✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार

श
शशिकांत ओक यांनी
Fri, 07/01/2011 - 12:42  ·  लेख
लेख
मित्रांनो, नाडीग्रंथांवर अनेकांनी बरेच लिखाण दोन्ही बाजूनी केले आहे. या धाग्याने नाडीग्रंथांचे प्रात्याक्षिकाचा अनुभव घेणाऱ्यांसाठी माहिती.... ....आज दि, १ जुलै ला इतिहास संशोधन मंडळाच्या पोतदार सभागृहात सायंकाळी ६ वाजता भाषण आहे. त्यात हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. इच्छुकांनी नोंद घ्यावी. मिपाच्या धोरणांत अशी माहिती देणे बसणारे नसेल तर धागा काढून टाकावा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
वाङ्मय
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
9622 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

धन्यवाद

चिरोटा
Fri, 07/01/2011 - 13:03 नवीन
चित्रफित बनवून यु ट्युबवर टाकता येईल का? धन्यवाद
  • Log in or register to post comments

आता तरी श्री. हैयो हे कोण

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/01/2011 - 13:08 नवीन
आता तरी श्री. हैयो हे कोण याची माहिती मिळेल का? :)
  • Log in or register to post comments

बिनडोकपणाचा कळस !

सहज
Fri, 07/01/2011 - 13:10 नवीन
....आज दि, १ जुलै ला बिनडोकपणाचा कळस ! असा उत्तम लेख श्री प्रभाकर नानावटी यांनी उपक्रम डोट ऑर्ग संस्थळावर लिहला आहे, त्याचा वाचकांनी जरुर लुत्फ लुटावा.इच्छुकांनी नोंद घ्यावी. मिपाच्या धोरणांत अशी माहिती देणे बसणारे नसेल तर प्रतिसाद काढून टाकावा.
  • Log in or register to post comments

पोतदार सभागृह नेमक कुठे आहे ?

आनंद
Fri, 07/01/2011 - 15:03 नवीन
पोतदार सभागृह नेमक कुठे आहे ?
  • Log in or register to post comments

इतिवृत्त - नाडीग्रंथांवरील सभा संपंन्न झाली

शशिकांत ओक
Fri, 07/01/2011 - 22:27 नवीन
मित्रांनो, इतिहास संशोधन मंडळाच्या स्व. म. म. द.वा.पोतदार सभागृहातील नाडी ग्रंथांवरील सभा संपन्न झाली. त्यात ओकांनी नाडी ग्रंथांची नॉस्ट्रॅडेमसच्या कथनांशी तुलनी करून केली व महर्षींचे कथन किती सरस व अदभूत आहे याचे दाखले दिले. त्यांच्या भाषणाशिवाय हैयोहैयैयोंनी नाडी ग्रंथातील कूट लिपीवर प्रकाश टाकला. काही व्यक्तींच्या नाडी ग्रंथ ताडपट्यातील मजकुरातून व्यक्तीचे व त्याच्या आई, वडील व पत्नीचे नाव कसे कोरून लिहिलेले असते याचे प्रात्यक्षिक एल सी डी प्रोजेक्टरवर दाखवले. त्याशिवाय ७५ सेंमी किंवा ३० इंचाच्या एका लांब लचक नाडी ताडपट्टीची झलक दाखवली.
  • Log in or register to post comments

वेरी इंटरेस्टींग.बाकी

आत्मशून्य
Sat, 07/02/2011 - 04:18 नवीन
वेरी इंटरेस्टींग. बाकी हयोहययो येणार म्हणजे कार्यक्रम बराच आधी ठरला असणार ? मग ज्या संध्याकाळी कार्यक्रम संपन्न होणार आहे नेमकं त्याच दिवशी लोक कामात असतानाच्या वेळी अत्यंत कमी वेळ देऊन ही माहीती का जाहीर करताय ? इतक्या चर्चा तूम्हासोबत होत असताना कीमान ३६ तास आधी हे कळवता आले नसते काय... ? चला राहूदे तेव्हडे तास पण आपण या कार्यक्रमाची कल्पना केवळ ५ तास १८ मीनीटे आगोदर दीली आहे हे निकोपतेच्या दृश्टीने फारच अक्षम्य आणी बेगडी भासत नाही काय ? कि कार्यक्रमाला यायचे असून येऊ न शकलेल्यांची नंतर हेटाळणी करायचा मनसूबा होता ? बाकी (किमान ) या प्रश्नांचे समर्पक उत्तर दीले तर आज सूर्य पश्चीमेला उगवला असं म्हणेन म्हणतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

ज्यांना यायचे होते ते आले.

