Skip to main content

मेक्सिकन पुडींग

लेखक गुलतोरा यांनी सोमवार, 20/06/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : सिज़नल फळांचे तुकडे 2 वाट्या , ब्रेड स्लाइस - 4, ग्लुकोज़ आणि मारी बिस्किटांचे तुकडे 2 वाट्या, तयार केलेले कस्टर्ड, साखर घालुन घोटुन घेतलेली साय. कृती - एका ताटलीत ब्रेड च्या स्लाइस ठेवा. त्यावर कस्टर्ड घाला. त्यावर बिस्किटांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड घालावे.त्यावर फळांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड. असे च उरलेल्या फळांच्या व बिस्किटांच्या तुकड्यांचे थर करावेत. उरलेले कस्टर्ड घालाव त्यावर साय घालावी आणि ही डिश फ्रिझर मधे 4-6 तास ठेवावी. नंतर बाहेर काढुन स्लाइस कराव्यात.

वाचने 3044
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

वाह भारीच की. वरुन जरा चेरी वैग्रे लावुन सजवले असते तर अजुन छान दिसले असते. आधी ते तूप घालुन ठेवलेले गुळाचे तुकडेच वाटले.

नक्की करून बघेन :)