Skip to main content

माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 25/05/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
परवा, माळ्यावरची पुस्तके काढतांना धुळमाखली डायरी,२० वर्षापुर्वीची.. अचानक खजिना हाती लागल्यासारखी सापडली तशी लेखणी तर तुला बहाल केली होती डायरी फक्त माझी होती कव्हर सुंदर आहे म्हणत म्हणत अवघी डायरी तुच जिंकुन घेतलीस ...मी मात्र शाई..शाई वेचत राहिले! डायरी माझी, लेखणी माझी, माझा तु, माझं ..माझं ..सर्वकाही तसं काही विशेष मागितलं नव्हतं मी तुझ्याकडे, भावनांशिवाय! वाटलं होतं तु भावनांनी रंगवशील! ...तुझ्या भावना लाख महाग असतील रे पण माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!
लेखनविषय:

वाचने 5005
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक .. कविता अगदी हृदयातुन शब्दांना वाट करुन दिल्यामुळे इतकी फ्लॉलेस झालिये की आर्या१२३ जी ... जवाब नहि तुम्हाला .. कोणतं कडवं निवडु ,... न कोणतं सोडु ? सगळी कविताच आवडलीये ..
परवा, माळ्यावरची पुस्तके काढतांना धुळमाखली डायरी,२० वर्षापुर्वीची.. अचानक खजिना हाती लागल्यासारखी सापडली
एकदम साधा क्षण, पण ह्या क्षणाला तुम्ही अगदी चार ओळींत चक्क प्रत्यक्ष उभं केलंत. . आणि शेवटचं कडवं तर एकदम वास्तवाचं दर्शन घडवणारा.. अशी वन टु वन कंपॅरिझन केवळ आपणच करु जाणोत ! एक्सलंट कविता .. अजुन येऊ द्या

..तुझ्या भावना लाख महाग असतील रे पण माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते! छानच लिहिले आहेस ग!

छान आहे कविता. शिर्षक पण आवडले.

छान. शेवटल्या कडव्यातल्या सौद्यातली खोट फारच जिव्हारी लागल्यासारखी वाटते.

In reply to by धनंजय

असेच म्हणतो. म्हणूनच आपल्याला जी आवडते त्यापेक्षा आपण जिला आवडतो त्या व्यक्तिवर प्रेम करावे असे म्हणतात. ;)

माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!
कसे दिले?

In reply to by पंगा

कोनत्या मापाने पाहीजे ? मंजे लीटर, किलो की मीटर. . . लाट का माल, लाट का माल. सेल सेल सेल सेल, भव्य दिव्य सेल. आता शब्द स्वस्त झाले म्हनल्यावर आता एका लेखावर एक फ्री मिळेल, नाही का !

माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!
ओळ अतिशय छान .. कविता आनखिन खोल येवुद्या .. लिहित रहा... वाचत आहे

तशी पूर्ण कविताच नॉस्टॅल्जिक करतेय पण शेवटाचं कडवं आरपार छेदून जातंय! छान रचना. खूप आवडली. राघव

सुंदर..... >>...तुझ्या भावना लाख महाग असतील रे पण माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!>> हे खासच आवडले....