✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिंपीणिचं घरटं

र
रामदास यांनी
Tue, 06/24/2008 - 20:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
67121 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

प्रिय वाचक

रामदास
Fri, 06/27/2008 - 20:47 नवीन
थोडा थोडा लिहीताना हा लेख बराच मागे पडला होता. बोर्डावर दिसणार नाही म्हणून हा खटाटोप करतो आहे.
  • Log in or register to post comments

शि॑पिनिच॑ घरत

मन्जिरि
Sun, 11/09/2008 - 22:22 नवीन
व्वा व्वा फार सुरेख अफलतुन ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

प्रतिसाद

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/27/2008 - 21:08 नवीन
प्रतिसाद खरडला आहे. इथे फक्त इतकेच सांगतो, अति अति सुंदर. बिपिन.
  • Log in or register to post comments

प्रभावी

सहज
Fri, 06/27/2008 - 22:01 नवीन
"आई-शिलाई" च्या जोडीचा प्रवास अतिशय प्रभावी. सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता. अप्रतिम!
  • Log in or register to post comments

काय चटका

यशोधरा
Fri, 06/27/2008 - 22:02 नवीन
काय चटका लावणारं लिहिलं आहेत!! आईसाठी जीव तडफडला.....
  • Log in or register to post comments

सगळं आयुष्य

एडिसन
Fri, 06/27/2008 - 22:08 नवीन
सगळं आयुष्य कष्टात काढलं त्या माऊलीनं..
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
निशब्द.. Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments

ओह माय गॉड..

भाग्यश्री
Fri, 06/27/2008 - 22:24 नवीन
ओह माय गॉड.. शेवट असा असेल या लेखाचा असं वाटलं नव्हतं!! खरच निशब्द केलंत..झटकाच बसला त्या वाक्याने.. :| http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर आहे लेख..

फुलपाखरु
Fri, 06/27/2008 - 22:33 नवीन
आणि अतिशय समर्पक नाव आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख आणि सुरेखच फक्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/27/2008 - 23:05 नवीन
शेवटची ओळ वाचतांना डोळ्यात पाणी टचटचले. -दिलीप बिरुटे (निशब्द )
  • Log in or register to post comments

+१

दादा कोंडके
Sat, 02/23/2013 - 16:47 नवीन
अगदी असच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोसत सोसत जगत रहायचं ..........

वाटाड्या...
Fri, 06/27/2008 - 23:27 नवीन
"सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती." अगदी खरं...त्यामुळेच ती पिढी सर्वोत्कॄष्ठ...त्या पिढीच्या ह्या गुणांच्या जोरावर आज काल आम्ही इतके वरती आलो. शतशः प्रणाम त्या पिढीला...असेच आमचे आई वडील सुद्धा...आठ्वणीने आज गदगद झालो. सुंदर लेख...
  • Log in or register to post comments

अप्रतिम

नंदन
Fri, 06/27/2008 - 23:28 नवीन
लेख! वाक्यावाक्याला दाद घेऊन जाणारा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

नि:शब्द करून टाकलेत.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 06/27/2008 - 23:28 नवीन
इतके हृदयस्पर्शी लिखाण. बोलती बंद झाली, प्रतिक्रिया दिली ती डोळ्यातल्या अश्रूंनी. कदाचित जे तोंडावाटेही परिणामकारकरित्या जे बाहेर यायचे नाही ते डोळ्यातून सहज आले. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

काय लिहू?

चकली
Fri, 06/27/2008 - 23:28 नवीन
शब्द संपले. असेच चांगले वाचायला मिळो..असेच लिहित रहा. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखाच्या

झकासराव
Fri, 06/27/2008 - 23:56 नवीन
लेखाच्या नावापासुनच शब्दन शब्द मनात घर करुन राहिला. शेवट :( ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

--

विसोबा खेचर
Fri, 06/27/2008 - 23:58 नवीन
आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. ------- शब्द नाहीत--------- तात्या.
  • Log in or register to post comments

ओह..! पुन्हा एकदा अस्सल ललित!

चतुरंग
Sat, 06/28/2008 - 00:05 नवीन
माणसं तेव्हा फारशी दुरावली नव्हती . सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता . सोसत सोसत जगत रहायचं हा एकच रस्ता या पिढीला महित होता आणि तक्रार पण नव्हती. एक शिवणाचं मशिन आम्हाला सगळ्यांना बदलत होतं. अशी वाक्यं हा तुमच्या लिखाणाचा आत्मा आहे. आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात. हे तर मागच्या पिढीतल्या बायकांचं आयुष्याचं सारंच एका वाक्यात.. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला. आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. क्या बात है! माणसं कशी हळूहळू विरघळत-विरघळत बदलत जातात ना? आणि रामदास शेवटचं वाक्य तर भेदून गेलं हो! खरं सांगू, माझ्या डोळ्यात पाणी आलंच नाही - मी थिजून गेलो! आता असंच कधीतरी सवडीने येईल ते पाणी, वाचलेलं सगळं पार आतात पोचेल तेव्हा! चतुरंग
  • Log in or register to post comments

शब्दश: सहमत!

