खर॑च लाख् मोलाच॑ आहे हे,
फक्त नजरेला नजर मिळता माणुस अनेक शब्द जे तोडा॑तुन नाही बोलु शकत ते तो बोलुन जातो.
गोवा हे ठिकाण मस्त आहे, आणि कोकणी माणसे जरा प्रेमळच असतात.(मी कोकणी आहे;) )
आपण एखाद्याला मदत केली की ती व्यक्ती ते लक्षात ठेवुन पुढच्या वेळी दुसर्याला मदत करते.
बर्याच वर्षांपुर्वी बेस्ट बस मधून प्रवास करताना एका मित्राला आलेला अनुभवः
भरपूर गर्दीच्या वेळी या मित्राने शेवटच्या स्टॉप चे तिकिट काढले. तो मधल्या मार्गिकेत उभा असताना एका सीटच्या कडेवर बसलेल्या आजीबाईंनी आपल्या शेजारील आजोबांना खिडकीकडे सरकायला लावून त्याला कडेला बसायला सांगितले. (पुढचा संवाद हिंदीत जसा झाला तसा देतोय, कारण तरच शब्दांची खुमारी कळेल.)
आजी: दूर जाना है बेटा, बैठ लो|
मित्रः नही जी, आप आरामसे बैठिये, क्युं तकलिफ उठाते है? वैसे भी जगह छोटी है|
आजी: अरे, जगह छोटी होगी, दिल तो बडा है ना हमारा, क्या वो काफी नहीं?
सामंतसाहेब .. खूपच मस्त अनुभव !!
माझ्या ब्लॉगवर 'क्या लाऊं साब !' नावाचा एक लेख आहे. त्या लेखाच्या शेवटी मी आंतरजालावर वाचलेली एक छोटीशी इंग्लिश गोष्ट नमूद केलीय.
जरूर वाचून कळवलं तर आनंद होईल :)
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------
अतिशय अभ्यासू वृत्तिने पण मनोरंजकतेने लिहिलेला हा लेख वाचून खूप बरं वाटलं.
आणि शेवटी त्या लहान मुलाची हृदयस्पर्शी वागणूक वाचून मला पण हुंदका आला.
सामंत
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
नमस्कार,
मी दरवर्षी किमान दोनदा गोव्याला जातो . जर मला त्या होटेलचा पत्ता दिलात तर मी नक्की जाईन.
अशा माणसाला भेटायला नक्की आवडेल.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
नमस्कार संतोषजी,
खरंच मला त्या वेटरचं नांव आता लक्षात नाही.पण म्हापस्याचं कामतांचं ते हॉटेल होतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
हम्म! ष्टोरी बरी वाटली. वेटरचे व्यक्तिचित्रं अधिक चांगल्या रितीने खुलवता आले असते असे वाटते. अर्थात, हे माझे व्यक्तिगत मत.
मुंबईच्या होटेलमधे गिऱ्हाईकाच्या डोळ्यामधे मला एकमेकाचा दुवा साधणारी नजर कमी दिसते.ते येतात,इकडे तिकडे बघतात,मेनु ऑर्डर करतात बस झालं.त्यांच्या नजरेत किंवा मनात कुणाशीही दुवा साधण्याची इच्छा नसतेचमुळी.
हॉटेलात गेल्यावर अजून काय करायचं? मीदेखील इकडेतिकडे काही बघण्यासारखे आहे का ते बघतो (!), नंतर मेनू ऑर्डर करतो, मागवलेले खातो अन् पैशे देऊन चालू पडतो!
आणि मुळात मुंबईकरांना इतका वेळ असतो का? शिवाय गिर्हाईकाने हॉटेलात गेल्यावर त्याने नजरेने किंवा मनाने वेटरमंडळींशी दुवा साधलाच पाहिजे, नव्हे ते त्याचे कर्तव्यच आहे असाच एकंदरीत तुमच्या वेटरचा सूर दिसला, जो मला गैर वाटला. एखादवेळेस एखाद्या गिर्हाईकाची वेटरशी सलगी, जवळीक जमणे समजू शकते पण म्हणून प्रत्येकच गिर्हाईकाच्या बाबतीत तसे होईल ही अपेक्षा चुकीची आहे.
मला तसं गोवं मुंबई पेक्षा खूप आवडतं.
इकडचे लोक मला जास्त प्रेमळ वाटतात
शिवाय लेखात वेटरने दोनतीनदा मुंबईची गोव्याशी तुलना केली आहे. मी त्याला इतकंच म्हटलं असतं की 'बाबारे, आलास ना आता मुंबई सोडून? मग झालं तर! आमची मुंबई तिच्या गुणदोषांसकट राहू दे आमच्याचपाशी! तुझं मुंबईवाचून आणि मुंबईचं तुझ्यावाचून मुळीच अडत नाही. मुंबई काय आहे, कशी आहे, प्रेमळ आहे किंवा नाही, तिथे माणूसकी आहे किंवा नाही, हे २६ जुलै २००५ सारख्या प्रसंगातून कळतेच!' :)
असो...
सामंतसाहेब, पुलेशु....
आपला,
(मुंबईकर) तात्या.
प्रतिक्रिया
छान !!!
खुप चा॑गला स॑देश.
मुंबईतील बस मधला अनुभव..
मस्त
एका वेट्रेसची गोष्ट
लेख आवडला
धन्स !
आभार
छान
हॉटेलचं नांव
हम्म!