✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद).

न
नितिन थत्ते यांनी
Mon, 06/27/2011 - 14:37  ·  लेख
लेख
. . . प्रेरणा आज ओळख करून घेऊ, भारतात जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद. इतिहासात पाहिले असता, महात्मा गांधींच्या खुनानंतर हिंदुत्ववादी लोकांना भारतात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सर्वसामान्य हिंदू घटनेत समावेश केलेल्या पुरोगामी तरतुदींकडे आकृष्ट होऊ लागला होता. पुराणमतवादी हिंदुत्ववाद्यांना असलेला हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी नेहरूंच्या मृत्यूनंतर लवकरच स्वामी चिन्मयानंद यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना पवई मुंबई येथे १९६४ मध्ये केली. ही संस्था हिंदू लोकांचे संघटन करण्याचे काम करते. रा स्व संघाची ही एक शाखा आहे असेही म्हणता येईल. हिंदू मूल्यांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रसार करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. सुमारे १९८० पर्यंत भारतीय हिंदूंना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था अमेरिकेपर्यंत पोहोचली. आता ही संस्था जगभरातील एक प्रमुख हिंदूत्ववादी संस्था बनली आहे. अयोध्येमध्ये या संस्थेने एक भले मोठे मंदिर बांधण्याचे गाजर दाखवल्याने ती बर्‍याच हिंदुत्ववादी बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. सध्या अमेरिकेतील व परदेशांतील हिंदु जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य चालले आहे. विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते साध्या वेशात राहतात. ते जवळ कोणतेही इतर साधन बाळगत नाहीत. त्यांचा मुक्काम आपापल्या घरांमध्येच असतो. ते हिंदुत्वाचे शिक्षण देतात. संस्थेतर्फे अधूनमधून संतांचा मेळावा म्हणजेच धर्म संसद आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. ही संस्था रा स्व संघाची शाखा असली आणि तिचे नेते भाजप या पक्षात सहभागी असली तरी रा स्व संघाच्या जवाबदारी झटकण्याच्या प्रवृतीमुळे ही संस्था कोणत्याही अतिरेकी घटनेत सहभागी नसल्याचा दावा करते. तसेच या संस्थेतून आलेले कार्यकर्ते दहशतवादी कृत्ये करीत असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेच्या सरकारी यंत्रणेत शिरलेल्या हस्तकांमुळे तिचा हिंसाचाराशी कोणताही संबंध नसल्याचे आजवर म्हटले गेले आहे. . . . . सावधां दक्ष
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
13338 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

थत्तेचच्चांचा दूसरा!!

सहज
Mon, 06/27/2011 - 14:42 नवीन
चच्चा संघीष्ट की अलकैदीष्ट??
  • Log in or register to post comments

चला...

श्रावण मोडक
Mon, 06/27/2011 - 14:45 नवीन
चला... चाचांना कसले तरी का होईना 'इष्ट' म्हटले गेले तर... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ते तर आहेतच

सहज
Mon, 06/27/2011 - 14:48 नवीन
'इष्ट'मनकलर के जमाने के सुपरहिट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सहमत

श्रावण मोडक
Mon, 06/27/2011 - 14:53 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

:ऑ

नितिन थत्ते
Mon, 06/27/2011 - 14:47 नवीन
कालपर्यंत कम्युनिष्ट समजत होता ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हा हा हा

सहज
Mon, 06/27/2011 - 14:50 नवीन
विकेट काढलीत!! थत्ते चच्चा - भारताचे पहीलेवहीले लोकपाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कम्युनिष्टच!

श्रावण मोडक
Mon, 06/27/2011 - 14:54 नवीन
'कम्युनिष्ट'च ते. 'दूसरा' टाकण्यात पटाईत! ;) मग सहज विकेट पडतातच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

बरोबर!

