लेखनप्रकार (Writing Type)
MIT ,Symboysis किंवा अशाच एखाद्या कॉलेजचा कॅंपस.. देन तीन पोरे नेसकॅफे वर कॉफी पीत फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतात. आपण, सहज जवळ जाऊन नाव विचारतो.. तर ते असतात जोशी, कुलकर्णी आणि पाटील .. दॅटस इट .. मराठी येत असूनही इंग्लिश बोलणारा, चांगल्या निदान बर्या घरातून आलेला.हाताशी मोबाईल आणि गाडी असणारा.. शरीराने भारतात आणि मनाने इंडियात राहणारा हा आमचा तरूण वर्ग.. अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली ही आमची जनरेशन..सुशिक्षित,मॉडर्न असा हा वर्ग .. संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह ... आणि, APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारताचे शिलेदार देखील..
होय, आणि खरं सांगायचं तर उद्याच्या भविष्याच्या निर्मितीचा सर्वात जास्त भार खरोखरच आमच्यावर आहे. कारण, आम्ही असे तरूण आहोत की ज्यांना निदान पोटापाण्याची चिंता नाही.. चांगलं शिकायला मिळतयं ,घरातुन सेफटी आहे.. हे सगळं मिळत नसल तर काय डोंबलाचा जगाचा विचार करणार? पण, फक्त भारच नव्हे तर आम्ही यासाठी केपेबल देखील आहोत. कारण, We are different.. आमच्याकडे आमचा स्वत:चा ऍटीटयूड आहे. एखाद्या गोष्टीकडे बघायची ताकद आहे, दृष्टी आहे.. मग ती इमॅच्युअर का असेना, पण तरी तो आमच्याकडे आहे.. 23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच..पण, ते घ्यायची तयारी आमच्यात आहे, हे जास्त महत्वाचे...आणि, सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता ..
आमच्यात आयडॉलीजीम नाही , आम्ही कोणाशीही बांधलेलो नाही.. आम्ही फक्त आमच्याशी बांधलेलो आहेत. आणि, कोणी काहीही म्हणो, ही आमची ताकद आहे. कारण, आमचं विश्व आम्ही घडवायचयं ही जाणीव आम्हाला आहे. माईक वर बोलणारा राजकारणी किंवा टी व्ही स्टार कॅंपस इंटर्व्ह्यु च्या वेळेला मदतीला येणार नाही आहे हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे .. फार कशाला, अगदी परवाचीच गोष्ट आहे. आमचा FE चा Welcome Ceremony चाललेला.. प्राचार्यांना एक पोरगा दंगा करताना सापडला.. त्यांनी त्याला स्टेजवर बोलवुन शिक्षा दिली व परत पाठवले.. आता त्या मुलाची काय प्रतिक्रिया तुम्ही एक्स्पेकट करता? रडेल किंवा खुन्नस देइल वगैरे वगैरे ... पण जेव्हा Spontenious मनोगताची वेळ झाली. तेंव्हा तो डायस वर आला आणि आज इंजिनिअरींग लाही हे आपलेपण आहे. त्यामुळे मला शिक्षा मिळाली याबद्दल थ्यँक्स म्हणला.. आणि, हा डाग पुसणार असा निर्धार केला ( आणि नंतर वर्गाचा प्रतिनिधी बनुन त्याने तो पुसलादेखील) .. ही जिद्द, धाडस होतं की पुर्वी?
याहुन महत्वाचा म्हणजे आमच्या फ्रँकनेस.. माझा एक इंग्रजी लेख वाचून कोणती तामिळनाडूतली मुलगी माझ्याशी प्रचंड भांडते , तरीही आम्ही दोस्त होतो. दरवेळेला भांडतो आणि आता तिला तिचा ब्लॉग तयार करायला मदत करतोय . Doesent sound intresting ?? मुल-मुली ,राज्य -राज्य हा फरक तर केंव्हाचाच गेलाय.. आणि तसेही आज पोरीच पोरापेक्षा फॉरवर्ड असतात, बरोबर ना ??
आणि, लास्ट बट नॉट द लिस्ट.. आमची माध्यमांची जाण.. आम्ही संगणक चारदा बंद पाडु ,मोबाईल ची वाट लावु पण, दोन दिवसात त्यावर मास्टरी मिळवणारच.. आणि, नेट, फेसबुकमुळे तर काही विचारूच नका! आठवीतल्या माझ्या मित्राला शंका असेल तर तो फेसबुक वर टाकतो आणि १० मिनिटात त्याला उत्तर मिळते . ही एक खुप मोठी ताकद आहे .. आजुबाजुची परिस्थिती आणि आम्ही स्वत: याचं एक युनिक अफलातून प्रॉडक्ट आमची जनरेशन आहे , आणि, जरा आजुबाजुला नजर टाकली की आम्ही किती ताकदवान आहोत हे दिसून येतय.. So, be carefull..!
हा, आता तुम्ही म्हणाल की, ''साल्या ,एवढी पोर आहात तुम्ही शिकणारी, एवढी ताकद आहे, मग आत्तापर्यंत फार पुढं जायला हवा होता की तुम्ही?'' अगदी बरोबर बॉस, मलापण तोच प्रश्न पडतो. मग विचार केल्यावर अस वाटतय की आम्हाला आमची ताकदच माहित नाही आहे.. आम्ही काय करू शकतो तेच कळत नाही. म्हणुनच मग "जागो रे" चे कसेबसे लाखभर सदस्य होतात. किंवा नेटवर चालू असलेल्या ग्रेट पॉवर रेस मध्ये 2 महिन्यात एकाही कॅम्पस चे २० पण पॉईंट होत नाहीत.. कारण, आम्हाला यातुन आम्ही काय करु शकतो त्याची जाणीवच नाही..
याहुन डेंजरस गोष्ट आहे ती वेगळीच, माझा एक लेखक मित्र आहे हिमांशु, तो म्हणतो, ''एखादी गोष्ट ही संधी आहे का समस्या ?'' तेच कळत नाही आम्हाला. आणि हा आमचा प्रॉब्लेम आहे ...बरोबर आहे ते ..अगदी असेच आहे.. नेट आले मान्य, पण, आम्ही त्याचा वापर फेसबुक वर चॅट करण्यासाठीच फक्त करायला लागलो ना..
मोबाईल मिळाला, पण त्यावरून आम्ही गणपती, साईबाबांचे एसएमएस टाकत राहिलो.. माध्यमामुळे आणि घरच्या प्रगत राहणीमुळे पोरं-पोरी एकत्र बोलायला लागली.. वाटल चांगल झाले माझ्या सारखा पोरांचा शायनेस तरी गेला .. पण, त्यातुन गंमत झाली वेगळीच .. परवा, फेसबुकवर एकाचा स्टेटस होता.. In a relationship with ************ नाव कुठलं परदेशातलं, सहज टोकलं तर म्हणाला, अजुन मी तीला बघितलेलचं नाही.. च्यायला, मला तर काय कळलच नाही बाबा हे झेंगाट ..
आणि, हे कमी का काय, म्हणून आजुबाजूचा भवताल.. घरच्यांना आम्हाला द्यायला वेळ नाही.. ते दमलेल्या बाबाची कहाणी ऐकण्यात समाधान मानतात.. आणि, पोराला टीव्ही व पीसी वापरायला मिळतो.. मग आमच्याही नकळत आम्ही पोर्न बघु लागतो. सातवी आठवीतच .. कधीतरी कोणी C.S. आणुन टाकतो.. मग, एखाद्या दिवशी पीसी वर पोर्न सापडले की आई-बाप डोक्याला हात मारतात.. किंवा आज मी 4 हेड शॉट ने खुन केले,अस पोरगा म्हणतो जेंव्हा पोरगं नक्की काय म्हणतय.. तेच कळत नाही..आणि पालकांचा खुन व्हायचा बाकी राहतो ..
नेट वापरणे ही आमची ताकद आहे. पण, केंव्हा प्रमाणात असल्यावर हो..आम्ही नेटवर भांड-भांड भांडतो, पण, प्रत्यक्षात बोल म्हटल्यावर तोंड बंद.. ते व्हर्च्युअल आहे हेच विसरतो आम्ही.. हातातला पैसा, भाबड्या समजुती यामुळे जगाचे अनुभव घ्यायला बाहेरच पडत नाही. . फार्मविले वर शेती बघितली म्हणजे काय गरमागरम भाजलेले कणीस खायला मिळतं? वाचन बिचन तर दुरचचं. आपलं वाचनं काय तर.. "मी आज आजारी पडलेय" .. असले स्टेटस..
परिस्थिती अशी, आणि मग मानसिक गोंधळ.. जग जवळ आलं खरं.. पण,दुसर्याचं काय उचलायच आणि काय नाही ते विसरलो. मग त्याने बीअर घेतली, आपण घेतो.. पण इथे त्याची गरज नाही. ना . पण त्याने घेतली की आपण घेतो.. या सगळयात एखाद्या गोष्टीची खरी डेप्थ कोण हुडकणार?तेवढा वेळ आणि इच्छा आहे ?
बापरे, केवढं ते वाईट लिहिलं मी आमच्याबद्दल. हे वाचल्यावर मला कोण मारायचा सोडणार नाही.. पण, मला वाटतं हे कळायला पाहिजे आपल्याला.. आपल्याला आपले प्रश्न कोणते, आपल्या समस्या कोणत्या तेच माहित नाही आहे..आणि तोच आपल्या प्रगतीचा वेग कमी करतोय ... तेवढं कळालं की झालं की !! एवढी हत्तीएवढी ताकद आहे आपल्याकडे.. उगाचच, चिरीमिरीच्या गोष्टीवर वाद घालण्यात ती वाया घालावण्यापेक्षा ती योग्य जागी वापरलं की झालं, हाय काय आणि नाय काय? मग, कोणाची हिंमत आहे आम्हाला आवरायची?
बॉस, आणि एवढं काय टेन्शन घ्याची गरज नाही.. मूळ प्रॉब्लेम दोनच आहेत. एक म्हणजे आपल्याला जगण्याचं बेसिक माहित नाही, उदा. पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे.. हे आपल्या आधीच्या पिढयावर बिंबवल गेलयं..आपल्यावर तेवढं राहिलय .. इतकच आणि .. ते मिळाल की योग्य दिशा घेणं.. मग, एमटीव्ही चा रिव्हेंज किंवा स्पार्टव्हिला जो संस्कार करतो. त्याला आपण नक्कीच पुरून उरू.
यावरून आठवलं, परवा मी ''बाकी शुन्य'' वाचलं, नाही आवडलं. . सगळं भारी होतं.. पण, मेन पात्राकडं बेस नव्हता आणि म्हणून तो भरकटला..सो, नाही आवडलं.. कारण, रखखरीत सत्य मांडण जस साहित्याच काम आहे, तसं वाट दाखवणही.. आज आम्हाला फक्त त्याची गरज आहे, बाकी कशाचीही नाही..ते कोण करणार ? मनस्विनी लता रविंद्र म्हणते तस ''का प्रश्न पडणचं आहे महत्वाचं?'' बरोबर ती एक बेसिक कन्सेप्ट आहे, पण त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण ही आपली खासियत.
तसं बघायला गेलं तर आपण फार पुढे न जाण्यातही आपली चूक काहीच नाही. परिस्थिती, समाज, पालक बऱ्याच गोष्टी आहेत. पण, आपण कशाला त्यांना शिव्या घाला? शेवटी गरज आपली आहे कारण, आत्महत्या आपण करतो आणि प्रगती झाली तर आपलीच होणार आहे.. गंमत अशी आहे की, आपल्या बद्दल वेगळी अशी चर्चा झालेलीच नाही..असो, काय फरक पडतो.. प्रत्येकाने विचार केला, आजुबाजुला पाहिले, आणि स्वत:ला शोधायचा प्रयत्न केला की झाले.. देर हे लेकीन दुरूस्त है.. काळात आपल्याला शिव्या घालण्यापेक्षा आपण आपल्याला बदलु.. कारण काहीही झाले, तरी आपण भविष्यकाळ आहोत. आपण, फक्त शक्ती विसरलेले हनुमान आहोत.. तेवढी शक्ती कळालीय आता.. मग, जग बदलु आपण.. आणि म्हणूनच शेवटी म्हणावं वाटतं..
Yes…We are…..
(तळटीप - सदरचा लेख ऑल इज वेल या पौगंडावस्थेवर आधारीत असलेल्या विशेषांकात प्रकाशित झालेला आहे . खुप दिवसानी मिपा पुन्हा नीट चालु लागलेले दिसले .सो , हा लेख इथे प्रकाशित करण्यापासुन स्वतःला थांबवु शकलो नाही .. )
प्रतिक्रिया
<थत्ते चाचा मोड ऑन> हा लेख
ते नवे आहेत हे जुने झाले
गेला
गेला बाजार २.५ वर्ष मिपावर
आँ!
:)
यात
असं?
मेलो .. =)) =)) लेख वाचायचं
आणि कधी कोणाचं वाचत
भैसाट्लेला लेख
काही कळल नाही
हा हा हा
सहमत आहे
शी बै
सूद्द लेखण शिकायचे क्ळाशेस
तुमचं वय काय हो पाचलग आजोबा?
अरे वा छान लेख
आपल्याला आपले प्रश्न कोणते,
हेच शोधत होतो
लेखातील भाव समजला. पण लेख
छद्मी ????? आईला .. काहीही
काहीही?
त्या विधानाने तुम्ही इतके का
त्या विधानाने तुम्ही इतके का
या लेखातून तु फेसबुक सॅवी
१० पैकी
तरूण गरीबांचे दवणे आठवले....
घाबरलो ना भौ...
छान
हाण्ण्..... सहज रावांशी
+१११
अशा प्रकारच्या लेखन शैलीला '
अशा प्रकारच्या लेखन शैलीला '
पाचलग आपल्याला
जाताजाता
दुसरीकडे प्रसिद्ध केलेले इथे
माफी असावी
सर, माफी नको..तुम्ही मिपा
सहमत
नमस्कार दोस्ता, मागे तू
तुम्ही कोदेश्वराचा अपमान करत
सहमत
श्रामोंशी सहमत.
ठिक ...
साला आमचा विनायक म्हणजे
च्यायला मी म्हणले अलिबागला
छान लेख. विचार करायला
कसला
सखाराम गटणे...
Pagination