Skip to main content

परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"

लेखक विकास यांनी रविवार, 05/06/2011 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात अधिक लिहीता येईल. त्यांचे हेतू आणि त्यांच्या विरोधकांच्या आरोपाप्रमाणे असलेले अंतस्थ हेतू याबद्दल पण बरेच उलट सुलट बोलता येईल. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे बाबा रामदेव यांनी उपोषण करणार नाही असा काहीसा दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून काही निर्णय घेणे देखील समर्थनीय ठरू शकले असते. पण मात्र जे आंदोलन पूर्णपणे शांततेने चालले होते, जे आंदोलक आणि त्यांचा नेता (बाबा रामदेव) हे कुठल्याही हिंसेची भाषा करत नव्हते त्यांना अपरात्री उठवून हद्दपार करून, एनडीटीव्हीवर पाहीले त्याप्रमाणे रामदेवबाबांवर नाही पण आंदोलकांवर लाठीहल्ला करत हे आंदोलन उध्वस्त करून सरकारने आपण घाबरलो आहोत हे मान्य केले आहे का? अनेक बायकांनी तक्रारी केल्या आहेत एका वृद्धाला स्टेजवरून ढकलून दिलेले दाखवले आहे. बरोबर का चूक, कसे केले तो मुद्दा सोडला तरी ज्या सरकारने अण्णा हजार्‍यांचे आंदोलन संयमाने "मॅनेज" केले त्यांचा इतका तोल कसा काय ढळा? सरकारला खरेच याचे परीणाम कळत नाहीत का? कधीकाळी निरंजकूश सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी केले, नंतर जयप्रकाशजींच्या विरोधात इंदीरा गांधींनी केले आणि आता हे सरकार तेच करत आहे असे वाटते. हा एका अर्थी टिपिंग पॉईंट ठरू शकतो आणि आधीच नाडल्या गेलेल्या भारतीयांकडून भारताचे इजिप्त होऊ शकते. फरक इतकाच की आपल्याकडे लोकशाही आहे, तिलाच धक्का लागू शकण्याची भिती आहे. हा प्रश्न रामदेव बाबांचा नाही की सरकार टिकेल का नाही, हा नाही, तर देशाच्या व्यवस्थेचा आहे. दोष आंदोलकांचा नसून सरकारचा आहे आणि त्यात कायद्यापेक्षा राजकीय चूक अधिक आहे...

वाचने 23133
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

In reply to by छोटा डॉन

>>ओके, तुमच्या मताचा आदर ठेऊन असे सांगतो धन्यवाद.
की मला ( काही पक्षी आम्हाला ) १०० भ्रष्टाचारी राजकारणी परवडले पण उगाच असले अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन स्वतःच्या विचित्र आणि अचाट संकल्पनांपायी (टोटल विदेशी बंदी) देशाच्या प्रगतीत बिब्बा घालणारे व काही अंशी देशाला पुन्हा अ-विकसित अवस्थेकडे न्हेणारे बाबा/काका/आण्णा/मामा/ताई वगैरे लोक नको आहेत असे सांगतो.
सहमती आहेच. मुळात त्यांनी हुकुमशहागिरी केली आहे किंवा तयारी आहे असं आहे का? ते जरी लाख म्हणाले, तरी आजची अर्थव्यवस्था त्यांचा अट्टाहास सामावून घेऊ शकते का? तर नाही. पण मग, ह्याचा अर्थ असा काढायचा का की, अमुक एक मुद्दा चुकीचा आहे किंवा अमुक इतके मुद्दे चुकीचे आहेत म्हणून ह्या व्यक्तीची प्रत्येकच गोष्ट चुकीची आहे असा सरळसोट ग्रह करुन घ्यायचा' ? जे मुद्दे चूक आहेत त्याकडे लक्षही देण्याची गरज नाहीच. पण, जे बरोबर आहेत तेही कचर्‍यातच जमा केले जावेत का? प्रगतीला एव्हढी मोठी खीळ घालणारा कोणीही फार काळ टिकू शकणार नाही हे सांगण्यासाठी कोणाही विश्लेषकाची गरज नाही. आजचा काळ हा पन्नास-शंभर वर्षापुर्वीच्या व्यक्तीपूजेच्या काळापेक्षा फार निराळा आहे. आपलीच कुचंबणा होते आहे हे कळालं की सगळे समर्थक दूर जाण्याला जास्त वेळ लागत नाही. तरीही जर कोणाशी अशी भावना असेल की, केवळ रामदेवबाबा किंवा तत्सम प्रभृती आपल्या सामाजिक ताकदीचा वापर अशा रितीने देश आणि देशाची व्यवस्था हाती घेण्यात यशस्वी होतील तर समस्त मुरब्बी राजकारण्यांची कीव करावीशी वाटते. >>हे लोक तर नकोच नको पण ह्यांची उगाच मिडिया मॅनेज करुन चमकोगिरी करणारी आंदोलने नको असेही सांगतो. ह्या भानगडी अमेरिकन मिडियाकडून उचलून इथे राबवल्या कोणी ह्याचा शोध घ्या. जर ते चालतं तर हे का नाही? :)
सरकारने विकासाकडे पहावे की असल्या उपटसुंभ मागण्या करत जमाव जमवुन त्यायोगे सरकारला 'ब्लॅकमेल' करत हिंडणार्‍या महाभागांच्या नाकदुर्‍या काढत हिंडावे ?
  • देशातील काळा पैसा आर्थिक घडीच्या मुख्यप्रवाहात आणावा,
  • परदेशात दडवलेला काळा पैसा भारतात परत आणावा आणि प्रवाहात आणावा.
  • (टोकाची भूमिका सोडल्यास काही अंशी, ) देशी उद्योगधंद्यांना बाजारपेठ मिळावी, ज्यायोगे देशातील पैसा देशात खेळता राहील...
ह्यापैकी कोणती मागणी सरकारला देशातील परिस्थितीचा विकास करण्यात आडकाठी करणारी आहे ते मला तरी कळालेलंच नाही. जाता जाता: राजकिय हेतू काही का असेना, महिन्या दिड महिन्याच्या फरकानं झालेल्या दोन आंदोलनांबाबतच्या सरकारच्या धोरणांमधील जमीन आस्मानाच्या फरकाबद्दल कोणालाच आश्चर्य वाटलेलं दिसत नाही काय?

In reply to by धमाल मुलगा

जाता जाता: राजकिय हेतू काही का असेना, महिन्या दिड महिन्याच्या फरकानं झालेल्या दोन आंदोलनांबाबतच्या सरकारच्या धोरणांमधील जमीन आस्मानाच्या फरकाबद्दल कोणालाच आश्चर्य वाटलेलं दिसत नाही काय? प्रिय धमालराव कोळसे-पाटलांचे अभिनंदन! अत्यंत योग्य आणि महत्वाचा मुद्दा उपस्थित केल्या बद्दल.... घटनाक्रमः १) अण्णांचे उपोषण : जनमानसात प्रसिध्धी, लोकांचा पठिंबा, सरकार (झक मारत) बॅक फूट वर.... २) अण्णा - बाबा बेबनाव : अण्णा रामदेवबाबा यांच्यात काहि कारणाने मतभेद.... ३) सरकारने (अगोदर मान्य करुन नंतर) अण्णांचे काही मुद्दे फेटाळले, अण्णा परत देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत... ४) बाबांचे वेगळे आंदोलन..... ५) सरकारने आंदोलन चिरडले.... यातून घडलेल्या गोष्टी : (माझ्या टाळक्या नुसार) १) अण्णांचे सुपरस्टारपद एकारात्रीत बाबांकडे.... २) जनतेचे लक्ष लोकपाल विधेयकावरुन उडून बाबांच्या अत्ताच्या अवस्थेवर आणि पुढच्या हालचालींवर... सरकारला दिलासा.... ३) बाबा एका रात्रीत देशाचे (मिडिया थ्रु) हिरो..... पर्फेक्ट विन्-विन सिचुएशन... सरकारला पण आणि बाबांना पण.... धमालराव कोळसे-पाटलांचा विजय असो!!!

In reply to by सुहास..

निवडणुकांचे टायमिंग ?? प्रश्नच नाही! या प्रकारामुळे रामदेवबाबांना जनतेची प्रचंड सहानुभुती मिळतेय.... ही एन्कॅश करण्यासाठी बाबा राजकारणात उतरले तर ' भगव्या कपड्यातला' बाबा भाजप आघाडाचीच मते खाणार आणि त्याचा काँग्रेसला फायदा होणार हे शेंबड पोरग सुद्धा सांगेल.... बाबांनी भाजप बरोबर युती करू नये व स्वतंत्र जागा लढवाव्यात हे मॅनेज करायला सुबोधकांत सहाय्य करतीलच....

In reply to by आंबोळी

समस्त मुद्द्यांशी सहमत. अवांतरः ओ आंबोळी हजारे, मला का काँग्रेसमध्ये ढकलताय? आँ? ;)

In reply to by छोटा डॉन

बाबा/काका/आण्णा/मामा/ताई वगैरे लोक नको आहेत असे सांगतो. ए राजा, शरद, सुरेश, अजित, विलास, अशोक, आदर्श मधील सर्व ....(सगळ्या मान्यवरांची नावे घेतलि तर प्रतिसाद खुप मोठा होईल) हे लोक देशाला खुप प्रगतीपथावर नेतील असे वाटते का ?

In reply to by छोटा डॉन

सरकारने विकासाकडे पहावे की असल्या उपटसुंभ मागण्या करत जमाव जमवुन त्यायोगे सरकारला 'ब्लॅकमेल' करत हिंडणार्‍या महाभागांच्या नाकदुर्‍या काढत हिंडावे ?>> सरकार कुठला विकास करतेय? कोणाचा विकास करतेय? देशाचा? सामान्य जनतेचा? स्वत:चा ? की स्वतःच्या राजकीय पक्षाचा?? यावर आणखी जास्त आणि मुद्देसुद वाचायला आवडेल...

In reply to by धमाल मुलगा

उद्या जर "विकास" या आयडी ने भिमसेनांच्या गाण्यावरून एखादा लेख लिहीला तरी पब्लीकला त्यात हिडन अजेंडा वाटू शकेल. ;) असो. केवळ गंमत म्हणून असे लिहीले आहे, कुणाचीही थट्टा करायचा हिडन अजेंडा यात नाही.:-) इतकेच म्हणायचे आहे की आपल्याला भ्रष्टाचाराची आणि तो करणार्‍या भ्रष्टाचार्‍यांची इतकी सवय झाली आहे की कोणिही काही चांगले काम करत असेल तर त्यातही काहीतरी लफड असणार असेच बघायची नकळत सवय लागलेली आहे. आज भ्रष्टाचाराने आपल्याला रसातळाला पोचवलेले आहे. पण, वास्तवातील (भ्रष्टाचाराच्या) भुतापेक्षा कल्पनेचे भूत नाचवले तर त्याचा खेळ जास्त रंगू शकतो... हे काही मी बाबा रामदेवांच्या बाजूने लिहीत नाही. उद्या त्यांचे लफडे बाहेर आले तर आहे ना कायदा आणि मेडीया लक्तरे वेशीवर टांगायला... पण आज, भ्रष्टाचाराच्या विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याला माझे समर्थन आहे. मग ते अण्णा, बाबा अथवा अगदी जामा मशिदीचे बुखारी असुंदेत अथवा अमीर खान असुंदेत. त्यांचा जर काही हिडन अजेंडा असेल तर त्याच्याकडे नक्कीच नंतर बघता येईल. आणि तसे देखील आपले पब्लीक लई इरसाल आहे. उगाच कुणाच्या मागे जास्त काळ रहात नाही, सगळे "पळभरच" असतय...

In reply to by विकास

>>पण आज, भ्रष्टाचाराच्या विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याला माझे समर्थन आहे. आंदोलन करणे म्हणजे आत्ताच्या आत्ता अमूक करा अश्या मागण्या करणे नव्हे. भ्रष्टाचारी व्यक्तीला फाशी द्या असा वटहुकूम काढला तर भ्रष्टाचार नाहीसा/बराच कमी/थोडा कमी/किंचित कमी होईल असा भ्रम रामदेवबाबा किंवा कोणाला का होतो आहे? भ्रष्टाचार्‍याला फाशी द्यायला भ्रष्टाचार सिद्ध होणे ही प्रीकंडिशन असावी आणि तो अधिक मोठा प्रश्न आहे. त्यासाठी लोकपाल विधेयकावर अगोदरच काम चालू आहे. स्विस बँकेतला पैसा राष्ट्रीय संपत्ती घोषीत करा.... केली. त्याने काय होणार आहे? ती तुमच्याकडे कशी येणार? स्विस बँकेतला पैसा देशात परत आणा. तो (बाबांचे उपोषण चालू असण्याच्या काळात) कसा आणायचा याबाबत रामदेव यांनी काही मार्गदर्शन केले आहे का? (म्हणजे तो पैसा देशात परत येईपर्यंत बाबा उपोषण सोडणार नव्हते असे गृहीत धरले आहे). अवांतर: बाबांच्या जिवाला धोका होता हे पोलीसांचे म्हणणे काही बाबासमर्थक म्हणून आसपास वावरणार्‍या अतिरेक्यांच्या तेथील वावरावरून खरे असावे असे वाटू लागले आहे. म्हणजे बाबांना अपाय करून त्याचे खापर इतरत्र फोडले जावे असा हेतू असावा. अतिअवांतर : सरकारने बाबांच्या म्हणण्याप्रमाणे भ्रष्टाचार्‍यांना (म्हणजे नक्की कोणाला हा प्रश्न बाजूला ठेवू) फाशी देण्याचा वटहुकूम काढला तर ते लोकपाल विधेयकाची जी प्रोसेस चालू आहे तिला बायपास केल्यासारखे होईल का?

In reply to by नितिन थत्ते

बाबांच्या मागण्या आणि त्यातील फीजिबिलिटी यावर वेगळा धागा असल्यास चांगले होईल. कारण तो विषय चर्चिलाच जात नाहीये या मुख्य नाट्यमय प्रसंगमालिकेमुळे. मला वाटते उद्देश चांगला आहे पण मागण्या अव्यवहार्य आहेत. (मागण्यांचा गाभा सदहेतूने प्रेरित आहे पण प्रेझेंटेशन आणि मुदती / पद्धती अशक्य कोटीतल्या अतिरेकी वाटतात.. हाय होप्स टाईप.) पण तेवढ्याने त्यांच्या मूळ उद्देशाविषयीच शंका घेऊन त्याला विरोध करणं चुकीचं वाटतं.

In reply to by नितिन थत्ते

अवांतर: बाबांच्या जिवाला धोका होता हे पोलीसांचे म्हणणे काही बाबासमर्थक म्हणून आसपास वावरणार्‍या अतिरेक्यांच्या तेथील वावरावरून खरे असावे असे वाटू लागले आहे. म्हणजे बाबांना अपाय करून त्याचे खापर इतरत्र फोडले जावे असा हेतू असावा.
नक्की कोण हो ? आम्ही अगदी डोळे फाडु फाडुन पाहिले पण त्यात आम्हाला एकही अतिरेकी दिसला नाही. बाकी बाबांना अपाय होण्याची शक्यता होती असे बाबा म्हणतात, खरे असावे, एकदा का प्रसिद्धीचा मोह चढला की काहीही भास होऊ लागतात व कुणीही शत्रु वाटु लागतो असे आम्हाला वाटते.
अतिअवांतर : सरकारने बाबांच्या म्हणण्याप्रमाणे भ्रष्टाचार्‍यांना (म्हणजे नक्की कोणाला हा प्रश्न बाजूला ठेवू) फाशी देण्याचा वटहुकूम काढला तर ते लोकपाल विधेयकाची जी प्रोसेस चालू आहे तिला बायपास केल्यासारखे होईल का?
ओ थत्तेचाचा, आण्णांचा अनुभव २ वर्षे आणि बाबांचा २० वर्षे असे खुद्द त्यांनी ( व नंतर मी मिपावर ) सांगितले आहे ना, मग शिनियर कोण ? कुनाचे ऐकायचे मग ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

एकदा का प्रसिद्धीचा मोह चढला की काहीही भास होऊ लागतात व कुणीही शत्रु वाटु लागतो असे आम्हाला वाटते सहमत आहे... पण या प्रकरणात मला तरी बाबांची आणि सरकारची भुमिका ही ' तु मारल्या सारखे कर मि रडल्यासारखे करतो' अशीच वाटते.... अण्णांच्या लोकपाल वरुन लोकांचे लक्ष उडवण्यासाठी.... सुबोधकांतांची मैत्री कामी आली बहुतेक....

In reply to by नितिन थत्ते

आंदोलन करणे म्हणजे आत्ताच्या आत्ता अमूक करा अश्या मागण्या करणे नव्हे गांधिजींनी "चले जाव" चे आंदोलन केले तेंव्हा त्यांना , ब्रिटीशांनी माघारी जाण्याची प्रक्रीया लगेच चालु करावी हेच अभिप्रेत होते . कोणतीही समीती नेमुन वेळकाढु पणा करणे हे नक्कीच नको होते

In reply to by विकास

उद्या जर "विकास" या आयडी ने भिमसेनांच्या गाण्यावरून एखादा लेख लिहीला तरी पब्लीकला त्यात हिडन अजेंडा वाटू शकेल हो मग आम्ही तुमच्या गाण्यातल्या (बालिश) जाणकारी बद्द्ल संशय व्यक्त करून तुम्ही पब्लिकला गोंधळात टाक आहात असे लिहू. :) -पुपेकेश ह.घ्या.हे.वे.सां. न.ल.

In reply to by विकास

हिडन अजेंडा नक्की वाटु शकेल (कुठला चष्मा चढवलाय त्यावर अवलंबुन आहे) कदाचित या धाग्यावर कुठल्या स्पेसिफिक आयडींकडुन प्रतिसाद आले तर तो कम्युनलही वाटु शकेल. आणि तसेही या धाग्यावर ५० पेक्षा जास्त प्रतिसाद आल्याने काही गडबड करण्याचा हेतु होता का ही शंकाही मनात येईल. रॉ ला विचारुन कोणि हिंदु अतिरेकी प्रतिसाद देत असेल तर धाग्याची उचलबांगडी ही करता येईल. ;-) चेतन अवांतरः अशी थातुरमातुर कारणे देउन बहुतेक प्रत्येक सभेला विरोध करता यावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

छान करमणुक झाली काही प्रतिसाद वाचुन ;) वृती आणि प्रवृत्ती चा घोळ घालण्यात विचारवंताना यश आले आहे असे वाटुन गेले , बाकी वाद होणार होता याची खात्री होतीच. कारण हल्ली काय बोलतो आहे या पेक्षा कोण बोलतो आहे याला विचारवंत नेहमीच जास्त महत्त्व देतात.(सौजन्य : पका काका ) असो ! आय डेफिनेटली सपोर्ट बाबा रामदेव ! किमान त्याने उपोषणाला बसण्याची , त्यानंतर सरकार शी बोलण्याची, अटकेत मार खाण्याची , त्याला प्रतिकार करण्याची, स्त्री वेषात पोलीसांना भुल देण्याची, मिडीया समोर बोलण्याची हिम्मत तरी दाखविली. तिथे जो पोलीस गेला तो देशातल्या सगळ्यात सुपरपावर्ड इसमाकडुन ऑर्डर्स घेवुन गेला होत. तो तिथे उपोषणाला बसणार नाही हे निश्चितच ! पण जे उपोषणाला बसले आणि ज्या हेतुने बसले होते त्यांना मात्र काही ही पावर नव्हत्या , किती ही काही ही बोलले तर तो अत्याचारच ! बाकी राहिली हिडन अ‍ॅजेडाची गोष्ट ! वर्षानुवर्षे एकच प्रश्नाच घोंगड भिजत ठेवले यात कोणाला काही हिडन एजेंडा कसा दिसत नाही ? मुळात स्विस बँकेत (आणि नंतर इतर परदेशी बँकेत) पैसा ठेवण्याची सुरुवात कोणी केली ? या प्रश्नाचे बोफोर्स रुपी उत्तर बाहेर येणार होते का ? त्यानंतर सरकार पक्षातल्या कोणा-कोणाचे (काय युवराज का काय ते ? ) बाल्यावस्थेत असणारे कोमल करियर संपणार होते का ? छ्या ! पण नकोच ते प्रश्न , नकोच ! म्हणुन अगदी हेच म्हणतो ! कोण रामदेवबाबा ?

In reply to by सुहास..

>>मुळात स्विस बँकेत (आणि नंतर इतर परदेशी बँकेत) पैसा ठेवण्याची सुरुवात कोणी केली ? या प्रश्नाचे बोफोर्स रुपी उत्तर बाहेर येणार होते का ? आँ? म्हणजे स्विस बँकेत पैसे ठेवण्याची सुरुवात बोफोर्सच्या वेळी झाली? आम्हीतर ब्वॉ आणिबाणीच्या काळापासून स्विस बँकेत पैसे ठेवले असल्याचे ऐकत आलो.

पोलिसांची कार्यवाही दुर्दैवी पण, कार्यवाहीशिवाय पर्याय नव्हता- इति पंतप्रधान. सलवार कपडे घालून बाबा पळून गेले. अहिंसेची पुजारी आणि स्वांतत्र्यसैनिक असे कुठे पळून जात असतात काय. आम्ही बाबांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या पण बाबांनी दिलेले वचन पाळले नाही. काँग्रेसचे द्विवेदीवर चप्पल फेकून मारली यामागे भाजप, आरएसएस वगैरे आणि इतर कारणामूळे मूळ आंदोलनातील सर्व मुद्दे आपोआप दूर राहीले आहेत. आपण शांतपणे आहे ते स्वीकारण्यास तयार राहीले पाहिजे मागच्या पानावरुन पुढे. देशाचा कारभार अगदी व्यवस्थित चालू आहे.:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंतप्रधान बोल्ले न्हवं? मग झालं तर. देशाचा कारभार वेवस्तित चालू है! उगं कुनी आरडू नगा. खोटंनाटं कांगावा करु नगा. यु.पी.ए., एन.डी.ए., आन्खी कोन कोन ए टू झ्येड....ऐका.. "आऽऽऽऽल इज वेऽऽऽऽल" ! जन्ता जनार्दना, आता झोपा कांबरुनात गुरगटून.

In reply to by धमाल मुलगा

आमच्या धम्याचं मोठेपण ते हेच. पंतप्रधान बोलताच त्याला "आऽऽऽऽल इज वेऽऽऽऽल" हे कळलं. मग तो तसा संदेश लगेच देऊ लागला. तेव्हा मंडळी... ;)

In reply to by श्रावण मोडक

काल दिसभर तुमी नव्हता चावडीत, मंग म्हनलं बगावं वाईच खुर्चीत बसून कसं वाट्टंय. मज्जाय हौ तुमच्या खुर्चीत. -धम्या तराळ. :D

In reply to by धमाल मुलगा

>>>जन्ता जनार्दना, आता झोपा कांबरुनात गुरगटून. होय मालक..

In reply to by प्रशांत

>>>>>जन्ता जनार्दना, आता झोपा कांबरुनात गुरगटून. जी मालक. - आनंद

काय पेटलंय एकेक पब्लिक :) इथे कोणी पेड लेखक नसल्यामुळे सगळी माहिती अंत:करणातुन आली असावी ह्यावर विश्वास आहे . तरीही .. श्री थत्ते यांचे काँग्रेसकृती वर मत ऐकण्यास उस्तुक :) बाबा कामदेव

सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणाचा गांभिर्याने विचार करत syo moto (स्वदखल) नोटीस केंद्रावर बजावली आहे...

In reply to by विकास

या वर अर्थातच सरकारचं उत्तर हे नेहमीच्या पठडीतलं राहणार. जसे की, १) बाबा रामदेव यांच्या जिवाला धोका होता अतिरेक्यां पासून २) मैदानावर मोठ्या प्रमाणावर जनता जमली होती त्या मुळे लॉ एन्ड ऑर्डर ची समस्या निर्माण होणार होती. ३) बाबा रामदेव हे त्यांच्या समर्थंकासह हिंसक आदोलन करणार होते. ४) मोठ्या प्रमाणावर जनता जमलेली असल्या मुळे अतिरेकी हल्ला होउन जिवहानी होण्याची शक्यता होती. वगैरे कारणांमुळे ही पोलीसी कारवाई करावी लागली. आता सरकारच्या वरील संभाव्य उत्तरांना प्रश्न, जसे की, १) बाबा रामदेव यांच्या जिवाला धोका आहे हे ५ तारखेलाच कळलं का? या आधी धोका नव्हता का? २) मैदानावर या पुर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनता जमलेली आहे आणी भविष्यात सुद्धा जमणार मग प्रत्येक वेळेस ह्याच प्रकारची पोलीसी दडपशाहीची कारवाई केली जाणार का? जेव्हा राजस्थानात गुज्जर लाखो च्या संख्येनी महामार्गावर जमा होतात, महामार्ग बंद करतात, रेल्वे लाइनवर बसून रेल्वे गाड्या बंद पाडतात तेव्हा लॉ एन्ड ऑर्डर ची समस्या निर्माण होत नाही का? तेव्हा त्यांना पांगवण्याकरीता अश्रूगोळ्यांचा/लाठ्यांचा वापर का केला जात नाही?? हेच हरयाणातील जाटांच्या आंदोलनाबाबत. ३) हा तर्क या पुढे प्रत्येक आंदोलनाबाबत, सरकार विरोधातील आंदोलनाबाबत लावण्यात येणार का? ४) पुढील निवडणूकीच्या वेळीस जेव्हा या सरकारातील नेत्यांच्या प्रचारसभेत लाखोंची गर्दी झाल्यास हिच अतिरेक्यांच्या हल्याची आणि जिवीत हानीची भितीची कारणे पुढे करून प्रचार सभेवर पोलीसांतर्फे लाठीमार/अश्रुगोळे फेकून जमावाला पांगवण्यात येणार का?? हा देश आणि या देशातील जनता तशीही असुरक्षीत आहे. इथे केव्हाही कुठेही बॉम्ब स्फोट होत आहेत, अतिरेकी केव्हाही लोकांना गोळ्या घालत आहेत अश्या परिस्थीत या सरकारचा वरील तर्क मान्य करायचा झाल्यास, या देशात कुठेही लोकांना जमा होण्यास, गर्दी करण्यास, सभा घेण्यास (निवडणूकीची सुद्धा) मनाई करण्यात यावी आणि कायम स्वरूपी संपुर्ण देशात धारा १४४ लावण्यात यावी. आणि अश्या परिस्थीती बद्दल म्हणावं की सगळं कंट्रोल मधे आहे आणि भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे!!!!

In reply to by समंजस

प्रतिसादाशी सहमत... "बाबा रामदेव यांच्या जिवाला धोका होता अतिरेक्यां पासून म्हणून मध्यरात्री पोलीस अ‍ॅक्शन अमलात आणली" या बचावात्मक मुद्यावरून कधीकाळी एका दाक्षिणात्याने सांगितलेला मुद्दा आठवला: त्याच्या म्हणण्याप्रमाणे दक्षिणेत काहीजण रावणाला व्हिलन मानत नाहीत. वास्तवीक सीता त्याची मुलगी होती म्हणून तो तीला माहेरपणाला घेऊन जात होता! :-)

In reply to by विकास

सुप्रीम कोर्टाने ही जी स्वदखल घेतली तीही थोडी इण्टरेस्टिंग आहे. याच कोर्टातले जनहितयाचिकाफेम वकील अनील अग्रवाल यांची एक याचिका आज सुप्रीम कोर्टात सुनावणीला येणार होती. न्यायमूर्ती चौहान आणि स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठापुढे. अग्रवालांनी नेहमीप्रमाणे आधी प्रसिद्धीचा खुळखुळा वाजवला होता. त्यामुळं काल मध्यरात्रीच्या लाठीहल्ल्याविषयीच्या याचिकेचे तपशीलही आज सकाळीच वृत्तसंकेतस्थळांवर झळकले होते. इतके की, त्यात सुप्रीम कोर्टात केव्हा सुनावणी होणार याचीही माहिती देण्यात आली होती. न्यायमूर्तींपुढे ही याचिका सुनावणीला आली तेव्हा त्यांनी या पूर्वप्रसिद्धीविषयी आश्चर्य व्यक्त केले (जणू कोर्टात येणाऱ्या याचिका गुप्तच असतात). मग त्यांनी ती याचिका दाखल करून घेण्याचा कल दाखवला नाही. तर स्वतः नोटीस काढली, असे दिसते. या नोटीशीला तीन आठवड्यांची मुदत आहे. पाहू काय होते ते...

४ तारखेला म्हणे त्या मंडपात कोणीतरी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तिला फारशी काही इजा झाली नाही. पण झाली असती किंवा इतर लोकांनीही असं काही करायला सुरूवात केली असती तर दंगे पेटले असते असं टिव्हीवर एकजण ( पहिला काँग्रेसचा प्रतिनिधी ज्यानं निवेदन दिलं) म्हटले..., असं सगळं वेळीच आटोक्यात आणण्यासाठी पोलिस कारवाइ करण्यात आली. पण ही आत्मदहनाच्या प्रयत्न करण्याची बातमी काही सापडत नाहीये आता बाबांचे पट्टशिष्य आचार्य बाळ्कृष्ण काल पहाटेपासून बेपत्ता आहेत, यांनीच सरकार बरोबर सगळ्या वाटाघाटी केल्या होत्या. आता ते एक सरावलेले नेपाळी गुंड आहेत अशा बातम्या येतायत :)

परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?">> या सरकारच्या कार्यकाळात हे असे म्हणण्याची वेळ बरेचदा सामान्य जनतेवर आलेली आहे, आता खरे तर हेच विचारण्याची वेळ आली आहे की, "सरकारला डोके तरी आहे का?"

..

एक खुप सोप्पा उपाय आहे. सरकारनी एक समीती नेमावि, तिच्याकडुन सगळ्या भारतीयान्ना एका कार्डात (जसे ते आधार कार्ड वगेरे दिले जात आहे त्यात) 'तो मानुस प्रामानीक आहे का नाही (Yes/No)' याचि तपासनि करुन त्यात नोन्द करावी. जर तो मानुस प्रामानीक असेल तर त्याला आन्दोलन करता येइल, आन्दोलनात भाग घेता येईल आनि त्याहुन महत्वाचे त्यालाच मतदान करता येईल. जो प्रामानीक नसेल म्हंजे ज्याच्या कडे असे कार्ड नसेल तो अप्रामानीक समजला जाईल. त्याला आन्दोलन करता येनार नाही, त्यात भाग घेता येनार नाही. मतदानात करता येनार नाही.(नाहीतरि जो प्रामानीक नाही त्याला मतदानाचा हक्क तरी कशाला, नाही का ?) मंग सगळे प्रामानीक लोकंच आन्दोलन करतील, मतदान करतील. भारत एकदम सुखि होईल.

In reply to by नरेशकुमार

जो प्रामानीक नसेल म्हंजे ज्याच्या कडे असे कार्ड नसेल तो अप्रामानीक समजला जाईल. त्याला आन्दोलन करता येनार नाही, त्यात भाग घेता येनार नाही. मतदानात करता येनार नाही आणि त्या (अप्रामाणिकाला) फक्त निवडणूक लढवता येईल! ;)

बाबा॑चे मुद्दे व त्यानिउभे केलेले प्रश्न्न सर्वसामान्य जनतेस पट्णारे होते म्हणुनच येव्हड्या मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठि॑बा मिळाल्यचे पहिले. सरकारची पोलिसी कारवा‍ई नपट्णारीच होती. त्यासाठि सरकारचा धिक्कार विनित

असे बघा गवि, अण्णा म्हणा किंवा बाबा म्हणा मोठ्या धेंडाच्या मागे लागले आहेत कारण ते आकडे डोळे दिपवणारेच काय संवेदना बधीर करणारे आहेत. आकडा जेवढा मोठा तेवढे आंदोलन मोठे हवेच. आपल्यासारखे सामान्य लोक काळा पैसा तयार करत असतातच असे तुम्ही म्हणता हे ही मान्य. हे बंद झाले पाहिजे हे ही मान्य. पण आता काही मूळ मुद्दे लक्षात घ्या. ज्या लोकांविरुद्ध हे आंदोलन चालु आहे त्यांनी अनिष्ट मार्गाने प्रचंड काळा पैसा उभारला आहे. अर्थात त्यावर काहीही कर भरलेला नाही. हा काळा पैसा आला कुठुन तर २ मार्गांनी: १. सामान्य माणसाने भरलेल्या करातुन किंवा इतर प्रकारच्या करातुन या लोकांनी भ्रष्टाचार करुन स्वतःच्या तुंबड्या भरल्या किंवा २. सामान्य माणसाकडुन लाच स्वरुपात मिळवला. दोन्ही बाबतीत राजकारणी श्रीमंत झाले आणि प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरुपात सामान्य माणूस लुबाडला गेला म्हणजेच गरीब झाला. हा पडला प्रत्यक्ष मार. आता राजकारण्यांनी जो काळा पैसा जमवला त्यातुन फक्त तेच श्रीमंत झाले. देश कामासाठी पैसा कुठुन आणणार? मग काय झाले तर कर वाढले. प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कर वाढले ज्यातुन प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष फायदा सामान्य माणसाला फारसा काहीच नाही. कारण कर स्वरुपात गोळा होणारा पैसा त्या प्रमाणात समाजकार्यासाठी वापरलाच गेला नाही. हा पडला सामान्य माणसाला पहिला अप्रत्यक्ष मार. या सगळ्या लाचखोरीत कंत्राटे मिळवण्यासाठी व्यावसायिकांनी प्रचंड प्रमाणात लाच दिली. त्यांचा खर्च झाला. मग तो पैसा ते कुठुन मिळवणार? किंमती वाढवुन. म्हणजे महागाई वाढली. थोडक्यात जी गोष्ट क्ष रुपयांना मिळणे अपेक्षित होते तीच काही मुठव्हर लोकांना अमाप पैसा खाल्ला म्हणुन क्ष + य रुपयांना मिळायला लागली. हा पडला दुसरा अप्रत्यक्ष मार. थोडक्यात जे श्रम सामान्या माणूस करतो आणि त्यातुन जो मोबदला मिळतो त्यात ज्या प्रकारचे राहणीमान त्याला परवडले पाहिजे ते परवडत नाही. जर हा माणूस नौकरदार असेल तर त्याच्याकडे काहीच उपाय नसतो. कारण त्याला पैसे खाण्याच्या संधी नसतात (किमान खाजगी नौकरीत तरी नाही) आणि उत्पन्नावरील कर ही बुडवता येत नाही कारण तो पगारातुन परस्पर कापला जातो. मग तो पैसे वाचवतो अश्या छोट्या मोठ्या उद्योगातुन. त्यातुन फारसा फायदा होत नाही. पण त्याकडे लक्ष देण्याची फारशी कोणाला गरजही वाटत नाही कारण त्याकडे लक्ष देउन वेळ, पैसा आणि साधनसंपत्ती खर्च करावी एवढा तो जास्त नसतोच. वरच्या पातळीवरचा भयानक भ्रष्टाचार थंडावला की लोकांची ही जी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पिळवणुक चालली आहे ती आपोआप थांबेल. आज ज्या गोष्टीसाठी १० रुपये खर्च करायला लागत आहेत त्यासाठी ५ च रुपये खर्च करायला लागले की हा भ्र्ष्टाचार कमी होइलच. त्यामुळे त्यासाठी वेगळे आंदोलन करायची गरज नाही

In reply to by मृत्युन्जय

वरच्या पातळीवरचा भयानक भ्रष्टाचार थंडावला की लोकांची ही जी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पिळवणुक चालली आहे ती आपोआप थांबेल. आज ज्या गोष्टीसाठी १० रुपये खर्च करायला लागत आहेत त्यासाठी ५ च रुपये खर्च करायला लागले की हा भ्र्ष्टाचार कमी होइलच. त्यामुळे त्यासाठी वेगळे आंदोलन करायची गरज नाही योग्य लॉजिक. उत्तम विचार. एकदम मान्य.. आपण कर भरतो म्हणजे "लुटले" जातो आणि मोठी धेंडे सर्व चुकवून उजळ माथ्याने फिरतात ही सामान्यांची भावना सर्वाच्या मुळाशी आहे. आणि ती अशा मार्गाने जाईल असे तुम्हाला म्हणायचे आहे असे दिसते. आणि ते योग्य वाटते.

In reply to by मृत्युन्जय

माझे मत याच्या अगदी उलट आहे.लोकशाहीमध्ये भ्रष्टाचार वरून खाली झिरपत नाही.आपण सारेच भ्रष्ट आहोत म्हणून आपल्यातून आलेले आपले लोकप्रतिनिधीसुद्धा भ्रष्ट आहेत. जे आडात तेच पोहोर्‍यात."नागरिकांत कर्तव्यभावना जागृत असेल तर सरकारी बंधनांची आवश्यकता व कर देण्याचे महत्त्व लोकांच्या सहजी लक्षात येईल."(डॉ.माधव दातार-म.टा.७/६.-अवश्य वाचनीय) आपली सोसायटी एक अनिर्बंध आणि बेबंद अशी भटक्या,विमुक्त स्थितीतली सोसायटी आहे. सिविल लॉ न जुमानणे,आपल्या टोळी(जात)पंचायती भावकी यांनाच मानणे व घाबरून असणे या स्वरूपाचे ट्रायबल इंस्टिंक्ट्स अजूनही आपल्यात शिल्लक आहेत्.जपान,अमेरिका,फ्रांस इथे वरच्या पातळीवर खूप भ्रष्टाचार चालतो पण सामान्य माणसाला त्याची झळ पोचत नाही वा तो राज्यकर्त्यांचे अनुकरण करून भ्रष्टही वागत नाही.याचे कारण रनाय्सांस पासून पुढे ६००-७०० वर्षे तिथे आधुनिकीकरणाची आणि नागरिकीकरणाची(सिविलायझेशन म्हणावे का?)प्रक्रिया ट्रायल्-एरर पद्धतीने तावून सुलाखून निघून लोकांच्या अंगवळणी पडलेली आहे.आधुनिक संस्कृतीचे वेगळे कायदेकानून असतात,वेगळी स्वयंशिस्त असते हे आपल्या अजून गळी उतरलेले नाही.आपण मोकाट,अंदाधुंद वागतो,कुणी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला की चवताळून उठतो.आणि ही अनागोंदी आजकालची नव्हे,सुमारे एक हजार वर्षे ती चालू आहे. आधीच्या प्रतिसादांतील ग.विं चे म्हणणे बरेचसे पटते की विखुरलेला भ्रष्टाचार हा केंद्रित भ्रष्टाचारापेक्षा कितीतरी मोठा आणि हुडकून काढण्यास कठिण आहे. प्रतिसाद लांबतोय आणि थोडेसे अवांतर होतेय पण एक निरीक्षण नोंदवण्याचा मोह आवरत नाहीय. कच्छी किराणा विक्रेत्यांशी बोलण्याचा प्रसंग आला. ते लोक आपापल्या गावांत कशी प्रगती सुरू आहे,अडाणी उद्योग रिलायन्सला कसा मागे टाकीत आहे,मुंदरा बंदरामुळे स्थावर मालमत्ता व विकासकामांना कशी तेजी आली आहे,बिहारी मजुरांचे तांडे कसे गावात घुसत आहेत,जनजीवन असुरक्षित होते आहे,गावात मागे वृद्ध आणि बायकामुलेच कशी उरली आहेत,गावागावातून त्यांच्यासाठी वृद्धाश्रमांतून राहाण्याची आणि 'टिफ्फिन' चीही मोफत अथवा नाममात्र पैशात सोय कशी आहे वगैरे सांगत होते.मी विचारले,नि:शुल्क सेवा परवडते कशी? तर सर्वांना ठाऊक असलेलेच उत्तर मिळाले,'इथे गावागावातून एकदोन तरी अब्जाधीश अथवा श्रीमंत एनाराय असतात.ते पुष्कळसा खर्च उचलतात त्यांना ते जड नाही".आता गणित करावे,कच्छमध्ये किती खेडेगावे आणि किती अब्जाधीश? हा सर्व पैसा काळा नसणार हे खरे, पण तो संपूर्णपणे पांढराही नसणार हेही खरे. आणखीही मनोरंजक माहिती(आधीच माहीत असलेली) निघत होती, पण अवांतरामध्ये अवांतर नको. असो.

In reply to by पुष्करिणी

नक्कीच जमले तर तेथे मत मांडेन. (का नाही जमणार? जर इथे इतक्या पिंका टाकतोय तर तिथे एकच टाकायला काय हरकत आहे? ;) ) असो. तो पर्यंत कॉलींग सुधीर जी! :-)

रामदेव बाबांचे आंदोलन ज्या पद्धतीने मोडून काढले तशाच पद्धतीने टेल्को कामगारानी ( नायर) केलेले एक आंदोलन त्यावेळच्या मुख्यमंत्र्याच्या सहाय्याने असेच चिरडून काढण्यात आले होते. त्यावेळेस कोणीच निषेधाचे सुर काढले नाहीत.

In reply to by विजुभाऊ

जितके आठवत आहे त्याप्रमाणे, नायरची माणसे गुंडगिरी करत कुणाला कामाला जाउन देत नव्हती. सगळ्या कामगारांचा त्या संपाचा भाग होयची इच्छा नव्हती. त्या आधीच्या दत्ता सामंतांच्या गिरणीकामगार संपाच्या आठवणी ताज्या होत्या आणि त्यात देशोधडीला लागलेले कामगार आणि मुंबईतून उठलेल्या गिरण्यांसारखी पुण्यातल्या कामगारांची आणि टेल्कोची अवस्था व्हावी अशी कुणाचीच इच्छा नव्हती. परीणामी कामगार/कर्मचार्‍यांचा पाठींबा नसलेल्या गुंडगिरीस सरकार आणि एकत्रित कामगारांनी असफल केले. इथे एका सामाजीक मागणीसाठी उपोषण चालले होते. त्यात सहभागी असणारे काँग्रेसच्या सभांसारखे ट्रक्स आणि सरकारी बसेस भरून आणल्याचे कोणी लिहीलेले देखील नाही अथवा माध्यमांद्वारे ऐकीवातही आलेले नाही. त्यामुळे असली तुलना म्हणजे मूळ मुद्यास बगल देऊन दिशाभूल करणे आहे. म्हणूनच, वास्तवीक असा संदर्भ देऊन म्हणायचेच असेल तर टेल्को प्रमाणे तसेच इंदीरा गांधींनी जसा रेल्वे कामगार संप चिरडला तसाच गिरणीकामगार संप चिरडून गिरण्या चालू ठेवण्यास मदत का केली नाही हा आहे. ते न केल्याने मुंबईला सामान्य मराठी माणूस पारखा देखील झाला आणि त्यातूनच आधी नसलेले टोळीयुद्ध आणि अरूण गवळीसारखे अनेकजण तयार झाले... असो.

In reply to by विजुभाऊ

निषेधाचे सुर थोडे फार निघाले असतील परंतू मोठ्या प्रमाणावर निघाले नसतील तर त्याला काही कारणे असावीत जसे की, १) ते आंदोलन फक्त काहि मर्यादित लोकांच्या मागण्यांशी/हिताशी संबंधीत (म्हणजेच त्या कंपनीचे कर्मचारी आणि त्यांचे हित) असल्यामुळे इतर जनतेला त्या बद्दल विशेष काही वाटलं नसेल, परंतू इथे हे आंदोलन फक्त काही मर्यादित लोकांच्या हिताशी संबंधित न राहता देशातील जास्तीत जास्त नागरीकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे प्रभावित करणार्‍या समस्येशी होतं या मुळे ह्या आंदोलनाशी जास्तीत जास्त नागरीकांचा भावनिक संबंध होता त्या मुळेच ज्या पद्धतिने सरकारने हे आंदोलन चिरडले, ज्या नेत्यांचा वारसा हा पक्ष सांगत आला (महात्मा गांधी/नेहरू) आहे त्याच पक्षाने सत्तेच्या लोभापायी, सत्ता हातातून सुटणार या भितिपायी रात्रीच्या अंधारात पोलीसी कारवाई केली, लोकशाही मुल्ये तुडवीली, नागरीकांच्या मुलभूत अधिकारांवर हल्ला चढवला त्या मुळे निषेधाचे आणि संतापाचे सुर निघालेत. हिटलरने सुद्धा काहिश्या अश्याच पद्धतिने आपल्या निंदकांचा, विरोधकांचा काटा काढला, ज्यूंना वेगळे करून मारलं आणि नंतर विरोधी जर्मन नागरीकांना सुद्धा. सुरवातीला रशियाशी हात मिळवणूक केली आणि नंतर संधि मिळताच, वेळ येताच त्यांच्यावरही हल्ला केला. हुकूमशाहीची सुरवात ही अशीच असते. फूट पाडायची, समाजातील गट वेगवेगळे होतील, राहतील आणि एकमेकांना मदत करणार नाहीत ही काळजी घ्यायची आणि मग एक-एक करत सगळ्या विरोधकांना चिरडून काढायचं. हिटलरने हेच केलं, ब्रिटीशानी हेच केलं आणि हे राजकीय नेते सुद्धा हीच पद्धत अवलंबत आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी ह्या प्रकरणाचा निषेध केला हे बरंच झालं या देशातील संभाव्य हुकूमशाही आणखी काही काळ लांबली.

In reply to by विजुभाऊ

शनिवार वाडयावर आंदोलन केलं होतं. उपोषण वगैरे नसावं. मदन पाटील नामक तत्कालिन कोणी मंत्री व इतर लोकांवर अत्यंत इरसाल गाणी आणि घोषणा केल्या होत्या. दुसर्‍या का तिसर्‍या दिवशी पहाटे २-३ वाजता तुफान पोलिस दल आणून ५-६ वाजण्याच्या आत सगळ्यांना नाशिक / ठाणे ई. जेलमध्ये घेऊन गेले होते. राजन नायर तसा गुंडच होता. तेव्हा शनिवार वाड्याच्या अगदी समोर राहत असल्याने आणि पहाटे जोरदार गोंधळ माजल्याने जाग आली आणि सर्व प्रकार प्रत्यक्ष पहायला मिळाला होता. खरं तर रामलिला मैदानावरची सरकारची कृती पाहून जुन्या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली पण रामदेव या मनुष्याच्या उद्दिष्टाबद्दल खात्री नसली तरी अगदी राजन नायर सारख्या युनियन लिडर गुंडाबरोबर तुलना करणं योग्य वाटलं नाही म्हणून आत्ता पर्यंत संदर्भ दिला नव्हता. आणि त्यामुळेच तेव्हा फार मोठा गदारोळ झाला नव्हता. त्याच्या विरुद्ध बाजूच्या एका युनियनचे काही कामगार संपात सहभागी नव्हते. ज्या पद्धतीने कारवाई केली आणी रातोरात सगळ्यांना पुण्याबाहेर नेलं. त्यावर टीका झाली. पण २० वर्षापूर्वी मीडिया इतका स्ट्राँग नव्हता. आणि चॅनेलवरची ठोठो आरडा ओरड ही नव्हती. आता झालं असं तर सगळ मराठी चॅनेल्स - माझा तुझा, बाणा आणि ठाम मत तुफान फटकेबाजी करून प्रसिद्धि मिळवतील. ही घटना माहीत असलेले मिपाकर नसावेत असं वाटलं होतं. विजूभाउंनी जरा सरप्राईझ केलं.

या संपुर्ण घडामोडींदरम्यान (अण्णा हजारेंचं आंदोलन, आताचं बाबा रामदेव यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला चिरडण्याचा झालेला प्रयत्न आणि त्या नंतरच्या घडामोडी) एक गोष्ट जी बर्‍याच लोकांच्या नजरेतून सुटली परंतू ज्यांच्या लक्षात आली आणि त्या मुळे झालेला एक मोठा अपेक्षाभंग तो म्हणजे, देशाला समर्थ नेतृत्व देउ शकणारा, या देशाच्या प्रगतीला, राजकारणाला एक चांगली दिशा देउ शकणारा, एका जुन्या राजकीय पक्षाला मजबूत नेतृत्व देउ शकणारा, भविष्यात प्रधानमंत्रि होउ पाहणार्‍या ज्या व्यक्तीकडे देशातील एक मोठा भाग, एक मोठा समाज मोठ्या आशेने बघत होता ती व्यक्ती म्हणजे राहूल गांधी कुठेच दिसली नाही. अचानक हवेत गायब झाल्या सारखी ही व्यक्ती अदृष्य झाली म्हणजे जेव्हा कॉंग्रेस पक्षाला, कॉंग्रेस सरकारला सक्षम नेतृत्वाची, लढवय्या नेत्याची, समजूतदारपणा असलेली तसेच भान सुटलेल्या आणि जिभेवरचा ताबा सुटलेल्या, सत्तेचा नशा चढलेल्या, सत्ता हातातून जाणार ही भिती असलेल्या पक्षातील नेत्यांना आवरण्याची, सावरण्याची ताकद असलेला नेता हवा होता/आहे अश्या वेळेस ही व्यक्ती कुठेच समोर दिसत नाहिय आणि पराकोटीचा अहंकार असलेली, पक्षाला जनतेपासून दुर घेउन जाणारी, वास्तव्य स्विकारण्याची तयारी नसलेली नेते मंडळीच काय ती दिसत आहेत. काय ही व्यक्ती खरोखरच एका जुन्या राजकिय पक्षाला, या देशाला समर्थ नेतृत्त्व देउ शकणार?

In reply to by समंजस

उत्तर 'हो' असो किंवा 'नाही' , काय फरक पडतो? "युवराज" ना? वंशपरंपरेनं मुकुट चढणारच डोक्यावर. सिंपल.

In reply to by समंजस

राहुल गांधीला देशाचा नेता बनवण्यात काँग्रेसपेक्षा काँग्रेसच्या विरोधकांनाच जास्त विण्टरेष्ट दिसतो आहे. ;)

In reply to by नितिन थत्ते

राहुल गांधीला देशाचा नेता बनवण्यात म्हणजे राहुल गांधी देशाचे नेते नाहीत असे म्हणायचे आहे? अहो जो पक्ष स्वतःला १०० वर्षांपेक्षा जुना म्हणून क्लेम करतो त्या पक्षाचे ते विद्यमान जनरल सेक्रेटरी आहेत ना?

In reply to by नितिन थत्ते

शिका...लोकहो शिका... ह्याला म्हणतात निष्ठा!

In reply to by नितिन थत्ते

राहुल गांधीला देशाचा नेता बनवण्यात काँग्रेसपेक्षा काँग्रेसच्या विरोधकांनाच जास्त विण्टरेष्ट दिसतो आहे>> मी काँग्रेस पक्ष विरोधक नाही परंतू काँग्रेसी विचारांचा विरोधक नक्कीच आहे. राहुल गांधींना देशाचा नेता बनवण्यात किंवा नेता बनण्यात विण्टरेष्ट नाही असा काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता मला ठाउक नाही. आपणांस ठाउक असल्यास मला नाव/नावे जाणून घ्यायला आवडेल :) काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता हा देशाचा नेता असतोच (पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी आंदोलन चिरडण्यामागे जे कारण दिलं आहे ते बघता असे दिसून येतंय की या देशात फक्त काँग्रेस पक्षच सत्ताधारी राहू शकतो, सत्ता भोगू शकतो, सत्ता मिळवू शकतो इतर कोणीही तसा प्रयत्न केल्यास destabilising the Government त्यांना अश्या प्रकारे चिरडले जाणार). फक्त इथे प्रश्न आहे तो सामर्थ्याचा, क्षमतेचा आणि त्या बाबतीत राहूल गांधींपासून जास्त अपेक्षा आहेत. सिनेमातील हिरोच्या स्टंटबाजी सारखी स्टंटबाजी राहूल गांधींकडुन अपेक्षीत नाही जसे की लोकल मधून प्रवास करणे, अचानक पणे कुठेही निघून जाणे, एखाद्या गरिबाच्या घरी जाउन जेवण करणे, राहणे वगैरे. अपेक्षीत आहे ते अश्या प्रसंगी जेव्हा देशातील राजकीय/सामाजीक वातावरण ढवळून निघत असताना समोर येउन, जबाबदारी घेउन परिस्थीला सामोरे जाउन समस्येचं उत्तर शोधून सरकारला/पक्षाला योग्य मार्गदर्शन करावं जे सामान्य जनतेला उपयोगी ठरणार, देशाला उपयोगी ठरणार. देशात सत्ता कोण उपभोगतंय काँग्रेस पक्ष की भाजपा की समाजवादी की आणखी कोणी हे सामान्य जनतेला महत्त्वाचं नाही.

In reply to by समंजस

एकाने (रामदेव) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करायचा प्रयत्न केल्यावर आंदोलन चिरडले गेले तर दुसर्‍याने (राहुल) राज्यपातळीवर आंदोलन करायचा प्रयत्न केल्यावर आंदोलन चिरडले गेले. त्यामुळे मला खात्री आहे की राहुलजींना मनातून आणि मनापासून रामदेवबाबांबद्दल कणवच वाटत असणार. पण भले ते पार्टी जनरल सेक्रेटरी असतील, पण शेवटी पार्टी अ‍ॅड्वायजर म्हणून पण काही प्रकार असतोच ना! त्यांना वाटते तसेच बोलावे लागते.. :( बाकी राहुलजींची मायावतींनी उचलबांगडी केली तेंव्हा काँग्रेस काय म्हणाली ते बघितले पाहीजे. ;)

In reply to by विकास

त्यामुळे मला खात्री आहे की राहुलजींना मनातून आणि मनापासून रामदेवबाबांबद्दल कणवच वाटत असणार.. =)) =)) =)) विकासराव दंडवत स्विकार करावा --^--

त्यामुळे मला खात्री आहे की राहुलजींना मनातून आणि मनापासून रामदेवबाबांबद्दल कणवच वाटत असणार.. हे वाक्य अगदीच मनाला स्पर्श करुन गेले.