सहज
Mon, 06/27/2011 - 15:07 नवीन
मग काय नितिन सेन म्हणायचे की नितिन रॉय? बादवे बुकर की मेगॅसेसे मिळाला म्हणे चच्चांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सेन

श्रावण मोडक
Mon, 06/27/2011 - 15:32 नवीन
'सेन' या शब्दाला माझी हरकत नाही. तुम्हाला सिंग तर म्हणायचे नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

:)

नितिन थत्ते
Mon, 06/27/2011 - 16:09 नवीन
मॅगेसेसे मिळाला म्हणजे आता लोकपाल कोण ते मी ठरवणार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हाहाहाहा...

श्रावण मोडक
Mon, 06/27/2011 - 17:44 नवीन
पुन्हा एक दूसरा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

इन्सेन.

llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/27/2011 - 17:04 नवीन
इन्सेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हा हा हा

आनंदयात्री
Mon, 06/27/2011 - 20:09 नवीन
>>इन्सेन नित सायलेंट धरु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

आज-काल

प्रास
Mon, 06/27/2011 - 14:52 नवीन
कम्युनिष्टांमधलेच १. संघिष्ट २. अलकैदिष्ट आणि ३. अनिष्ट असे भेद सांगण्यात येतात...... ह. घ्या. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

वा!

सुनील
Mon, 06/27/2011 - 14:47 नवीन
छ्या! मिसळ दिवसेंदिवस जास्तच चटकदार होऊ लागली आहे! "समतोल" प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments

प्रविण तोगडीया यांना मानाचा

वपाडाव
Mon, 06/27/2011 - 14:49 नवीन
प्रविण तोगडीया यांना मानाचा मुजरा....
  • Log in or register to post comments

||वद जाऊ कुणाला शरण, करील जो

llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/27/2011 - 14:56 नवीन
||वद जाऊ कुणाला शरण, करील जो 'वरण' संकटांचे|| बर्‍याच दिवसात वरण भात खाल्ला नाही. शेवटी बामण वर्णाच्या वरणाची चव काही न्यारीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

जे

विनायक प्रभू
Mon, 06/27/2011 - 14:53 नवीन
जे आयला. एक 'डागचिक' पण क्रिप्टीक लेख टाकावा की काय?
  • Log in or register to post comments

काही का असेना थत्ते चाचा

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/27/2011 - 15:23 नवीन
काही का असेना थत्ते चाचा 'मोकळे' झाले हे महत्वाचे. अवांतर :- हे लेखन सलिम-जावेद च्या धर्तीवर विजु-नितिन असे केले गेले असते तर एकदम सुप्पर डूप्पर हिट झाले असते ;)
  • Log in or register to post comments

सुप्पर डूप्पर हिट

चेतन
Mon, 06/27/2011 - 16:38 नवीन
थत्ते चाचा खुन की वध हो....... ;) सुप्पर डूप्पर हिट करण्यासाठी ही प्रतिक्रीया महत्वाची आहे. (माथेफिरु) चेतन अवांतरः अपेक्षित विडंबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

जौंद्या.... दोन्ही नको. आपण

नितिन थत्ते
Mon, 06/27/2011 - 16:50 नवीन
जौंद्या.... दोन्ही नको. आपण त्यांनी स्वतः वापरलेला ऑथेण्टिक "हत्या" हाच शब्द वापरू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

हत्या का...? बरं बरं सॉरी

चेतन
Mon, 06/27/2011 - 17:14 नवीन
हत्या का...? बरं बरं सॉरी शक्तिमान शिख 'हत्या'कांडानंतर स्वतःला सेक्युलर म्हणवणारी तकलादु जमात म्हणुन एक विडंबन सुचतयं पण जाउद्या संपादकानां कशाला त्रास ;) चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

छे छे

आनंदयात्री
Mon, 06/27/2011 - 20:11 नवीन
>>शिख 'हत्या'कांडानंतर स्वतःला सेक्युलर म्हणवणारी तकलादु जमात हत्याकांड !!! छे छे .. तो तर काँग्रेसी अभिव्यक्तीचा एक उत्स्फुर्त हुंकार होता !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

हो ना. आता मोठ्ठा वृक्ष

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 06/29/2011 - 00:40 नवीन
हो ना. आता मोठ्ठा वृक्ष कोसळला तर जमिनीला हादरे बसणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