प्रमोद देव
Sat, 06/28/2008 - 08:59 नवीन
चतुरंगरावांशी शब्दश: सहमत ! निःशब्द झालो! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त!

पिवळा डांबिस
Sat, 06/28/2008 - 00:16 नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख लिखाण!! रामदासजी, ही व्यक्तिरेखा काल्पनिक असेल अशी आशा आहे. कारण कुठल्याही आईला इतक्या त्रासातून जायला लागू नये हीच परमेश्वराजवळ प्रार्थना!! -डांबिसकाका
  • Log in or register to post comments

मनापासून

चित्रा
Sat, 06/28/2008 - 01:27 नवीन
मनाचा ठाव घेणारे लिखाण..
  • Log in or register to post comments

सुरेख.....

मदनबाण
Sat, 06/28/2008 - 04:52 नवीन
फारच सुरेख..... (नि:शब्द झालेला) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

सुरेख..............

विद्याधर३१
Sat, 06/28/2008 - 07:58 नवीन
अतिशय सुरेख ललित लेख... छान व्यक्तिचित्रण.. पुन्हा तुमची त्यातली हातोटी उठून दिसते. विद्याधर
  • Log in or register to post comments

रामदास

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 06/28/2008 - 11:00 नवीन
रामदास जी, काय लिहू हेच कळेनासे झाले आहे... माझी सफर मध्ये मी फक्त मी मध्ये अडकलो होतो.... पण आज कळाले की माझ्या मी ला काहीच अर्थ नाही... मोठ मोठ्या गोष्टी लिहणे अथवा त्याची सही म्हणून उपयोग करणे वेगळी गोष्ट... पण सत्य हे नहमी वेगळेच असते.. तुमच्या आईच्या अनुभवाने मला माझ्या बालपणीचे १२ वर्ष आठवले तुमच्या व माझ्या जिवनामध्ये एक धागा आहेत जे सर्वस्वी एकच आहेत असे वाटावे इतके माझ्या ही जवळचे आहेत... एक शिलाई मशिन माझ्या ही घरी आहे आज ही.... ! घरी गेल्यावर नेहमी डोळे भरुन पाहत राहवे असे ते मशीन गेली ४५ वर्षे ने मशिन चालूच होते.. .. मागील वर्षापासून बंद करुन ठेवले आहे पण आज ही कधी मधी ते चालू होते...आपल्या नातवासाठी घोंगडी व लंगोटी तयार करण्यासाठी... ! त्या मशीनचे स्वप्न खुप मोठे होते... ! त्या स्वप्नात आम्ही कधीच पुर्ण झालो नाही... पण तुटलो जरुर !!! धन्यवाद....! त्या माऊली ला माझे ही प्रणाम सांगा ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments

सिंगर

रामदास
Sat, 06/28/2008 - 11:15 नवीन
Image removed. जुनी पुस्तकं आवरताना हे मॅन्युअल सापडलं आणि लेख लिहीला. १९६० च्या दरम्यान छापलेले हे पुस्तक आज एक कलेक्टर आयटम आहे. त्यातला हा एक फोटो.
  • Log in or register to post comments

जबरदस्त !!

विसुनाना
Sat, 06/28/2008 - 17:56 नवीन
अत्यंत प्रभावी लेखन. अत्युच्च दर्जा... वरवर साधा दिसणारा विषय एखाद्या प्रतिभाशाली लेखकाचा हात लागल्यावर सोन्याचा होतो. हा रामदासांचा 'मिडास टच'!
  • Log in or register to post comments

खुपच मस्त.

शितल
Sat, 06/28/2008 - 18:49 नवीन
सर्व कसे डोळ्यासमोर घडते असे वाटते, आणि आई ने घरासाठी केलेले परिश्रम वाचुन आईचे मोठेपण अजुन जाणवते. पण शेवट मात्र खुप खुप मनाला वेदना देतो. इतके की डोळ्यातुन पाणी येते.
  • Log in or register to post comments

डोळे पाणावले !!

