Skip to main content

कोळंबी भात

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 20/06/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः दीड वाटी बासमती तांदुळ स्वच्छ धुवून, निथळून ठेवणे दीड वाटी स्वच्छ केलेली कोळंबी (किंचित मीठ, हळद व लिंबाचा रस लावून ठेवावी) ३ वाटया नारळाचे दुध २-३ टेस्पून आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट १ टेस्पून लाल तिखट १/२ टेस्पून गरम मसाला १/२ टेस्पून धणेपुड १/४ टीस्पून हळद मीठ चवीनुसार १ टीस्पून शाहीजिरे किंवा साधे जिरे ४-५ लवंग २-३ दालचिनीच्या काडया २-३ तमालपत्र २-३ हिरवी वेलची तेल . पाकृ: जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून शाहीजिरे व खडा-मसाला घालावा. छान तडतडले की त्यात आले+लसुण+मिरची+पुदीना पेस्ट घालून परतणे. . परतून झाले की त्यात हळद, मीठ लावून ठेवलेली कोळंबी घालावी व परत चांगले परतणे. त्यात सर्व मसाले, मीठ घालून परतणे. . आता भिजवून, निथळत ठेवलेला तांदुळ घालून हलक्या हाताने एकत्र करावे. . छान परतले की त्यात ३ वाटया नारळाचे दुध घालावे. (नारळाच्या दुधात शिजवल्याने चव छान लागते) दुसरा पर्याय म्हणजे २ वाटया नारळाचे दुध +१ वाटी पाणी घालावे व उकळी आणून मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवावे. . कोथिंबीर घालून सजवावे व लगेच गरमा-गरम खायला सुरुवात करावी :) .

वाचने 10713
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

जबरदस्त पाकृ. फोटो तर असे कि समोर कोलंबी ठेवल्या सारखी वाटतेय. कोलंबी म्हणजे जीव कि प्राण. का ...का असा जीव घेताय.इथे मिळत नाही हो कोलंबी.

चविष्ट दिसतय. टोमॅटो नाही वापरलात?

मस्त्च गं... :) खरच, जीव अगदी जळतोय. इथे काही फ्रेश फिश मिळत नाही. आणि कोळंबी तर दुरची गोष्ट. ते frozen फिशला अजिबात चव नसते. :(

In reply to by Mrunalini

इथे काही ठिकाणी ताजी कोळंबी मिळते, खरं आहे फ्रोझन फिशला चव नसते पण काही वेळेला त्यावरच समाधान मानावं लागतं :(

या क्षेत्रा मधे नवीन असल्यामुळे नारळाचे दुध कसे बनवायचे माहित नाही ..कृपया माहिती सांगावी ..पाकृ छान आहे ...येत्या रविवार चा मेनु असेल.. अवान्तर : काही जण आमसुले/ तिरफले घाल्तात ...त्याचा काही अनुभव आहे का ?

In reply to by शाहिर

नारळ खवून त्यात थोडे कोमट पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घेणे, मग वाटलेला नारळाचा चव गाळणीतून किंवा स्वच्छ सुती कापडातून गाळून घेणे...दाट नारळाचे दुध निघेल. पुन्हा त्याच नारळाच्या चवात पाणी घालून, वाटून, गाळून घेणे, आता थोडे पातळ दुध निघेल. हे नारळाचे दुध तुम्ही कुठल्याही नॉन्-व्हेज पदार्थात, सोलकढी, खीरी साठी वापरू शकता. आमसुले/ तिरफळं घालून बनवायचा अनुभव नाही हो :(

सुंदर. सुरेख. अप्रतिम. ( पाकृ फोटो डीटेलिंग या क्रमाने ) :)

पुन्हा एकदा प्रतिसाद देत आहे कारण................ मागच्याच आठवड्यात बेन्ग्लुरुला प्रोन गस्सी आणि नीर दोसा खाल्ला (मलबारी/मेंगलोरी) पद्धतीने बनवलेला. लई भारी अजून चव रेंगाळत आहे आणि तोडला पाणी सुटत आहे.