शशिकांत ओक
Sat, 07/02/2011 - 13:16 नवीन
मित्रा,
आधी हे कळवता आले नसते काय... ?
त्या दिवसाच्या पुण्याच्या पेपरमधे भाषण होणार असे प्रकाशित झाले होते. मिपाकरांनी ते वाचले असेल. ज्यांना यायचे होते ते आले. न आलेल्यांची हेटळणी कशाला करायला हवी...
  • Log in or register to post comments

काका

आत्मशून्य
Sat, 07/02/2011 - 13:23 नवीन
ज्याना आधीच योग्यवेळी कळले नाही त्यांचे काय हा खरा प्रश्न आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आत्मशून्य'जी..... आपण एकदा

मृगनयनी
Sat, 07/02/2011 - 14:24 नवीन
आत्मशून्य'जी..... आपण एकदा शन्कानिरसनासाठी शशिकान्त'जींना फोन करा... किन्वा प्रत्यक्ष भेटा..... कारण तुमची नाडीपट्टी पाहायची तळमळ खरंच तीव्र असेल..... तर तुमची पट्टी नक्की मिळेल... इतरांसारखे केवळ "नाडी जोतिषा"ची थट्टा करण्याच्या उद्देशाने जर तुम्ही काही विधाने करत असाल.. तर मग कशालाच काहीच अर्थ उरत नाही.... तुम्हाला खरंच तुमची पट्टी पाहायची असेल.. तर ओक'सरांना अवश्य भेटा.... कारण नुसते शब्दांचे खेळ करून किन्वा जर-तर ची भाषा बोलून प्रत्यक्षात मात्र मूळ मुद्दा बाजूलाच राहतो!!! त्यामुळे पोहायला शिकायचे असेल.. तर पाण्यात उडी घ्यायलाच हवी!!!.... अर्थात तुम्ही बुडणार नाही... याची खात्री आम्ही तुम्हाला देतो!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मी पट्टी पाहीली आहे.

आत्मशून्य
Sat, 07/02/2011 - 14:26 नवीन
शन्कानिरसनासाठी त्यांचाशी मी व्यनीतही थोडफार बोललो आहे.
अर्थात तुम्ही बुडणार नाही... याची खात्री आम्ही तुम्हाला देतो!!!
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

देतो

ऋषिकेश
Sun, 07/03/2011 - 17:21 नवीन
अर्थात तुम्ही बुडणार नाही... याची खात्री आम्ही तुम्हाला देतो!!! Smile
मृगनयनी आणि देतो!!! हा टायपोच असावा ना? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

पुण्याचा पेपर ?

अजातशत्रु
Sat, 07/02/2011 - 15:50 नवीन
त्या दिवसाच्या पुण्याच्या पेपरमधे भाषण होणार असे प्रकाशित झाले होते. मिपाकरांनी ते वाचले असेल. ज्यांना यायचे होते ते आले. न आलेल्यांची हेटळणी कशाला करायला हवी...
म्हणजे आमंत्रण पुण्याच्या लोकांनाच होते ? बरे वर एक असाच प्रश्न विचारला होता ते सभागृह कुठे आहे ते? त्याचे उत्तरही इथे दिलेले नाही यास्तव आमचीही लाभ घेण्याची संधी हुकली. . . . . . . . . . . . . . . . . (पट्टि चे पोहणारे ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

पोस्टाद्वारे म्हणजे

JAGOMOHANPYARE
Sat, 07/02/2011 - 18:23 नवीन
पोस्टाद्वारे म्हणजे प्रत्यक्ष्य न येता नाडीभविष्य जाणता येते का? किती फी आणि काय माहिती पाठवावी लागते? ( फीची माहिती खरडवहीत लिहिली तरी चालेल.)
  • Log in or register to post comments

