अलिकडे प्रोफेसर विजुभाऊंबरोबर हेरिटॅज वॉक घेतांना एक गहन प्रश्न समोर आला...
कि औरंगजेब कधी मरण पावला?
प्रोफेसर विजुभाऊंचं म्हणणं की ८० व्या वर्षी!!!
आमचं म्हणणं की तो मेलाच नाही, तो चिरंजीव आहे, अश्वत्थ्यामासारखा!!
इतर मिपाकरांना काय वाटतं ते जाणून घेण्यासाठी हा कौल!!!!
यात कोणी समाजप्रबोधनाचा उद्देश पाहू नये...
शोधून सापडणार नाही!!!!
:)
औरंगजेब यांच्यावर बाबा रामदेव यांनी केलेली टीका मी एकवेळ समजू शकतो कारण रामदेवबाबा स्वतः एक दाढीवाले आहेत, परिवर्तनवादी विचारांची एक संघटना चालवतात आणि मुख्य म्हणजे कुठेतरी औरंगजेब यांच्या सारख्या आकार उकाराच्या नावाचे आहेत (औरंगजेब ह्यांची दाढी ३.५, तर रामदेवांची ३.७+) रामदेवांची अखेरची प्रतिक्रिया वाचावी. 'उपोषण चालुच राहणार' हे वाक्य त्यात आहे.
पण जे फक्त लोकांना टोप्या घालतात त्या लोकांनी औरंगजेब यांनी आपल्या कार्यातून कसा कुणाचा अपमान केलाय हे सांगत 'थेरडं खपलं' यासारख्या दिलेल्या प्रतिक्रिया सडक्याच. इतिहास ठाऊक नसणारे आणि तशी इच्छाही नसणारे ब्रिगेडी मिपाकर जसे 'थेरडा' आणि 'देशद्रोही हुसेन' या भाषेत बोलतात त्यांच्यात आणि यांच्यात फार फरक दिसत नाही. औरंगजेब यांच्या कार्यातील अधिक-उणे इतिहासकारांनीच दाखवून दिले पाहिजे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी कशाला घसे खरवडून थुंकायचे?
टोपी बनवण्यात कुशल औरंगजेब एव्हाना काळाच्या कुशीत शांतपणे विसावले आहेत. त्यांच्यापर्यंत आता हे शिव्याशाप पोचणार नाहीत.
असो. पि. डां. यांना विशेष धन्यवाद. परदेशातील जाणकार मंडळींचे लेखन अजून वाचायला आवडेल.
माझे उत्तर कौलातील चौथ्या पर्यायाच्या जवळ आहे. पण त्यात तो फक्त मिपावरच दिसतो असे गृहीत धरले गेले असल्याने "इतर" म्हणले आहे. ;)
बाकी "औरंगजेब ही एक वृत्ती आहे" ह्या वाक्याचे विस्तारीकरण करण्याचा विचार करत होतो. पण बर्याच दिवसाने पिडां, हे कौलाच्या निमित्ताने का होईना पण अॅक्टीव्ह झाले असल्याने मा. सरपंचांच्या सुचनेप्रमाणे त्यांना नवीन लेखक समजत प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. ;)
औरंगजेब यांचा मॄत्यु कधी झाला हे सांगण्याइतकी माझी इतिहासाची जाण नाही, पण या ना त्या कारणाने सतत लढायांमध्ये, आणि त्यामुळे प्रकाशात राहाण्याचे कसब बाकी त्यांच्यात होते हे नक्की. या निमित्ताने येडझवा आणि आणि अंमळ वेडझवा म्हणजे काय आणि तो असला म्हणजे पादशहा कसा मोठा होतो का यावर एकदा चर्चा व्हायला हवी. चारचौघांपेक्षा वेगळे राज्य करणारा त्याच्या मितीत कदाचित चारचौघांसारखेच आयुष्य जगला असेल या अर्थाचे थोरोचे एक वाक्य आहे, पण मराठेशाहीचा द्वेश केल्याने मोंगल मोठा साजुकराव कसा होतो? औरंगजेब यांचे आयुष्य असेलही मोठे, पण त्या आयुष्याला औरंगजेब यांच्या चमत्कारिकपणाने चार चांद कसे लागतात ते मला तरी कळत नाही.
औरंगजेब यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे चिरायु होवोत. (ती होतीलच, त्यांना माझ्या शुभेच्छांची गरज नाही). 'आपल्या' हिंदू धर्मबांधवांची कत्तल करणारं थेरडं चचलं असे शब्द वापरावेसे वापरणार्यांना त्याच हिंदू धर्मदेवता सद्बुद्धी देवोत.
आणि बापाचा खुन करुन पादशहा होणे हे मोगलांना काही नवीन नाही. बाबर का बेटा हुमांयु ( और हुमायुं का ? .. अकबर .. दमदमंम्मंम..दमं दमंम्म्मं .. (शी मी हमाम काय करतोय .. आवरा) ) पासुन ते कालच्या औरंगजेबापर्यंत हे होत आलेले आहे. मायबाप पिवळा डँबिस यांनी आता औरंगजेब यांना शांतपणे कबरीत चिरनिद्रा घेऊ द्यावी. जिवंत असताना औरंगजेबाच्या पराक्रमाची एखादीही बखर न लिहु शकणार्या पिडांकाकाणी आता औरंगजेबाची कबर उकरुन काढणे यापरता दुटप्पीपणा नाही.
साजुकतुप राव
ब्रेड को चाहिये, इक बटर टेस्टी होने तक
कौन खाता है, भुके पेट खत्म होने तक
औरंगजेब यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे चिरायु होवोत. (ती होतीलच, त्यांना माझ्या शुभेच्छांची गरज नाही). 'आपल्या' हिंदू धर्मबांधवांची कत्तल करणारं थेरडं चचलं असे शब्द वापरावेसे वापरणार्यांना त्याच हिंदू धर्मदेवता सद्बुद्धी देवोत
ह.ह.मेलो. :)
-दिलीप बिरुटे
मला वाटतं एक औरंगजेब नगरजवळ कुठे तरी मरण पावला आणि दुसरा औरंगाबादजवळ खुल्ताबाद परिसरात औरंगजेबाची जिथे समाधी सॉरी कबर आहे तो दुसरा असावा. :)
च्यायला, अवघड आहे. :)
बाकी, पिडाकाकांच्या कौलाला अभ्यास करुन, विकीचे संदर्भ चाळून, इंग्रजी लेखक काय म्हणतात, भारतीय लेखक काय म्हणतात, असे असलेले संदर्भ चाळून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो. तो पर्यंत पिडाकाकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. :)
-दिलीप बिरुटे
एका औरंगजेबाची कबर नगर पासून सुमारे ३० किलोमीटर (अंतर नक्की माहिती नाही) अंतरावर पाथर्डी नामक गावाकडे लागताना दिसते.
त्या जागेला प्रत्यक्ष भेट देऊन तो तोच पुण्यात्मा आहे ही खात्री करून तिथे नाक रगडून मग मिपाकरांना माहिती दिल्या जाईल.
कौलाच्या निमित्ताने एक निरीक्षण.....
सहसा समाजात (आपल्या दृष्टीने) थोर असलेल्या व्यक्तींची नावे मुलांना ठेवण्याचा प्रघात असतो. त्यानुसार हुमायुन, रझिया, मुहम्मद, अकबर, इमरान, वसिम, आदिल, इब्राहिम; इतकेच कशाला हुसेन आणि ओसामा ही नावेसुद्धा ठेवलेली मुसलमान समाजात पाहिली/ऐकली आहेत. पण ज्याचे नाव औरंगजेब आहे असा एकही माणूस मला माहिती नाही.
कोणाच्या पाहण्यात असा माणूस आहे का?
अशी बरीच माणसे आहेत / असावीत. माझ्या माहितीत एक बांगलादेशी माणूस होता. पाकिस्तानातही आहेत. 'औरंगझेब' असे गुगलल्यास फेस्बुकावर अथवा लिंक्डइनवर बरेच सापडतील.
बाकी मूळ प्रतिसादाचा हेतू नीटसा कळला नाही (किंवा संदिग्ध ठेवला गेला असावा.) मुसलमानांना औरंगझेब आवडत नाही असे काही सुचावायचे आहे का? नुसते नाव ठेवले म्हणजे त्या माणसाची भलावण केले असे असते का? तसे असते तर सगळ्या 'मोहन' लोकांचे मायबाप गांधीवादी म्हणवले गेले असते आणि गोची म्हणजे मुसलमानांना गांधीवादी व्हायचा रस्ता बंदच झाला असता! ;)
थत्ते आणि बिपिन काकांशी सहमत आहे .
खलणायकाच्या भुमिका करणार्या एका कलाकाराचे नाव नंतर कोणी ठेवलेले दिसत नाही. नंतर त्या कलाकाराने खल भुमिका सोडुन चांगली कामे केल्याचे स्मरते. त्याला कुठल्याश्या समारंभात कोणी चप्पल फेकुन मारल्याचेही पुसटसे आठवते आहे. त्या कलाकाराने ती चप्पल आपल्या कामाची पावती म्हणुन पॉझिटिव्हली घेतली होती ( शिका , तक्रारी करणार्यांनो शिका काही तरी ;) ) असे ह्या णॉस्टॅल्जिक समयी जाताजाता णमुद करावेसे वाटते.
- प्राण
हेतु काही नव्हता. मला औरंगजेब नाव आढळले नव्हते (माझ्या ओळखीत/माहितीत) म्हणून निरीक्षण नोंदवले. (आणि गुगलून पाहिले नव्हते)
किंचित हेतु परदेशात वास्तव्य करणार्यांच्या माहितीत अश्या (पाकिस्तानी, बांगला देशी, अरब, तुर्की) व्यक्ती आहेत का हे जाणून घेण्याचा होता.
श्री. औरंगजेब यांच्या निधनामुळे समाजात खरेच एक भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. शिवाय एक असामान्य दर्जाचा टोपी विणकार आपल्यातुन निघुन गेला आहे याची पिडाकाकांनी काही जाण ठेवली नाही याचे खरेच अतोनात दु:ख झाले. पिडाकाकांकडुन खरेच ही अपेक्षा नव्हती. त्यांना कलेची जाण होती असे मी ऐकुन होतो.
असो तर या निमित्ताने कौल पाडुन पिडाकाकांनी एक फार भले कार्य केले आहे असे मात्र आम्ही प्रांजळपणे नमूद करु इच्छितो.
बाकी मला "मरणान्ति वैराणि!!!" हा पर्याय का आहे ते कळालेच नाही. औरंगझेब महाराजांशी वैर धरायचेच कशाला? इतका सज्जन, कनवाळु, परोपकारी, निधर्मी, सर्वधर्मसमभाव पाळणारा बादशहा देशाला लाभला याचा आनंद मानायचा की केवळ त्याने आपल्या बापाला कैदेत टाकुन राज्य मिळवले म्हणुन त्याच्यावर टीका करायची?
असो. गोब्राह्मणप्रतिपालक श्री. औरंगजेब महाराजांच्या पुण्यात्माला शांती लाभो. त्यासाठी काही यज्ञ याग करायचे असल्यास मला जरुर कळवावे. मी यथाशक्ती सर्व मदत करेनच.
अबुल मुझफ्फर मोइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर,शहेनशाहे सल्तनत उल हिंदिया वल मुघलीया (साहेब اورنگزیب ) कधी गेले सांगता येणार नाही,परंतु आमचे पूर्वज त्यांच्या कंपनीत कामाला होते असे स्मरते....आमच्या पूर्वजांनी इतक्या चांगल्या माणसाची साथ सोडून छत्रपतींशी संग धरला याचे वाईट सुद्धा वाटले....असो
गोब्राह्मणप्रतिपालक श्री. औरंगजेब महाराजांच्या पुण्यात्माला शांती लाभो
आमच्या पूर्वजांनी इतक्या चांगल्या माणसाची साथ सोडून छत्रपतींशी संग धरला याचे वाईट सुद्धा वाटले.
मुघलवाले जास्त ऑनसाईट देत नसत असे ऐकून होतो.दिलीच तर २/३ महिन्यांची. त्यातही ओळख असली तर ऑन्साईट पटकन मिळणार. छत्रपतींनी 'लॉन्गटर्म ऑनसाईट opportunity' देतो म्हणून सांगितले असेल.
आंदोबांशी सहमत आहे. (दुर्भाग्य आंद्याचे)
औरंगजेब स्वता किंवा त्यांची कला अजुनही दुर्बोध वाटतात. वास्तवदर्शी शैली आकर्षक होती , आहे व असणार. त्याचे असे विस्कटलेले स्वरुप('मॉडर्न आर्ट'), सामान्यांना त्याबद्दलची अनाकलनीयता हे त्याकाळच्या बुद्धीजीवी लोकांनी टोपी विणकला हायजॅक केली म्हणावे की त्याकाळच्या मान्यताप्राप्त वास्तवदर्शी शैलीला फाट्यावर मारुन त्या काळच्या नवटोपीकारांनी, अभिजनांनी खुली केलेली टोपी विणकारीता म्हणावे हेच मला अजुन कळले नाही.
त्यांच्या देशोदेशीच्या फिरण्याची.. त्यांची मराठ्यांत शत्रु बघण्याची.. त्यांच्या सर्वसामान्यांना न समजणार्या कायद्यांची.. त्यांच्या पाढर्या शुभ्र दाढीची, त्यांनी भर दरबारात वापरलेले शब्द ते एका स्वतंत्र राजासाठी वापरले त्याची, त्यांच्या शत्रुत्वाचीच चर्चा जास्त झाली पण त्यांच्या कलेतून ते काय सांगू इच्छीतात हे कोणीच समजवून सांगितले नाही . त्यांनी विणलेल्या टोप्यांची कधीच चर्चा झाली नाही . ते आपल्या शेवटच्या दिवसात मायदेशी परत यायला तळमळत होते हे आम्ही त्यांच्या नातेवाईकांकडूनही ऐकले कारण ते तसे आमच्या खारी-बटर वाल्याच्या नात्यात होते.. त्यांना महाराष्ट्रासाठी ही नितांत प्रेम होते. अन आपण एक परप्रांतिय आहोत याचा ही अभिमान होता पण त्यांनी अशा लढाया का केल्या हे मात्र समजू शकले नाही. ते अत्यंत गरिब परिस्थीतीतून अन हालअपेष्टा सोसून पुढे आले होते पण शेवटी त्यांचा मृतदेह काही मायदेशी आला नाही अन दफन विधी येथे होऊ शकत नाही याचे दु:ख आहे..
(मी खरेतर हे सांगू इच्छित नव्हतो पण शेवटी रहावले नाही )
डानरावांनी ह्यावर सविस्तर लिहावेच. भले दोन लेख झाले तरी चालतील.
सविस्तर प्रतिक्रिया फारच उशीराच देतोय.
चर्चा आवडते आहे हेवेसांनल. काही प्रतिसादांमुळे फारच सुरेख रीतीने पार्श्वभूमी कळली.
असो.
>>डानरावांनी ह्यावर सविस्तर लिहावेच. भले दोन लेख झाले तरी चालतील.
हम्म्म्, औरंगजेब नावाच्या एका महान आणि वादळी व्यक्तीमत्वाचे कला आणि संस्कॄती ह्या क्षेत्रात योगदान ह्याबद्दल अधिक उहापोह व्हावा ह्या हेतुने उपरोक्त वाक्यात केलेले आवाहन हे नक्कीच कौतुकास्पद आहेच.
गेल्या सहस्त्रकातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या वादळी व्यक्तीमत्वाच्या कलाकाराच्या जगताला गवसणी घालण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो अपुरा किंवा उडता ठरेल असे आम्हाला वाटते - तरी तशी इच्छा होणे हे स्तुत्यच. एक माणूस आपल्या टोपी विण्ण्याच्या विस्मॄतीत गेलेल्य किंवा दर्जाने नीच ठरवलेल्या कामाकरता उणेपुरे ८०-९० वर्षांचे आयुष्य वेचतो (नक्की वयोमानाबाबत मतभेद हे ही त्या अवलियाच्या कर्तुत्वाची चेष्टाच ). समज येण्याच्या वयाच्याही आधीच उगम झालेल्या टोप्या विणण्याच्या व लोकांना ती घालण्याच्या ऊर्मीला जो सत्तरीनंतर थांबवू शकत नाही, टोप्यांच्या वीणीचे व आकार-उकारांचे अनेक प्रकारचे प्रयोग , अनेक शैलींनी व्यक्त होतो. आणि आयुष्याच्या अखेरच्या काही दशकामध्ये ज्याला सत्तापिपासू आणि कुटिल/हलकट राजकारणी तसेच हिंदवी स्वराज्याच्य मुळावर उठलेला सैतान ठरवण्यात येऊन , देशाबाहेर, नव्हे आपल्या टोप्या विणण्याची कला जिथे बहरली अशी कर्मभुमीबाहेर मृत्यूला स्वीकारावे लागते. या सर्वात खचितच भव्यताही आहे नि शोकांतिकाही आहे.
तसे पाहता तत्कालिक राजकिय, सामाजिक आणि धार्मिक अशा कलाबाह्य बाबींना टाळून या माणसाच्या कामामागची पूर्वपीठिका, त्याच्या कामाचे स्वरूप , संदर्भ , याचा शोध घेण्याकरता लिखाण केले जाऊ शकते, नव्हे ते करावेच असे स्पष्ट मत मी मांडतो.
टोप्यांचे प्रकार असतात. बर्याचदा आपण घालत असलेली दॄष्य टोपी हे एक "एक्स्प्रेशन" असते, अदृष्य टोपी असेल तर ती त्याच्या सुप्त मनाचे आंतरिक प्रकटन असते. कधीकधीच त्याच टोप्यांचे स्वरूप "आपल्याला काय जाणवले आहे, काय वाटते आहे ते आजमावून पहावे, त्याचा आकार आपल्या डोक्यावर कसा उमटतो ते पहावे व जमलेच तर ह्यायोगे आपली प्रतिमा तपासून पहावे " असे असते. टोपी घालुन आरशात पाहणे वगैरे ही दुय्यम अभिव्यक्ती अथवा प्रकटन मानायला हवे.
तत्कालिन भारतीय समाजात टोपी घालण्याच्या कलेचा प्रवाह कसा बनत गेला, कुठले कुठले फोर्सेस त्यात कार्यरत होते, निरनिराळे लोक या निमित्ताने एकत्र कसे आले ? कुठले तात्कालिक प्रवाह प्रभावशाली होते , जे नंतर क्षीण ठरले ? हा सगळा आशय एका छोट्या लेखमालेत सामावण्याजोगता नाही. मी सवडीने ह्यावर अजुन सविस्तर भाष्य करेनच, पण निदान पिडाकाकांच्या ह्या लेखामुळे मला आजकाल सिलाई मशिन्समुळे विस्मृतीत गेलेल्या ह्या टोप्या विणण्याच्य कलेबद्दल ४ शब्द लिहायला मिळाले व त्यायोगे औरंगजेब नावाच्या ह्या क्षेत्रातल्या दादा व्यक्तिमत्वाची कणभर ओळख करुन देता अली ह्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे.
आज काळ बदलला आहे. आज आपण टोप्यांवरुन समोरच्याच्या धर्म, संस्कार, संस्कृती आदींबद्दल आपल्या पुर्वपिठिकांमधुन आनि ठोकताळ्यांवरुन एक 'अंदाज' बांधत असतो आणि त्यानुसार समोरच्याशी आपल्याला योग्य वाटेल तसे वर्तन करत असतो. म्हणजे थोडक्यात आजही आपल्याला समाज, धर्म, संस्कृती, राष्ट्र आदींबाबत निर्णयाप्रत येताना 'टोपी'चाच आसरा घेतो. मग अशा परिस्थ्तीत टोप्या विणण्याची कला आणि समाज , टोप्यांची कला आणि धर्म आणि राष्ट्रसंकल्पना आणि यातल्या कमिटमेंट्समधील आंतर्विरोध , टोप्यांची कला आणि बाजार या सगळ्या गहन प्रश्नांकरताच मोठ्या चर्चा संभवतात. यातील कुठलीही गोष्ट व्हॅक्युममधे अस्तित्वात नसते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलची सुट्या सुट्या प्रश्नांवरील चर्चा कदापि अर्थपूर्ण, समग्र ठरणार नाही. औरंगजेब या सार्याच्या एपिसेंटरला होते व म्हणुनच त्यांच्या व्यक्तित्वाचे वर्णन वादळी म्हणून करणे हे अपुरेच ठरेल असे म्हणतो.
असो, तुर्तास इथेच स्वल्पविराम घेतो, बाकी चर्चा पुढे सरकेल तसे अजुन खरडेनच :)
- छोटा डॉन
परीचय धावताच नव्हता तर अगदी 'उडता' होता असे खेदाने म्हणावे लागते. छो. डॉ. कडून थोड्यातरी सखोल चर्चेची अपेक्षा होती. प्रतिसादात भारतीय अभिजात विणकला व पाश्चिमात्य विणकला (इंग्रजी टोप्या) ह्यातील ढोबळ फरकाविषयी माहिती दिली नाहिये, पण मग औरंगजेब ह्यांनी नक्की त्यांच्या विणकलेत भारतीयत्व ठेऊनही पाश्चिमात्य शैलीचा कसा वापर केला इत्यदिविषयी देखील काही टिपण्णी का नाही.
अपेक्षेनुसार या संस्थळावर रोचक आणि सभ्यतेची पातळी धरून, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी न करता वृद्ध औरंगजेबाला जो देशत्याग करावा लागला त्याविषयी एका ना एका उदारमतवादी व्यक्तिचे लेखन येणारच याची अपेक्षा होतीच. औरंगजेब ह्यांना चांगल ३६० डिग्री मध्ये आभ्यासल तर ते खरोखर ग्रेट होते , महाराष्ट्रात एका अमहाराष्ट्रीयन विणकराला मान मिळणे हे नक्कीच कौतकास्पद आहे. कुठलाही माणूस आयुष्यात चांगले काम आणि ठळक चुका नेहमीच करत असतो , पण प्रसिध्ध व्यक्तींच्या चुकांची चर्चा जास्त होते.
(असो ह्या पार्श्व-भूमीवर छोटा डॉन प्रतिक्रिया बोलकी आहे !!!)
मरणान्तानि वैराणी, या हिंदू संस्कृतीच्या शिकवणीचा विसर पडू देऊ नये, या भावनेतून मी माझी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मिपाकरांचे अज्ञान दूर करावे किंवा आपले मत इतरांवर लादावे, हा हेतू नाही. औरंगजेब जिवंत असताना त्यांच्यावर भरपूर टीका झाली आहे आणि वादाचा विषय काय होता, हे प्रतिक्रियांतून कुणालाही समजू शकेल. त्यामुळे इतिहासाबद्दल काही लिहायला नको.
औरंगजेब यांच्या विणकलेबद्दल लेख लिहिण्याची माझी लायकी नाही आणि कलेचा आस्वादक इतकेच मी स्वतःपुरते म्हणू शकतो. तसे पहायला गेले तर मीही केवळ टोपी नियमित वापरणार्यांपैकी आहे. फरक इतकाच की एखाद्या कलावंताच्या चुकांवरुन त्याच्यावर शिवराळ टीका करण्याइतकी माझी उंची नाही, याची मला जाणीव आहे. म्हणूनच औरंगजेब यांच्या कोणत्याही चुका या युद्ध क्षेत्रातील अथवा विणकाम क्षेत्रातील व्यक्तीनेच दाखवून द्याव्यात, असे नक्कीच वाटते.
औरंगजेब हे धर्मांध मुसलमान नव्हते खरे तर ते Sterio Type मुसलमान काय पण एक Sterio Type व्यक्ती ही नव्हते.
ते फक्त अन फक्त एक मनस्वी विणकार होते .
सगळ्यांनाच एका तराजूत तोलणे योग्य आहे का ? दाऊद च्या गुन्हाची सजा (मराठी ?) सर्व-सामान्य मुसलमानांना का?? की ज्याचे दाऊद शी काही घेणे देणेही नाही ?? असो... शहाणे मिपाकर खुल्या मनाने व थंड डोक्याने ह्या प्रश्नाकडे पाहत आहेत, ह्याबद्द्दल धन्यवाद. येथील अनेक आगपाखड लेखकांना अशीच बुद्धी होवो ही त्या अल्लातालाकडे प्रार्थना आहे.
त्यांच्यावर झालेला मोठा अन्याय म्हणजे त्यांचे नाव कोणीही आपल्या लेकरांना ठेवले नाही. किती हा अन्याय. पण ठेवले नाही हे ही एक बरेच झाले नाहीतर परत औरंगजेब यांना नावे ठेवली गेली असती. (अप्रत्यक्षरित्या. म्हणजे त्या लहान पोराने चूक केली असती तर "औरंग्या मेल्या मूर्खच आहेस तू" असे कोणीतरी म्हटले असते. आणि अनाहूतपणे त्या धर्मात्याचा अपमान झाला असता) असो. चर्चा वाचतो आहे.
त्यांच्यावर झालेला मोठा अन्याय म्हणजे त्यांचे नाव कोणीही आपल्या लेकरांना ठेवले नाही. किती हा अन्याय..
असहमत... नेरुळ , सेक्टर ४ मधे एक खिडक्यांचे ग्रिल बनवणार्या इसमाचे नाव औरंगजेब आहे... मी स्वतः त्याच्याकडून माझ्या घरासाठी ग्रील बनवून घेतले आहेत.... जाळीदार ग्रील छान बनवतो....(श्री. अभिज्ञ यास दुजोरा देउ शकतात)
बाकी डानरावांना दंडवत... त्यांची आणि पराची प्रतिक्रीया लाजवाब आहे.
पै.औरंग्यापापी च्या आत्म्यास शांती लाभो. (काय करणार? शेवटी 'मरणांती वैराणी' वगैरे)
हे बोलले नग्नतावादी. आपल्या सरस्वतीदेवीचा अपमान आपणच करण्याचं ठरवलं तर ब धर्मियांचं काय होणार? अरे, जरा त्यांच्या दैवतांबाबत त्यांच्या संस्थळांवर बोलून दाखवा की!
हे बघा, म्हणे त्यांच्या संस्थळावर बोलून दाखवा. हे असले लोक खोडसाळपणा करतात आणि मग सरकारला त्यावर बंदी घालावी लागते. तरी बरं या देशात अजून शर्मिला टागोरांसारखे विचारवंत आहेत जे आपल्या प्राणांची आहुती देऊन सरकारला असल्या बंद्या उठवायला भाग पाडतात आणि अभिव्यक्तिचं रक्षण करतात. यांचं काय जातंय नुसतं बोलून दाखवा म्हणायला? टागोर-खान म्हणाल्या तेच खरं, लायकीच नाही आहे या लोकांची.
ते आपल्या शेवटच्या दिवसात मायदेशी परत यायला तळमळत होते हे आम्ही त्यांच्या नातेवाईकांकडूनही ऐकले कारण ते तसे आमच्या खारी-बटर वाल्याच्या नात्यात होते..
औरंगजेबाच्या मामेबहिणीच्या नणदेची चुलत बहीण जी स्वत: एक राजकुमारी होती एकदा एका हिंदू परिकथेतील राजकुमाच्या प्रेमात पडली ...तसे ते दोघे ही एकमेकांच्या प्रेमात होते पण राजकुमाराच्या हवेलीतील एका खडूस प्रधानाला त्यांच्या प्रेमाचा संशय आला अन हे गुपित उघड झाले.
त्या हलकटाने त्यावेळच्या हिंदू-मुस्लिम वादाचा फ़ायदा उचलला अन सगळीकडे ही बातमी पसरवली मग काय, व्हायचे तेच झाले त्या राजकुमारीचा विवाह दुसरीकडॆ झाला. राजकुमाराला मात्र तिच्या विरहाने आपले प्राण गमवावे लागले पण अजूनही परिकथेतील राजकुमाराचे भूत संकेतस्थळावर आपल्या खारी बटरवाल्या नातवाईकांसकट भटकताना जाणविते . सध्या हे भूताड आपल्या झुल्फीकार वेताळ नातेवाईकांसह मराठी संकेतस्थळावर बटर लावण्याऎवजे लोकांना चुना लावण्यात मग्न असते. ;-)
देव या 'भूताड मित्र मंडळां'च्या आत्म्यास शांती देवो !! :-)
त्यांच्या अप्रकाशित (न विकल्या गेलेल्या) (व त्यांच्या उदरनिर्वाहास सहायभूत न झालेल्य() टोप्यांचा संग्रह तुम्हाला मिळाला नाही काय?
त्यावरून कांही निष्कर्ष निघत असल्यास एका अज्ञात पैलूवर प्रकाश पडेल.
(हेही काम चोता दोन यांचेकडे औटसोर्स करता येईल म्हणा!)
प्रतिसादाशी सहमत आहे.
अॅक्च्युअली अजुन एका महत्वाच्या मुद्याकडे सभासदांचे दुर्लक्ष होत असल्याने मी मुद्दाम तो सर्वांच्या लक्षात आणुन देऊ इच्छितो.
कलासक्त आणि जेष्ठ टोपीकर्मी औरंजजेब ह्या थोर कलावंताला वृद्धापकाळात मातॄभुमीपासून दुर जावे लागले. मायदेशापासून दूर औरंगाबादेत त्यांचा मृत्यू झाला. तर प्रश्न आणि चर्चेचा मुद्दा असा की, हे असे होणे ही आपल्या समाजाची शोकांतिका नाही काय? असे का व्हावे? औरंजजेब ह्या थोर कलावंताला वृद्धापकाळात मातॄभुमीत धड मरु ही न देणार्या मनोवृत्तींना, प्रवृत्तींना काय म्हणायचे ? आपला देश नक्की कुठे चालला आहे?
- (संतप्त)छोटा डॉन
गोब्राह्मणप्रतिपालक श्री. औरंगजेब महाराजांच्या पुण्यात्माला शांती लाभो.
गो आणि ब्राम्हण या शब्दांचा वापर करण्याची काही गरज होती का ? :)
बहुजनांना अनुल्लेखाने मारण्याचा बामनी ( ही शिवी नाही असे नुकतेच कळले आहे ) कावाच यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. तरी याकरता निषेध.
- पँथर
Reign 31 July 1658 – 3 March 1707
(48 years, 215 days)
Coronation 15 June 1659 at Red Fort, Delhi
Predecessor Shah Jahan
Successor Bahadur Shah I
Spouse Nawab Raj Bai Begum
Dilras Bano Begam
Hira Bai Zainabadi Mahal
Aurangabadi Mahal
Udaipuri Mahal
Issue
Zeb-un-Nissa
Zinat-un-Nissa
Muhammad Azam Shah
Mehr-un-Nissa
Muhammad Akbar
Sultan Muhammad
Bahadur Shah I
Badr-un-Nissa
Zabdat-un-Nissa
Muhammad Kam Baksh
Full name
Abul Muzaffar Muhiuddin Muhammad Aurangzeb Bahadur Alamgir
House Timurid
Father Shah Jahan
Mother Mumtaz Mahal
Born 4 November 1618
Dahod, Mughal Empire
Died 3 March 1707 (aged 88)
Ahmednagar, Mughal Empire
Burial Khuldabad
Religion Islam
बापाचा खून करण्याची प्रथा मुघलांच्यात आहे , म्हणून गळा का काढायचा? आपल्यात महाभारते कमी आहेत का? खुद्द छत्रपतींचा मृत्युही त्यांच्याच एका पत्नीने विष देऊन घडवला, असे ऐकून आहे... ( चला कौल लावायला विषय मिळाला.. )
त्यतच अल्पसंख्याकासाठी नवा कायदा आला आहे म्हणे, म्हणूण ५ नंबरला मत दिले. उगाच आम्तरजालीय दंगल घडली तर डोकेदुखी नको
थोडा खुलासा!
औरंगजेब यांच्यावर बाबा रामदेव
In reply to थोडा खुलासा! by पिवळा डांबिस
काय पराशेट
In reply to औरंगजेब यांच्यावर बाबा रामदेव by परिकथेतील राजकुमार
मेला ते ठिक आहे ! पण त्याचया
In reply to काय पराशेट by रमताराम
म्हणजे? तुम्ही आचारी नव्हतात
In reply to मेला ते ठिक आहे ! पण त्याचया by आचारी
त्याला वेज आचारी नको होता !!
In reply to म्हणजे? तुम्ही आचारी नव्हतात by नितिन थत्ते
त्याला वेज आचारी नको होता !!
In reply to म्हणजे? तुम्ही आचारी नव्हतात by नितिन थत्ते
इतिहासाच्या पुस्तकात याबद्द्ल
In reply to मेला ते ठिक आहे ! पण त्याचया by आचारी
पिवळा डांबिस -
In reply to थोडा खुलासा! by पिवळा डांबिस
इतर
औरंगजेब यांचा मॄत्यु कधी झाला
पाली झुरळांचा विजय असो. :)
In reply to औरंगजेब यांचा मॄत्यु कधी झाला by टारझन
पादशहा...????
In reply to औरंगजेब यांचा मॄत्यु कधी झाला by टारझन
"पादशहा" नाही ओ - "पातशहा"......
In reply to पादशहा...???? by नन्दादीप
पार्सिंग एरर
In reply to औरंगजेब यांचा मॄत्यु कधी झाला by टारझन
औरंगाजेब हि एक व्यक्ती नसुन
तीन नसून दोन असावे असे वाटते :)
In reply to औरंगाजेब हि एक व्यक्ती नसुन by नरेशकुमार
एका औरंगजेबाची कबर नगर पासून
In reply to तीन नसून दोन असावे असे वाटते :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वयाच्या
औरंगजेब त्याच्या मृत्युसमयी
कौलाच्या निमित्ताने एक
अशी बरीच माणसे आहेत / असावीत.
In reply to कौलाच्या निमित्ताने एक by नितिन थत्ते
थत्ते आणि बिपिन काकांशी सहमत
In reply to अशी बरीच माणसे आहेत / असावीत. by बिपिन कार्यकर्ते
-
In reply to अशी बरीच माणसे आहेत / असावीत. by बिपिन कार्यकर्ते
औरंगजेब नावाचया इसमाशी माझा
In reply to - by नितिन थत्ते
दिल्लीत
In reply to कौलाच्या निमित्ताने एक by नितिन थत्ते
श्री. औरंगजेब यांच्या
अबुल मुझफ्फर मोइनुद्दीन
In reply to श्री. औरंगजेब यांच्या by मृत्युन्जय
ऑणसाईट
In reply to अबुल मुझफ्फर मोइनुद्दीन by मालोजीराव
"ऐसी ऑफर दुंगा कि मना नाही कर पाओगे"
In reply to ऑणसाईट by चिरोटा
कला
In reply to श्री. औरंगजेब यांच्या by मृत्युन्जय
+१
In reply to कला by आनंदयात्री
+५०%/-५०%
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
स्वल्पविराम !!
In reply to +५०%/-५०% by छोटा डॉन
पंढरपुरचे चोता दोन फुल्ल
In reply to +५०%/-५०% by छोटा डॉन
परीचय धावताच नव्हता तर अगदी
In reply to +५०%/-५०% by छोटा डॉन
त्यांच्यावर झालेला मोठा
In reply to परीचय धावताच नव्हता तर अगदी by परिकथेतील राजकुमार
अन्याय झालेला नाही
In reply to त्यांच्यावर झालेला मोठा by llपुण्याचे पेशवेll
जाळीदार ! अहो, शेवटी जातिवंत
In reply to अन्याय झालेला नाही by आंबोळी
_/\_
In reply to परीचय धावताच नव्हता तर अगदी by परिकथेतील राजकुमार
+१००००
In reply to _/\_ by योगी९००
निषेध निषेध...
In reply to +१०००० by नगरीनिरंजन
हे बघा, म्हणे त्यांच्या
In reply to निषेध निषेध... by राजेश घासकडवी
राज, पिछले जनम का ...(परिकथेतील राजकुमार)
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
=))
In reply to राज, पिछले जनम का ...(परिकथेतील राजकुमार) by वाहीदा
आज
In reply to =)) by आनंदयात्री
त्यांच्या अप्रकाशित (न
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे ...
In reply to श्री. औरंगजेब यांच्या by मृत्युन्जय
गोब्राह्मणप्रतिपालक श्री.
In reply to श्री. औरंगजेब यांच्या by मृत्युन्जय
विकि वरुन साभार
बापाचा खून करण्याची प्रथा
माझ्या मते...
कशावरुन मत बनवलत?
In reply to माझ्या मते... by टवाळ कार्टा
अरे पण मुळात तो जगलाच किती
In reply to माझ्या मते... by टवाळ कार्टा
माझ्या जन्मापूर्वी