सुक्या कोलंबीची किसमूर.
कोशिंबिरीला कोकणी भाषेत किसमूर म्हणतात.
साहित्यः-१)दोन वाट्या सुकी कोलंबी(दोके मोडून तुकडे केलेली).
२)दीड वाटी खवलेले खोबरे. ३)दोन कांदे. ४)दोन चमचे मिरचीपूड
५)एक चमचा मालवणी मसाला. ६)अर्धा चमचा हळदपूड.
७)थोडी चिंच. ८)मिठ ९)खोबरेल तेल १०)एक निखारा.
कृती :-प्रथम कोलंबी थोड्या तेलात परतून चुरचुरीत करून घ्यावी.कांदे बारीक कापून घ्यावे.त्यात खवलेले खोबरे
व बाकी साहित्य घालून चिंचेचा जाड कोळ व मिठ घालून एकत्र कालवावे.अगदी वाढतेवेळेस त्यात कोलंबी
चुरून घालावी व सर्व परत कालवावे.मध्ये खड्डा करून त्यात वाटीत घालून निखारा ठेवावा.त्यावर तेल घालून
धूर येईल तो कोडून ठेवावा.पाच मिनिटंनी निखार्याची वाटी काढावी.व्यवस्थित कालवून वाढावी.
टिप :-धुराचा वास आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल्,पण वापरल्यास एक वेगळा स्व्वाद येईल.
फोटो पहिल्यांदाच टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.गोड्/तिखट हवा तसा मानून घेणे.
फोटो पहिल्यांदाच टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.गोड्/तिखट हवा तसा मानून घेणे.
वाचने
7138
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
अहा! किसमूर मला खुप
"ज्योती'' , फोटु काढताना
"ज्योती'' , फोटु काढताना
In reply to "ज्योती'' , फोटु काढताना by टारझन
+१
In reply to +१ by पंगा
अॅक्चुली कॅमेरा स्थीर
In reply to अॅक्चुली कॅमेरा स्थीर by नरेशकुमार
ठीक आहे, पण...
In reply to ठीक आहे, पण... by पंगा
हो ना !, काहीना काहीतरी
टारझन
सध्या शाकाहारी असल्यामुळे
वा!व्वा!
छानच
मस्त.
मस्त!
In reply to मस्त! by पिवळा डांबिस
यात जवळा वापरलेला नाही.मोठी
In reply to यात जवळा वापरलेला नाही.मोठी by ज्योति प्रकाश
धन्यवाद!
आवडेश