बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून तिने मंगळसूत्र बनवून घेतले होते, विकण्याचा बहाणा करून चार ठिकाणून खरे असल्याची खात्री करून घेतली होती. सोने अस्सल होते. तिने नवीन साडी चोळी घेतली होती, आणि दूर वरच्या एका तिर्थस्थाना बद्दल सगळी माहिती मिळवली होती, आणि एक चांगला ग्राहकही हेरून ठेवला होता.
तिचे घर आता दूर राहिले होते, आई, बाप, बहीणी, भावांशी संबंध तुटून फार वर्षे होऊन गेली होती. जुन्या मैत्रिणींची आता लग्नं होऊन त्या आता आपापल्या संसारात रमल्या होत्या..
तिच्या स्वता: बद्दलच्या संवेदना आता संपल्यातच जमा होत्या. ज्या ही घात, अपघाता मुळे ती इथे पोहोचली होती त्याच्या बद्दलच दुखः ही उगाळून उगाळून संपून गेलं होते.
आता ती इथलीच एक होऊन गेली होती. मागचे सारे विसरुन हळूहळू इथल्या जीवनात ती रमु लागली होती. इथली मैत्री, स्पर्धा, भांडणं, मारामा-या ह्यां सगळ्या सवयीच्या झाल्या होत्या.
तरीही ती वेगळीच होती, ग्राहकांना पटवण्या, गटवण्याच्या स्पर्धेत ती फार मागे राहायची. ते रंग ढंग अजून तिच्यात पूर्णपणे उतरायचे होते, ती इथे चुकून तर आली नाही ना? असे ही अनेकांना पहील्यांदा वाटायचे. बाकीच्या तिला गमतीने ताई आणि आपा म्हणायच्या. दलालांची ही तिच्याशी वर्तणूक आदर पुर्वकच असायची.
जरी तिने ग्राहक गटवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत कधी भाग घेतला नसला तरीही काही लोकांना मात्र तीच हवी असायची. एकूण तिचे बरे चालले होते.
तसल्याही परीस्थित ती आनंदाने जगण्याचा प्रयत्न करीत होती.
लग्न करून संसार करण्याची तिची इच्छा अपूर्णच राहिली होती. आता ती कधी ही पूर्ण होऊ शकणार नाही हे तिला माहित होते. तरी ही तरी ही एक दिवस, फक्त एक तरी दिवस तिला लग्न झालेया सर्वसामान्य बाई सारखे जगायचे होते.
लग्न करायला नाही म्हणत आहे मी! ती म्हणाली, फक्त एक दिवस मला लग्नाच्या बायको सारखे वागवा, मग जन्म भर कधीही या मी लग्नाच्या पत्नीच्या निष्ठेनी तुमची सेवा करील. एक पैसा ही घेणार नाही, ती ग्राहकाला म्हणाली.
तिने त्याला सर्व नीट समजावून सांगितले. ग्राहक ही तयार झाला.
निघण्या पूर्वी तिने नवीन आणलेल्या साबणाने घासून पुसून स्वछ आंघोळ केली. तिने मागितलेला दिवस तिला मिळाला होता.
पैसे होते तरीही टॅक्सी करून जाण्यात तिला रस नव्हता. बस, रेल्वे, काळीपिवळी तून लग्न झालेल्या बाई सारखे तिला मिरवत मिरवत जायचे होते. शहरात दोन चार नजरा चमकल्याचा तिला भास झाला पण वेशी बाहेर मात्र तिला कुणीही ओळखले नाही. ते दोघेही एका सुखी संसारी जोडप्या सारखे वाटत होते.
सगळं काही तिच्या मना सारखंच घडत होतं ती फार फार आनंदात होती.
ग्राहकाला देवा धर्मात काही रस असावा असे तिला वाटले नाही, पण तसा तो सज्जन होता. ती जे जे म्हणेल तसा तसा तो वागत होता,
दिलेला शब्द त्याने पाळला होता.
फुलांची पुडी घेऊन ती मंदिरात गेली, फुले वाहून तिने देवाला प्रदक्षिणा घातल्या आणि हात जोडले.
नक्कीच नक्कीच, मी म्हणतो ना! ही तशीच आहे.
नाही रे वाटत नाही.
लाव बेट! वाटलं तर रेट विचार तिला.
तू कुठे बघितलं हिला?