अभय
Sat, 06/28/2008 - 18:57 नवीन
वाचताना डोळ्यातुन नकळत येणारे अश्रु आवरण्याचा प्रयत्न करतो आहे.!! अत्यंत प्रभावी !! अभय
  • Log in or register to post comments

सोप्या शब्दात अतिशय प्रभावी कथन

मिसळपाव
Sat, 06/28/2008 - 19:29 नवीन
गोष्ट कशी प्रवाहिपणे पुढे पुढे जात रहाते. ...सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होत...... सुरेख उपमा. शेवटच्या परीच्छेदाने चटका लावला.
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम लेख

गमक
Sat, 06/28/2008 - 19:55 नवीन
५ मिन्टा पूर्‍वि मिसळपाव वर आलो आणि हा लेखच पहिल्यांदा उघडला. डोल्यातून पाणि आले. अतिशय उत्तम लेख
  • Log in or register to post comments

नि:शब्द

प्रगती
Sat, 06/28/2008 - 20:58 नवीन
काय प्रतिक्रिया देणार, शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments

सुन्न

मुक्तसुनीत
Sun, 06/29/2008 - 10:09 नवीन
सुन्न करणारे लिखाण. असे म्हणतात की एखादा लेख जेव्हा अस्सल उतरतो - मग ती कथा असो की व्यक्तिरेखा - तेव्हा त्यातले काय कल्पनेचे आणि काय घडलेले हा प्रश्न फजूल ठरत जातो. डांबिस यांच्या अब्दुलखानाबद्दल हाच अनुभव आला होता. लिखाण इतके अस्सल होते की, हा माणूस खराच भेटला का ? नक्की "सत्य" काय ? हा प्रश्न फजूल होतो. सत्य ते आणि तेव्हढेच जे लेखकाने मांडले , आपल्या लेखणीतून जे जिवंत केले. प्रस्तुत लेखाबद्दलही हेच झाले आहे असे मला वाटते. गरीब , कष्टाचे जीवन जगणारी माणसे आपण आजूबाजूला पाहतोच की ! हलाखीचे , दुर्दैवाचे दशावतार असणारी अनेक आयुष्ये आपण आजवरच्या अनुभवांमधे पाहिली आहेत. प्रस्तुत लेखाचे - आणि माझ्या मते कुठल्याही उत्तम प्रतीच्या ललित लिखाणाचे - यश यात असते की त्याद्वारे लेखक त्या त्या काळाचे , व्यक्तीच्या सामाजिक , कालसापेक्ष बदलणार्‍या पर्यावरणाचे अगदी सूक्ष्म चित्रण करतो ; माणसाच्या वेदनेच्या दुखर्‍या नशीच्या अगदी नेमके जवळ नेऊन वाचकाला ठेवतो , आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने स्थलकालाला ओलांडून वाचकाला त्या त्या प्रदेशात नेमके नेऊन सोडतो. या कथेमधे "आई" या पात्राच्या तोंडी कसलेही - अगदी जुजबीसुद्धा - संवाद नाहीत ! तिच्या मूक वेदनेला याहून चांगले शब्दरूप कुणाला देता आले नसते. लेखाकाची अल्पक्षरत्वाची , तुटक वाक्यांची शैली अतिशय प्रभावी आहे. तपशीलाच्या पसार्‍याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते. प्रत्येक वाक्यात तीव्रतेने जाणवलेले एकेक सत्य. आणि अशा एकेक वाक्याने केलेले चिरेबंदी काम. रामदास , तुमचे लिखाण शैलीच्या बाबतीत पानवलकरांची , वेदनेचा वेध घेण्याच्या बाबतीत जी एंची , तत्कालीन सामाजिक चित्रणाच्या बाबतीत गाडगीळांची आठवण करून देणारे आहे.
  • Log in or register to post comments

तुमची जी

भडकमकर मास्तर
Sun, 06/29/2008 - 18:59 नवीन
तुमची जी नॅरेशन स्टाईल आहे ना, खरंच अप्रतिम आहे... ... मुक्तसुनित यांनी म्हटल्याप्रमाणे अशा कष्टाचे जीवन संगणार्‍या कथा आपण अनेकदा वाचत असतो पण अशी ताकदवान कथा क्वचित वाचायला मिळते... तपशीलाच्या पसार्‍याला पूर्ण फाटा देऊन एकेक बाण सोडावा तसे एकेक छोटे छोटे वाक्य येते हेच म्हणतो... शेवट ग्रेट....आणि शीर्षक उत्तम... असेच लेख वाचायची अपेक्षा करत राहीन.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

नील_गंधार
Fri, 03/05/2010 - 17:12 नवीन
अगदी हेच म्हणतो. अतिशय सुंदर लेख. नील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

काय बोलु?

