मास्टरशेफ संजीव कपूर ह्यांच्या खाना खजाना मध्ये ही पा़कृ पाहीली होती , तीच करुन बघीतली आणी इथे देत आहे :)
साहित्य चिकन मुरवण्यासाठी:
१/२ किलो साफ करून तुकडे केलेले चिकन
२-३ टेस्पून आले+लसुण पेस्ट
२ कप दही
१ कप तळलेला कुरकुरीत कांदा
१/२ कप बारीक चिरलेला पुदीना
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून वेलचीपूड
२ टीस्पून लाल तिखट
१ १/२ टीस्पून गरम मसाला
१ टेस्पून लिंबाचा रस
१ हिरवी मिर्ची चिरून
मीठ चवीनुसार
१-२ टेस्पून तुप
भातासाठी साहित्यः
२ कप बासमती तांदुळ
३-४ तमालपत्र
४-५ लवंगा
४-५ काळीमिरी
२ मसाला वेलची
२-३ हिरवी वेलची
३-४ दालचिनी
१ टीस्पून शहाजिरे
मीठ चवीप्रमाणे (चिकनला की लावले आहे त्याअंदाजानुसार घालावे)
इतर साहित्यः
१/२ कप दुधात केशर मिसळलेले
२ टेस्पून तुप
थोडासा तळलेला कुरकुरीत कांदा
थोडासा चिरलेला पुदीना
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
कणीक
पाकृ:
चिकनला मॅरीनेट करण्यासाठी जे साहित्य सांगितले ते सर्व लावून चिकन ४-५ तास चांगले मुरु द्यावे.
२ कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यात २० मिनिटे भिजवणे.
एका स्वच्छ रुमालात शहाजिरे सोडून वरील अख्खा गरम-मसाला बांधुन , बत्त्याने एक-दोनदा कुटून घेणे.
नंतर ४ कप पाणी उकळ्ण्यास ठेवून त्यात मीठ, शहाजिरे व बांधलेली पुरचुंडे घालून भात अर्धवट शिजवून घेणे .(७०-८०% शिजवणे)
शिजवलेला भात ताटात काढून गार होऊ द्यावा.
एका नॉन-स्टीक भांड्याला तुपाचा हात फिरवून घेणे.
त्यावर मुरलेले चिकन सर्वत्र पसरवणे.
त्यावर अर्धवट शिजवलेला भाताचा थर लावणे.
त्यावर तळलेला कांदा, चिरलेला पुदीना, चिरलेली कोथिंबीर, किंचित गरम-मसाला, किंचित वेलचीपूड भुरभुरणे.
परत त्यावर अर्धवट शिजवलेला भाताचा थर लावणे व त्यावर चिरलेला पुदीना, चिरलेली कोथिंबीर, किंचित गरम-मसाला, किंचित वेलचीपूड भुरभुरणे.
त्यावर केशर मिश्रीत दुध घालणे, तुप सोडणे.
झाकण ठेवणे, झाकणाची कडा कण्केने व्यवस्थीत बंद करून ,भांडे तव्यावर ठेवावे.
१५ मिनिटे मध्यम आचेवर शिजु द्यावे व १५-२० मिनिटे मंद आचेवर शिजु द्यावे.मंद आचेवर शिजवले की चिकन चांगले शिजते.
आवडत्या रायत्यासोबत गरम-गरम सर्व्ह करणे.
वाचने
7376
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
खपलो
फोटो बघुन तोनडाला पाणी सुट्ले :)
हम्म!!
याला म्हणतात बिर्याणी
In reply to हम्म!! by रश्मि दाते
मस्त !! चिकनचे तुकडे जर मोठे
वाह ! बिर्याणी :)
धन्यवाद
खल्लास ........या विकांताला
कच्चे मुर्ग की बिर्याणी
छान , चवदार