Skip to main content

कच्चे मुर्ग की बिर्याणी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 28/05/2011 04:51 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टरशेफ संजीव कपूर ह्यांच्या खाना खजाना मध्ये ही पा़कृ पाहीली होती , तीच करुन बघीतली आणी इथे देत आहे :) साहित्य चिकन मुरवण्यासाठी: १/२ किलो साफ करून तुकडे केलेले चिकन २-३ टेस्पून आले+लसुण पेस्ट २ कप दही १ कप तळलेला कुरकुरीत कांदा १/२ कप बारीक चिरलेला पुदीना १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून वेलचीपूड २ टीस्पून लाल तिखट १ १/२ टीस्पून गरम मसाला १ टेस्पून लिंबाचा रस १ हिरवी मिर्ची चिरून मीठ चवीनुसार १-२ टेस्पून तुप . भातासाठी साहित्यः २ कप बासमती तांदुळ ३-४ तमालपत्र ४-५ लवंगा ४-५ काळीमिरी २ मसाला वेलची २-३ हिरवी वेलची ३-४ दालचिनी १ टीस्पून शहाजिरे मीठ चवीप्रमाणे (चिकनला की लावले आहे त्याअंदाजानुसार घालावे) इतर साहित्यः १/२ कप दुधात केशर मिसळलेले २ टेस्पून तुप थोडासा तळलेला कुरकुरीत कांदा थोडासा चिरलेला पुदीना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कणीक पाकृ: चिकनला मॅरीनेट करण्यासाठी जे साहित्य सांगितले ते सर्व लावून चिकन ४-५ तास चांगले मुरु द्यावे. . २ कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यात २० मिनिटे भिजवणे. एका स्वच्छ रुमालात शहाजिरे सोडून वरील अख्खा गरम-मसाला बांधुन , बत्त्याने एक-दोनदा कुटून घेणे. . . नंतर ४ कप पाणी उकळ्ण्यास ठेवून त्यात मीठ, शहाजिरे व बांधलेली पुरचुंडे घालून भात अर्धवट शिजवून घेणे .(७०-८०% शिजवणे) शिजवलेला भात ताटात काढून गार होऊ द्यावा. एका नॉन-स्टीक भांड्याला तुपाचा हात फिरवून घेणे. . त्यावर मुरलेले चिकन सर्वत्र पसरवणे. . त्यावर अर्धवट शिजवलेला भाताचा थर लावणे. . त्यावर तळलेला कांदा, चिरलेला पुदीना, चिरलेली कोथिंबीर, किंचित गरम-मसाला, किंचित वेलचीपूड भुरभुरणे. . परत त्यावर अर्धवट शिजवलेला भाताचा थर लावणे व त्यावर चिरलेला पुदीना, चिरलेली कोथिंबीर, किंचित गरम-मसाला, किंचित वेलचीपूड भुरभुरणे. त्यावर केशर मिश्रीत दुध घालणे, तुप सोडणे. . झाकण ठेवणे, झाकणाची कडा कण्केने व्यवस्थीत बंद करून ,भांडे तव्यावर ठेवावे. . १५ मिनिटे मध्यम आचेवर शिजु द्यावे व १५-२० मिनिटे मंद आचेवर शिजु द्यावे.मंद आचेवर शिजवले की चिकन चांगले शिजते. आवडत्या रायत्यासोबत गरम-गरम सर्व्ह करणे. .

वाचने 7376
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

फारच सुरेख दिसत आहे.

याला म्हणतात असली बीर्याणि,मस्त दिसत आहे,पण घरी सगळे डायट वर आहेत,:(

खुप सुंदर झाली आहे बिर्याणी. बिर्याणी म्हणजे माझा खुप आवडता पदार्थ आहे. :) छान , चवदार पाककृतीसाठी धन्यवाद. - नीलकांत

धन्यवाद सगळ्यांना :)

छान , चवदार पाककृतीसाठी धन्यवाद.