शैलेन्द्र
Sun, 06/29/2008 - 19:13 नवीन
काय बोलु? भरुन आलं... रडावस वाटल शेवटी...
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

कोलबेर
Sun, 06/29/2008 - 23:00 नवीन
तुमचा कवितेवरील सुंदर लेख आणि हा भावस्पर्शी लेख दोन्ही लेख फार आवडले. लेखाची मांडणी, वातावरण निर्मिती, शेवट सगळेच जमून आले आहे.
  • Log in or register to post comments

रामदासजी...

संजय अभ्यंकर
Sun, 06/29/2008 - 23:59 नवीन
आपला लेख वाचुन, डोळ्यात पाणी उभे राहीले. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शब्दच नाहियेत

वरदा
Mon, 06/30/2008 - 04:19 नवीन
मी खूप वेळ प्रतिक्रीया देऊच नाही शकले...... डोळ्यात खूप पाणी आलं....
  • Log in or register to post comments

एक नि:शब्द

महेश हतोळकर
Mon, 06/30/2008 - 09:28 नवीन
एक नि:शब्द करणारा प्रवास... मानलं बुवा तुम्हाला.
  • Log in or register to post comments

खुप छान

आनंदयात्री
Mon, 06/30/2008 - 12:09 नवीन
खुप छान लेख रामदास .. आपण तर फ्यान बॉ तुमचे !
  • Log in or register to post comments

रडावस वाटल

ऋचा
Mon, 06/30/2008 - 13:50 नवीन
रडावस वाटल शेवटी... अप्रतिम!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

सुरेख व्यक्तीचित्र..

पद्मश्री चित्रे
Mon, 06/30/2008 - 13:53 नवीन
आई उभी राहिली डोळ्यासमोर... तिची तगमग, दु:ख , हतबलता .. रडवलंत अगदी....
  • Log in or register to post comments

फारच छान

सुमीत भातखंडे
Mon, 06/30/2008 - 15:53 नवीन
व्यक्तिचित्रण. सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता मस्तच
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अभिज्ञ
Mon, 06/30/2008 - 23:06 नवीन
आम्हि, आता या रामदासापुढेहि हात जोडतो. तुम्हि असले अफ़ाट कसे काय लिहिता बुवा.... लेख अत्युत्तम झालाय.मन:पुर्वक अभिनंदन. वरील बहुतेकांनी म्हंटल्याप्रमाणे आमच्या डोळ्यातून पाणि काढलेत. आपले असेच अप्रतिम लेख उत्तरोत्तर वाचायला मिळोत. =D> =D> =D> =D> =D> अभिज्ञ
  • Log in or register to post comments

अप्रतीम !!!!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 07/10/2008 - 02:05 नवीन
"सहज सुंदर भाषा. चपखल शब्दयोजना. उत्तम वातावरणनिर्मिती" अशासारख्या कोरड्या शब्दांनी आपला अपमान करू इच्छित नाही. - सर्किट
  • Log in or register to post comments

अतिशय कसदार

चित्तरंजन भट
Fri, 07/11/2008 - 16:27 नवीन
अतिशय कसदार, सहज अनुभवलेखन. बाकी इतरांनी लिहिलेच आहे. अवांतर : सुमतीबाई सुकळीकर ह्यांचे घर रामदासपेठेत. तुम्ही रामदासपेठेतच राहता का? बाय द वे, "नर्सा" हा शब्द वाचून फार बरे वाटले. अगदी पुन्हा नागपूरला गेल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments

------- शब्द

स्वाती फडणीस
Fri, 07/11/2008 - 17:12 नवीन
------- शब्द नाहीत---------
  • Log in or register to post comments

शिंपीणिचं घरटं मस्तच....

आरती
Fri, 07/11/2008 - 17:14 नवीन
अतिशय हृदयस्पर्शी वाटला हा लेख..... मन सुन्न झाल.... डोळ्यात कधी टचकन पाणी आले कळलेच नाहि. रामदास तुमचे मनापासून अभिनन्दन......
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

भिंगरि
Tue, 11/11/2008 - 00:05 नवीन
प्रतिक्रिया लिहायला शब्दच नाहित. 'झिजुनि स्वतः चंदनाने दुसर्‍यास मधुगंध द्यावा' वृत्तिने उभ आयुष्य जगणार्‍या 'आईला' शतशः प्रणाम.
  • Log in or register to post comments

रामदासजी...

प्राजु
Tue, 11/11/2008 - 00:30 नवीन
काय हो लिहिलंत हे!!! कोणत्या शब्दांत प्रतिक्रिया लिहावी कळत नाही. तुम्हाला आणि तुमच्या लेखणीला साष्टांग नमस्कार!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखन

लवंगी
Tue, 11/11/2008 - 00:41 नवीन
असच लिहित जा ..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा