अबोल प्रीत, उमलतेय..
अबोल प्रीत, उमलतेय पाकळी हळू हळू
कि नेत्र सांगती कथाच आपुली हळू हळू??
हृदय भरून वाहती, तुझेच स्पंद अंतरी
भरेल का मनातली हि पोकळी हळू हळू??
सुरेल मारवा तुझाच भारला इथे तिथे
तुझाच पूरिया घुमेल राऊळी हळू हळू
तनूवरी शहारला जसा तुझाच स्पर्श रे
उधाणले उरांत श्वास वादळी हळू हळू
तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा
भिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू
कधी सरीत अन कधी तुझ्या उन्हांत नाहते
पहा तुझीच घेरतेय सावली हळू हळू..
- प्राजु
व्वाह!!
"तनूवरी शहारला जसा तुझाच
तुझाच गंध घेउनी, खुलेल कंप
वा, वा ,वा क्या बात है...
सुंदर.
सुंदर...........
मला वाटतं..
ह्म्म्म.... ते गाणे सूर तेच
:)
व्वा! अप्रतिम उतरलीये!
+१
हळू हळू कळेल असं वाटतं
व्वा..!
:)
व्वा, सुंदर
सर्वांचे मनापासून आभार!
'वृत्ता'कडेही लक्ष द्यावेस
सुरेल मारवा तुझाच भारला इथे
सुंदर..
संध्याकाळी वाचली म्हणुन बरी
प्रित
अबोल प्रीत, चांगलिच उमललि हळू.... हळू..!
मस्त कविता गो प्राजुतै.
फार सुंदर...
मस्त. खूप आवडली.
नेहमीप्रमाणेच सुंदर.
+१
छान!
वाह् व्वा व्वा...