Skip to main content

राहुल व सोनिया यांची बदनामी ?

लेखक तर्री यांनी मंगळवार, 21/06/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात चे. पु वर एक " विडिओ " पहाण्यात आला. त्यामध्ये राहुल गांधी / सोनिया गांधींची यथेच्च बदनामी करण्यात आली आहे. २ ऊदाहरणे १.सोनिया गांधीचे खोटे प्रतिज्ञा पत्र : आपण "केंब्रिज " विद्यापिठाच्या स्नातक असल्याचे प्रतिज्ञा पत्र खोटे आहे . वास्तविक त्या मात्र ५ वी पास आहेत. २. राहुल गांधी ना अमेरिके मध्ये अटक : बेकायदा / बेहिशेबी $१६०,००० जवळ बाळगल्या बद्द्ल राहुल गांधी ना अमेरिके मध्ये एफ्.बी.आय. ने ९ तास ताब्यात घेतले होते . ते त्यानंतर आज पर्यंत अमेरिके मध्ये गेलेले नाहित. हे खरे असेल की निव्वळ प्रचारकी / बदनामी ? विरोधकाना पुरेसे मुद्दे नसल्याने हे सगळे पसरवण्यात येते आहे का ? आपल्या ला काय वाटते ?

वाचने 3856
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

आम्हाला असे वाटते की या विषयावरील चर्चा श्री. जयंत कुलकर्णी यांनी यापूर्वीच इथे उपस्थित केली आहे, त्यामुळे पुन्हा वेळ वाया घालवण्यात हशील नाही. इथे पहा : यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला का करत नाहीत ?

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.. साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी | तयासी शेवटी कडबा रे | नुसता कडबा बि घासकडबा?

सोनिया का पंतप्रधान होऊ शकत नाही त्याची लिंक. According to a Provision in the Citizenship Act. A Foreign National who becomes a Citizen of India, is bounded by the same restrictions, which an Indian would face, If he/she were to become a Citizen of Italy. (Condition based on principle of reciprocity) Now Since you can't become a PM in Italy, Unless you are born there. Likewise an Italian Citizen can't become Indian PM, unless He/She is not born here! म्हणुन सोनिया बाई नाही बनल्या पंतप्रधान. बाकी सगळे नाटक

In reply to by रणजित चितळे

हे कोणत्या साईटीवरून मिळाले? घटनेत असे कुठेलेही बंधन नाही. भारतिय नागरिकत्व घेतलेली व्यक्ती पंतप्रधान बनू शकते. ५० पैकी जवळपास ३०/३२ देशामध्ये असेच आहे. ईटलीमधेही. ईटलीचे नागरिकत्व असेल आणि वय ५०हून अधिक असेल तर आपणही बरल्स्कोनी होवू शकता!!

In reply to by चिरोटा

त्यांनी पंतप्रधान व्हायला नकार दिला* ही फॅक्ट पचवता येत नसल्याने संघिष्ट लोक अशा काल्पनिक गोष्टी मधून मधून फॅब्रिकेट करीत असतात. येथे कलाम यांनी पत्र नियुक्तीचे पत्र तयार ठेवले होते असे स्पष्टपणे म्हटले आहे. (कलाम यांनी वरील तथाकथित कायद्याचा विचार न करता पत्र तयार केले असे निदान संघिष्टांनी म्हणू नये). *नकार दिला = जवाबदारी घेणे टाळले वगैरे आक्षेप हे स्वतंत्र मुद्दे आहेत त्यावर माझे आत्ता काही म्हणणे नाही. त्या पंतप्रधान होऊ शकत नव्हत्या/कलाम यांनी पंतप्रधान करण्यास नकार दिला वगैरे काल्पनिक कथांबाबतच हा प्रतिसाद आहे.

In reply to by नितिन थत्ते

सहमत आहे. सोनिया गांधी सारख्या निस्वार्थी, पापभिरु आणि देशासाठी जीवन वाहिलेल्या महान व्यक्तिविषयी असे खोटे पुरावे पसरवताना श्री. चितळे ह्यांनी थोडा विचार करायला हवा होता. त्यांचे हे वागणे अत्यंत खेदजनक आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>सोनिया गांधी सारख्या निस्वार्थी, पापभिरु आणि देशासाठी जीवन वाहिलेल्या महान व्यक्तिविषयी..... हॅ हॅ हॅ.... तुमचं चालू द्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

काहीसा सहमत आहे. या व्यक्तीने भारतासाठी खूप वेळ दिला आहे यात शंका नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सोनिया गांधी सारख्या निस्वार्थी, पापभिरु आणि देशासाठी जीवन वाहिलेल्या महान व्यक्तिविषयी असे खोटे पुरावे पसरवताना श्री. चितळे ह्यांनी थोडा विचार करायला हवा होता. त्यांचे हे वागणे अत्यंत खेदजनक आहे. पराशी सहमत आहे. मागेपण कोणी तरी असाच खोडसाळपणे राजीव गांधींचे आजोबा (वडीलांचे वडील) कोण म्हणून विचारत होता....

रिमोट कंट्रोल वापरुन जास्त फायदा होत असेल तर कोण ती सत्तेची काटेरी माळ गळ्यात घालून घेईल ? त्याची उदाहरण आधी आपल्या महाराष्ट्राने घालूनच दिले आहे.

राहुल आणि सोनिया यांच्यावर जळण्यार्‍यांना रेशन कार्डवर इनो देखील मिळावे अशी मागणी मी लवकरच संसंदेत करणार आहे. - खासदार, ;) इंट्या.