Skip to main content

वळवळ केवळ

लेखक विसुनाना यांनी सोमवार, 06/06/2011 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
कोण ऐकतो, कोण समजतो? फुकाच अवघी तळमळ केवळ झोप रात्रिची उडून जाते, होते पोटी जळजळ केवळ मनास वाटे व्हावी क्रांती, राहु नये ही चळवळ केवळ टीव्ही आणिक फेसबुकावर हाय उठवते खळबळ केवळ रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ जाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ सामसुमीच्या खुणा सांगती क्षितिजावरती उठेल वादळ गळत्या पानांमधून कांही उगाच होते सळसळ केवळ ऊंचऊंच लाव्हा उसळावा स्वस्थ पसरला फुटून कातळ आत्मतुष्टिचा झरा वाहतो थंडपणाने खळखळ केवळ टरारणार्‍या स्नायुंमधुनी बसेल हिसका तुटेल साखळ सांड बडवले जुवे खेचती, थुंकी गळते घळघळ केवळ 'जन्मलोच तर जगून जाऊ' - कापुरुषांची धडपड निर्बळ गटारातल्या गांडवळांची अशीच असते वळवळ केवळ ***
लेखनविषय:

वाचने 1809
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सगळीच कडवी उत्तम जमली आहेत. विषण्ण वास्तव!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सर्वच कडवी भारी उतरली आहेत. -दिलीप बिरुटे

का लाजवितो आहेस सगळ्यांना? अपाय नको उपाय हवा आहे!!!!

वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्‍यांचे आभार मानतो.