Skip to main content

रामदेव बाबा यांची प्रकृती गंभीर

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 08/06/2011 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
योगगुरू रामदेव बाबा यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. आज (बुधवार) बाबांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून, डॉक्‍टरांनी त्यांना द्रवस्वरूपातील पदार्थ सेवन करण्यास सांगितले आहे. तसेच, हे उपोषण लवकर थांबवा, असा सल्लाही दिला आहे. याबद्दल प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश शर्मा पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "रामदेव बाबा याची प्रकृती ढासळत चालली आहे. त्यांचे वजन कमी झाले असून त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.'' रामदेव बाबांनी दूध किंवा फळांचा रस घ्यावा व जमल्यास हे उपोषण त्वरीत थांबवावे असा सल्ला दिल्याचे त्यांनी नमूद केले. सरकार कधी जागे होणार

वाचने 3119
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

नुस्त्या कपालभातीवर ते दोन-तीन महीने सहज काढ्तील.

http://www.esakal.com/esakal/20110608/5551901297896649315.htm ह्या लिंकवरच्या शेवटचा परिच्छेद तर तुम्ही दिलेलाच नाही. असू द्या..मी देतो आणि सकाळमधली बातमी पुर्ण करतो. :)
याबद्दल बोलताना रामदेव बाबांनी सांगितले की लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ती सोडून इतर सर्वांनी या उपोषणात सहभागी व्हावे. सध्या संपूर्ण देशातील हजारो समर्थकांनी या उपोषणात भाग घेतला असून, ६२४ जिल्ह्यातील लोक उपोषण करीत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------- सरकार कधी झोपलं होतं?

In reply to by धमाल मुलगा

सध्या संपूर्ण देशातील हजारो समर्थकांनी या उपोषणात भाग घेतला असून, ६२४ जिल्ह्यातील लोक उपोषण करीत आहेत. देशातील अन्नटंचाईची समस्या अता चुटकी सरशी नाहीशी होयील.... अवांतर : शास्त्रींच्या कार्यकाळात असाच त्यांनी व बर्‍याच देशबांधवांनी भात सोडला होता हे आठवून अंमळ नॉस्टॅलजिक झालो....

अजून खूप काम बाकी आहे... शस्त्रास्त्र वगैरे. ती हरवलेली पाच हजार माणसं शोधायची आहेत

डॉक्‍टरांनी त्यांना द्रवस्वरूपातील पदार्थ सेवन करण्यास सांगितले आहे. तसेच, हे उपोषण लवकर थांबवा, असा सल्लाही दिला आहे. हे बरं आहे!! आम्हाला मात्र नेमका उलट सल्ला देतात हे शिंदळीचे डॉक्टर!!!! :(

मध्येच चार चार तास गायब होतात,परत आल्यावर एकदम ताजेतवाने होवुन सरकार वर टिका करतात.स्टेमिना चांगला आहे बाबांचा.

देशातील अन्नटंचाईची समस्या अता चुटकी सरशी नाहीशी होयील. अतिशय ह्रुदय शुन्य प्रतिक्रिया.. सारा समज आत्म मग्न झाला आहे.. कुणाला कशाचेच काहिच वाटत नाहि.. त्या मुळे सरकारचे फावते... असो..आम्हास बाबांची काळजी वाटते.