Skip to main content

हायकू १

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 12/06/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
हायकू १
एक फुलपाखरू दगडावर बसलं मनात म्हणालं कसं फसवलं मातीमधली ढेकळं काळी पिवून पावसाचं पानी व्हत्यात मातीवानी कुकुचकु कुकुचकु कोंबडा ओरडतोय कुकुचकु तेच आहे का त्याचे हायकू? दरीच्याच काठावर घसा खरडून ओरडतोय माझाच आवाज परत येतोय सांजचा सुर्य क्षितीजावर बुडला किनार्‍यावर दगड रडला हिरवे रान हिरवेगार पाउस नव्हता तर पिवळेशार पिवळेशार समाधी लागावी म्हणून डोंगरावरचे देवूळ अंधारात जाते बुडून पाखरांचा थवा पोटासाठी सकाळी घरट्यातून उडतो सायंकाळी परत येतो - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०६/२०११
लेखनविषय:

वाचने 1351
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

हायकू आवडले. दोन ओळीनंतर तिस-या ओळीत काही तरी वेगळं असलं पाहिजे असे वाटले. काही ओळी छान आहेत. काहींना जरा वेळ दिला पाहिजे असे वाटले. :) खालच्या ओळीत काही असं वेगळेपण वाटत नाही. पाखरांचा थवा पोटासाठी सकाळी घरट्यातून उडतो सायंकाळी परत येतो बाकी, सांजचा सूर्य, हिरवे रान हिरवेगार, आणि समाधी लागावी म्हणून हे हायकू आवडले. अजून येऊ दे..........! -दिलीप बिरुटे

मस्त उतरलीये कविता...बाकी हायकु हा प्रकार,हल्ली फारसा पाहाण्यात वाचण्यात येत नाही...तो आज मिळाला म्हणुन बरही वाटलं...