Skip to main content

आंबाडयाची चटणी

लेखक जागु यांनी गुरुवार, 30/06/2011 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आंबाडे पाहील्यावर अनेक जणांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. लहानपणी हे कोवळे आंबाडे खायला मजा यायची. झाडावर दगडे मारुनही आम्ही आंबाडे पाडायचो. मग त्याला मिठ मसाला लावुन खायचे. ती गम्मतच वेगळी होती. पिकलेले आंबाडे त्यांचा स्वाद मला खुप आवडायचा. आंबाडे मिठ घालुनही मुरवत ठेवायचो. आंबाड्यांचा सिझन गेला की मग आंबाड्यांची कोवळी पाने आणि त्यांचे देठ चावुन तो स्वाद मिळवण्या पर्यंत उपद्व्याप चालायचे. अश्याच आंबाड्याची आता चटणी पाहुया. साहित्यः ५-६आंबाडे (धुवुन फोडी करुन) ओल खोबर १ वाटी २ मिरच्या (तिखट हवी असल्यास जास्त घ्या) थोडी कोथिंबीर (ऑप्शनल) मिठ कृती : वरील सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सरमध्ये चटणी करावी. (किती सोप्पी रेसिपी एका ओळीतच संपली)

वाचने 8395
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

अहा.. हा प्रकार फारच टेस्टी असतो. अशाच कृतीचा पण नाव वेगळे असलेला पदार्थ रत्नांग्रेस नेहमी खायचो. चटकदार एकदम.. :) पण यात काहीसा गूळ घालून आंबटगोडपणा आणलेला असायचा.. मला वाटते कैरीची चटणीच म्हणायचो त्याला..

In reply to by गवि

पण यात काहीसा गूळ घालून आंबटगोडपणा आणलेला असायचा.. मला वाटते कैरीची चटणीच म्हणायचो त्याला..
+१ सहमत हो गवि. कैरी बरोबरच गूळ देखील किसुन घालतत ह्यात. आठवणीनेच जीव जळाला हो :( ए जागुतै ते अंबाडे मला पार्सल पाठव ग. किंवा मंडईत कुठे मिळतात ते सांग.

छान लागते. काही तेलगू भाषकांकडे "गोंगुरा" ह्या नावाने पूर्वीही खाल्ली होती.

In reply to by विसुनाना

असं काय? पण ती पालेभाजी तर चक्क बरण्यांतून मिळते! आपल्या बेडेकर लोणच्यांसारखी.

In reply to by विसुनाना

गोंगुरा = अंबाडीची पालेभाजी. हे वेगळे आंबाडे (फळे) आहेत
मला पन अंबाडीची पालेभाजी ची चटणी असेल असे वाटले. ती पन मस्त लागते. हा प्रकार मी १ल्यांदाच पाह्तेय. हे पुण्यात मिळते का?

In reply to by विसुनाना

वाक्यरचना आता नीट आठवत नाही. पण असेच काहीसे पु.लं. नी आपल्या "खाद्यजीवन" चा शेवट करताना म्हटले आहे. की "वाफाळलेला भात आणि अंबाडीची वरुन लसणाची फोडणी दिलेली भाजी ताटात असेल तर साक्षात यमदूत आला तरी त्याचा खाणार्‍यावरचा हात खाण्यावर जाईल." अगदी पटले होते. मूळ वाक्य काय आहे ते कोणाला आठवत असल्यास कृपया दुरुस्त करावे.

आंध्रप्रदेशात आंबाडे (फळ) आहे त्याला वड मंगा / वडु मंगा ( Tender Mango) असे म्हणतात्...त्याचे लोणचे करतात

स्ळूर्र्र्प स्ळूर्र्प .............आहा ......... बरोबर तांदळाची भाकरी पण चालते . लहानपणी खूप अंबाडे/अंबाडी खाल्लीत. आता तर औषधालाही मिळत/माहित पडत नाहीत. बालपणीचा काळ सुखाचा .

In reply to by इरसाल

लहानपणी खूप अंबाडे/अंबाडी खाल्लीत. आता तर औषधालाही मिळत/माहित पडत नाहीत. अरे हो .....अंबाडे **** या विकारावर उत्तम औषध आहेत म्हणे. हे तुम्हाला माहिती आहे वाटते ;)

आमच्या जुन्या घरा मागे होतं अंबाड्याच झाड. आई गुळा ऐवजी थोडीशी साखर घालायची यात.

आता आंबाडे वासालाही मिळणे मुष्किल आहे. तरीही ह्या विकांती मावशीला आणायला सांगतो. आजच ऑर्डर नोंदवली तर चालेल.. - पिंगू

आंबाडे आणि आंबाडी वेगळी. उद्या आंबाडीच्या भाजीची रेसिपी देते. ह्यात थोडी साखर किंवा गुळ घातला तरी चालेल चव छान लागते तशी पण. पण ज्यांना आंबट आवडते त्यांना साखर किंवा गुळ घालून नाही आवडत.

आंबाडे.............हे पहिल्यादांच पहाते आहे..कदाचित आमचेकडे दुसरे काही नाव असेल.. ह्म्म.जावुद्यात..पण चटणी मस्तच झालेली दिसतेय....व्वा... आंबाडीची भाजी आमची जीव की प्राण....येऊद्यात लवकर....

जागु , नेहमीप्रमाणेच मस्तं पाकृ .

आजच पणजी बस स्टंडवरून पेरूएवढे मोठे अंबाडे आणलेत सासव करायला. आता चटणी पण करेन. अंबाड्यांचा फोटो खासच आलाय!