आपल्याजवळच्या नातेवाईकाने

शशिकांत ओक
Sat, 07/02/2011 - 18:33 नवीन
मित्रा, नाही, पण आपल्याजवळच्या नातेवाईकाने आपला अंगठ्याचा ठसा नेऊन ते मिळवता येणे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

अंगठा शाईने उठवून पोस्ताने

JAGOMOHANPYARE
Sun, 07/03/2011 - 11:41 नवीन
अंगठा शाईने उठवून पोस्ताने पाठवला तर? त्यात इतर पर्सनल बेसिक माहितीही देइन.... अशी एखादी सिस्टिम सुरु झाल्यास बरे होईल.
  • Log in or register to post comments

तशी सोय नाही

शशिकांत ओक
Sun, 07/03/2011 - 15:24 नवीन
मित्रा, सध्या तशी सोय नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

प्रात्यक्षिक पहायची संधी हुकली असे वाचत असेल तर

शशिकांत ओक
Sun, 07/03/2011 - 15:21 नवीन
मित्रांनो, १ जुलैला पुण्यात इ.सं.मं.मधे झालेल्या नाडीग्रंथांच्या ताडपट्टीतील लेखन व व्यक्तीची नावे कशी कोरून येतात याचे प्रात्यक्षिक पहायची संधी हुकली असे वाचत असेल तर इच्छुक व्यक्तींसाठी एकत्र येऊन आपल्याला असा कार्यक्रम ठरवता येऊ शकेल. मात्र सध्या ते पुण्यात शक्य आहे. नंतर अन्य ठिकाणी विशेषतः ठाण्यात देखील असा कार्यक्रम करता येईल. यासाठी कोणी पुढाकार घेत असेल तर फार छान...
  • Log in or register to post comments

नाडी पट्टीत नावे खरोखरच लिहिलेली असतात का?

शशिकांत ओक
Mon, 09/10/2018 - 10:20 नवीन
नमस्कार मित्रांनो, वरील प्रात्यक्षिकाला दर्शवून ७ वर्षांचा कालावधी गेला आहे. जुने धागे सहज चाळताना हा धागा नजरेस पडला. मध्यंतरीच्या काळात नवीन मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकांच्या आवृत्तींचे प्रकाशन झाले. नाडीग्रंथ भविष्य विषयावर ७,८ अॅप्स प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध करून देण्यात आली.. वगैरे वगैरे... त्यामधून खालील लिंक दिली आहे. सध्या हैयो दिल्लीत व्यवसायानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. https://docs.google.com/presentation/d/1mXaIacPzvsSucZ-1iIiwCjiAvyTfqjnOqsAAhIUVfhI/edit?usp=drivesdk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

ओक्के- घेतला पुढाकार

रामदास
Mon, 07/04/2011 - 10:15 नवीन
भेटू या ठाण्यात जुलैच्या अखेरीस. एक नाडी पट्टी कट्टा करू या .कितीजणांनी येणे आवश्यक आहे ? (मिनीमम कोरम)
  • Log in or register to post comments

गप्पांचा बाजार पण वेळेच्या बंधनात.

शशिकांत ओक
Mon, 07/04/2011 - 14:05 नवीन
प्रिय रामदासजी, मी सोडून ६ जणं तरी असावेत. आधिक आले तर छान. त्यात नाडीग्रंथ दर्शन ही थिम असली तरी फक्त तीच असे नसावे. गप्पांचा बाजार पण वेळेच्या बंधनात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मी, रामदासकाका.. दोन

गवि
Mon, 07/04/2011 - 14:10 नवीन
मी, रामदासकाका.. दोन झाले.. कॉलिंग किसन शिंदे.. स्पावड्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आम्हीही हात वर केल्या आहे

सूड
Mon, 07/04/2011 - 14:16 नवीन
याची कृपया नोंद घेतल्या जावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

असेच म्हणतो.

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 07/04/2011 - 15:43 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

सुनील
Mon, 07/11/2011 - 14:58 नवीन
तारीख-वेळ सोयीची असल्यास, माझीही उपस्थिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

नाडी गप्पा कट्टा

शशिकांत ओक
Mon, 08/08/2011 - 21:49 नवीन
रामदासजी, नाडीकट्ट्यावर पुढे काय ठरले ते कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

एक मुलभुत शंका....

गणपा
Mon, 07/04/2011 - 14:18 नवीन
काही व्यक्तींच्या नाडी ग्रंथ ताडपट्यातील मजकुरातून व्यक्तीचे व त्याच्या आई, वडील व पत्नीचे नाव कसे कोरून लिहिलेले असते याचे प्रात्यक्षिक एल सी डी प्रोजेक्टरवर दाखवले.
ह्या पट्ट्या फक्त भुतकाल आणि वतमानच वर्तवतात का? (असं असेल तर काय उपेग?)
  • Log in or register to post comments

रामाची सीता कोण

शशिकांत ओक
Mon, 07/04/2011 - 14:23 नवीन
मित्रा,
फक्त भुतकाल आणि वतमानच वर्तवतात का?
हे म्हणजे रामाची सीता कोण असे झाले.
  • Log in or register to post comments

वरील प्रतिसादातल उद्गृत

गणपा
Mon, 07/04/2011 - 14:48 नवीन
वरील प्रतिसादातल उद्गृत केलेलं वाक्य तुमचच होतं हो काका. त्यात कुठेही त्या मनुष्याच्या भविष्य वर्तवल्याचा उल्लेख नाही. आता त्या वाक्या वरुन मज अजाणाला जो बोध झाला त्या अन्वये ही शंका उपस्थित झाली. यात कसलाही/ कुणाचीही हेटाळणी करण्याचा वा खिल्ली उडवण्याचा मुळीच उद्देश नव्हता. असो. एक प्रामाणिक शंकेला पुणेरी उत्तर मिळालं. आता अधिक जाणुन घायची इच्छा मेली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

?

नितिन थत्ते
Mon, 07/04/2011 - 15:34 नवीन
कोणतं पुणेरी उत्तर मिळालं तुम्हाला? म्हणजे "भविष्यपण सांगितलेलं असतं" असं उत्तर मिळालं असं समजत आहात का? परंतु भविष्य सांगितलेले असते असा कुठलाही दावा केलेला नाही असे हैयो हैयैयो यांनी आम्हाला ठणकावून सांगितले होते. (किंबहुना मग दावा कसला आहे हेच त्याम्नी सांगितले नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हॅ हॅ हॅ चाचा, ओक काकांचा

गणपा
Mon, 07/04/2011 - 15:50 नवीन
हॅ हॅ हॅ चाचा, ओक काकांचा खालील प्रतिसाद आधीच आला असल्याने हा विषय अजुण ताणुन धरु इच्छीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

लोकांचा विश्वास बसणे शक्य होत नाही.

शशिकांत ओक
Mon, 07/04/2011 - 15:20 नवीन
मित्रा, नाडीग्रंथ हे भविष्यकथन आहे. त्या ग्रंथांची महती कळायला सोपे जावे म्हणून त्यातील कथन ज्या विशिष्ठ व्यक्तिला उद्देशून केले गेले आहे हे नक्की करायला जे साक्षी म्हणून लिहिले जाते त्यावर लोकांचा विश्वास बसणे शक्य होत नाही. चर्चा तेथे घोटाळत राहाते.
  • Log in or register to post comments

जुलै अखेर शक्य होणार नाही.

नितिन थत्ते
Tue, 07/05/2011 - 16:47 नवीन
जुलै अखेर शक्य होणार नाही. पण ६+ लोक आधीच जमले आहेत. >>नाडीग्रंथ हे भविष्यकथन आहे. हा दावा तुम्ही (हैयो हैयैयो यांच्या संबंधी धाग्यावर) करत आहात हे नक्की का? हैयोंनी मला खालीलप्रमाणे उत्तर दिले होते. श्री. थत्ते, आपण तीन विविध गटांच्या विधानांची निष्कारण मिसळ करताहांत. नाडिग्रंथप्रेमी, नाडिग्रंथविरोधक आणि तटस्थाभ्यासक ह्यांत कोणाचे काय दावे आहेत, दावे आहेत की नाहीत किंवा कसे, हे आधी आपण जाणून घ्यावे. माझ्या माहितीमध्ये, "नाडीग्रंथात हजारो वर्षांपूर्वीच कोणा ऋषींनी कल्पांतापर्यंत (मानवजात अस्तित्वात असेपर्यंत) जन्माला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवलेले आहे" असा अभ्यासांती दावा ह्यापैकी कोठल्याही पक्षाकडून झालेला नाही. किंबहुना, मी आठवण करून देवू इच्छितो, "असे कसेकाय होते बुवा" ह्या स्वरूपांत मुळांत नाडिग्रंथविरोधकांनी स्वत:च स्वत:स पाडून घेतलेला हा एक अनुभवशून्य आणि त्यामुळेच कौतुकास्पद असा प्रश्न होय. हे मी ह्यापूर्वीही निदर्शनास आणून दिलेले आहे. अभ्यासामध्ये अशा दाव्यांचा विचार करण्याने मूळ अभ्यासास बाधा पोहोंचते. श्री. थत्ते, आपणही अशा विधानांवर (अभ्यासाशिवायच) विश्वास ठेवाल असे वाटले नव्हते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

आम्हीही हात वर केला आहे

शशिकांत ओक
Tue, 07/05/2011 - 14:59 नवीन
रामदासजी व अन्य मित्रांनो. ठाण्यासाठी किती हात वर झाले? त्याप्रमाणे मला माझे इतर कार्यक्रम आखायला बरं पडेल.
  • Log in or register to post comments

आम्ही बी येऊ

स्पा
Tue, 07/05/2011 - 16:36 नवीन
आम्ही बी येऊ आत्तापर्यंत गवि रामदास काका वि मे सूड मी मिका किसन शिंदे लीमाऊजेट
  • Log in or register to post comments

सहाची अपेक्षा, आठ झाले. कोरम

गवि
Tue, 07/05/2011 - 16:42 नवीन
सहाची अपेक्षा, आठ झाले. कोरम फुल्ल. चला.. तारीख वेळ ठिकाण राहिले फक्त. समजा ठाण्यानजीकच्या (असल्यास) नाडीकेंद्रात भेटले तर? तिथून अनुभव घेऊन मग अन्यत्र जाऊ आणि चर्चा करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हे काय?

कवितानागेश
Mon, 07/11/2011 - 12:46 नवीन
मला न विचारताच माझे नाव टाकल्याबद्दल णिशेध! अवांतरः मी येइन की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

माऊ...

सूड
Mon, 07/11/2011 - 13:18 नवीन
>>मला न विचारताच माझे नाव टाकल्याबद्दल णिशेध! माऊ...अगं हे नवीन का आहे ?? आता स्पा नक्की खवळणार आहे, पळ्ळा ऽऽऽ !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मी देखील येईन.

विजुभाऊ
Tue, 07/05/2011 - 16:50 नवीन
मी देखील येईन.
  • Log in or register to post comments

पुणेकरांचा उत्साह दमट हवामानाने मावळला

शशिकांत ओक
Sun, 07/10/2011 - 18:10 नवीन
मित्र हो, ठाणेकरांनी नाडीकट्टा करायला पुढाकार घेऊन आघाडी मिळवली... कदाचित पुणेकर नाडी ग्रंथ प्रेमींचा उत्साह दमट हवामानाने मावळला....
  • Log in or register to post comments

छे छे सगळे कट्टॅ आधी ठाण्याला

५० फक्त
Mon, 07/11/2011 - 11:19 नवीन
छे छे सगळे कट्टॅ आधी ठाण्याला आणि मग पुण्याला अशी प्रंपराच आहे मिपाची, आणि घाबाउ स्पा या कट्टा करण्याकामी पुढाकार घेत असल्याने मी तरी माघार घेतली आहे, मला अजुन बरंच लिहायचं आहे मिपावर आणि वेळ पण थोडाच आहे. ५० फक्त त्यांच्या तिथे फ्री क्रुपेकरुन, भडक, ललकार, माजकारण आणि पोतीवरुन नादविनाद करणा-या धाग्यांच्या बंड्लांचा किरकोळ तसेच घाउक दरात नुसता बाजारच काय तर घर, दार, शेत, फार्म हाउस इ. इ. वसवले जाईल.
  • Log in or register to post comments

किती हात वर झाले?

शशिकांत ओक
Sat, 07/16/2011 - 21:25 नवीन
रामदासजी व अन्य मित्रांनो, ठाण्यासाठी किती हात वर झाले? त्याप्रमाणे मला माझे इतर कार्यक्रम आखायला बरं पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा