Skip to main content

भंगलेल्या मनाचा अभंग

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 08/06/2011 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
चित्त आणि वृत्ती व्हावी एकरूप अहंकार लोप होवो माझा देव आहे नाही ठावे नसे मज माझे हितगुज मज पाशी मीच मला केले उभे न्यायालयी आत्माराम होई न्यायाधीश अलिप्तता ऐसी तैसी नाही सोपी किती बहुरूपी अंतरंगी परी नाही आता उपाव दुसरा अखंड पहारा चित्तावरी.....!!
लेखनविषय:

वाचने 1412
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मनाचा शोध मनानी घ्यावा ईतरास सांगावा आत्मरूपी गमे हे त्यास सज्जन मनाचा मुळचाच जोही नसे पापी

अप्रतीम.. खूप आवडले. :) प्रतिसाद देण्यास भाग पाडणारी रचना! येऊ देत अजून! :) राघव