छान विडंबन

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/27/2011 - 16:59 नवीन
व्वाहवा छान हो...अगदी...नगदी विडंबन आहे हे....ह्हे ह्हे ह्हे....ह्हा ह्हा ह्हा...मजा आली..लीहीत रहा...
  • Log in or register to post comments

मस्त्

चिरोटा
Mon, 06/27/2011 - 17:07 नवीन
मस्त विडंबन. भारतिय मग तो हिंदु असो वा मुस्लिम, कार्य पवित्र आहे सिद्ध करण्यासाठी अमेरिकेचा स्टॅम्प लागतोच असे दिसतय.
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन

राजेश घासकडवी
Mon, 06/27/2011 - 17:51 नवीन
'मुस्लीम हिंदूंच्या चालीरीतींकडे आकृष्ट झाले', 'हे लोक साध्या वेशात राहातात' वगैरे मूळ लेखातली वाक्यं वाचून हसून हसून पुरेवाट झाली होती. पण इतकी माफक चेष्टा चालेल बहुधा. नाही उडायचा हा धागा.
  • Log in or register to post comments

थत्ते चाचांचे वाक्य पण या

मृत्युन्जय
Mon, 06/27/2011 - 18:21 नवीन
थत्ते चाचांचे वाक्य पण या संस्थेच्या सरकारी यंत्रणेत शिरलेल्या हस्तकांमुळे तिचा हिंसाचाराशी कोणताही संबंध नसल्याचे आजवर म्हटले गेले आहे. मूळ लेखातील वाक्य पण या संस्थेचा हिंसाचाराशी कोणताही संबंध आजवर सिद्ध झालेला नाही. थत्ते चाचा विडंबन पाडतानाही स्वतःचा हिडन अजेंडा पुढे सरकवतात हे बघुन अंमळ मौज वाटली.
  • Log in or register to post comments

अंमळ फसले आहे.

धमाल मुलगा
Mon, 06/27/2011 - 18:30 नवीन
असे आमचे पष्ट मत. मुळ लेखातल्या गंभीरतेचा पोत विडंबनात पुरेसा उतरत नाही.
  • मंदिर बांधण्याचे गाजर दाखवल्याने
  • जवाबदारी झटकण्याच्या प्रवृतीमुळे ही संस्था कोणत्याही अतिरेकी घटनेत सहभागी नसल्याचा दावा करते.
  • सरकारी यंत्रणेत शिरलेल्या हस्तकांमुळे तिचा हिंसाचाराशी कोणताही संबंध नसल्याचे आजवर म्हटले गेले आहे.
अशा वाक्यांमुळं निखळ विडंबनाचा आनंद मिळत नाही. केवळ तिसर्‍या लक्षावरील शरसंधानासाठी दुसर्‍या गोष्टीचा फायदा पहिल्यांदा घेण्याचा प्रयत्न वाटतो. अर्थात, एकुणातच फार वाचन, मनन, चिंतन आणि अभ्यास नसल्याने आमचे मत हे योग्य असेलच ह्याची खात्री देता येत नाही. गरज पडल्यास जाणकार, अभ्यासू आणि सक्रिय महाजनांनीच ते योग्य त्या कसोट्यांवर घासून वर्गिकृत करावे असे नमुद करतो. :D
  • Log in or register to post comments

मस्तच!

विकास
Mon, 06/27/2011 - 18:53 नवीन
सध्या अमेरिकेतील व परदेशांतील हिंदु जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य चालले आहे. या निमित्ताने काँग्रेसच्या सागरपार (पण फक्त अमेरीकाच दाखवणार्‍या) शाखेची आठवण झाली. ;) Image removed. काँग्रेसचे कार्यकर्ते समाजकार्यात मग्न असलेल्याने त्यांना वरील संकेतस्थळ अजून पूर्ण करायला वेळ मिळालेला दिसत नाही. :-) बाकी चित्र पहात असताना "भारतीय काँग्रेस स्टार्ट्स विथ गांधी अँड एन्डस विथ गांधी" असा निष्कर्ष निघतो. तसेच विदेशी नागरीकांचे आपल्याला वावडे नसल्याने काँग्रेसच्या जन्माआधीचे वॉशिंग्टन-जेफरसन-लिंकन यांना काँग्रेसचे मरणोत्तर सन्मानीय सभासदत्व बहाल केलेले दिसतेयं! बाकी आता मला देखील यातून प्रेरणा मिळून, " काँग्रेसजनांना एकत्र ठेवणारी सत्ता" असा काहीसा लेख लिहावासा वाटत आहे. ;)
  • Log in or register to post comments

