Skip to main content

सुक्या कोलंबीची किसमूर.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शुक्रवार, 20/05/2011 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोशिंबिरीला कोकणी भाषेत किसमूर म्हणतात. साहित्यः-१)दोन वाट्या सुकी कोलंबी(दोके मोडून तुकडे केलेली). २)दीड वाटी खवलेले खोबरे. ३)दोन कांदे. ४)दोन चमचे मिरचीपूड ५)एक चमचा मालवणी मसाला. ६)अर्धा चमचा हळदपूड. ७)थोडी चिंच. ८)मिठ ९)खोबरेल तेल १०)एक निखारा. कृती :-प्रथम कोलंबी थोड्या तेलात परतून चुरचुरीत करून घ्यावी.कांदे बारीक कापून घ्यावे.त्यात खवलेले खोबरे व बाकी साहित्य घालून चिंचेचा जाड कोळ व मिठ घालून एकत्र कालवावे.अगदी वाढतेवेळेस त्यात कोलंबी चुरून घालावी व सर्व परत कालवावे.मध्ये खड्डा करून त्यात वाटीत घालून निखारा ठेवावा.त्यावर तेल घालून धूर येईल तो कोडून ठेवावा.पाच मिनिटंनी निखार्याची वाटी काढावी.व्यवस्थित कालवून वाढावी. टिप :-धुराचा वास आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल्,पण वापरल्यास एक वेगळा स्व्वाद येईल. फोटो पहिल्यांदाच टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.गोड्/तिखट हवा तसा मानून घेणे.

वाचने 7150
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

किसमूर मला खुप आवडतं....मला सुकी मच्छीच खुप खुप आवडते :) मस्त तांदुळाच्या भाकरी बरोबर कांदा सुके बोंबील, सोडे, सुकट परतुन अहा.....

"ज्योती'' , फोटु काढताना त्यावर "प्रकाश:" व्यवस्थित पडेल अशी काळजी घ्यावी . बाकी पाकृ बद्दल धन्यवाद , - मेनबत्ती प्रकाश

"ज्योती'' , फोटु काढताना त्यावर "प्रकाश:" व्यवस्थित पडेल अशी काळजी घ्यावी . बाकी पाकृ बद्दल धन्यवाद , - मेनबत्ती प्रकाश

In reply to by पंगा

अ‍ॅक्चुली कॅमेरा स्थीर होता, पन प्रुथ्वी फिरत असल्याने काही क्षनात तिच पुढे गेली नसेल कशावरुन ? बोला बोला आता बोला !

In reply to by नरेशकुमार

... मग त्या परिस्थितीत निदान क्यामेरा मागे जाण्याची गती नियंत्रित करता यायला हवी. पृथ्वी पुढे जाण्याची भरपाई करण्याकरिता क्यामेरा मागे घेणे म्हणजे हापिसात एक तास उशिरा गेल्यावर त्याची भरपाई करण्याकरिता एक तास लवकर घरी जाण्यासारखे आहे. (*** विशेष सूचना: हा भिकार विनोद माझा नसून, याची प्रेरणा श्री. चिं. वि. जोशी यांजकडून साभार घेतलेली आहे. (संदर्भ: बहुधा 'माझे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग'.) तेव्हा कृपया त्याचे श्रेय अथवा त्याचा दोष मला देऊ नये. तसेच, या विनोदाला हसला नाहीत, किंवा या 'विनोदाला हसलात', तरी मला त्याचे सोयरसुतक नाही. या विनोदासंबंधीच्या सर्व प्रतिक्रिया श्रीचिंविजोश्यार्पणमस्तु आहेत. विशेष सूचना समाप्त. ***) किंवा कदाचित बंदुकीतून गोळी झाडल्यावर (पक्षी: 'शूट' केल्यावर) न्यूटनप्रणित तृतीयगतिनियमास अनुसरून ज्याप्रमाणे बंदूक जोराने मागे येते, तद्वत क्यामेर्‍यातून 'शूट' केल्यावर क्यामेरा जोराने मागे येत असावा काय? पण मग याचे दुष्परिणाम छायाचित्रावर होऊ नयेत, याकरिता या पार्श्वगामी गतीवर नियंत्रणाप्रीत्यर्थ होतकरू छायाचित्रकाराने अगोदर काही सराव करणे आवश्यक नाही काय? की आपले उचलला क्यामेरा की दाबली कळ - हे कसे चालायचे? (*** विशेष सूचना: हा भिकार विनोद माझा आहे. पण हसलात, 'हसलात', किंवा न हसलात तरी मला फरक पडत नाही. हसणारांना, 'हसणारांना' आणि न हसणारांना सारख्याच प्रमाणात फाट्यावर मारण्याचे हक्क माझ्याकडे तूर्तास राखून ठेवण्यात आलेले आहेत. कृपया नोंद घ्यावी. सूचना समाप्त. ***)

In reply to by पंगा

हो ना !, काहीना काहीतरी नियंत्रित करायला पाहीजे होते, हे मात्र नक्की. . बाकी पाक्रु सवडीने वेळ मिळाला की वाचीन. अंधेरा कायम रहे.

एकाच वेळी दोन मेणबत्त्या लावू नयेत.

खाता येणार नाही पण निखार्‍याची आयडीया छान आहे. हीच आयडीया आणखी कुठे वापरता येईल का याचा विचार करतो आहे.पाकृ नेहेमीप्रमाणे चांगली आहे. काकडीच्या धोंडसामुळे तुमचे नाव लक्षात होतेच.

सुकटाची मस्त पाककृती. कोळशावर भाजलेल्या सुक्या बांगड्याची चटणीही अप्रतिम लागते.

किसमूर खूप आवडीचं!! पण यात तुम्ही सुकी कोलंबी म्हणजे करंदी वापरलीत की जवळा? आमच्याकडे करंदी वापरतात म्हणून विचारलं....

म्म्म्म्म्म्म