✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"

व
विकास यांनी
Sun, 06/05/2011 - 21:02  ·  लेख
लेख
बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात अधिक लिहीता येईल. त्यांचे हेतू आणि त्यांच्या विरोधकांच्या आरोपाप्रमाणे असलेले अंतस्थ हेतू याबद्दल पण बरेच उलट सुलट बोलता येईल. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे बाबा रामदेव यांनी उपोषण करणार नाही असा काहीसा दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून काही निर्णय घेणे देखील समर्थनीय ठरू शकले असते. पण मात्र जे आंदोलन पूर्णपणे शांततेने चालले होते, जे आंदोलक आणि त्यांचा नेता (बाबा रामदेव) हे कुठल्याही हिंसेची भाषा करत नव्हते त्यांना अपरात्री उठवून हद्दपार करून, एनडीटीव्हीवर पाहीले त्याप्रमाणे रामदेवबाबांवर नाही पण आंदोलकांवर लाठीहल्ला करत हे आंदोलन उध्वस्त करून सरकारने आपण घाबरलो आहोत हे मान्य केले आहे का? अनेक बायकांनी तक्रारी केल्या आहेत एका वृद्धाला स्टेजवरून ढकलून दिलेले दाखवले आहे. बरोबर का चूक, कसे केले तो मुद्दा सोडला तरी ज्या सरकारने अण्णा हजार्‍यांचे आंदोलन संयमाने "मॅनेज" केले त्यांचा इतका तोल कसा काय ढळा? सरकारला खरेच याचे परीणाम कळत नाहीत का? कधीकाळी निरंजकूश सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी केले, नंतर जयप्रकाशजींच्या विरोधात इंदीरा गांधींनी केले आणि आता हे सरकार तेच करत आहे असे वाटते. हा एका अर्थी टिपिंग पॉईंट ठरू शकतो आणि आधीच नाडल्या गेलेल्या भारतीयांकडून भारताचे इजिप्त होऊ शकते. फरक इतकाच की आपल्याकडे लोकशाही आहे, तिलाच धक्का लागू शकण्याची भिती आहे. हा प्रश्न रामदेव बाबांचा नाही की सरकार टिकेल का नाही, हा नाही, तर देशाच्या व्यवस्थेचा आहे. दोष आंदोलकांचा नसून सरकारचा आहे आणि त्यात कायद्यापेक्षा राजकीय चूक अधिक आहे...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22999 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

४ तारखेला म्हणे त्या मंडपात

पुष्करिणी
Tue, 06/07/2011 - 02:29 नवीन
४ तारखेला म्हणे त्या मंडपात कोणीतरी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तिला फारशी काही इजा झाली नाही. पण झाली असती किंवा इतर लोकांनीही असं काही करायला सुरूवात केली असती तर दंगे पेटले असते असं टिव्हीवर एकजण ( पहिला काँग्रेसचा प्रतिनिधी ज्यानं निवेदन दिलं) म्हटले..., असं सगळं वेळीच आटोक्यात आणण्यासाठी पोलिस कारवाइ करण्यात आली. पण ही आत्मदहनाच्या प्रयत्न करण्याची बातमी काही सापडत नाहीये आता बाबांचे पट्टशिष्य आचार्य बाळ्कृष्ण काल पहाटेपासून बेपत्ता आहेत, यांनीच सरकार बरोबर सगळ्या वाटाघाटी केल्या होत्या. आता ते एक सरावलेले नेपाळी गुंड आहेत अशा बातम्या येतायत :)
  • Log in or register to post comments

परत एकदा म्हणावे का

समंजस
Tue, 06/07/2011 - 13:54 नवीन
<<परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?">> या सरकारच्या कार्यकाळात हे असे म्हणण्याची वेळ बरेचदा सामान्य जनतेवर आलेली आहे, आता खरे तर हेच विचारण्याची वेळ आली आहे की, "सरकारला डोके तरी आहे का?"
  • Log in or register to post comments

..

समंजस
Tue, 06/07/2011 - 13:57 नवीन
..
  • Log in or register to post comments

एक खुप सोप्पा उपाय आहे.

नरेशकुमार
Tue, 06/07/2011 - 15:16 नवीन
एक खुप सोप्पा उपाय आहे. सरकारनी एक समीती नेमावि, तिच्याकडुन सगळ्या भारतीयान्ना एका कार्डात (जसे ते आधार कार्ड वगेरे दिले जात आहे त्यात) 'तो मानुस प्रामानीक आहे का नाही (Yes/No)' याचि तपासनि करुन त्यात नोन्द करावी. जर तो मानुस प्रामानीक असेल तर त्यालाच आन्दोलन करता येइल, आन्दोलनात भाग घेता येईल आनि त्याहुन महत्वाचे त्यालाच मतदान करता येईल. जो प्रामानीक नसेल म्हंजे ज्याच्या कडे असे कार्ड नसेल तो अप्रामानीक समजला जाईल. त्याला आन्दोलन करता येनार नाही, त्यात भाग घेता येनार नाही. मतदानात करता येनार नाही.(नाहीतरि जो प्रामानीक नाही त्याला मतदानाचा हक्क तरी कशाला, नाही का ?) मंग सगळे प्रामानीक लोकंच आन्दोलन करतील, मतदान करतील. भारत एकदम सुखि होईल.
  • Log in or register to post comments

त्याला फक्त

विकास
Tue, 06/07/2011 - 20:32 नवीन
जो प्रामानीक नसेल म्हंजे ज्याच्या कडे असे कार्ड नसेल तो अप्रामानीक समजला जाईल. त्याला आन्दोलन करता येनार नाही, त्यात भाग घेता येनार नाही. मतदानात करता येनार नाही आणि त्या (अप्रामाणिकाला) फक्त निवडणूक लढवता येईल! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

प्रामाणिकपणाचे

अन्या दातार
Wed, 06/08/2011 - 11:56 नवीन
सर्टीफिकेट दिल्लीत करुन मिळेल का गाव चावडीवर?? (आणि त्यासाठी खालून किती द्यावे लागतात??? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

बाबा॑चा मुद्दा.....

नारयन लेले
Tue, 06/07/2011 - 16:40 नवीन
बाबा॑चे मुद्दे व त्यानिउभे केलेले प्रश्न्न सर्वसामान्य जनतेस पट्णारे होते म्हणुनच येव्हड्या मोठ्या प्रमाणात जनतेचा पाठि॑बा मिळाल्यचे पहिले. सरकारची पोलिसी कारवा‍ई नपट्णारीच होती. त्यासाठि सरकारचा धिक्कार विनित
  • Log in or register to post comments

@ गवि

मृत्युन्जय
Wed, 06/08/2011 - 12:31 नवीन
असे बघा गवि, अण्णा म्हणा किंवा बाबा म्हणा मोठ्या धेंडाच्या मागे लागले आहेत कारण ते आकडे डोळे दिपवणारेच काय संवेदना बधीर करणारे आहेत. आकडा जेवढा मोठा तेवढे आंदोलन मोठे हवेच. आपल्यासारखे सामान्य लोक काळा पैसा तयार करत असतातच असे तुम्ही म्हणता हे ही मान्य. हे बंद झाले पाहिजे हे ही मान्य. पण आता काही मूळ मुद्दे लक्षात घ्या. ज्या लोकांविरुद्ध हे आंदोलन चालु आहे त्यांनी अनिष्ट मार्गाने प्रचंड काळा पैसा उभारला आहे. अर्थात त्यावर काहीही कर भरलेला नाही. हा काळा पैसा आला कुठुन तर २ मार्गांनी: १. सामान्य माणसाने भरलेल्या करातुन किंवा इतर प्रकारच्या करातुन या लोकांनी भ्रष्टाचार करुन स्वतःच्या तुंबड्या भरल्या किंवा २. सामान्य माणसाकडुन लाच स्वरुपात मिळवला. दोन्ही बाबतीत राजकारणी श्रीमंत झाले आणि प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरुपात सामान्य माणूस लुबाडला गेला म्हणजेच गरीब झाला. हा पडला प्रत्यक्ष मार. आता राजकारण्यांनी जो काळा पैसा जमवला त्यातुन फक्त तेच श्रीमंत झाले. देश कामासाठी पैसा कुठुन आणणार? मग काय झाले तर कर वाढले. प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कर वाढले ज्यातुन प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष फायदा सामान्य माणसाला फारसा काहीच नाही. कारण कर स्वरुपात गोळा होणारा पैसा त्या प्रमाणात समाजकार्यासाठी वापरलाच गेला नाही. हा पडला सामान्य माणसाला पहिला अप्रत्यक्ष मार. या सगळ्या लाचखोरीत कंत्राटे मिळवण्यासाठी व्यावसायिकांनी प्रचंड प्रमाणात लाच दिली. त्यांचा खर्च झाला. मग तो पैसा ते कुठुन मिळवणार? किंमती वाढवुन. म्हणजे महागाई वाढली. थोडक्यात जी गोष्ट क्ष रुपयांना मिळणे अपेक्षित होते तीच काही मुठव्हर लोकांना अमाप पैसा खाल्ला म्हणुन क्ष + य रुपयांना मिळायला लागली. हा पडला दुसरा अप्रत्यक्ष मार. थोडक्यात जे श्रम सामान्या माणूस करतो आणि त्यातुन जो मोबदला मिळतो त्यात ज्या प्रकारचे राहणीमान त्याला परवडले पाहिजे ते परवडत नाही. जर हा माणूस नौकरदार असेल तर त्याच्याकडे काहीच उपाय नसतो. कारण त्याला पैसे खाण्याच्या संधी नसतात (किमान खाजगी नौकरीत तरी नाही) आणि उत्पन्नावरील कर ही बुडवता येत नाही कारण तो पगारातुन परस्पर कापला जातो. मग तो पैसे वाचवतो अश्या छोट्या मोठ्या उद्योगातुन. त्यातुन फारसा फायदा होत नाही. पण त्याकडे लक्ष देण्याची फारशी कोणाला गरजही वाटत नाही कारण त्याकडे लक्ष देउन वेळ, पैसा आणि साधनसंपत्ती खर्च करावी एवढा तो जास्त नसतोच. वरच्या पातळीवरचा भयानक भ्रष्टाचार थंडावला की लोकांची ही जी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पिळवणुक चालली आहे ती आपोआप थांबेल. आज ज्या गोष्टीसाठी १० रुपये खर्च करायला लागत आहेत त्यासाठी ५ च रुपये खर्च करायला लागले की हा भ्र्ष्टाचार कमी होइलच. त्यामुळे त्यासाठी वेगळे आंदोलन करायची गरज नाही
  • Log in or register to post comments

वरच्या पातळीवरचा भयानक

गवि
Wed, 06/08/2011 - 12:53 नवीन
वरच्या पातळीवरचा भयानक भ्रष्टाचार थंडावला की लोकांची ही जी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पिळवणुक चालली आहे ती आपोआप थांबेल. आज ज्या गोष्टीसाठी १० रुपये खर्च करायला लागत आहेत त्यासाठी ५ च रुपये खर्च करायला लागले की हा भ्र्ष्टाचार कमी होइलच. त्यामुळे त्यासाठी वेगळे आंदोलन करायची गरज नाही योग्य लॉजिक. उत्तम विचार. एकदम मान्य.. आपण कर भरतो म्हणजे "लुटले" जातो आणि मोठी धेंडे सर्व चुकवून उजळ माथ्याने फिरतात ही सामान्यांची भावना सर्वाच्या मुळाशी आहे. आणि ती अशा मार्गाने जाईल असे तुम्हाला म्हणायचे आहे असे दिसते. आणि ते योग्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आडात नाही तर पोहोर्‍यात कुठून?

राही
Wed, 06/08/2011 - 15:01 नवीन
माझे मत याच्या अगदी उलट आहे.लोकशाहीमध्ये भ्रष्टाचार वरून खाली झिरपत नाही.आपण सारेच भ्रष्ट आहोत म्हणून आपल्यातून आलेले आपले लोकप्रतिनिधीसुद्धा भ्रष्ट आहेत. जे आडात तेच पोहोर्‍यात."नागरिकांत कर्तव्यभावना जागृत असेल तर सरकारी बंधनांची आवश्यकता व कर देण्याचे महत्त्व लोकांच्या सहजी लक्षात येईल."(डॉ.माधव दातार-म.टा.७/६.-अवश्य वाचनीय) आपली सोसायटी एक अनिर्बंध आणि बेबंद अशी भटक्या,विमुक्त स्थितीतली सोसायटी आहे. सिविल लॉ न जुमानणे,आपल्या टोळी(जात)पंचायती भावकी यांनाच मानणे व घाबरून असणे या स्वरूपाचे ट्रायबल इंस्टिंक्ट्स अजूनही आपल्यात शिल्लक आहेत्.जपान,अमेरिका,फ्रांस इथे वरच्या पातळीवर खूप भ्रष्टाचार चालतो पण सामान्य माणसाला त्याची झळ पोचत नाही वा तो राज्यकर्त्यांचे अनुकरण करून भ्रष्टही वागत नाही.याचे कारण रनाय्सांस पासून पुढे ६००-७०० वर्षे तिथे आधुनिकीकरणाची आणि नागरिकीकरणाची(सिविलायझेशन म्हणावे का?)प्रक्रिया ट्रायल्-एरर पद्धतीने तावून सुलाखून निघून लोकांच्या अंगवळणी पडलेली आहे.आधुनिक संस्कृतीचे वेगळे कायदेकानून असतात,वेगळी स्वयंशिस्त असते हे आपल्या अजून गळी उतरलेले नाही.आपण मोकाट,अंदाधुंद वागतो,कुणी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला की चवताळून उठतो.आणि ही अनागोंदी आजकालची नव्हे,सुमारे एक हजार वर्षे ती चालू आहे. आधीच्या प्रतिसादांतील ग.विं चे म्हणणे बरेचसे पटते की विखुरलेला भ्रष्टाचार हा केंद्रित भ्रष्टाचारापेक्षा कितीतरी मोठा आणि हुडकून काढण्यास कठिण आहे. प्रतिसाद लांबतोय आणि थोडेसे अवांतर होतेय पण एक निरीक्षण नोंदवण्याचा मोह आवरत नाहीय. कच्छी किराणा विक्रेत्यांशी बोलण्याचा प्रसंग आला. ते लोक आपापल्या गावांत कशी प्रगती सुरू आहे,अडाणी उद्योग रिलायन्सला कसा मागे टाकीत आहे,मुंदरा बंदरामुळे स्थावर मालमत्ता व विकासकामांना कशी तेजी आली आहे,बिहारी मजुरांचे तांडे कसे गावात घुसत आहेत,जनजीवन असुरक्षित होते आहे,गावात मागे वृद्ध आणि बायकामुलेच कशी उरली आहेत,गावागावातून त्यांच्यासाठी वृद्धाश्रमांतून राहाण्याची आणि 'टिफ्फिन' चीही मोफत अथवा नाममात्र पैशात सोय कशी आहे वगैरे सांगत होते.मी विचारले,नि:शुल्क सेवा परवडते कशी? तर सर्वांना ठाऊक असलेलेच उत्तर मिळाले,'इथे गावागावातून एकदोन तरी अब्जाधीश अथवा श्रीमंत एनाराय असतात.ते पुष्कळसा खर्च उचलतात त्यांना ते जड नाही".आता गणित करावे,कच्छमध्ये किती खेडेगावे आणि किती अब्जाधीश? हा सर्व पैसा काळा नसणार हे खरे, पण तो संपूर्णपणे पांढराही नसणार हेही खरे. आणखीही मनोरंजक माहिती(आधीच माहीत असलेली) निघत होती, पण अवांतरामध्ये अवांतर नको. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लोकपाल विधेयकाचा मसुदा आहे,

पुष्करिणी
Wed, 06/08/2011 - 13:06 नवीन
लोकपाल विधेयकाचा मसुदा http://www.lokpalbillconsultation.org/ आहे, पब्लिक कंसल्टेशनचा पर्याय आहे, वाचून आपापली मते नोंदवता येतिल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

विकास
Wed, 06/08/2011 - 16:07 नवीन
नक्कीच जमले तर तेथे मत मांडेन. (का नाही जमणार? जर इथे इतक्या पिंका टाकतोय तर तिथे एकच टाकायला काय हरकत आहे? ;) ) असो. तो पर्यंत कॉलींग सुधीर जी! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

रामदेव बाबांचे आंदोलन ज्या

विजुभाऊ
Wed, 06/08/2011 - 15:13 नवीन
रामदेव बाबांचे आंदोलन ज्या पद्धतीने मोडून काढले तशाच पद्धतीने टेल्को कामगारानी ( नायर) केलेले एक आंदोलन त्यावेळच्या मुख्यमंत्र्याच्या सहाय्याने असेच चिरडून काढण्यात आले होते. त्यावेळेस कोणीच निषेधाचे सुर काढले नाहीत.
  • Log in or register to post comments

कारण

विकास
Wed, 06/08/2011 - 16:21 नवीन
जितके आठवत आहे त्याप्रमाणे, नायरची माणसे गुंडगिरी करत कुणाला कामाला जाउन देत नव्हती. सगळ्या कामगारांचा त्या संपाचा भाग होयची इच्छा नव्हती. त्या आधीच्या दत्ता सामंतांच्या गिरणीकामगार संपाच्या आठवणी ताज्या होत्या आणि त्यात देशोधडीला लागलेले कामगार आणि मुंबईतून उठलेल्या गिरण्यांसारखी पुण्यातल्या कामगारांची आणि टेल्कोची अवस्था व्हावी अशी कुणाचीच इच्छा नव्हती. परीणामी कामगार/कर्मचार्‍यांचा पाठींबा नसलेल्या गुंडगिरीस सरकार आणि एकत्रित कामगारांनी असफल केले. इथे एका सामाजीक मागणीसाठी उपोषण चालले होते. त्यात सहभागी असणारे काँग्रेसच्या सभांसारखे ट्रक्स आणि सरकारी बसेस भरून आणल्याचे कोणी लिहीलेले देखील नाही अथवा माध्यमांद्वारे ऐकीवातही आलेले नाही. त्यामुळे असली तुलना म्हणजे मूळ मुद्यास बगल देऊन दिशाभूल करणे आहे. म्हणूनच, वास्तवीक असा संदर्भ देऊन म्हणायचेच असेल तर टेल्को प्रमाणे तसेच इंदीरा गांधींनी जसा रेल्वे कामगार संप चिरडला तसाच गिरणीकामगार संप चिरडून गिरण्या चालू ठेवण्यास मदत का केली नाही हा आहे. ते न केल्याने मुंबईला सामान्य मराठी माणूस पारखा देखील झाला आणि त्यातूनच आधी नसलेले टोळीयुद्ध आणि अरूण गवळीसारखे अनेकजण तयार झाले... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

निषेधाचे

समंजस
Wed, 06/08/2011 - 18:47 नवीन
निषेधाचे सुर थोडे फार निघाले असतील परंतू मोठ्या प्रमाणावर निघाले नसतील तर त्याला काही कारणे असावीत जसे की, १) ते आंदोलन फक्त काहि मर्यादित लोकांच्या मागण्यांशी/हिताशी संबंधीत (म्हणजेच त्या कंपनीचे कर्मचारी आणि त्यांचे हित) असल्यामुळे इतर जनतेला त्या बद्दल विशेष काही वाटलं नसेल, परंतू इथे हे आंदोलन फक्त काही मर्यादित लोकांच्या हिताशी संबंधित न राहता देशातील जास्तीत जास्त नागरीकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे प्रभावित करणार्‍या समस्येशी होतं या मुळे ह्या आंदोलनाशी जास्तीत जास्त नागरीकांचा भावनिक संबंध होता त्या मुळेच ज्या पद्धतिने सरकारने हे आंदोलन चिरडले, ज्या नेत्यांचा वारसा हा पक्ष सांगत आला (महात्मा गांधी/नेहरू) आहे त्याच पक्षाने सत्तेच्या लोभापायी, सत्ता हातातून सुटणार या भितिपायी रात्रीच्या अंधारात पोलीसी कारवाई केली, लोकशाही मुल्ये तुडवीली, नागरीकांच्या मुलभूत अधिकारांवर हल्ला चढवला त्या मुळे निषेधाचे आणि संतापाचे सुर निघालेत. हिटलरने सुद्धा काहिश्या अश्याच पद्धतिने आपल्या निंदकांचा, विरोधकांचा काटा काढला, ज्यूंना वेगळे करून मारलं आणि नंतर विरोधी जर्मन नागरीकांना सुद्धा. सुरवातीला रशियाशी हात मिळवणूक केली आणि नंतर संधि मिळताच, वेळ येताच त्यांच्यावरही हल्ला केला. हुकूमशाहीची सुरवात ही अशीच असते. फूट पाडायची, समाजातील गट वेगवेगळे होतील, राहतील आणि एकमेकांना मदत करणार नाहीत ही काळजी घ्यायची आणि मग एक-एक करत सगळ्या विरोधकांना चिरडून काढायचं. हिटलरने हेच केलं, ब्रिटीशानी हेच केलं आणि हे राजकीय नेते सुद्धा हीच पद्धत अवलंबत आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी ह्या प्रकरणाचा निषेध केला हे बरंच झालं या देशातील संभाव्य हुकूमशाही आणखी काही काळ लांबली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

राजन नायर

मैत्र
Fri, 06/10/2011 - 15:00 नवीन
शनिवार वाडयावर आंदोलन केलं होतं. उपोषण वगैरे नसावं. मदन पाटील नामक तत्कालिन कोणी मंत्री व इतर लोकांवर अत्यंत इरसाल गाणी आणि घोषणा केल्या होत्या. दुसर्‍या का तिसर्‍या दिवशी पहाटे २-३ वाजता तुफान पोलिस दल आणून ५-६ वाजण्याच्या आत सगळ्यांना नाशिक / ठाणे ई. जेलमध्ये घेऊन गेले होते. राजन नायर तसा गुंडच होता. तेव्हा शनिवार वाड्याच्या अगदी समोर राहत असल्याने आणि पहाटे जोरदार गोंधळ माजल्याने जाग आली आणि सर्व प्रकार प्रत्यक्ष पहायला मिळाला होता. खरं तर रामलिला मैदानावरची सरकारची कृती पाहून जुन्या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली पण रामदेव या मनुष्याच्या उद्दिष्टाबद्दल खात्री नसली तरी अगदी राजन नायर सारख्या युनियन लिडर गुंडाबरोबर तुलना करणं योग्य वाटलं नाही म्हणून आत्ता पर्यंत संदर्भ दिला नव्हता. आणि त्यामुळेच तेव्हा फार मोठा गदारोळ झाला नव्हता. त्याच्या विरुद्ध बाजूच्या एका युनियनचे काही कामगार संपात सहभागी नव्हते. ज्या पद्धतीने कारवाई केली आणी रातोरात सगळ्यांना पुण्याबाहेर नेलं. त्यावर टीका झाली. पण २० वर्षापूर्वी मीडिया इतका स्ट्राँग नव्हता. आणि चॅनेलवरची ठोठो आरडा ओरड ही नव्हती. आता झालं असं तर सगळ मराठी चॅनेल्स - माझा तुझा, बाणा आणि ठाम मत तुफान फटकेबाजी करून प्रसिद्धि मिळवतील. ही घटना माहीत असलेले मिपाकर नसावेत असं वाटलं होतं. विजूभाउंनी जरा सरप्राईझ केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

या संपुर्ण घडामोडींदरम्यान

समंजस
Wed, 06/08/2011 - 19:15 नवीन
या संपुर्ण घडामोडींदरम्यान (अण्णा हजारेंचं आंदोलन, आताचं बाबा रामदेव यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला चिरडण्याचा झालेला प्रयत्न आणि त्या नंतरच्या घडामोडी) एक गोष्ट जी बर्‍याच लोकांच्या नजरेतून सुटली परंतू ज्यांच्या लक्षात आली आणि त्या मुळे झालेला एक मोठा अपेक्षाभंग तो म्हणजे, देशाला समर्थ नेतृत्व देउ शकणारा, या देशाच्या प्रगतीला, राजकारणाला एक चांगली दिशा देउ शकणारा, एका जुन्या राजकीय पक्षाला मजबूत नेतृत्व देउ शकणारा, भविष्यात प्रधानमंत्रि होउ पाहणार्‍या ज्या व्यक्तीकडे देशातील एक मोठा भाग, एक मोठा समाज मोठ्या आशेने बघत होता ती व्यक्ती म्हणजे राहूल गांधी कुठेच दिसली नाही. अचानक हवेत गायब झाल्या सारखी ही व्यक्ती अदृष्य झाली म्हणजे जेव्हा कॉंग्रेस पक्षाला, कॉंग्रेस सरकारला सक्षम नेतृत्वाची, लढवय्या नेत्याची, समजूतदारपणा असलेली तसेच भान सुटलेल्या आणि जिभेवरचा ताबा सुटलेल्या, सत्तेचा नशा चढलेल्या, सत्ता हातातून जाणार ही भिती असलेल्या पक्षातील नेत्यांना आवरण्याची, सावरण्याची ताकद असलेला नेता हवा होता/आहे अश्या वेळेस ही व्यक्ती कुठेच समोर दिसत नाहिय आणि पराकोटीचा अहंकार असलेली, पक्षाला जनतेपासून दुर घेउन जाणारी, वास्तव्य स्विकारण्याची तयारी नसलेली नेते मंडळीच काय ती दिसत आहेत. काय ही व्यक्ती खरोखरच एका जुन्या राजकिय पक्षाला, या देशाला समर्थ नेतृत्त्व देउ शकणार?
  • Log in or register to post comments

उत्तर 'हो' असो किंवा 'नाही' ,

धमाल मुलगा
Wed, 06/08/2011 - 19:17 नवीन
उत्तर 'हो' असो किंवा 'नाही' , काय फरक पडतो? "युवराज" ना? वंशपरंपरेनं मुकुट चढणारच डोक्यावर. सिंपल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

?

नितिन थत्ते
Wed, 06/08/2011 - 20:12 नवीन
राहुल गांधीला देशाचा नेता बनवण्यात काँग्रेसपेक्षा काँग्रेसच्या विरोधकांनाच जास्त विण्टरेष्ट दिसतो आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

म्हणजे?

विकास
Wed, 06/08/2011 - 20:21 नवीन
राहुल गांधीला देशाचा नेता बनवण्यात म्हणजे राहुल गांधी देशाचे नेते नाहीत असे म्हणायचे आहे? अहो जो पक्ष स्वतःला १०० वर्षांपेक्षा जुना म्हणून क्लेम करतो त्या पक्षाचे ते विद्यमान जनरल सेक्रेटरी आहेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ज्जे ब्बात!

धमाल मुलगा
Wed, 06/08/2011 - 20:32 नवीन
शिका...लोकहो शिका... ह्याला म्हणतात निष्ठा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

राहुल गांधीला

समंजस
गुरुवार, 06/09/2011 - 17:44 नवीन
<<राहुल गांधीला देशाचा नेता बनवण्यात काँग्रेसपेक्षा काँग्रेसच्या विरोधकांनाच जास्त विण्टरेष्ट दिसतो आहे>> मी काँग्रेस पक्ष विरोधक नाही परंतू काँग्रेसी विचारांचा विरोधक नक्कीच आहे. राहुल गांधींना देशाचा नेता बनवण्यात किंवा नेता बनण्यात विण्टरेष्ट नाही असा काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता मला ठाउक नाही. आपणांस ठाउक असल्यास मला नाव/नावे जाणून घ्यायला आवडेल :) काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता हा देशाचा नेता असतोच (पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी आंदोलन चिरडण्यामागे जे कारण दिलं आहे ते बघता असे दिसून येतंय की या देशात फक्त काँग्रेस पक्षच सत्ताधारी राहू शकतो, सत्ता भोगू शकतो, सत्ता मिळवू शकतो इतर कोणीही तसा प्रयत्न केल्यास destabilising the Government त्यांना अश्या प्रकारे चिरडले जाणार). फक्त इथे प्रश्न आहे तो सामर्थ्याचा, क्षमतेचा आणि त्या बाबतीत राहूल गांधींपासून जास्त अपेक्षा आहेत. सिनेमातील हिरोच्या स्टंटबाजी सारखी स्टंटबाजी राहूल गांधींकडुन अपेक्षीत नाही जसे की लोकल मधून प्रवास करणे, अचानक पणे कुठेही निघून जाणे, एखाद्या गरिबाच्या घरी जाउन जेवण करणे, राहणे वगैरे. अपेक्षीत आहे ते अश्या प्रसंगी जेव्हा देशातील राजकीय/सामाजीक वातावरण ढवळून निघत असताना समोर येउन, जबाबदारी घेउन परिस्थीला सामोरे जाउन समस्येचं उत्तर शोधून सरकारला/पक्षाला योग्य मार्गदर्शन करावं जे सामान्य जनतेला उपयोगी ठरणार, देशाला उपयोगी ठरणार. देशात सत्ता कोण उपभोगतंय काँग्रेस पक्ष की भाजपा की समाजवादी की आणखी कोणी हे सामान्य जनतेला महत्त्वाचं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

त्याचं काय आहे...

विकास
Wed, 06/08/2011 - 20:25 नवीन
एकाने (रामदेव) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करायचा प्रयत्न केल्यावर आंदोलन चिरडले गेले तर दुसर्‍याने (राहुल) राज्यपातळीवर आंदोलन करायचा प्रयत्न केल्यावर आंदोलन चिरडले गेले. त्यामुळे मला खात्री आहे की राहुलजींना मनातून आणि मनापासून रामदेवबाबांबद्दल कणवच वाटत असणार. पण भले ते पार्टी जनरल सेक्रेटरी असतील, पण शेवटी पार्टी अ‍ॅड्वायजर म्हणून पण काही प्रकार असतोच ना! त्यांना वाटते तसेच बोलावे लागते.. :( बाकी राहुलजींची मायावतींनी उचलबांगडी केली तेंव्हा काँग्रेस काय म्हणाली ते बघितले पाहीजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

=)) =)) =))

धमाल मुलगा
Wed, 06/08/2011 - 20:44 नवीन
=)) =)) =)) =)) अग्ग्ग्ग्ग्ग्गं.................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

--^--

आंबोळी
Wed, 06/08/2011 - 20:56 नवीन
त्यामुळे मला खात्री आहे की राहुलजींना मनातून आणि मनापासून रामदेवबाबांबद्दल कणवच वाटत असणार.. =)) =)) =)) विकासराव दंडवत स्विकार करावा --^--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मनातुन अगदी गलबलुन आले

वेताळ
गुरुवार, 06/09/2011 - 17:55 नवीन
त्यामुळे मला खात्री आहे की राहुलजींना मनातून आणि मनापासून रामदेवबाबांबद्दल कणवच वाटत असणार.. हे वाक्य अगदीच मनाला स्पर्श करुन गेले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा