Skip to main content

Android फोन वर मराठी वेबसाईट्स कशा पहाव्या?

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 13/06/2011 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्याच्या माझ्या फोन मधे देवनागरी फाँट दिसत नाही. सद्ध्याचा फोन कुठला ह्याला महत्व नाही. लवकरच Android फोन घेणार आहे. त्यावर मराठी साईट्स, ब्लॉग्स वाचता यावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल? कुणाला अनुभव आहे का? कुणी ह्या बाबतीत मदत करू शकेल का?

वाचने 7019
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

माझ्या माहिती प्रमाणे अँड्रॉईडवर (२.क्ष) मधे देवनागरी दिसण्याची सोय सध्या नाही. अँड्रॉईडवर ३.० (हनिकोम्ब) वर हिन्दी उपलब्ध करणार असल्याचं ऐकून होतो पण मी स्वतः पाहिलेलं नाही. काही संस्थळांवर फोन रूट करून देवनागरी दिसण्यासाठीचे फॉन्ट कसे टाकावे याची माहीती आहे पण मी स्वतःचा फोन रूट करण्यास अजून धजावलेलो नाही. आयफोनवर सुद्धा देवनागरी फॉन्टस थोडे चमत्कारीकच दिसतात.. म्हणजे वेलांटी , उकार, अनुस्वार भलत्याच अक्षरावर दिसतात.

In reply to by मराठे

>>माझ्या माहिती प्रमाणे अँड्रॉईडवर (२.क्ष) मधे देवनागरी दिसण्याची सोय सध्या नाही. मी गेले १ वर्षभर अ‍ॅन्ड्रॉड २.० (इक्लेयर) वापरत आहे, माझे मॉडेल सॅमसंग्-गॅलेक्सी आहे. अगदी पहिल्या दिवसापासुन त्यात मराठी फॉन्ट्स उत्तम दिसत आहेत, बोले ते एकदम खटाखट ! काही इतर कंपन्यांच्या अ‍ॅन्ड्रॉड फोन्समध्ये मराठी फॉन्टला प्रोब्लेम आहे असे ऐकले आहे. सॅमसंगच्या सर्व अ‍ॅन्ड्रोड मॉडेल्समध्ये मराठी उत्तम दिसते. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

@ डॉन सॅमसंग गॅलेक्सी मध्ये टंकता पण येते का? मी गॅलेक्सी एस (ACE) घ्यायचा विचार करतोय. आणि फ्रोयो देवनागरी सपोर्ट करतं का?

जाऊन बघ रे http://forum.xda-developers.com/archive/index.php/t-666973.html काही उपाय दिसताहेत. मी स्वतः हे करुन बघितलेले नाही. आणखीन एक म्हणजे गूगलच्या अँड्रॉईड डेवलपर साईटवर जाऊन तुला इंडिक फॉन्ट्स हवेत असे लिही. तिथेही काही लोक उपाय देत असतात. लोकांच्या अपेक्षांना अनुसरुन लवकरच देवनागरी फॉन्ट यावा अशी आशा आहे! -रंगा

ओपेरा टाकले का ? असेल तर about:config असे अ‍ॅड्रेस बार मध्ये टंका आणि कॉप्लेक्स स्क्रिप्ट साठीचा सपोर्ट चालु करा. अगदी खाली खाली असेल बघा तो ऑप्शन.

मी माझ्या Android फोन वर 'ऑपरा मिनी' ब्राउजर इंस्टॉल केला आहे. मग त्याच्या अ‍ॅड्रेस बार मधे 'Opera:config' टाईप करायचं. तिथे असलेल्या लिस्ट मधे 'Use bitmap fonts for complex scripts' चा 'Yes' पर्याय निवडायचा. मराठी/हिंगी/देवनागरीतली संस्थळे नीट पाहता येतील. :) पण देवनागरी लिहिता येणार नाही.. :(

प्रभोनी एकदम बरोबर सांगितले आहे. सध्या तरी तोच उपाय आहे. भारतीय भाषा android वर दिसण्यासाठी गुगल कडे तक्रार पण करण्यात आली आहे आणि त्यांनी त्याचा किडा (Bug) तयार केला आहे. आता कधी येते आहे ते पहायचे. बरेच फोन हे देश आणि सेवा पुरावाणार्यानी बदल केलेले असतात जसे अमेरिकेत इंग्लिश आणि स्पानिश भाषा असते . तसे खरे तर भारतात करता येईल. कोणी जर लिनक्स मध्ये काम करणारे असेल तर त्यांना यावर जास्ती प्रकाश टाकता येईल.

Nokia N900 घ्या.MicroB Browser(Default) ,Opera,Firefox आहेत्,सर्वांवर मराठी नीट दीसते. Firefox मधे लॉग ईन करुन लिहुही शकता. वर FeedingIt सारखे RSS Reader व ईतर अनेक आहेत्,त्यावर तर मिपा खुप छान दीसते. 1 GB application memory,32GB internal memory,Memory Card upto 16GB......................................................... - Android सारख्या सुमार OS ला लोकप्रियता मिळत असताना,Maemo 5 सारखा देखणा व ताकदवर OS कमी लेखला गेल्यामुळे व्यथीत असलेला.

In reply to by आदिजोशी

हो आहे पण मी हे फक्त माहीती म्हणुन सांगितले,दुसरे काही अनुमान काढु नये. browsing ही प्राथमिकता असेल तर असा advanced browser मोबाईलवर तर तुम्हाला मिळणार नाही. Maemo 5 व Android Gingerbird/MeeGo(no calling) dual boot म्हणुन वापरु शकता. हा 'Device' (mobile नाही) एवढा आवडतो की बोलल्या शिवाय राहवत नाही, लुक पासुन ते hardware,software सर्व पैसा वसुल आहे. पण वापरणारा थोडा geeky असावा.

In reply to by शानबा५१२

अँड्रॉईड अजून बाल्यावस्थेत आहे...त्यापेक्षा विंडोज मोबाईल वापरलेले कधीही चांगले....असले फोंट संबंधी प्रोब्लेम्स येत नाहीत

In reply to by मालोजीराव

विंडोज मोबाईल हे टिप्पीकल मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट आहे. तद्दन गंडलेलं. फॉन्टचे प्रॉब्लेम न येण्यामागचं एकमेव कारण म्हणजे, ttf फाईली विन्डोज/फॉन्ट्स मध्ये साठवून ठेवता येतात. (सध्या मलातरी WM6.1 साठी फुकटातला देवनागरी फॉन्ट मिळत नाहीये. WM6.0 होतं तेव्हा वापरत होतो, पण ६.१ साठी त्यांनी पैसे घ्यायला सुरुवात केलीए. :( ) ह्याशिवाय विंडोज फोनमध्ये लै प्रॉब्लेम आहेत राव. इनबिल्ट मेमरी अडवून बसतंय ते विन्डोज. हाताळायला अतिनाजूक, वापरायला किचकट आणि बेभरवशाचं मायक्रोसॉफ्ट! एकवेळ नोकियाचा ११०० वापरावा पण विन्डोज नको अशा मतापर्यंत आलोय राव मी. अ‍ॅड्या, वर सगळ्यांनी सांगितलेला ऑपेरा-मिनी च्या config मध्ये बदल करण्याचा पर्याय लै बेष्ट आहे. (जर मोबाईलवरुन मराठी टंकलेखन करायचं नसेल आणि फक्त वाचायचं असेल तर.) शिवाय, ऑपेरा-मिनी बर्‍याच फोन्ससोबत काम करतं. अगदी जावाबेस्ड सुध्दा. केवळ ह्या कारणासाठी अँड्रॉईड घेणार असशील तर ह्या पर्यायाचा विचार कर. (गेली साडेतीन+ वर्षं+विन्डोज मोबाईलला वैतागलेला) ध.

In reply to by धमाल मुलगा

धमालराव अहो विंडोज बेष्ट आहे कारण त्यावर मला अँड्रॉईड पण टाकता आली, सध्या विंडोज ६.५ अँड्रॉईड २.२ सकट वापरतोय... विन्डोज/फॉन्ट्स मध्ये mangal आणि arial unicode ms फोंट पेस्ट करा...मी पण तेच केलंय
हाताळायला अतिनाजूक, वापरायला किचकट आणि बेभरवशाचं मायक्रोसॉफ्ट!
यावर सहमत

In reply to by मालोजीराव

हे ब्येस. आजच प्रयत्न करुन पाहतो फॉन्टचा. आणि एक शंका: माझं डबडं लै जुनं आणि गरीब आहे (Asus P320). त्यावर WM6.1 आणि अँड्रॉईड दोन्ही ठेवता येईल का ते ठाऊक आहे का? शक्य असलं तर करुन बघावं म्हणतो. :)

In reply to by धमाल मुलगा

प्रोसेसर कमी क्षमतेचा असल्याने अँड्रॉईड टाकला तर ASUS गन्डेल, त्यापेक्षा विंडोज ६.५ ला अपडेट करा.....माझं पण डबडं लै जुनं होतं...म्हणून ते ebay वर विकलं आणि htc चा Touch Pro2 घेतलं

In reply to by मालोजीराव

ट्च प्रो २ बद्द्ल व्ययक्तीक अनुभव काय आहे? तुम्ही घेतलात तेव्हा प्रो ७ होता का? धाग्याशी सबंधीत आहे अस समजावे.

In reply to by शानबा५१२

तुम्ही घेतलात तेव्हा प्रो ७ होता का?
तुम्हाला HD7 म्हणायचं आहे का? ट्च प्रो २ बद्दलचा अनुभव नक्कीच चांगला आहे,आणि त्याच्यासारख्या दिसणाऱ्या नोकिया E7 पेक्षा तो नक्कीच जबरी आहे, कारण मी याची ROM अपग्रेड करू शकतो,यावर अँड्रॉईड टाकू शकतो ...म्हणजे एकाच वेळी विंडोज आणि अँड्रॉईड वापरू शकतो....जर dot net किंवा sharepoint येत असेल तर स्वत: कस्टम applications करू शकतो....राउटर आणि मोडेम म्हणून वापरता येतोय सध्या तर... ....मी ट्च प्रो २ फार कमी किमतीत घेतल्याने अतिशय समाधानी आहे ;) - HTC प्रेमी

In reply to by मालोजीराव

तुम्हाला HD7 म्हणायचं आहे का?
नाही,मी हाटेकॉ प्रो ७ बोलतो आहे. http://www.htc.com/www/product/7pro/overview.html ट्च प्रो २ पुर्ण ब्लॅक नाहीये म्हणुन मन करत नाही.
.जर dot net किंवा sharepoint येत असेल तर स्वत: कस्टम applications करू शकतो
ह्यात हाटेकॉचा 'सेन्स' हा ओ.सीस्टम आहे का? कारण तोच हल्लीच 'ओपेन सोर्स' बनवला गेला आहे.त्यात तुम्ही अ‍ॅप्स बनवले तर समजु शकते. वि. फोन ७ हा 'क्लोज सोर्स' आहे त्यत अ‍ॅप्स बनवता येतात? मेमो ५ हा ओपेन सोर्स आहे,माझ्या काही ऑनलाईन मित्रांचेही अ‍ॅप्स आहेत. बाकी ट्च प्रो २ हा जसा अ‍ॅपलसाठी आयफोन आहे तसा हाटेकॉसाठी आहे,कारण खुप चालला होता व बग्स अजिबात नाहीत्,तुम्हाला कमी भावात मिळाला हे ऐकुन जळजळ झाली व हेवा वाटला.

In reply to by शानबा५१२

धन्स...मी आत्ताच पहिल्यांदा पाहिला HTC 7 PRO....खतरनाक आहे...आवडला आपल्याला...
वि. फोन ७ हा 'क्लोज सोर्स' आहे त्यत अ‍ॅप्स बनवता येतात? मेमो ५ हा ओपेन सोर्स आहे,माझ्या काही ऑनलाईन मित्रांचेही अ‍ॅप्स आहेत.
काही कीडेबाज लोक इथे कायम काहीना काही डेवलप करत असतात. वि. फोन ७ ची ROM ट्च प्रो २ वर अपग्रेड करता येत नाई :( त्यामुळे सांगू शकत नाई (आमची प्रो २ वाल्यांची झेप फक्त विन ६.५ पर्यंतच)
कमी भावात मिळाला हे ऐकुन जळजळ झाली व हेवा वाटला.
भारतातून विकत घेण्यापेक्षा मी ट्च प्रो २ इम्पोर्ट करवला आणि मग इकडे त्याला unlock केला. (आधी CDMA होता त्याला GSM kela) त्यामुळे डबल फायदा असं झाला कि त्यात आता CDMA आणि GSM असं कुठलाही कार्ड चालू शकतं,आणि अतिशय स्वतात पडला.. हे वेगळं सांगणे न लगे ;)

लेखावरील काही प्रतिक्रीया वाचुन कुत्रा ,शेपुट व डुक्कर्,चिखल हे शब्द नकळत मनात येउन गेले,असो. हा प्रतिसाद मी न९०० वरुनच लिहलाय. बाकी वि.फो. मॅन्गो खुप छान आहे.

ब्राउझींग हा मोबाईल वापरण्यातला एक भाग आहे. फक्त आणि फक्त ब्राउझींग साठी मी मोबाईल घेत नाहिये. सद्ध्या उपलब्ध असलेल्या सगळ्या मोबाईल्सच्या तुलनेत गॅलक्सी २ सगळ्या सोयींच्या बाबतीत वरचढ आहे. जी फंक्शन्स सामान्य माणूस वापरतो ती सगळी ह्या फोन मधे उत्तम रित्या चालतात असा अनुभव आहे. विंडोज आणि सिंबियन सारख्या वापरायच्या दॄष्टीने टुकार ओ. एस. दुसर्‍या नाहीत. फोन वापरणारी ९९.९९९९९९९% माणसं Geeks नसल्याने त्यांना तांत्रीक गोष्टींपेक्षा प्रत्यक्ष वापराचे महत्व जास्त असते. त्यामुळे माझ्या दॄष्टीने हाताळायची सहजता, वेगवेगळी अ‍ॅप्स टाकायची क्षमता, स्पीड, ब्राउझींग, गेमीग, म्युझिक, इत्यादि गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.