बघायला बिघायला कशाला हवं रे. कुठे बघितलं नाही पण माझी नजर धोका खाणार नाही. इतका अनुभव आहे मला. कितीही लपवलं तरी नुसत्या चाली वरून कळतात रे ह्या बाया.
तिला मागून कुजबुज ऐकू आली.
ती सुन्न झाली. तिच्या हातापायातले त्राण निघून गेले.
तिचे डोके चक्राउ लागले. आता जणु देव अन देऊळ तिच्या भोवती प्रदक्षिणा घालू लागले.
तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळला आणि दानपेटीत जाऊन पडला.
नकळत तिचा हात गळया कडे गेला. तिने खस्स्कन मंगळसूत्र ओढुन काढ्ले..
अश्रूच्या पाठोपाठ ते ही दान पेटीत जाऊन सामावले.
ती बाहेर आली.
चला! ती ग्राहकाला म्हणाली.
कुठे? ग्राहक म्हणाला.
कुठे? अजुन कुठे जाणार? वेश्या आहे ना मी? कोण घरी नेणार मला? बाहेरच्या जगात माझ्या साठी जागा नाही. चकल्या वरच परत सोडुन द्या मला. ती म्हणाली.
तिच्या डोळ्यात आता एक ही अश्रू नव्हता.
(समाप्त)
क्षणभराची सौभाग्यकांक्षिणी ---- कथा--- जयनीत दीक्षित
वाचने
4440
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
जयनीतजी,
कथा छान जमली आहे.
इथे तेवढं स्वसंपादन करून घ्या बरं.....
धन्यवाद प्रास
In reply to जयनीतजी, by प्रास
चुक लक्षात आणुन दिल्या बद्दल. धन्यवाद.
छान जमली आहे
पण तेवढ्या कमेंटवरुन तिने तसे करायला नको होते. तिने 'तो' काय करतो ते बघाय्ला हवे होते.
'लागा चुनरी मे दाग' मध्ये नाही का अभिषेक बच्चन मारायला जात अश्याच लोकांना?
आयला रे!
बेक्कार! चरकलोच राव वाचून. :(
कथा हेलावुन सोडत आहे...
समाजाच्या अंधार्या कोपर्यामागील एक सत्य वातणारी कथा आहे ...
अजुन थोडिशी मोठी असायला हवी
अजुन थोडिशी मोठी असायला हवी होती..
पण परिणाम कारक नाही वाट्ली...
(No subject)
:(
वेगळीच अस्वस्थ करणारी कथा..
वेगळीच अस्वस्थ करणारी कथा..
माफ करा पण तद्दन फुलपाखरी
माफ करा पण तद्दन फुलपाखरी अश्रुपाताची कथा.
काल वाचली होती पण आज तुम्ही त्यात बदल केल्याने खास प्रतिसाद देत आहे.
हा काय फालतुपण आहे ? म्हणजे आधी लग्नाला तयार व्हायचे, समोरच्या पुरुषानी मग तिच्या जोडीने वेगवेगळी मनोरथे रचायची, पुढच्या आयुष्याचे बेत आखायाचे आणि ह्या दिडशहाणीने कोणा तद्दन अनोळखी फालतु माणसाच्या एका टिपणी वरुन विश्वासाने ज्याने आयुष्यभरासाठी हात धरला आहे त्याचा हात सोडून द्यायचा ? अरे काय अर्थ आहे का? साला नाती येवढी तकलादू असतात का ? आयुष्यात एकदा लग्नाचा निर्णय घेतल्यावर अशा प्रसंगांना तोंड द्यावेच लागेल अशी ह्या बाईला साधी कल्पना देखील नव्हती ? काय राव !
असो..
ह्या अशा बायका किंवा भुतकाळातला प्रेमी परत आल्यावर सध्या ज्याच्याशी लग्न ठरलय किंवा साखरपुडा झालाय त्याला लाथ मारुन जाणार्या हिरवणी खरच डोक्यात जातात. असे वागणारे पुरुष देखील जातातच, पण कथांमध्ये आणि शिणुमात अशा बायकाच दाखवायची फ्याशन आहे.
असो..
लग्नाला तयार नाही हो.
In reply to माफ करा पण तद्दन फुलपाखरी by परिकथेतील राजकुमार
लग्नाला तयार नाही झालेली हो ती.. लग्न करण्याची कमिटमेंट मागितली वा दिली नाहीये. तोही एक गिर्हाईकच आहे.
तिला एक दिवस गरती बाईचे जिणे जगायचे आहे. तो एक दिवस ती आपल्या आयुष्यापासून लपू पाहते आहे एक बेगडी का होईना पण लग्न झालेल्या स्त्रीचा देवळात जाण्याचा अनुभव घेण्यासाठी.
तिथेही तिच्याकडे पाहून पब्लिक हेच बोलते हे कळल्यावर तिला असे लपण्यातली व्यर्थता कळते आणि ती परत आपल्या वास्तव जगात जाण्याची इच्छा सांगते.
असे माझे इंटरप्रिटेशन आहे.
अहो काल वाचले तेव्हा तो एक
In reply to लग्नाला तयार नाही हो. by गवि
अहो काल वाचले तेव्हा तो एक दिवसवाला पॅरा होता म्हणुन प्रतिक्रिया दिली नव्हती. आज दिसला नाही म्हणुन दिली , बहुदा तेंव्हा संपादन चालु असावे कारण आता तो पॅरा दिसत आहे.
असो....
बुच मारले गेले नसल्यास प्रतिक्रिया संपादतो.
असहमत.
In reply to अहो काल वाचले तेव्हा तो एक by परिकथेतील राजकुमार
मी जेव्हा वाचली होती तेव्हा ते वाक्य होतं हे मला आठवतंय.
थोडक्यातः गाळून वाचायची सवय वाईट हों. ;)
गाळायचच नाही तर वाचायचच कशाला
In reply to असहमत. by धमाल मुलगा
गाळायचच नाही तर वाचायचच कशाला ?
_/\_
In reply to गाळायचच नाही तर वाचायचच कशाला by परिकथेतील राजकुमार
तेल्+चुना+मनगट = ऑबॉबॉबॉबॉबॉ....
मेल्या...प्रतिक्रिया बरोबर आहे....साईट चुकलीए....पलिकडच्या विंडोतली प्रतिक्रिया इकडं का चिकटिवतंयस? ;)
-पोलाईट धम्या.
मेल्या...प्रतिक्रिया बरोबर
In reply to _/\_ by धमाल मुलगा
मिपाला आपणच प्रगल्भतेकडे न्यायला नको का ?
जिंदादिल परा
धन्यवाद.
In reply to लग्नाला तयार नाही हो. by गवि
गगनविहारी आपल्या प्रतीसादा बद्दल मनापसुन धन्यवाद.
धन्यवाद
In reply to लग्नाला तयार नाही हो. by गवि
.धमाल मुलगा, प्रतीसादा साठी मनपुर्वक धन्यवाद.
धन्यवाद.
In reply to लग्नाला तयार नाही हो. by गवि
आपल्या सर्वांच्या प्रतीसादा बद्दल मनापसुन धन्यवाद.
परीकथेतील राजकुमार ह्याना,
In reply to माफ करा पण तद्दन फुलपाखरी by परिकथेतील राजकुमार
पहिले एक चुक राहुन गेली होती, ती प्रास ह्यांनी पहिल्या प्रतीसादात लक्षात आणुन दिली होती. त्यामुळे असे झाले असावे.
चुक माझीच आहे.
असो.
पण माझ्या परी आणि भुताची गोष्टं ह्याला तुम्ही दिलेल्या प्रतीसादा बद्दल खुप खुप धन्यवाद. तुमचा त्या कथे वरचा प्रतीसाद मला मिळालेला सगळ्यात मोठं कॉम्प्लीमेन्ट वाटतं.
तुमचा त्या कथे वरचा प्रतीसाद
In reply to परीकथेतील राजकुमार ह्याना, by जयनीत
का लाजवता मालक ?
अहो तुम्ही छानच लिहिले आहेत की :) फक्त जे पटले नाही त्यावर मी लिहिले येवढेच. तुम्ही लिहित रहा, आम्ही आनंदे वाचुच.
पुलेशु.
कथा आवडली पण अजुन मोठी करता
कथा आवडली पण अजुन मोठी करता आली असती, या एका दिवसात फक्त देवळात जाउन येण्यापेक्षा या दुनियेत फिरुन तिला आलेल्या अनुभवांबद्दल तिला बोलतं करता आलं असतं तर छान झालं असतं.
त्रोटक वाटली. अजून फुलवता आली
त्रोटक वाटली. अजून फुलवता आली असती.