साहित्य :
१ जुडी पालक (थोडे पाणी घालुन वाफवुन पेस्ट करुन घ्या)
गरजेपुरते बेसन
१ चिरलेला कांदा
थोडी चिरलेली कोथिंबिर
२-३ चिरलेल्या मिरच्या
हिंग
हळ्द
मिठ
थोडा गोडा किंवा गरम मसाला (ऑप्शनल)
तेल
पाककृती :
वरील साहित्यातील तेल सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्या. चांगले ढवळा.
आता तव्यावर थोडे तेल पसरवुन ह्याचे पोळे, धिरडे काय म्हणाल ते तुमच्या आवडीच्या साईझ मध्ये टाका. एकदम पण मोठा नको नाहीतर उलटताना त्रास होईल.
गॅस मिडीयम ठेवा ४-५ मिनीटांनी उलथा. थोडेसे तेल परत सोडा (जर तव्याला असेल तर नाही टाकलेत तरी चालेल)परत ५-६ मिनीटे ठेउन दाबुन शिजला आहे का ते पहा. जर दाबल्यावर त्यातुन ओला रस येत असेल तर गॅस मंद करुन थोडावेळ दोन्ही बाजुने शिजु द्या. आहे की नाही एकदम सोप्पी रेसिपी. आता हा पोळा नुसता खा नाहीतर जेवणावर साईड डिश म्हणुन वापरा.
अधिक टिपा :
पौष्टीकतेसाठी तसेच लहान मुले पालकची भाजी नुसती खात नाहीत म्हणून पालक टाकला आहे. ह्या अजुन किसलेला गाजर, बिट, कोबी तसेच आवडीच्या भाज्याही टाकु शकतो.
वाचन संख्या
7025
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम मस्त
छान
आं??? मासे संपले ???
पाकृ छान आहे बदल म्हणून! आजच
सोप्पं आणि छान.
वेगळी आणि सुन्दर पाक्रु
अगदी सोप्पी अशी पाकृ
मिसळपाव नाही नाही मासे नाही
मस्त आयडिया..
हायला ! लैच जबर्या दिस्तया.
मस्तच...
:)
सही.
तोंडाला पाणी सुटले!
मी पालक चिरून २ मिनिटे