साहित्यः
दीड वाटी बासमती तांदुळ स्वच्छ धुवून, निथळून ठेवणे
दीड वाटी स्वच्छ केलेली कोळंबी (किंचित मीठ, हळद व लिंबाचा रस लावून ठेवावी)
३ वाटया नारळाचे दुध
२-३ टेस्पून आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट
१ टेस्पून लाल तिखट
१/२ टेस्पून गरम मसाला
१/२ टेस्पून धणेपुड
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१ टीस्पून शाहीजिरे किंवा साधे जिरे
४-५ लवंग
२-३ दालचिनीच्या काडया
२-३ तमालपत्र
२-३ हिरवी वेलची
तेल
पाकृ:
जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून शाहीजिरे व खडा-मसाला घालावा.
छान तडतडले की त्यात आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट घालून परतणे.
परतून झाले की त्यात हळद, मीठ लावून ठेवलेली कोळंबी घालावी व परत चांगले परतणे.
त्यात सर्व मसाले, मीठ घालून परतणे.
आता भिजवून, निथळत ठेवलेला तांदुळ घालून हलक्या हाताने एकत्र करावे.
छान परतले की त्यात ३ वाटया नारळाचे दुध घालावे. (नारळाच्या दुधात शिजवल्याने चव छान लागते)
दुसरा पर्याय म्हणजे २ वाटया नारळाचे दुध +१ वाटी पाणी घालावे व उकळी आणून मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवावे.
कोथिंबीर घालून सजवावे व लगेच गरमा-गरम खायला सुरुवात करावी :)
वाचने
10713
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त पाकृ. फोटो तर असे कि
मासे खात नाही पण मला तुमच्या
यम् यम्.....
टोमॅटो मी कधीच घालून
In reply to यम् यम्..... by गणपा
मस्त फोटो!
खतर्नाक दिसतोय... लगेच उचलून
मस्त्च गं... खरच, जीव अगदी
धन्स मृणाल
In reply to मस्त्च गं... खरच, जीव अगदी by Mrunalini
मस्त रेसिपी!!!
मस्त फोटो :)
नारळाचे दुध ?
नारळाचे दुध
In reply to नारळाचे दुध ? by शाहिर
मस्त तोपासु. ह्यात थोडी
शब्दच संपले..!
तोंडाला पाणी सुटले!
आमोद सुनासि आले...
झकास..
पुन्हा एकदा प्रतिसाद देत