एक भावानुवाद:
बुल्लेह शा चे हे एक काव्य. राबी शेरगिलनी गायले आहे.
अशा प्रकारच्या रचनांचे शब्दश: भाषांतर विचित्र वाटते, म्हणून थोडासा मुक्त भावानुवाद करण्याची सूट मी आपली आपणच घेऊन टाकली!
ना आस्तिक वा पांथिक, ना पवित्र वा पतित मी,
ना कुणी संत, ना कुणी राजा, आहे मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
ग्रंथात अन भांगेतही सापडत नाही मी,
दारूच्या धुन्दीतही जाणवत नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
ना सुखदु:खाच्या सोहळ्यात, ना पूजेत रमतो मी,
हवा, पाणी, आग अन जमीन, यातही नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
ना देशाविदेशात, ना भाषा प्रांतात वसतो मी
या इथल्या ठिकाणीही रहात नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
धर्माचे गूढ अन माणसाचे मूळ, जाणत नाही मी,
चालतोफिरतो, उठतोबसतो, तोही नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आहे फक्त मी,
माझ्या जाणीवेतून, आहे 'ज्ञानी' फक्त मी,
बुल्ला, समोर ठाकलो आहे का मी?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7456
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!!
सुरेख
मस्तच!!
झकास
मस्त
In reply to झकास by स्पा
@ स्पा : आश्चर्य आहे तुम्ही
In reply to मस्त by इरसाल
>>@ स्पा : आश्चर्य आहे तुम्ही
In reply to मस्त by इरसाल
पोथी पूराण बरीच वाचता असं वाटतंय...
In reply to >>@ स्पा : आश्चर्य आहे तुम्ही by विश्वनाथ मेहेंदळे
मस्त जमून आलाय अनुवाद.. -
मस्त!
धन्स ग तुझ्यामुळे अर्थ कळाला
झक्कास!!
सूरेख
छानच !!
बुल्लेह शा चं आत्मषटक म्हणा
आज अर्थ कळला
मस्त!
फार छान
मस्त.
+१
In reply to मस्त. by नितिन थत्ते
+२
In reply to मस्त. by नितिन थत्ते
+३
In reply to मस्त. by नितिन थत्ते
याच्या शेवटच्या कडव्यावर
सुरेख !! भावनुवाद आवडला.
सुरेख!
छान आहे भावानुवाद
मस्तच आहे भावानुवाद.
श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनो
छानच लिहिले आहेस आणि मुख्य
सुंदर अनुवाद अमोल केळकर
मस्तं !
हम्म. पूर्वी हे गाणं ऐकून फार
बुल्लेह शाहच्या रचनांबद्दल अजून लिहा...
मस्तं !
ऐका
लिमा टच नाहि जाणवला :(
एकदम आभारी!
In reply to लिमा टच नाहि जाणवला :( by अर्धवटराव