✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझे नावडते संगीतकार

त
तिमा यांनी
Tue, 05/24/2011 - 21:16  ·  लेख
लेख
आजच प्रवास करत असताना अचानक बसवाल्याने एफेम रेडियो लावला. त्यातल्या चरपटपंजरीचा त्रास कमी का काय म्हणून चरपटणारीने 'आज राजेश रोशनजी का बर्थ डे है' असे सांगून सगळी राजेश रोशनची गाणी लावली. त्यामुळे असह्य मानसिक ताप झाला. त्यातूनच ही कल्पना सुचली की आपले नावडते संगीतकार आठवावेत. पूर्वी कोणीतरी, आवडते संगीतकार, यावर कौल घेतला होता. म्हणून कौले काढायला गेलो तर 'पर्याय वाढवा' हे दाबल्यावर पुढचे सगळे इंग्रजीतच टाईप व्हायला लागले. बरीच खटापट केल्यावर विचार केला, की मग हा विषय चर्चेलाच टाकावा. मला नावडणार्‍या संगीतकारांची नांवे उतरत्या क्रमाने दिली आहेत. जेवढा नंबर वरचा तेवढा त्याच्या संगीताचा मानसिक त्रास जास्त, अशा पध्दतीने! का आवडत नाही त्याची कारणे शक्य आहे तिथे दिली आहेत. तर होउन जाऊ द्यात एकदा! १. राजेश रोशन याचं हे ..... हो... सुरु झालं की वाटतं की किशोरसारख्या गुणी गायकाचा इतका वाईट उपयोग दुसर्‍या कुणीच केला नाही. सपक चाली, एकदम खालच्या सा वरुन वरच्या षडजावर उड्या... छ्या! एकही गाणे कधी आवडले नाही. मागे मार्मिक मधे शुध्दनिषाद यांनी ह्याचा उल्लेख 'स्वर्गीय बापाने मरताना पोराच्या हाती नुसताच बेंडबाजा दिला असे वाचल्याचे स्मरते. २. उषा खन्ना उडत्या चाली, पण कधी आकर्षक वाटल्याच नाहीत. ३. भप्पी लहरी चोरीव आणि त्याच्यासारख्याच उबगवाण्या ४. रवि बर्‍याचशा चाली म्हणजे दळण आणि त्याच्या नावावरच्या काही उत्कृष्ट चाली त्यानेच दिल्या असतील का याविषयीची दाट शंका.(उदाहरणार्थ : लागेना मोरा जिया) ५. लक्ष्मीकांत प्यारेलाल पारसमणी सारख्या काही उत्तम चालींनंतर पार ढेपाळले आणि 'हाथी मेरे साथी' नंतर तर त्यांच्या प्रत्येक गाण्यात कुठल्यातरी म्युझिक पीस मधे हत्ती ओरडायला लागला. ६. राम लक्ष्मण लक्ष्मी प्यारे नंतरचे बँडवाले! ७. शंकर (जयकिशन नंतरचा) तरी वरील रत्नांपेक्षा पुष्कळ बरा. वरील यादी ही आणखीही वाढवता येईल पण त्या उरलेल्या मंडळींनी काहीवेळा बरे संगीत दिले आहे म्हणून त्यांना या यादीत जागा नाही. फक्त जुन्या संगीतकारांचाच विचार केला आहे कारण नवीन संगीतकारांचे संगीत माझ्या डोक्यावरुन जाते. मिपावर अनेक जाणकार आहेत. त्यांना काय वाटते हे जाणण्याची इच्छा आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11735 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

यात रहेमानचे नाव नाही

आशु जोग
Tue, 05/24/2011 - 21:25 नवीन
यात रहेमानचे नाव नाही घातले तो फार बोर माणूस आहे
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ.. नवा अवतार

अर्धवट
Tue, 05/24/2011 - 21:56 नवीन
हॅ हॅ हॅ.. नवा अवतार वाटतं एकंदरीत वाटचाल, एकोळी धागे वगैरे अगदी अपेक्षीत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

रहमान

नितिन थत्ते
Tue, 05/24/2011 - 21:31 नवीन
राजेश रोशन आपल्याला आवडतात ब्वॉ. म्हणजे थोर संगीतकारांच्या यादीत त्यांचे नाव येणार नाही कदाचित; पण मला आवडतात. त्यांनी भरपूर हिट्ट गाणी दिली आहेत. उदा. ज्यूली, लूटमार, कामचोर (आणि राकेश रोशनचे पिक्चर), याराना, मि. नटवरलाल, काला पत्थर वगैरे. तसेच भप्पी लाहिरींचे. नावडत्या संगीतकारांत ए आर रहमानचे* नाव माझ्या यादीत वर आहे. फारच सिन्थेटिक संगीत देणारा म्हणून. अण्णू मलिक रहमान पेक्षा जास्त चांगला वाटतो. राम लक्ष्मण नावडताच. *मला संगीतातलं काही कळतं असा संशय मुळीच माझ्या मनात नाही.
  • Log in or register to post comments

अण्णू मलिक रहमान पेक्षा जास्त

मृत्युन्जय
Tue, 05/24/2011 - 21:52 नवीन
अण्णू मलिक रहमान पेक्षा जास्त चांगला वाटतो _/\_ _/\_ _/\_ _/\_ यापुढे तुम्ही काँग्रेसभक्त का आहात हा प्रश्न मला पडायचा नाही. असते एकेकाची आवड. एक बोलु का? तुम्हाला रेहमान आवडत नसेल तर हरकत नाही. कदाचित तुमच्याइतके संगीकळातत नसेल मला. पण अन्नु मलिक त्याच्याहुन चांगला कसा हो? (इथे ३-४ कळवळुन बोलणार्‍या करूण चेहेर्‍याच्या स्मायली आहेत असे समजुन घ्यावे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१ सहमत

योगी९००
Tue, 05/24/2011 - 22:55 नवीन
एक बोलु का? तुम्हाला रेहमान आवडत नसेल तर हरकत नाही. कदाचित तुमच्याइतके संगीकळातत नसेल मला. पण अन्नु मलिक त्याच्याहुन चांगला कसा हो? हेच म्हणावे वाटले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सोहनी

चिरोटा
Tue, 05/24/2011 - 23:25 नवीन
सोहनी महिवाल्,एक जान है हम मधली गाणी खूप चांगली नसली तरी ठीक आणी मुख्य म्हणजे ओरिजनल असावीत. रेफ्युजी चित्रपटातील गाणी सुश्राव्य नाहीत असे अण्णुचा शत्रु पण म्हणू शकणार नाही(गाणी ओरिजिनल आहेत की नाहीत हे मात्र अण्णुलाच विचारावे लागेल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

चिरोटाजी, असेलही अन्नु मलिक

सोत्रि
Wed, 05/25/2011 - 11:12 नवीन
चिरोटाजी, असेलही अन्नु मलिक चांगला पण तो रेह्मान पेक्षा चांगला कसा? फक्त सोहनी महिवाल्,एक जान है हम ची गाणी चांगली म्हणून? - सोकजी (रेहमानमय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

यादीतल्या नावांशी १००% सहमत.

अन्या दातार
Tue, 05/24/2011 - 21:31 नवीन
यादीतल्या नावांशी १००% सहमत. :) जोगसाहेबांशी १००% असहमत.
  • Log in or register to post comments

माफी असावी तुम्हाला रहेमान

आशु जोग
Tue, 05/24/2011 - 23:50 नवीन
माफी असावी तुम्हाला रहेमान आवडतो असे दिसते आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

नक्कीच

अन्या दातार
Wed, 05/25/2011 - 02:00 नवीन
आठवा: रोजा, बाँबे, गझिनी, सपने, गुरु, दिल से, ताल, स्वदेस, रंग दे बसंती, साथिया............... आणि तेलुगुमध्ये ये माया चेसावे मधल्या या गाण्यासाठी त्याचे शंभर गुन्हे माफ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

होय रोजा गझिनी

आशु जोग
Wed, 05/25/2011 - 11:44 नवीन
होय रोजा गझिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

माझी भर

हुप्प्या
Tue, 05/24/2011 - 21:57 नवीन
राजेश रोशनची गाणी इतकी वाईट वाटत नाहीत. पण काही काही साफ चोरलेली आहेत. बातो बातो मे ह्या सिनेमातली गाणी मला आवडायची (कभी खुशी कभी गम तारारमपमपम.., न बोलो तुम न मैने कुछ कहा वगैरे) पण ही सरळसरळ प्रसिद्ध इंग्रजी बालगीतांवरुन उचलली आहेत असे कळून चुकले. यारानातील छू कर मेरे मन को हे एका रवींद्र संगीतातील रचनेवरून सरळ उचललेले आहे. त्यामुळे जेव्हा हा सिनेमा बंगालमधे प्रदर्शित झाला तेव्हा ह्या गाण्यावर बंदी घालावी अशी मागणी झाली होती. ज्युलीमधील (१९७५ चा) गाणी आवडतात आणि ती चोरलेली आहेत असे अद्याप कळलेले नाही. त्यामुळे संशयाचा फायदा द्यायला हवा. पण तरी बापाची सर नाही हे खरे. ए आर रहमान, हा माणूस माझा कमालीचा नावडता. माझ्या लेखी तो माझा सगळ्यात नावडता संगीतकार आहे. मला त्याचे संगीत कधीही आवडलेले नाही. हिंदीचा/उर्दूचा गंधही नसल्यामुळे त्याच्या हिंदी गाण्यात शब्द कसेबसे ठोकूनठाकून बसवलेले असतात असे वाटते. कित्येकदा तमिळ चाल आधीच तयार असते आणि आता त्यात हिंदी शब्द कोंबायचे अशा पद्धतीने त्याने अनेक गाणी बनवली आहेत असे वाटते. (उदा. बॉम्बे) भाषेचा लहेजा संभाळता न येणारा संगीतकार म्हणजे नको वाटतो. कधीतरी त्याची हाईप संपेल अशी आशा. बप्पी लहिरी सुरवातीच्या काळात खूप चांगली गाणी द्यायचा पण नंतर आचरटपणा, उचलेगिरी वाढली. नौशादची सुरवातीची गाणी सुरेख होती पण नंतरच्या काळातली त्याची काही गाणी अगदी बकवास वाटतात. जाता जाता: सज्जाद हुसेन हा एक अत्यंत प्रतिभावंत पण अहंकारी आणि लहरी संगीतकार होता. त्याच्या लेखी नौशाद हा अत्यंत सामान्य, सुमार संगीतकार. बहुतेक संगीतकार सुरवातीला अगदी उत्तम संगीत बनवतात. पण जेव्हा ते पुढे येतात तेव्हा त्यांची प्रतिभा आटते किंवा मागणीच्या प्रमाणात चांगले संगीत बनवणे अवघड जात असावे.
  • Log in or register to post comments

छान लिहिलेत माहितीपूर्णही आहे

आशु जोग
Tue, 05/24/2011 - 23:47 नवीन
छान लिहिलेत माहितीपूर्णही आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

गीतकार्/संगीतकार

मी_ओंकार
Wed, 05/25/2011 - 13:48 नवीन
ए आर रहमान, हा माणूस माझा कमालीचा नावडता. माझ्या लेखी तो माझा सगळ्यात नावडता संगीतकार आहे. मला त्याचे संगीत कधीही आवडलेले नाही. हिंदीचा/उर्दूचा गंधही नसल्यामुळे त्याच्या हिंदी गाण्यात शब्द कसेबसे ठोकूनठाकून बसवलेले असतात असे वाटते. कित्येकदा तमिळ चाल आधीच तयार असते आणि आता त्यात हिंदी शब्द कोंबायचे अशा पद्धतीने त्याने अनेक गाणी बनवली आहेत असे वाटते. (उदा. बॉम्बे) भाषेचा लहेजा संभाळता न येणारा संगीतकार म्हणजे नको वाटतो. गाणी लिहीणारा तो गीतकार. शब्द (ठोकून बसवलेले वगैरे) हे गीतकाराचे असतात. संगीत देणारा - चाल लावणारा / चाल बनवणारा तो संगीतकार. शब्द चांगले नाहीत म्हणून रेहमान वाईट हे काही कळले नाही. - ओंकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

चोर्‍या वगैरे

प्रदीप
Wed, 05/25/2011 - 20:57 नवीन
हे गाणे ह्यावरून उचलले आहे, ते त्यावरून... असली चर्चा अनेक संगीताशी संबंधित फोरांवर सुरू असते. ८० च्या दशकानंतरच्या संगीताची माहिती नाही, पण ४७ - ८०च्या काळातील हिंदी चित्रपट संगीतात अशा 'चोर्‍यां'ची अनेक उदहरणे सापडतात, एका संस्थळावर ह्याविषयी विस्तृत माहिती आहे (विकास ह्यांनी तो दुवा दिलेला आहे). ह्या काळातील तथाकथित 'चोर्‍यां'विषयी एक लक्षात घ्यावे की सर्वसाधारणपणे गीताचा मुखडा कुठल्या परदेशी गीतावर आधारित असायचा, ते मूळ गीत इजिप्त्शियन असे किंवा पाश्चिमात्य असे. काही असले तरी ह्या काळांतील 'चोर्‍या' ह्या तद्दन चोर्‍या नसत. गीताचा मुखडा दुसर्‍य गीतावरून बेतलेला असे. परंतु गाण्यातील अंतर्‍याच्या चाली, प्रील्यूड, कोडा, इंटरल्यूड, दोन ओळींमधील मधील पीसेस, ठेका, ती वाजवणारी वाद्ये-- थोडक्यात इतर सर्व काही--त्या त्या संगीतकाराची स्वतःची असत. म्हणजे गाण्याची फ्रेम दुसर्‍या गाण्यावर बेतलेली असली तरीही पुढची सर्व डेव्हलपमेंट संगीतकाराने स्वतः केलेली असे, व ती अनेकदा इतकी प्रभावी असे की मूळ गीताचा अंश त्यात अगदी थोडकाच रहावा. गीताचे अ‍ॅडॉप्टेशन सुरेख केलेले असे. तेव्हा त्या काळांतील गीतांबद्दल तरी 'चोरी'चा फारसा बागुलबोवा करण्यात हंशील नाही. आणि मग नक्की चोरी कशाकशास म्हणायची? अनेकदा गीते भारतीय लोकसंगीतावरून घेतलेली आहेत, शास्त्रीय संगीतातील चीजांवर आधारलेली आहेत, सुगम संगीतावर (ठुमर्‍य, कजर्‍या इ.) आधारलेली आहेत. त्यांनाही 'चोरी'च म्हणायचे का? शेवटी जे आपल्या समोर आले ते आपणास आवडते की नाही, हे महत्वाचे. नौशादांचे त्यांच्या नंतरच्या काळातील संगीत आपल्याला आवडत नाही, हे समजले. पण हे आपले मत आहे, इतकेच पुरे आहे ना! त्याच्या पुष्ट्यर्थ सज्जादचे उर्मट वक्तव्य देण्याची गरज भासू नये. (सज्जादने फार संगीत दिले असे नाही, पण जे काही दिले त्यातील एकाद-दोन झगझगीत गाणी वगळता इतर सर्व सुमार होती, हे माझे त्याच्या संगीताविषयीचे मत आहे. ती सर्वच गाणी अरबस्थानातील वाळवंटात गाण्यासाठी आहेत असे सर्व संगीत आहे-- उंटांच्या गळ्यातील घंटांसकट. एकासारखे दुसरे गाणे, काहीही वैविध्य नाही. सज्जाद कुशल मेंडोलिनवदक होता, आणि संगीतकार म्हणून त्याचा दबदबाही होता. पण त्याच्या उर्मटपणाच्या आख्ययिकच जास्त चर्चिल्या जातात!) नौशाद सुमारे तीस+ वर्षे कार्यरत राहिले. इतक्या प्रदीर्घ काळात ननवे प्रयोग करणे हे तसे कठीणच काम. अन्य कुणी संगीतकाराने ते केले असल्याचे मला तरी आठवत नाही. सगळ्यांचे तसेच होत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

सहमत

विकास
Wed, 05/25/2011 - 23:15 नवीन
ह्या काळातील तथाकथित 'चोर्‍यां'विषयी एक लक्षात घ्यावे की सर्वसाधारणपणे गीताचा मुखडा कुठल्या परदेशी गीतावर आधारित असायचा, ते मूळ गीत इजिप्त्शियन असे किंवा पाश्चिमात्य असे. खरे आहे. बर्‍याचदा जसे एखाद्या रागदारीवर आधारीत संगीत असते तसे कधी कधी दिसते, विशेष करून जुन्या संगितकारांच्या संदर्भात. मात्र नंतरच्या काळात जसेच्या तसे कॉपी करणे यात काहीच गैर वाटेनासे झाले. बप्पी लेहरी कदाचीत अशा पद्धतीतील आद्य संगितकार असावा. शेवटी जे आपल्या समोर आले ते आपणास आवडते की नाही, हे महत्वाचे. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

खुलासा

हुप्प्या
गुरुवार, 05/26/2011 - 00:43 नवीन
<< नौशादांचे त्यांच्या नंतरच्या काळातील संगीत आपल्याला आवडत नाही, हे समजले. पण हे आपले मत आहे, इतकेच पुरे आहे ना! त्याच्या पुष्ट्यर्थ सज्जादचे उर्मट वक्तव्य देण्याची गरज भासू नये. << पुष्ट्यर्थ वगैरे काही नाही. "जाता जाता" असा जो त्या परिच्छेदाच्या आधी शब्दप्रयोग केला आहे त्याचा अर्थ, ह्या संदर्भात आठवण झाली म्हणून असा आहे. माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ असा आजिबात नाही. गैरसमज नसावा. अजून एक आठवण म्हणजे शिरीष कणेकरांच्या कुठल्यातरी लेखात लता मंगेशकरचे विधान आहे की राजेश रोशन बापाकडून काहीही शिकला नाही अशा अर्थाचे. म्हणजे लतादिदीच्या लेखी राजेश रोशन (रोशनच्या तुलनेत) यथातथाच आहे. अर्थात हिंदी संगीताचे सुवर्णयुग जिने अनुभवले आणि घडवलेही तिला नवे संगीतकार फिके वाटणे स्वाभाविकच आहे. सज्जाद हुसेनची जी काही गाणी ऐकली ती चांगलीच वाटली आहेत. त्याच्या विक्षिप्तपणामुळे आणि अहंकारामुळे त्याला जास्त सिनेमे मिळाले नसावेत. फिल्म इंडस्ट्रीमधे प्रसिद्ध व्ह्यायच्या आधी केलेला अहंकार फार महाग पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

अरे अरे

लॉरी टांगटूंगकर
Tue, 05/24/2011 - 22:37 नवीन
हिमेशभाइच्या आधि रेहमान चे नाव बघुन हळह्ळ वाटलि.(इथे डोके फोडत अस्लेल्या करूण चेहेर्‍याच्या स्मायली आहेत असे समजुन घ्यावे)
  • Log in or register to post comments

ही घ्या माझी लिस्ट

योगी९००
Tue, 05/24/2011 - 23:08 नवीन
हिमेश रेशमिया अन्नू मलिक प्रितम बाकी रवी आणि राजेश रोशन नावडते असे नव्हतेच.. त्यांची बरीच गाणी (जरी चोरलेली असली) तरी गुणगुणावीशी वाटायची... रवी - वक्त, हमराज,निकाह अजून आवडतात.. राजेश रोशन - जुली, स्वामी (पल भर ये क्या हो गया)
  • Log in or register to post comments

राजेश रोशन डोक्यात जाईल इतका

पक्या
Tue, 05/24/2011 - 23:24 नवीन
राजेश रोशन डोक्यात जाईल इतका काही वाईट संगीतकार नाही. त्याची बरीच गाणी ऐकायला चांगली वाटतात.
  • Log in or register to post comments

तुम्हाला हिमेश रेशमिया अमर

विजुभाऊ
Tue, 05/24/2011 - 23:47 नवीन
तुम्हाला हिमेश रेशमिया अमर उत्पल ( शहेनशहा) आनंद मिलिंद जतीन ललीत यांच्या बाबतीत काही ऐकीवात आहे का?
  • Log in or register to post comments

विजु शहा

प्रियाली
Tue, 05/24/2011 - 23:56 नवीन
बहुधा कल्याणजींचे सुपुत्र अतिशय त्रासदायक संगीत देतात.
  • Log in or register to post comments

गुप्त मधली

गोगोल
Wed, 05/25/2011 - 09:45 नवीन
गाणी बरी होती ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

ऋषीचे कुळ आणि नदीचे मुळ

विकास
Wed, 05/25/2011 - 01:27 नवीन
एखादे गाणे आवडले म्हणजे तो संगितकार आवडता होतो अशातला भाग नसतो. प्रत्येक संगितकाराचे एखादे गाणे तरी आवडू शकेलच तर काही किमान गुणगुणता येतील. बाकी बप्पी लेहरीवर चाल चोरण्याचा योग्य आरोप होतो. मात्र इतर संगिताच्या क्षेत्रातील ऋषींची कुळं आणि नद्यांची मुळं बघितली की नथिंग बट डिप्रेशन येते. :(
  • Log in or register to post comments

यात अन्नू मलिकचे नाव नाही हे

नगरीनिरंजन
Wed, 05/25/2011 - 05:51 नवीन
यात अन्नू मलिकचे नाव नाही हे पाहून आधी आश्चर्य वाटले, पण मग कळले की बरेच लोक त्याला संगीतकार मानत नाहीत. जुडवातली त्याच्याच आवाजात रेकलेली त्याची गाणी(?) ऐकल्यावर बहिरा माणूसही त्याला संगीतकार समजणार नाही.
  • Log in or register to post comments

उंची है बिल्डींग, लिफ्ट तेरी बंद है।

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/25/2011 - 08:24 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हिमेसभाईपेक्षा सगळे बरे!

रेवती
Wed, 05/25/2011 - 06:39 नवीन
हिमेसभाईपेक्षा सगळे बरे!;)
  • Log in or register to post comments

माझं मत

पैसा
Wed, 05/25/2011 - 07:41 नवीन
हिमेसभाईलाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगदी अगदी

स्मिता.
Wed, 05/25/2011 - 13:49 नवीन
अगदी अगदी १००% खरंय. हिमेशपुढे अन्नू मलिकचं 'उंची है बिल्डींग' सुद्धा सुसह्य वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मागे कुणाचा तरी 'आय डोन्ट हेट

प्यारे१
Wed, 05/25/2011 - 09:19 नवीन
मागे कुणाचा तरी 'आय डोन्ट हेट इन प्लुरल्स' वाला धागा आला होता. साथियाँ मधले चुपके से लग जा गले, ओ हमदम, शीर्षक गीत ऐकल्यानंतर ती गाणी लगेच भावण्याचं कारण गुलझार साब असावेत. हल्ली चाल/संगीत आधी आणि नंतर त्याला साजेसे शब्द असा प्रकार असतो. अर्थातच रेहमान तामिळ्भाषिक असल्याने त्याच्या मनात थोडेफार तामिळ शब्द चाल देताना ही अभिप्रेत असावेत. इथे गुलझार यांनी चपखल शब्द बसवल्याने ती गाणी गुणगुणावीशी वाटतात. मात्र हिंदुस्तानी मधील एकही गाणे आणी त्याचे शब्द म्हणजे शब्दशः छळ आहे. अन्नू मलिक (तोच उंची है बिल्डींग वाला ) जेव्हा बाजीगर मधली गाणी, पंछी नदियाँ पवन के झोकें सारखी गाणी देतो तेव्हा तो आवडतोच. चांगले घ्या बाकी टाकून द्या. सिम्पल.
  • Log in or register to post comments

+१ असे

गोगोल
Wed, 05/25/2011 - 09:49 नवीन
म्हणायला हरकत असू नये पण ह्या तथाकथित नामांकीत संगीत कारांनी केलेल्या चोर्या पाहून अस म्हणावस वाटत की या वाईट गोष्टी यांच्याबाबतीत एक्सेपशन नसून अधून मधून दिलेल्या चांगल्या चाली याच एक्सेपशन आहेत. साजिद खाननी या चोरी कामावर बरेच टी व्ही शो केले आणि म्हणून मग त्याच्या त्या शो वर बंदी आली असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चोर्‍या चोर्‍या काय आरडी ने

मृत्युन्जय
Wed, 05/25/2011 - 10:16 नवीन
चोर्‍या चोर्‍या काय आरडी ने पण केल्या. अण्णु ने केल्या त्यात काही विशेष नाही. विशेष हे की आरडीनी बरीच ओरिजिनल गाणी दिली. मध्यंत्यरी एका कार्यक्रमात अण्णुवर आरोप झाला की तो गाणी चोरतो त्यावर उसळुन तो उत्तरला की कोण म्हणतो की मी गाणी चोरतो. आता हीच चाल घ्या अगदी ओरिजिनल आहे. त्यानंतर त्याने जे गाणे म्हणुन दाखवले त्याची चाल शेम टु शेम शनिदेवाच्या आरतीची होती. मला त्याचे कौतुक वाटले. तो खोटे पण अगदी धडधडीत बोलतो. बाकी अन्नुची सुद्धा काही गाणी आवडतात पण ती चोरलेली नसतील असे छातीठोकपणे सांगता येत नाही. एका दशकापुर्वी अन्नुने एकच चाल २ चित्रपटांच्या गाण्यांसाठी वापरली. दोन्ही चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होउ घातले होते आणि त्याची गाणी आलटुन पालटुन वाजायची. गंमत म्हणजे दोन्ही गाणी मूळ माकारेना या इंग्लिश(की इटालियन) गाण्यावरुन चोरली होती. एवढा महान चोट्टेपणा केवळ अन्नु मलिक करु शकणा. कुठलाही संगीतकार २०% पेक्षा जास्त ओरिजिनल गाणी देउ शकत नाही हा जावईशोध सुद्धा त्याचाच. मी अन्नुची बरीच गाणी ऐकली आहेत. त्याची ती २०% तली गाणी कोणी ऐकली आहेत काय?
  • Log in or register to post comments

माझ्या अल्प ज्ञानानुसार मला

मुलूखावेगळी
Wed, 05/25/2011 - 10:32 नवीन
माझ्या अल्प ज्ञानानुसार मला असे वाटते कि १ गाण्यात संगीतकार्,गीतकार ,गायक आणि पिक्चरायझेशन ह्या सर्व बाबींचे योगदान असते. संगीतकाराऐवजी मी गाने गायकावरुन निवडते तेव्हा कोनताच संगीतकार डिस्लाईक नाही. वरील यादीत ल्या भप्पी साठी मात्र+१०० बाकिंसाठी नाहीच कारन त्यांची काही गाणे चांगली आहेत
  • Log in or register to post comments

मुलुखावेगळीजी,

प्रास
Wed, 05/25/2011 - 12:22 नवीन
भप्पीदांची 'चलते चलते' (१९७६) आणि 'शराबी' (१९८४) चित्रपटामधली गाणी एकदा तरी ऐकाच...... ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

मला त्याची आनि कोनाचीही

मुलूखावेगळी
Wed, 05/25/2011 - 13:38 नवीन
मला त्याची आनि कोनाचीही चांगली गाणी आवडतात . भप्पीचा अवतार बघुनच तो डोक्यात जातो. पोळ्याचा बैलासारखा/नंदीबैलासार्खा सजलेला दिसतो ना म्हनुन आनि मी वर बोल्लेय ना गायका साठी ऐकते गाने संगीतकार म्हनाल तर आर डी न रहमान जास्त फेव आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

भप्पीदांची 'चलते चलते' (१९७६)

विजुभाऊ
Wed, 06/08/2011 - 15:15 नवीन
भप्पीदांची 'चलते चलते' (१९७६) आणि 'शराबी' (१९८४) चित्रपटामधली गाणी एकदा तरी ऐकाच...... ही विनंती. शराबीतले " दे दे प्यार दे" आणि एस डी बर्मन चे "रामा मेघ दे पानी दे छाया दे रे रामा मेघ दे" आणि एकत्र ऐकून पहा ही तुम्हाला विनन्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

रेहमान

मराठी_माणूस
Wed, 05/25/2011 - 12:26 नवीन
ए आर रेहमान, अन्नु मलिक, बप्पी, नविन बरेचसे ज्यांच्या पेक्षा उषा खन्ना, राकेश रोशन, एल पी, रवि, हे केंव्हाही सरस
  • Log in or register to post comments

राकेश रोशन ??

योगी९००
Wed, 05/25/2011 - 14:20 नवीन
राकेश रोशन?? राजेश रोशन असे पाहिजे होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

रोचक धागा. जरा वेळ मिळाला की

बबलु
Wed, 05/25/2011 - 11:50 नवीन
रोचक धागा. जरा वेळ मिळाला की सविस्तर प्रतिक्रिया देइन. रूमाल टाकून ठेवलाय.
  • Log in or register to post comments

बप्पी लाहिरीची गाणी अत्यंत

गवि
Wed, 05/25/2011 - 12:13 नवीन
बप्पी लाहिरीची गाणी अत्यंत मस्त असतात. त्याला उगीच टाकाऊ ठरवू नये. -जिमी जिमी आजा. -झूम झूम झूम बाबा. -इन्तेहा हो गई इन्तजार की. (शराबी) -दे दे प्यार दे -पग घुंगरू बांध. -यार बिना चैन कहां रे. -याद आ रहा है तेरा प्यार.. -रंबा हो -हरी ओम हरी (प्यारा दुश्मन) -कोई यहां नाचे नाचे. -बम्बई से आया मेरा दोस्त -हम को आजकल है इन्तजार (सैलाब) आणि किती म्हणू. त्याची अनेक गाणी ऐकून कोणाचीही पावलं ताल धरतात. डिस्को स्टाईल संगीत भारतात आणण्यात आर डी खेरीज बप्पीच होता. आणि इतर असंख्य वाद्यांचा उपयोग त्याने प्रथम केला. चांगला आहे तो.
  • Log in or register to post comments

बरीच विसरलात असे दिसते

योगी९००
Wed, 05/25/2011 - 14:24 नवीन
बप्पीदांची खालील गाणी विसरलात असे दिसते.. ऐतबार (आवाज दी है आज एक नजर ने... आणि किसी नजर को तेरा..) तोहफा ..(तोहफा तोहफा आणि एक आंख मारू तो. ही गाणी जरी सो सो असली तरी गाण्याचा ठेका मात्र एकदम मस्त होता. मात्र जितू जयाप्रदा आणि श्रीदेवीला नाचताना नाही बघवत..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बाकी सगळी गाणी ठिक आहेत पण

गोगोल
Wed, 05/25/2011 - 22:58 नवीन
कोई यहां नाचे नाचे???? सिरीयसली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तेही

गवि
गुरुवार, 05/26/2011 - 13:23 नवीन
तेही ठीकच आहे की. ढिंगचॅक गाणे आहे एकदम. आणि बप्पीदाचेच आहे. डिस्को डान्सरमधले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

आव्वा आव्वा

नगरीनिरंजन
गुरुवार, 05/26/2011 - 13:30 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद

तिमा
Wed, 05/25/2011 - 12:48 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. मीही संगीतकारांचा घाऊक तिटकारा करत नाही. कदाचित, स्वर्गीय रोशनजींच्यामुळे राजेश रोशनकडून माझ्या अपेक्षा वाढल्या असतील. पण तुलनेने त्यांचे समकालीन संगीतकार हे एवढे थोर होते की त्यापुढे हे सामान्य वाटायचे. हल्लीच्या काही गाण्यांमधे, गायकाचा आवाज, त्याच्या शरीराच्या नक्की कुठल्या भागातून येतोय हेच कळत नाही आणि मग अशा गाण्यांपुढे ते सात संगीतकार सुध्दा उजवे वाटतात.
  • Log in or register to post comments

हिमेसभाईंना

चावटमेला
Wed, 05/25/2011 - 17:26 नवीन
हिमेसभाईंना प्रचंड बहुमताने विजयी करून टाकावे.. हिमेसभाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है..
  • Log in or register to post comments

मते

प्रदीप
Wed, 05/25/2011 - 20:33 नवीन
छान, वेगळ्या धर्तीचा धागा! माझी मते:
२. उषा खन्ना उडत्या चाली, पण कधी आकर्षक वाटल्याच नाहीत.
असेच म्हणतो. रवि: दळणबाज हे खरेच! त्याच्या 'दस लाख' मधील 'गरिबों की सुनो..' ने प्रचंड वात आणला होता. आणि 'हमराज' मधील महेंद्र कपूरचे 'ऐ हवा' ऐकवत नव्हते! (पण गेल्या चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत तरी तो मल्याळी फिल्म्सना संगीत देत होता, म्हणे! तसे असेल तर तो सगळ्यात जास्त कार्यरत राहिलेला संगीतकार म्हटला पाहिजे!) लक्ष्मीकांत- प्यारेलालः तुमच्या मतांशी सहमत नाही. अत्यंत गुणी संगीतकार द्वयी, पण (तथाकथित जाणकारांत )तितकेच बदनाम! कल्याणजी- आनंदजी-- मला अजिबात आवडले नाहीत. त्यांच्या संगीतात मला कायम काहीतरी अत्यंत खोटे, पोकळ (phoney) वाटत राहिले आहे. शंकर-जयकिशन माझे सर्वात आवडते संगीतकार आहेत, पण ७१ नंतर शंकर संपलाच!
  • Log in or register to post comments

लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी

आशु जोग
Wed, 05/25/2011 - 22:24 नवीन
लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी कायम सस्ता माल वापरला शब्बीरकुमार, मो अजीज वगैरे (लता, रफी पेक्षा ते स्वस्त) त्यामुळे गाणी अगदीच फिकी वाटतात बर चित्रपट अमिताभचा असेल तर संगीताला महत्व नसेच आणि त्यांना मिळालेला रफी, लता हे सुद्धा नंतरच्या काळातले(जरा वयस्कर) उदा रफीची सुरुवातीची गाणी घ्या आणि परदा है परदा सारखी गाणी आठवा फरक कळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

माहिती

प्रदीप
गुरुवार, 05/26/2011 - 11:46 नवीन
लक्ष्मी-प्यारे ह्यांनी संगीतकार म्हणून सुरूवात १९६४ च्या 'पारसमणी'पासून केली. तेव्हा लता व रफी दोघेही उमेदीत होते. आता काही तथाकथित जाणकारांच्या मते लताने १९६० साली गायन-सन्यास घ्यायला हवा होता, ह्यावरून गेले तर मग लक्ष्मी-प्यारेंना मिळालेले लता-रफी 'नंतरच्या काळातले' हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. लताने सर्वाधिक गाणी ह्यांच्यासाठी गायलीत, आणि लता हा 'सस्ता माल' नसावा! शब्बीरकुमार, मोहमद अझीझ हे रफी गेल्यानंतर त्याची 'जागा घेण्यासाठी' घेतले गेले असे मला वाटते. 'पर्दा है पर्दा' मधील रफी मला 'सुहानी रात ढल चुकी' तील रफीपेक्षा वेगळा जरूर वाटतो, पण इंफिरीयर अजिबात नाही. माझे कानच खराब आहेत, त्याला काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

रवी

हुप्प्या
गुरुवार, 05/26/2011 - 01:19 नवीन
मला तरी रवीची अनेक गाणी आवडतात. वक्त, गुमराह, काजल, भरौसा, खानदान, आदमी और इन्सान, धडकन, धुंद, निकाह अशा काही सिनेमातील काही गाण्यात त्याने आपली प्रतिभा नक्कीच दाखवली आहे. मी त्याला इतका टाकाऊ समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा