Skip to main content

१८५७ अ हेरीटेज वॉक (४)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 05/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवे १८५७ अ हेरीटेज वॉक http://misalpav.com/node/18261 १८५७ अ हेरीटेज वॉक (२) http://misalpav.com/node/18312 १८५७ अ हेरीटेज वॉक (३) http://misalpav.com/node/18381 उपासमार पाउस आणि सैन्यातील बेदीली ( बख्त खानाला सेनापती मानायला हिंदू सैनीक तयार नव्हते) या मुळे स्वातन्त्र्य लढा देणार्‍या सैन्याला हार पत्करावी लागली होती. त्यांचे मनोधैर्य अधीकच खचले. १८५७ च्या दिल्लीच्या लढाईत नजफगडची लढाई हा ब्रीटीश सैन्याचा पहीला मोठा विजय होता. या मुळे ब्रीटीशांचे मनोधैर्य उंचावले गेले. ही घटना दिल्लीतील १८५७ च्या घडामोडीत टर्निंग पॉईन्ट मानता येईल. या लढाईचे आणखी एक महत्व म्हणजे असे की पंजाबहून येताना ब्रीगेडीयर जॉन निकोल्सन ने स्वतःसोबत आणलेले सीज मशिनरी. कोणतीही तटबंदी उडवून लावणारी यंत्रणा. यात६०० गाड्या भरून आणलेला दारुगोळा २४ पौंडी आणि १८ पौंडी गोळे फेकणार्‍या तोफा तसेच ८ इंची गोळे फेकणार्‍या उखळी तोफा. प्राथमिक तयारी म्हणून निकोल्सन ने ६ आणि ७ सप्टेंबरलाच एक तुकडी तोफांसहीत रीज मध्ये तैनात केली. या तुकडीने मोरी गेटजवळ तोफांचा मारा चालू केला. बंडखोर ( भारतीय क्रान्तीकारक) इथे चकले त्याना वाटले की हल्ला या दिशेनेच होणार आहे दुसरी तुकडी कश्मिरी गेटच्या रोखाने सिव्हील लाईन्स मध्ये तैनात केली. या तुकडीने कश्मिरी गेट जवळ ११ सप्टेंबर रोजी लढाई छेडली. तिसरी तुकडी ओल्ड कस्टम हाऊस जवल तैनात केली. चौथी तुकडी उखळी तोफा घेवून खुदीसा बाग जवळ तैनात केली.१४ सप्टेंबर रोजी निकराचा हल्ला करायचा असे ठरले त्यानुसार निकोलस ने तीन छोट्या तुकड्या खुदीसाबाग च्या आसपास आणल्या. खुदीसाबाग मध्ये बादशहाचे उन्हाळी निवासस्थान होते. दुसर्‍या तुकडीने कश्मिरी गेट च्या भिंतीवर हल्ला चढवला. गनपावडर आणि वाळूच्या पिशव्या लावून त्यानी स्फोट घडवला यात कश्मिरी गेटच्या भिंतीचा काही भाग पडला. 1 दरम्यान जी तुकडी किशनगंजच्या बाजूने ( काबूल गेट) लढत होती त्या तुकडीचा कमाम्डर मेजर रीड जखमी झाला. बंडखोरानी त्याचा पाठलाग केला आणि त्या तुकडीतील ब्रीटीश फौजेला पळ काढावा लागला. निकोलसन हा मात्र शहर ताब्यात घ्यायचे या इर्ष्येने पेटला होता त्याने एका गल्लीतून काबूल गेट वर पुन्हा हल्ला चढवला. या वेळेस बंडखोरांकडे किल्ल्याच्या भिंतीवरील महत्वाची ठाणी होती. तेथे त्यानी बंदूका देखील तैनात केल्या होत्या त्यानी गल्लीतून येणार्‍या ब्रीटीश शिपायांवर हल्ला चढवला. यात खूप ब्रीटीश सैनीक जखमी झाले. स्वतः निकोल्सन सुद्धा जबर जखमी झाला. जवळजवळ ११७० सैनीक जखमी झाले होते. यावेळेस आर्कडेल विलसन ने सैनीकाना तात्पुरती माघार घेण्याचे तसेच जवळच्या चर्चचा आसरा घेण्याचेआदेश दिले. ते ऐकताच अक्षरशः मरणासन्न अवस्थेतील निकोलसनने विलसनला मारण्याची धमकी दिली.इतरानी मध्यस्ती केली विलसन कश्मिरी गेटच्या जवळ तळ ठोकून बसला. ब्रीटीश सैन्य आता विस्कळीत झाले होते बरेचसे अधिकारी /सैनीक जखमी झाले होते. इकडे क्रांतीकारी सैन्य सततचे अपयश , उपासमार यामुळे हताश झालेले होते . नाही म्हणायला अफगाणी मुजाहिदीन लहानमोठे हल्ले चढवत होते. पण त्यात सुसूत्रता नव्हती . हळूहळू ब्रीटीश सैन्याने बंडखोर( क्रान्तीकारी) सैन्यावर विजय मिळवायला सुरवात केली. १६ सप्टेंबर ला बंडखोरांकडील दारुखाना त्यानी कब्जात घेतला. १८ सप्टेंबरला जामा मशीद ताब्यात घेतली. लाल किल्ला देखील ताब्यात घेतला . 2 ( तोफ गोळ्यानी झालेल्या जखमा अंगावर अजूनही मिरवणारे कश्मिरी गेट) २० सप्टेंबरला हुमायूनच्या मकबर्‍यात लपून बसलेल्या बहादूरशहा: जफर आणि त्याच्या तीन मुलाना ताब्यात घेतले . 3 ( २० सप्टेंबर ला कॅपटन विल्यम हडसन ने बहादूरशहा जफर ला ताब्यात घेतले. फोटो आं.जा. वर उपलब्ध) दुसर्‍या दिवशी खूनी दरवाजाजवळ बहादूरशहाच्या तीनही मुलाना फाशी दिली गेले . त्या तिन्ही मुलांची डोकी बहादूर शहा जफर ला नजर करण्यात आली.दिल्लीतील बंड मोडून गेले होते.२१ सप्टेंबर ला दिल्ली ( शहाजहानाबाद) पूर्णपणे ताब्यात घेतले. भारतीय स्वातन्त्र्य संग्रामाच्या दृष्टीने हा एक मोठा मानसीक आघात होता. या घटनेचा परीणाम भारतातील इतर ठीकाणच्या लढायांवर झाला. अंगावर टाकलेली जबाबदारी पूर्ण झाल्या नंतर दोन दिवसानी २३ सप्टेंबरला जॉन निकोलसनचा मृत्यू झाला. 4 (असे सांगतात की कडव्या शिस्तीचा भोक्ता असलेला निकोल्सन हा विक्षीप्त म्हणून प्रसिद्ध असला तरीही त्या सैनीकांत तो फार आदरणीय होता. त्याच्या कबरीवरची फुले उचलुन बंडखोर शीख / जाट सैनीकानी इंग्रजांविरुद्ध न लढण्याची शपथ घेतली ) ( क्रमशः) .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5913
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

वाचतो आहे. क्रमशः संपल्यावर (वेळ मिळाल्यास) सविस्तर बोलेन.

पण हे अटक (अटकेपार झेंडा मधलं) कुठे होतं?

तुम्ही म्हणता ते अट्टोक ( अटक) सध्या पाकिस्तानच्या पम्जाब प्रांतात आहे. १७५९-६० मध्ये मराठी ( पेशवे) येथपर्यन्त आले होते( अटकेपार झेंडे) त्याचा स्वातन्त्र संग्रामाशी काहिही समन्ध नाही. १८५७ च्या स्वातन्त्र्य संग्रमात नानासाहेब ( पळपुट्या बाजीरावाचा मुलगा) याचा संबन्ध आला . तो त्यावेळेस बिठूर नावाच्या कानपुरजवळील एका झेड्यात रहात होता. १८५७ सालात जेथे मराठी राजवटच आस्तित्वात नव्हती तेथे पेशवाई कुठे झेंडे लावणार होती

फार इंटरेस्टिंग लेखमाला.. धन्यवाद विजुभाऊ.. येऊ दे पुढचे लवकर.

वाचतो आहे. १८५७ च्या उठावासारखी ऐतिहासिक घटना, तिच्या जागोजाग शिल्लक राहिलेल्या खुणांचा मागोवा घेत इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रकल्प आवडला. अजून येऊ द्यात.

हाही भाग आवडला. फोटो नेहमीप्रमाणेच छान. बहादुरशहा आणि त्याच्या मुलांबद्दल वाचून वाईट वाटलं.

नकाशात अट्टोक पाहिले तर ते जम्मु च्या जवळ आहे. पुरातन काळात हा भाग गांधारदेश नावाने ओळखला जायचा. मराठ्यानी अटकेपार झेंडे लावले म्हणजे खरोखरच अतीशय मोठा पराक्रम गाजवला होता.

In reply to by विजुभाऊ

अटक ही नकाशामधे पाहील्यास रावळपिंडीच्याही उत्तरेला येते. सध्याची अफगाणिस्थान आणि हिंदूस्थान यांच्या सीमेपासून साधारण समदूर असून पाकीस्तानात स्थित आहे. इथे पहा.

छान मालिका चालली आहे, वाचत आहे. चित्रांबद्दल धन्यवाद.