वर्षे सुकली गुच्छ बांधले काडी एक तयातिल चंदन
वळून मागे शोधू पाहे; गंध मंडली; शापित मन
उगाळली आयुष्ये परि ना वात सरे ना ऋतुमंथन
काळावरती ठसे अबाधित; तलम रेशमी हे बंधन
घटअमृतसय निराकार; उभयांना विरहाचे प्राक्तन
शोध निरागस क्षतापलिकडे; रोज सागराचे स्पंदन
.............................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1113
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा अज्ञातकुल एका वेगळ्याच
व्वा अज्ञातकुल एका वेगळ्याच शैलीने तूम्ही विरहाची वेदना चितारली आहे.
फक्त घटअमृतसय हा उल्लेख का केलात ते सांगितले तर उत्तमच आहे. त्यामुळे नायकाच्या भावना अधिक समजतील.
घटअमृतसय
In reply to व्वा अज्ञातकुल एका वेगळ्याच by पाषाणभेद
अमृतघटाप्रमाणे असलेली आठवण अथवा "आठवणींचा अमृतघट" असं म्हणायचंय मला. :)
आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार. असाच लोभ असू द्यावा कायम. धन्यवाद.