Skip to main content

Tiramisu (Italian Dessert) - तिरामिसु

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 01/06/2011 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः तिरामिसु बिस्किट्स (French Fingers) किंवा Sponge cake पण वापरु शकता. Mascarpone Cheese - २ Packets पिठीसाखर - १ १/२ कप अंडी - ६ Cognac किंवा Rum - ४ चमचे कॉफी - ४ चमचे कोको पावडर - ४ चमचे व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब कृती: १. चीज हे normal temp ला आणावे. Cheese २. अंड्यांचे पांढरे व बलक वेगळे करावे. ३. अंड्यांच्या बलक मधे ६ चमचे साखर टाकुन Hand mixer ने मिक्स करावे. egg yoke mix ४. ह्यात मऊ झालेले क्रिम चीज टाकुन हलक्या हाताने मिक्स करावे. ५. दुसर्‍या भांड्यामधे अंड्याचे पांढरे घेउन त्यात Cognac किंवा Rum व व्हॅनिला इसेन्स टाकावे. cognac ६. ह्यात राहिलेली साखर थोडी थोडी टाकुन खुप मिक्स करावे. हे मिश्रण hard pick येई पर्यंत beat करावे. egg white ७. हे मिश्रण वरील चीज मधे हलक्या हाताने एकत्र करावे व फ्रिज मधे ठेवावे. ८. पातेल्यामधे ३ कप पाणी गरम करुन, त्यात कॉफी व २ चमचे साखर टाकुन २-३ मिनिटे उकळुन घ्यावे. ९. हे कॉफीचे पाणी गार झाल्यावर त्यात तिरामिसु बिस्किट्स बुडवुन, ज्या भांड्यामधे केक करायचा आहे, त्यात एक layer बनवुन घ्यावा. buscuits १०. त्यावर अंड्याचे मिश्रण टाकुन वरतुन गाळणीतुन कोको पावडर sprinkle करावी. 1st ११. हिच कृती परत एकदा करावी. 2nd १२. अशाप्रकारे अजुन १ layer झाल्यावर केक ७-८ तास फ्रिज मधे ठेवावा. final f2 १३. केक सेट झाल्यावर तुकडे कापुन serve करावा. टिपः १. आवडत नसल्यास Cognac किंवा Rum नाही टाकले तरी चालते. f3

वाचने 5672
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

हो गं, अगदी खर. तसे मी हे तिरामिसु भारतात तरी कधी खाल्ला नव्ह्ता. इथे आल्यावर पहिल्यांदा try केला. आता माझे सगळ्यात आवडते dessert आहे हे. yummm yummm :)

अहाहा....मस्तच ग....करुन पाहिलेच पाहिजे..मुलीला खूप आवडेल..आणी आम्हाला पण.

तिरामिसु= पिक मी अप... :) अगदी सार्थ नाव आहे. हे आमचे तिरामिसु आणि ही आमचीच अजून एक तिरामिसु पाकृ स्वाती

माझे आतिशय आवडते डेझर्ट आहे :) फोटो व पाकृ एकदम छान :)