Skip to main content

रवा लाडू---

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 07/06/2011 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- दोन वाट्या जाड रवा, दोन वाट्या साखर, एक वाटी साजुक तुप, एक टे.स्पुन वेलदोडा पुड, बेदाणे थोडे. कॄती- प्रथम साजुक तुपावर रवा खमंग भाजुन घ्यावा, अगदी घरभर खमंग वास पसरला पाहिजे,आता तो थोडावेळ बाजूला ठेवा. मग पाक करण्याची तयारी करा. एका पातेल्यात साखर घाला, ती बुडेल इतपतच पाणी घाला, पाक करण्यास ठेवा..एकतारी पाक झाला की त्यात भाजलेला रवा घाला,एक्त्र ढवळा नीट. बाजुला ठेवुन द्या.येताजाता ते मिश्रण हलवत रहा..रवा घट्ट झाला..जरासा कोरडा झाला की त्यात वेलदोडा पुड मिसळा, पुन्हा एकजीव करा. आणी आता लाडू वळायला घ्या..एक एक बेदाणा लावत लावत लाडू वळा.. मी आजच केले आहेत..पण अजुन लाडू वळले नाहीत ..त्यामुळे फ़ोटो उद्या टाकीन नक्की.

वाचने 7405
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मस्त!! पण पाकृचा फोटो कधी मिळ्णार बघायला ताई ?? मीसुध्द्धा रेवतीप्रमाणेच नारळाचा चव घालून लाडू बनवते

मस्त पाकृ. लाडूत सुके खोबरे टाकले तर लाडू आणखी मस्त लागतात.

निवेदिता ताई, लाडू एकदम मस्त झालेत. तुमच्याकडून आणि रेवतीताईंकडून प्रेरणा घेऊन मी बनवून पाहिलेत. ओले नारळ तर मिळालेच नाही पण सुके खोबरे घालूनही मस्त लागतात. हा बघा मी परवा बनवलेल्या लाडूंचा फोटो:

In reply to by स्मिता.

स्मिताजी, तुमच्या घरी जेव्हा येइन तेव्हा खाण्याच्या लिस्टात याचीही गणना करून टाकावी ही विनंती.....

छानच फोटू!...... स्मिता! माझा फ़ोटो अपलोडच होत नाहीये...सो प्लिज समजून घ्या.. तसा स्मिताने एक फ़ोटो दिलाच आहे..

मी ओले खोबरे कीसून घालून केलेले, ते पण yummy झालेले ....