्यावर दुसर्या मार्गाने त्यांना बाहेर काढले गेले होते. काही अंतरावर असलेल्या प्राचीन गुंफात त्यांना आणले गेले.
गुंफात आणल्यावर त्यांना आंघोळ घालण्यात आली, गुंगी उतरण्यासाठी कसलेसे औषध पाजण्यात आले. हळूहळू दोघे शुद्धीवर आले, भयं विस्मयकारक नजरेने भोवतालचा आसमंत न्याहाळू लागले. गुंफा खुपच प्राचीन होती. मध्यभागी मोठा होम पेटवला होता, त्या लाल-पिवळ्या ज्वालांमध्ये गुंफेच्या काळ्या कुटट भिंती अजुनाच भेसूर वाटत होत्या.. त्या भिंतींवर काढलेल्या चित्र - विचित्र कलाकृती जीवाचा ठाव घेत होत्या. त्याना होमाजवळ एका खांबाला बांधून उभे केले होते. गुंफेच्या शेवटी एक अक्राळ-विक्राळ मूर्ती होती. ती नक्की कशाची आहे, हे त्यांना सांगता नसते आले. होमा मध्ये आहुती देत असलेली अंजली आणि अविनाश पाहून दोघ हादरली. त्यांच्या मागे किमान १५-२० लोक बसले होते.
इथे एक गोष्ठ नवीन होती.. ती म्हणजे बळींचे शांत असणे. आधी आणलेले बळी रडत भक्त, दोघांना शिव्या शाप देत असत. पण हे दोघे एकदम शांत होते. अविनाश-अंजलीला ते जाणवले नसते तर नवल, पण वेळ एवढा थोडा होता की त्यना वीचार करायला फार सवड नव्हती. बळी देऊन अमर व्हायची घाई त्यना झाली होती. आता आपली यातून सुटका नाही हे सत्य कळल्यामुळे दोघे शांत असतील असा समज त्यांनी करून घेतला. आतापर्यंत सर्व त्यांच्या प्लॅनप्रमाणे झाले होते. अंजलीने स्वातीशी मैत्री करणे, अविनाशने स्वातीला पटवणे, स्वातीचा पुढकार आहे असा दाखवून विशालला जाळ्यात ओढणे.. पुढची आखणी.. संशय न येऊन देता दोघांचा पूर्ण विश्वास मिळवणे, बरेच मेहनत घेतली होती दोघांनी, आणि आता हि मेहनत सफल होणार होती. अजून ८ मिनिटे.. मग दोघांचा बळी.. की आम्ही दोघे अजरामर होणार.. विचारानेच अंजली खुश होत होती.
घटका भरली, नोकरांच्या सहाय्याने दोघाना एकत्र बळीशिळेवर आणण्यात आले, गुडघ्यांवर बसवून त्यांच्या माना शिळेच्या कोनात अडकवल्या गेल्या. अविनाश – अंजली आपापल्या सावजांजवळ आले. विशाल- स्वातीच्या नजरेला नजर देण्याचा धीर दोघांच्यात नव्हता.. त्या प्रश्नांची उत्तरे त्यांचाकडे नव्हती.. प्रेम ही त्यांची खेळायची गोष्ट होती.. त्यात अडकणे त्यना जमणार नव्हते.
अविनाश – अंजली उठून बळींच्या जवळ आले, तसे बाके लोक होमात आहुती देत कसलासा मात्र जपू लागले. होमाच्या ज्वाळा तांडव करत गुंफेच्या चाटला पोहोचला, आवेशाने एकाच वेळी तलवार उचलीत अविनाश – अंजलीने जय घोष केला आणि तलवार वेगात खाली आणली... निमिषमात्र .. काळ गोठला... ज्वाला ही थबकल्या... इतक्यात ..............
ठो ~~~~~~~~~~~~ठो ... दोन बार झाले... आवेगात खाली येणारे अविनाश – अंजलीच्या हातातून तलवारी फेकल्या गेल्या.. पुढचे दोन बार दोघांच्या मस्तकाच्या चिंधड्या उडवून गेले.. हे बदलेले चित्र लोकांच्या लक्षात येण्यासाठी २ मिनिटे लागली.. तेवढ्या वेळात विशाल – स्वातीची सुटका करण्यात आली.. बघता बघता पोलिसांनी सगळ्यांना अटक केली.
भडकलेला होम.. मोडलेला यज्ञ ... हुकलेली आहुती .. देवता कोपली ..काडऽकान आवाज झाला.. मूर्ती भंगली! संपूर्ण गुंफा हादरु लागली. तसे पोलिसांनी सर्वाना बाहेर काढले.
गेले अडीच वर्ष मुंबईत धुमाकूळ घालणार्या, जोडगोळीचा मुंबई पोलिसानी काल रात्री अलिबाग जवळ नायनाट केला. ६ मुले, ६ मुली गेल्या अडीच वर्षात गयाब झाली होती. त्यांना हुडकून काढण्यासाठी, इन्स्पेक्टर विशाल आणि इन्स्पेक्टर स्वाती यांनी जीवाची बाजी लावली. अलिबागला जाताना विशालच्या बुटात ट्रान्समीटर बसवला गेला होता, स्वातीच्या घड्याळात छोटा रेडिओ बसवला गेला होता. अविनाशनी प्रेमानी खाऊ घातलेली लापशी, संधी साधून स्वातीने ओकून टाकली होती.. त्यामळे तिच्यावर झोपेच्या गोलीचा अंमल कमी झाला. विशालच्या डोक्यात फटका मारलेला स्वातीने पाहिला आणि रेडीओ वरून धोक्याची सुचना दिली होती. दोघांना भूयारात नेल्याने संपर्क तुटला आणि पोलिसांची दिशाभूल झाली.. पण गुंफेत आल्यावर स्वातीने पुन्हा संदेश पाठवला आणि पोलीस वेळेवर पोहोचू शकले.
या सर्व धाम-धुमीत स्वाती-विशाल मात्र खरेच एकमेकांच्या प्रेमात पडले!!
प्रतिक्रिया
राम राम मंडळी!!
सस्पेन्स फार लवकर संपला शिवाय
छान.
आनंदी हर्षद,
भारी..
कथा आवडली
कथा आवडली...
हाण्ण तिच्यायला!!!
धमु..
छान..
चांगला प्रयत्न! लिहित रहा.