साहित्य- दोन वाट्या जाड रवा, दोन वाट्या साखर, एक वाटी साजुक तुप, एक टे.स्पुन वेलदोडा पुड,
बेदाणे थोडे.
कॄती- प्रथम साजुक तुपावर रवा खमंग भाजुन घ्यावा, अगदी घरभर खमंग वास पसरला पाहिजे,आता तो थोडावेळ बाजूला ठेवा.
मग पाक करण्याची तयारी करा. एका पातेल्यात साखर घाला, ती बुडेल इतपतच पाणी घाला, पाक करण्यास ठेवा..एकतारी पाक झाला की त्यात भाजलेला रवा घाला,एक्त्र ढवळा नीट. बाजुला ठेवुन द्या.येताजाता ते
मिश्रण हलवत रहा..रवा घट्ट झाला..जरासा कोरडा झाला की त्यात वेलदोडा पुड मिसळा, पुन्हा एकजीव करा.
आणी आता लाडू वळायला घ्या..एक एक बेदाणा लावत लावत लाडू वळा..
मी आजच केले आहेत..पण अजुन लाडू वळले नाहीत ..त्यामुळे फ़ोटो उद्या टाकीन नक्की.
वाचने
7405
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटूशिवाय प्रतिसाद मिळायचे
हो टाका फोटो लवकर
मस्त!! पण
छान
मस्त लाडू
लई भारी.......
In reply to मस्त लाडू by स्मिता.
केव्हा येताय?
In reply to लई भारी....... by प्रास
छानच फोटू! ग्रेट हां स्मिता!
In reply to मस्त लाडू by स्मिता.
छानच फोटू!...... स्मिता! माझा
मस्तच.....