उधाणलेला समुद्र, बेफान लाटा,
गार वारा, अन... अन... हात तुझा हातात.
पौर्णिमेची रात्र,
खिडकीखाली नक्षत्रांचा सडा
पायी घेऊन उभा पारिजात,
मंत्रमुग्ध सुगंध, अन... अन... हात तुझा हातात.
पावसाची रिपरिप, अंगावर कोसळणाऱ्या सरी
अथांग भिजलेलो मी, अन... अन... हात तुझा हातात
थकलेला जीव, खोलीभर अंधार.
एकटेपणाची बोचरी जाणीव,
अन... अन... हात तुझा हातात
घाबरलेलो मी, बिथर्लेलो मी,
कुशीत डोकं ठेऊन रडणारा मी,
अन... अन... हात तुझा हातात
बागेत खेळणारी आपली छकुली,
दुडक्या चालीने दवडणारी ती,
कौतुकाने पाहणारा मी,
अन... अन... हात तुझा हातात
निवांत संध्याकाळ, मावळतीचा दिनकर,
गोंगाट सुद्धा वाटावा श्वासोश्वास,
अन... अन... हात तुझा हातात
संपलेला प्रवास, थकलेली गात्र,
अशक्त शरीर, मिटणारे डोळे,
अन... अन... हात तुझा हातात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2358
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!!
कविता अप्रतिम ... मनापासुन
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद,
In reply to कविता अप्रतिम ... मनापासुन by गणेशा
आयुष्यात कधीकधी गर्दीतसुद्धा
In reply to आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
वाहव्वा झंपुराव
वावा ट्वीटर ट्वीटर ट्वीटर