✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिंपीणिचं घरटं

र
रामदास यांनी
Tue, 06/24/2008 - 20:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
67130 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

अप्रतिम

बन्ड्या
Tue, 11/11/2008 - 06:41 नवीन
मानलं बुवा तुम्हाला. ... ....बन्ड्या
  • Log in or register to post comments

पँडोराज बॉक्स

विनायक प्रभू
Tue, 11/11/2008 - 10:57 नवीन
असे किती पँडोराज बॉक्स आहेत मुनिवर्य.
  • Log in or register to post comments

नि:शब्द

वारकरि रशियात
Tue, 11/11/2008 - 11:31 नवीन
मुक्तसंगः अनहंवादि झालो. अधिक लिहिणे केवळ अशक्य! धन्यवाद आणि असेच लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

शिंपीणिचं घरटं - फार भावलं

दत्ता काळे
Tue, 11/11/2008 - 13:46 नवीन
हे असं लेखन आजकाल अभावानेच वाचायला मिळतं. १. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात. २. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला. आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. ३. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. - - डोळ्यात पाणी आलं
  • Log in or register to post comments

केवळ

नीधप
गुरुवार, 02/11/2010 - 11:07 नवीन
केवळ अप्रतिम! - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अफाट,

मृत्युन्जय
गुरुवार, 02/11/2010 - 12:17 नवीन
अफाट, अप्रतिम, ह्रिदयस्पर्षी. शब्द कमी पड्तील लिखाणाचे कौतुक करताना. मागे तुमचे काटेकोरांटीची फुले (तुमचेच होते ना ते पण?)?वाचले होते. ते पण निव्वळ अप्रतिम होते.
  • Log in or register to post comments

आता वाईट वाटतं

शुचि
गुरुवार, 02/11/2010 - 12:29 नवीन
>>आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात.>> काळजाला भीडलं!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

गेल्या

अनामिका
गुरुवार, 02/11/2010 - 12:39 नवीन
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. शेवटच वाक्य वाचुन जीव चरकला आणि त्याच क्षणी आईचा चेहरा डोळ्यासमोर आला...........पाय हा अवयव फक्त नावापुरता शरीराला जोडलेला आहे त्यातल त्राण तर केंव्हाच निघुन गेलय्.आयुष्यभर संसारासाठी काढलेल्या खस्तांमुळे व खर्चाचा ताळमेळ बसवताना केवळ शक्य तितके पैसे वाचवता यावेत यासाठी तरुणपणी परळ ते वरळी ,आणि नंतर रेमंड ते हरिनिवास सर्कल असे रोजच्यारोज व सतत बरेच वर्ष चालत केलेल्या प्रवासापायी आज आई स्वतःच्या पायावर उभी देखिल राहु शकत नाही........ संसारासाठी व आपल्या पिलांसाठी सतत कष्ट उपसणार्‍या अश्या असंख्य माऊल्यांपुढे सदैव नतमस्तक........... "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 02/11/2010 - 13:01 नवीन
हे माझ्या नजरेतून कसे काय सुटले? आज मुखपृष्ठावर पाहिले तेव्हा आधाशासारखे वाचून काढले. अप्रतिम! स्वाती
  • Log in or register to post comments

आधीपण

टुकुल
गुरुवार, 02/11/2010 - 13:05 नवीन
आधीपण वाचले होते आणी आता परत वाचले, दुसर्‍यांदा वाचाताना पण त्याच भावना येण हे तुमच्या लिखाणाच कौशल्य. --टुकुल
  • Log in or register to post comments

सुन्न केले ...

वाहीदा
गुरुवार, 02/11/2010 - 13:16 नवीन
संध्याकाळी आई मात्र एकटी पडायची. तिचा गळा मात्र सुरेल होता त्यामुळी गाणं गुणगुणत एकतीच काम करायची. माझ्या कानावर येता जाता संस्कार व्हायला लागले. घर दिव्यात मंद ...बघ अजून जळते वात..तेव्हाच म्हणायला शिकलो . आता वाईट वाटतं की तिचा एकटेपण वाटून घ्यायला तेव्हा कुणिच नव्हतं. जेव्हा कळायला लागल तेव्हा वेळ नव्हता. घरातल्या बाईची ट्रॅजेडी आपोआप लिहीली जाते. वाल्मीकीसारखा साक्षात्कार होण्याची आवश्यकता नाही. पण पण ..सहसंवेदनांचे डोळे फार उशिरा उघडतात. आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते. निशब्द !! जाहिरातीत शिलाई मशिन आलं की टीव्ही खाडकन बंद करून रडायला लागते. मावशीबाई आईला समजावतात. दादा मुके मुके हूओन बघत राहतात. मशिनच्या बाजूला आईची व्हीलचेअर आहे. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे. वाचून खुपच बधीर झाले ....डोळे पाणावले अन सुन्न झाले .. शेवटच्या Paragraph ने तर भलतिच भावनिक कलाटणी घेतली ! नेहमी प्रमाणेच अप्रतिम !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

नि:शब्द!

स्वाती२
गुरुवार, 02/11/2010 - 17:15 नवीन
नि:शब्द!
  • Log in or register to post comments

हृद्य

प्रकाश घाटपांडे
Fri, 02/12/2010 - 11:30 नवीन
अतिशय हृद्य लेख. शिंपिनीच्या घर्रट्यात समद्यांना जागा आहे. रामदासांचे लेख अंतर्मुख करायला लावतात ब्वॉ! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

अप्रतीम

मोहन
Fri, 02/12/2010 - 12:08 नवीन
रामदासजी तूमचे लेखन नेहमीच अप्रतीम असते. हा लेख माझा वाचायचा सुटला होता. आपल्यासारख्यांमुळे मिपा वर वारंवार यावेसे वाटते. आपल्या नव्या लेखाच्या प्र्तीक्षेत --- मोहन
  • Log in or register to post comments

खूप हृदयस्पर्शी, रामदास..

उपास
Fri, 02/12/2010 - 19:55 नवीन
आपण तर नि:शब्द! प्रसंगनिर्मिती आणि लेखनशैली अतिशय परिणामकारक.. आईंना प्रणाम आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना जोपासणार्‍या, त्यांनी आयुष्यभर केलेल्या श्रमांचे मोल समजून घेणार्‍या मुलां नातवंडांचही कौतुक.. माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments

आSSई ग्ग !!!

अर्धवटराव
Sat, 03/06/2010 - 04:05 नवीन
(नि:शब्द) अर्धवटराव -रेडि टु थिन्क
  • Log in or register to post comments

माझी सायीसारखी सुरकुतलेली आजी

नगरीनिरंजन
Mon, 10/11/2010 - 10:56 नवीन
माझी सायीसारखी सुरकुतलेली आजी आणि तिचं मशिन आठवलं. हृदय ठिसूळ झालं वाचून.
  • Log in or register to post comments

अप्रतिम ! आतून आतून आलेलं,

मितान
Mon, 10/11/2010 - 12:31 नवीन
अप्रतिम ! आतून आतून आलेलं, नितळ लेखन !!!
  • Log in or register to post comments

बापरे!

Pain
Mon, 10/11/2010 - 15:33 नवीन
बापरे!
  • Log in or register to post comments

बापरे!

Pain
Mon, 10/11/2010 - 15:34 नवीन
बापरे!
  • Log in or register to post comments

खुप भावस्पर्शी

विलासराव
Mon, 10/11/2010 - 16:38 नवीन
लेख. शेवट अनपेक्षीत.
  • Log in or register to post comments

कित्येकदा वाचलं तरी

lakhu risbud
Wed, 10/05/2011 - 02:59 नवीन
आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. ....................कित्येकदा वाचलं तरी शेवटच्या परीच्छेदानंतर नकळत डोळ्यात पाणी तरळते. रामदासकाका, या दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या लेखणीमधून अजून अशाच लेखांच्या माणकांची आशा आहे.
  • Log in or register to post comments

रामदास तुमच्या कथा वाचायच्या

विजुभाऊ
Fri, 03/02/2012 - 20:33 नवीन
रामदास तुमच्या कथा वाचायच्या म्हणजे अगोदर धैर्य गोळा करायला लागतं
  • Log in or register to post comments

निशब्द... :-(

मोदक
Tue, 03/06/2012 - 20:09 नवीन
धागा वर आणल्याबद्दल आभार विजुभाऊ..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

.

वपाडाव
Wed, 03/07/2012 - 19:45 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अप्रतिम लेखन

प्रसाद गोडबोले
Sat, 02/23/2013 - 12:59 नवीन
कसलं सुंदर लिहिलय ... इंटर्नेटवर बर्‍याचदा "हसता हसता खुर्चीवरुन पडावे " असे विनोदी लेखन पहायला मिळते ... पण इतकं हळ्वं करणारं लेखन फारच क्वचित ... शेवट्याच्या वाक्यावर डोळ्यात पाणी तरळल :( फारच मनस्वी... काळजला हात घालणारं लेखन !!
  • Log in or register to post comments

+१

आदूबाळ
Sat, 02/23/2013 - 13:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तुम्ही आयडी सारखेच दिसता राव

श्री गावसेना प्रमुख
Sat, 02/23/2013 - 14:43 नवीन
तुम्ही आयडी सारखेच दिसता रावImage removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

म्हणजे निष्पाप, निरागस वैग्रे

आदूबाळ
Sat, 02/23/2013 - 21:08 नवीन
म्हणजे निष्पाप, निरागस वैग्रे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

मध्यमवर्गीय कौ

प्रभाकर पेठकर
Sat, 02/23/2013 - 14:55 नवीन
मध्यमवर्गीय कौ
  • Log in or register to post comments

मध्यमवर्गीय कौटुंबिक

प्रभाकर पेठकर
Sat, 02/23/2013 - 15:03 नवीन
मध्यमवर्गीय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध, कष्टणारी मागची पिढी, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, प्रसंगी आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून, आपली स्वप्ने बासनात गुंढाळून मुलांचे शिक्षण, कोणाचे लग्नकार्य, कोणाचा सांभाळ, कोणाचे आजारपण ह्या कौटुंबिक कर्तव्याला दिलेले प्राधान्य वगैरे वगैरे वाचताना मी माझा राहिलोच नाही. त्या घरातला सदस्य झालो, त्या कष्टाळू आणि सोशिक आईचा मुलगा झालो....शेवट वाचून अक्षरश: ढसाढसा रडलो. आई आणि तिचे शिलाई मशीन हा माझ्याही बालपणाच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

निव्वळ नि:शब्द.

बॅटमॅन
Sat, 02/23/2013 - 15:02 नवीन
निव्वळ नि:शब्द. :(
  • Log in or register to post comments

कस्लं सुरेख

बांवरे
Sat, 02/23/2013 - 15:29 नवीन
तरल, लिखाण ! घरच्या मशीनची आठवण आल्याबिगर राहवलं नाय !
  • Log in or register to post comments

हा धागा वर आणल्याबद्द्ल शतशः धन्यवाद!

क्रान्ति
Sat, 02/23/2013 - 15:49 नवीन
रामदासकाका, तुम्ही लिहित रहावं, आम्ही थक्क होऊन वाचत रहावं आणि कळत-नकळत गुंतत जावं!
  • Log in or register to post comments

क्रांतीजींशी सहमत

jaypal
Sat, 02/23/2013 - 17:12 नवीन
निशब्द ......जयपाल Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

निशब्द..

चिगो
Sat, 02/23/2013 - 20:18 नवीन
ह्या इतक्या ताकदीच्या लि़खाणावर प्रतिक्रिया द्यायची माझी लायकी नाहीये, हे माहीत असूनही हिम्मत करतोय.. काका, शक्य झाल्यास तुम्हाला भेटून तुमचा हात हातात घेईल म्हणतो..
सगळा गोतावळा तूपात भिजवलेल्या वातींसारखा एकमेकांना धरून होता .
शब्दच खुंटले ह्या असल्या अस्सल उपमांपुढे.. मुजरा स्विकारावा, मालक !
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा..

स्वाती दिनेश
Sat, 02/23/2013 - 23:05 नवीन
धागा वर आलेला दिसला आणि आपसूकच पुन्हा एकदा उघडला गेला. पुन्हा एकदा प्रतिक्रिया लिहीताना शब्द संपले.. स्वाती
  • Log in or register to post comments

आईची आठवण आली . माझ्या आईनेही

लौंगी मिरची
Tue, 02/26/2013 - 05:07 नवीन
आईची आठवण आली . माझ्या आईनेही वयाच्या पन्नाशीपर्यंत काम केलं .शेवटी गुढगे दुखीनं तिला मशिनीपासुन दूर केलं , पण माझ्या आणि माझ्या भावाचा शिक्षणाचा बराच वाटा आईच्या मशिनिनं उचललाय. खुप छान मांडणी केलीय लेखाची . आजही आई म्हटलं की मशिनवर बसलेली आईच आठवते.
  • Log in or register to post comments

खरच खूप छान वाट्ले वाचून..

स्मिता चौगुले
Tue, 02/26/2013 - 13:57 नवीन
खरच खूप छान वाट्ले वाचून.. सुन्दर लेखन
  • Log in or register to post comments

खरच नि:शब्द.......

रणजीत देशमुख
Wed, 03/27/2013 - 12:10 नवीन
खरच नि:शब्द.......
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखन

सुबोध खरे
Wed, 03/27/2013 - 12:25 नवीन
अप्रतिम लेखन
  • Log in or register to post comments

परत परत वर आणावा असा धागा..

बाळ सप्रे
Fri, 05/10/2013 - 14:04 नवीन
परत परत वर आणावा असा धागा.. अशा "निवडक" लिखाणाचा एखादा वेगळा विभाग नाही का करता येणार?
  • Log in or register to post comments

"घरात खूप कधीच न पाहिलेले

खबो जाप
Fri, 05/10/2013 - 14:49 नवीन
"घरात खूप कधीच न पाहिलेले पैसे आले. पण आता ते हवे होते कुणाला.शिलाईच्या पैशावर वाढलेली मुलं श्रीमंत झाली होती. वेगवेगळ्या देशात राहत होती." ---एक नंबर वाक्य फ्लॅटचा नकाशा दाखवायला आर्कीटेक्ट आला तेव्हा त्यानी कागदावर दाखवलं हे तुमचं देवघर. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला. --एकदम काळजाला भिडून गेले.
गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
--ह्या वाक्यावर डोळ्यात खळकन पाणी आले. बस नकळत कुठेतरी गुंतत जावे असे लिखाण, एकदम आवडेश.
  • Log in or register to post comments

शेवट वाचुन मन सुन्न झाले.

आर्या१२३
Fri, 05/10/2013 - 15:05 नवीन
शेवट वाचुन मन सुन्न झाले. तुमच्या आईंना, तुमच्या लेखणीला आणि संवेदनशीलपणाला सलाम!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम लघुकथा !

तर्री
Fri, 05/10/2013 - 15:39 नवीन
अरविंद गोखल्यांची लघुकथा वाचावी तसे वाटले.
  • Log in or register to post comments

वाह..

भटक्या..
Fri, 05/10/2013 - 16:19 नवीन
डोळ्यात टच्कन पाणी आल...
  • Log in or register to post comments

सुंदर लिखाण .

देशपांडे विनायक
Sat, 05/11/2013 - 10:29 नवीन
सुंदर लिखाण . पण गंमत बघा ! या मशीनचा धक्का मला फार मोठा बसला बायकोला मनापासून साथ देणारा मी ,ती जेव्हा माहेरहून मशीन आणते म्हणाली तेंव्हा चक्क ओरडून नाही म्हणालो ते मशीन तिने तिच्या पगारातून मोठ्या हौसेने घेतलेले होते माझे ओरडणे ऐकून ती आशचर्याने पाहू लागली कारण असे मी ओरडत नाही मराठी सिनेमा पाहणे हा नित्य कार्यक्रम असण्याचा हा परिणाम होता शिवण्याचे मशीन आणि घरावर येणारे संकट यांचे घनिष्ट संबंध मी विसरूच शकत नव्हतो ते मशीन मी आणि बायको निवृत्त झालो तेंव्हा घरी आणले कालानुसार त्यात बदल केला ,त्याला इलेक्ट्रिक मोटार लावली पण तिला काम नसते आता ते मशीन का घरात आहे याचे साधे सरळ उत्तर आताच्या पिढीला रुचेल ?
  • Log in or register to post comments

__/\___

पिलीयन रायडर
Fri, 10/11/2013 - 13:54 नवीन
__/\___ शब्द नाहीत... आईची फार फार आठवण येतेय...
  • Log in or register to post comments

कॅलिडोस्कोप सारखं प्रत्येक

प्यारे१
Fri, 10/11/2013 - 14:52 नवीन
कॅलिडोस्कोप सारखं प्रत्येक वेळी नवं वाटणारं नि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारे भिडणारं, बरंचसंच्च रिलेट करणारं.... आईवडलांचे कष्ट, एकत्र घरातली परवड, एकाच्या जीवावर दुसर्‍यानं खाऊन माज दाखवणं, सगळे प्रकार. त्यातून घरातून बाहेर पडणं असं सगळं. नंतर ह्या माज कर्त्या काकानं वडिलोपार्जित जमीन परस्पर विकणं असं सगळं केलं. वडील शिक्षक. अतिशयच सरळमार्गी. ट्युशनचा पैसा पण नको म्हणणारे. १० बाय १५ च्या भाड्याच्या खोलीत रात्र रात्र शिवणयंत्र चालवणं, चहापावडर, गंध, कॉस्मेटिक्स, ब्लँकेट्स, ब्लाऊजपीस विकणं, हे सगळं आईनं केलंय. ७२ला लग्न झाल्यावर ८६-८९ बाह्य परीक्षा देऊन मराठी बी ए झाली. आईनं भाकरी करता करता नोट्स वाचून दाखवायच्या बहिणीने. ८९ ते २००३ बँक कलेक्शन चं पिग्मीचं काम. १०० रु ला ३ रुपये मिळणार. आज प्रत्येक वेळी हॉटेलात खर्च करताना, ब्राण्डेड कपडे घ्यायचे म्हटलं की आधी तेच आठवतं. लिहीण्यासारखं बरंच आहे. बहिणींनी ह्यापेक्षाही जास्त हाल काढलेत. आज ईशकृपेनं बरं आहे पण भूतकाळ आठवला की शहारायला होतं.
  • Log in or register to post comments

..............

बॅटमॅन
Fri, 10/11/2013 - 14:53 नवीन
..............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा