Skip to main content

अस्वस्थ दशकाची डायरी - आपले मत?

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 15/06/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी 'ध्येयवर्धक' वाचावे म्हणुन मराठी पुस्तक शोधत होतो,घरात तसे काही सापडले नाही.नववीत की दहावीत असताना वाचलेला एक धडा आठवला,फार आवडलेला,तो ह्या कादंबरीमधला होता म्हणुन ही विकत घ्यायचा विचार आहे. http://majesticprakashan.com/?q=node/703 ३०० रुपये वाया जाउ नयेत म्हणुन हा लेख लिहतोय. आपणापैकी कुणी वाचली आहे का? वाचली असेल तर आपले मत काय? काही परीचय देउ शकाल का? 'ध्येयवर्धक' आहे का?

वाचने 3967
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

पुस्तक चांगले आहे ..मात्र, ध्येयवर्धक म्हणावे का नाही , याबाबत साशंक ..

In reply to by पाषाणभेद

एमपीएससीच काय तर समाजाचा अभ्यास करणार्‍या सर्वांच्या कामस येणारं हे पुस्तक आहे. लेखकाने मुक्तपत्रकार म्हणून दहा वर्षे जे पाहिलं त्याचे विवेचन सुध्दा आहे यात. त्यामुळे त्यावेळी घडणार्‍या घटनांचे पडसाद आजच्या समाजावर उमटलेले दिसतात. जसं आसामच्या विद्यार्थी आंदोलनाव या पुस्तकात एक प्रकरण आहे. त्यात आसु आणि प्रफुल्ल कुमार मोहंतो आदींविषयी छान माहिती आहे. तशीच माहिती त्यावेळी भारताच्या राजकीय, सामाजीक जीवनात ज्वलंत असणार्‍या सर्वंच विषयांना त्यांनी स्पर्ष केलेला आहे. अशी दहा वर्षे मुशाफीरी केल्यावर लेखक पुढे सनदी अधिकारी बनले. :) - नीलकांत

अत्यंत अप्रतिम आणि वर्ल्डक्लास पुस्तक आहे. त्यातील भिरी भिरी भ्रमंती हे प्रकरण तर खासच. - (प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाचा आचंद्र-सुर्य फॅन) इंट्या.

अत्यंत अप्रतिम आणि वर्ल्डक्लास पुस्तक आहे. त्यातील भिरी भिरी भ्रमंती हे प्रकरण तर खासच. - (प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाचा आचंद्र-सुर्य फॅन) इंट्या.

ऊत्तम पुस्तक इंट्याशी सहमत मुळात ध्येयवर्धक वगैरे हेतूने वाचल्यास निराशा होणारच पुस्तक एक अनुभवकथन आहे वाचल्यानंतर एक वेगळीच अस्वस्थता जाणवते

हे एक चांगले पुस्तक आहे. ८० च्या दशकात भारतात घडलेल्या घडामोडींची घेतलेली दखल आहे. आणि लेखकाने अत्यंत सुंदर भाषेत लिहीले आहे. या पुस्तकावर मिसळपाववर येथे चर्चा झालेली आहे. - नीलकांत

पुस्तक चांगले आहे माहितीपूर्ण आहे ..मात्र, ध्येयवर्धक म्हणावे का हे तुमच्या वयावर अवलंबून आहे कमी वय असेल तर प्रेरक वगैरे

उत्तम पुस्तक आहे....पैसे नक्कीच वाया जाणार नाहीत.

सर्वांनी दीली प्रतिक्रीया म्हणुन मी आहे आपला आभारी. पण वाचयचे करत होते पुस्तक मन्,म्हणुन लिहला हा धागा. जर ह्या ध्येयवर्धक पुस्तकाला म्हणायचे नाही,तर म्हणायचे कोणत्या ध्येयवर्धक पुस्तकाला? कोणी मला जरा बर होईल सांगितलत तर.