अग्गायायायाया

धमाल मुलगा
Mon, 06/27/2011 - 19:01 नवीन
Image removed. Image removed. Image removed. आम्ही जातो..आमुच्या गावा...आमुचा टाटा घ्यावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तुमचा अभ्यास महान आहे.

मृत्युन्जय
Mon, 06/27/2011 - 19:19 नवीन
तुमचा अभ्यास महान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कसचं कसचं!

विकास
Mon, 06/27/2011 - 20:05 नवीन
तुमचा अभ्यास महान आहे. हे मला उद्देशून आहे असे वाटले म्हणून थोडे स्पष्टीकरण देतो. गांधीजींनी एकदा अभ्यासाच्या (स्टडीच्या) संदर्भात म्हणाले होते, "I intend to make a careful study of my own religion and, as far as I can, of other religions as well." आता "रिलीजन" या शब्दाचा डिक्शनरी अर्थातला एक अर्थ, "the body of persons adhering to a particular set of beliefs and practices" असा देखील आहे. म्हणजे त्यात केवळ देव-धर्म लागते असे नाही. कुठलेही बिलीफ आणि त्यासाठीची प्रॅक्टीस हे करणारा समुदाय असावा इतकेच... म्हणून सत्ता मिळवण्यासाठी ऐक्य हवे असे "बिलीफ" आणि त्यासाठी कॉमन "प्रॅक्टीस" असलेल्या रीलीजनचा मी देखील (गांधीजींची) प्रेरणा घेऊन आपल्या कुवतीप्रमाणे अभ्यास करायचा प्रयत्न करत असतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

:)

आत्मशून्य
Mon, 06/27/2011 - 20:21 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

///काँग्रेसचे कार्यकर्ते

जयंत कुलकर्णी
Mon, 06/27/2011 - 20:56 नवीन
///काँग्रेसचे कार्यकर्ते समाजकार्यात मग्न असलेल्याने त्यांना वरील संकेतस्थळ अजून पूर्ण करायला वेळ मिळालेला दिसत नाही. बाकी चित्र पहात असताना "भारतीय काँग्रेस स्टार्ट्स विथ गांधी अँड एन्डस विथ गांधी" असा निष्कर्ष निघतो. तसेच विदेशी नागरीकांचे आपल्याला वावडे नसल्याने काँग्रेसच्या जन्माआधीचे वॉशिंग्टन-जेफरसन-लिंकन यांना काँग्रेसचे मरणोत्तर सन्मानीय सभासदत्व बहाल केलेले दिसतेयं!/// असहमत ! टिळक, पटेल, शास्त्री या हरकाम्यांची चित्रे अजून टाकायची आहेत. पण ती राजपूत्रानंतर. दुसर्‍या वाक्याशीही असहमत. तसे असते तर शेवटी आपल्या लाडक्या सोनियांचे चित्र पाहिजे होते. काँग्रेसच्या अंतःसाठी तरी त्यांना श्रेय द्याल का नाही ? मरणोत्तर सभासदस्व.....:-) "आपल्या हिटलिस्टवर कोणकोण आहे प्रत्येकी १० नावे सांगा.?" असा धागा काढायचा विचार करतोय. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कोण?

विकास
Mon, 06/27/2011 - 21:22 नवीन
टिळक, पटेल, शास्त्री या हरकाम्यांची चित्रे अजून टाकायची आहेत. टिळकः जयंतराव टिळकांबद्दल बोलत आहात का त्यांचे सुपुत्र दिपक टिळक का त्यांचे सुपुत्र (कसबामधून तिकीट मिळालेले) रोहीत टिळकांबद्दल बोलत आहात? पटेलः तुम्हाला नक्की चिमणभाई पटेल म्हणायचे असेल शास्त्री: अनिल शास्त्री का? त्यांचे काही खरे नाही म्हणा...रामलीला वरील काँग्रेसलीलावर टिका केली आहे ते... बाकी आम्हाला कुठलेही टिळक, पटेल, शास्त्री माहीत नाहीत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

संपूर्ण श्रेय काँग्रेस पक्षालाच द्यायला हवे

सुधीर काळे
Mon, 06/27/2011 - 20:33 नवीन
हिंदूंना एकत्र आणण्याचे, त्यांच्यात एकी निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय काँग्रेस पक्षालाच द्यायला हवे.
  • Log in or register to post comments

आमेऽऽन!

धमाल मुलगा
Mon, 06/27/2011 - 20:38 नवीन
आमेऽऽन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

+१

विकास
Mon, 06/27/2011 - 20:42 नवीन
+१ :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

श्री. नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन!

सुधीर काळे
Mon, 06/27/2011 - 23:01 नवीन
संयुक्त राष्ट्र संघटनेने 'मोदींच्या गुजराथ' राज्याला सावजनिक सेवा क्षेत्रातील पारदर्शकता, जबाबदार वागणूक आणि तात्काळ कारवाई करण्याच्या क्षमतेबद्दल जागतिक दुसरे पारितोषिक दिले. ही माहिती माझे बडोद्याला रहाणार्‍या एका स्नेह्यांनी मला दिली. याबद्दल श्री. नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन! बादवे, याची चर्चा 'मिपा'वर झाली का? Image removed. "हा बातमी मी इथे कां दिली बॉ" हे मात्र विचारू नका हं!
  • Log in or register to post comments

मोदींचे हाबिनंदनच हो. पण

शिल्पा ब
Tue, 06/28/2011 - 04:36 नवीन
मोदींचे हाबिनंदनच हो. पण सध्या मिपा समाज हा ब्राह्मण समाज तसेच संपूर्ण हिंदू आणि ख्रिस्चन समाज इतरांवर कसा वाईट्ट्ट परिणाम करतेय हे इतरांना समजून सांगण्यात बिज्जी आहे. त्यामुळे मोदींकडे नंतर बघू. काय हो अ जात शत्रू आणि अस्मा फकीर? बात सच्ची का नाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

शि ल्पाब ताई :)

अजातशत्रु
Tue, 06/28/2011 - 17:25 नवीन
शि ल्पाब ताई तुमी बी योक धागा काडा कि, तुमच्या तर्‍हेने समजून सांगाया वाईच,बगूया तरी तुमचं ग्यान मंग बगू काय व्हतं ते :) अवांतर : हे अस्मा फकीर कोण आहेत? मला इथले आंसमा शख्स हे माहित आहेत. अतिअवांतर: तुम्ही माझे स्पष्ट नाव (फोड करुन का होइना ) घेतले आहे तो मी वैयक्तिक प्रतिसाद समजून तुम्हाला वैयक्तिक उत्तर दिले आहे चालेल ना? नाहितर सॉरी हं, नाहि तुमच्या वैयक्तिक प्रतिसादा संदर्भातल्या व्याख्या कधि बदलतील याचा काही नेम नसतो, म्हणून आपली अगोदरच काळजी घेतोय. जाताजाता : हे मी वर काय लिहीलेय ते समजले ना? :) मी छोट्टे छोट्टे प्रतिसादही देऊ शकतो ( अटि लागू)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

विद्वाsssss न !!! बाकी

शिल्पा ब
Wed, 06/29/2011 - 07:02 नवीन
विद्वाsssss न !!! बाकी आम्हाला ढ न म्हणता दोन ओळी तुम्हाला लिहायला सुचल्या हेच काय कमी आहे? <<<नाहि तुमच्या वैयक्तिक प्रतिसादा संदर्भातल्या व्याख्या कधि बदलतील याचा काही नेम नसतो, हे सुद्धा इतर सगळ्या गोष्टींसारखंच स्वतःच ठरवलं वाटतं!! आता विद्वानच म्हंटल्यावर काय बॉ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

म्हणले होते हो तुम्हाला कळलेच नाही :)

अजातशत्रु
Wed, 06/29/2011 - 14:20 नवीन
तुम्ही जाताजाता वाचले नाही काय? आता याचा प्रत्यय येणे हे क्रमपात्रच झाले आहे.
हे सुद्धा इतर सगळ्या गोष्टींसारखंच स्वतःच ठरवलं वाटतं!! आता विद्वानच म्हंटल्यावर काय बॉ!!
असं स्वतःच ठरवत नाही, तुम्ही लगेच, मी वैयक्तिक पातळीवर घसरलो असे बोलायचा चान्स घेता म्हणून ती काळजी.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

श्री. नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन!

आत्मशून्य
Tue, 06/28/2011 - 07:25 नवीन
यावर मिपावर चर्चा झाल्याचे मला स्मरत नाही, असल्यास धागा द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

मोदी भाय तमारो अभिनंदन ६.

अजातशत्रु
Tue, 06/28/2011 - 17:03 नवीन
देस मेरा रंगरेज ये बाबू... घाट घाट यहाँ घटता जादू , राई पहाड़ है, कंकड़ शंकर, बात है छोटी बड़ा पतंगड़ इंडिया सर ये चीज़ धुरंधर रंग रंगीला परजा तंतर भारत में कुछ भी हो सकता हे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

विडंबन

आंसमा शख्स
Tue, 06/28/2011 - 08:01 नवीन
विडंबन चांगले जमले आहे. पण सत्य निराळे आहे.
  • Log in or register to post comments

सत्य काय आहे?

अजातशत्रु
Wed, 06/29/2011 - 13:51 नवीन
पुढचा धागा कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स

ही संस्था रा स्व संघाची शाखा

विजुभाऊ
Tue, 06/28/2011 - 11:26 नवीन
ही संस्था रा स्व संघाची शाखा असली आणि तिचे नेते भाजप या पक्षात सहभागी असली तरी रा स्व संघाच्या जवाबदारी झटकण्याच्या प्रवृतीमुळे ही संस्था कोणत्याही अतिरेकी घटनेत सहभागी नसल्याचा दावा करते. थत्ते एका दगडात किती पक्षी माराल हो. रा स्व संघाचे लोक बजरंग दल,विश्व हिंदु परीषद, भाजप , अभाविप वगैरे संघटनांचे कार्य चालवत असले तरीही संघाचा या संघटनांशीकाहीही संबम्ध नाही. वरील सर्व संघटनांचे महत्वाचे कार्यालयीन संघाच्या कार्यालयातून ठरवले जात असल्याची काही लोकाना शंका आहे तरीही हा नेहमीच योगायोग असतो. संघ अशा कोणत्याच घटनांशी संदर्भीत नसतो. बाबरी मशीदी च्या जागेत राम मंदीर बांधण्याच्या घटने मागे संघाचा काहीही संबन्ध नाही. तसेच इंदीरा गांधीनी ज्या जनसंघ ( दीपक..... दीपक) या सम्घटनेच्या कार्यकत्यांना तुरुंगात डांबले होते त्या संघटनेशी देखील संघाचा काहीही संबन्ध नाही. महात्मा गांधींचा खूनी नथुराम गोडसेशी देखील संघाचा काहीही सम्बन्ध नाही. काँग्रेस सरकारचा भ्रष्टाचार उघड करताना भ्रष्टचारी कर्नाटक मुख्यमंत्र्याना पाठीशी घालणार्‍या भाजप शी संघाचा काहीच संबन्ध नाही. भाजप ही संघाची शाखा नाही दोन्ही ठीकाणी कार्यकर्ते एकच आहेत हा निव्वळ योगायोग समजावा
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आंसमा शख्स
Tue, 06/28/2011 - 12:16 नवीन
सत्य सांगणारा फार चांगला प्रतिसाद दिला- धन्यवाद. तुम्ही चांगले लिहिले आहे. हाच खरा चेहरा आहे. बाकी सर्व झूट आहे हे लक्षात आलेच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा