Skip to main content

तुम्हाला कोणती मिठाई आवडते?

लेखक निनाद यांनी सोमवार, 23/05/2011 11:22 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2196
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

वर मला काँबिनेशन असलेली उत्तरे या कौलात देता येत नाहीत असे लक्षात आले. जसे की फरसाण आणि पेढे दोन्ही आवडते आणि तयार विकत आणतो असे उत्तर त्यात देता आले नाही. त्यामुळे तुमची पसंती इतर काही असेल तर तसे खाली प्रतिसादात द्या.

In reply to by निनाद

जी मिठाई खाल्यावर दुसरे काहीही खायचे ईच्छा होत नाही आणि थोड्या वेळाने पोटात जोरदार वळून येते अशी कोणतीही मिठाई.

In reply to by मृत्युन्जय

खवा व मिठाई म्हणजे आपल्या नथु हलवाई स्व्वीट मार्ट मध्ये जी काही मिठाई असते संदर्भात माहिती गोळा करण्याचा प्रयत्न असल्याने तो विकल्प घेतला नाही.

रसगुल्ल्याला मत दिले असले तरी आमची पहिली पसंत म्हणजे गुलाबजामुन ज्याला आम्ही प्रेमाने गुलजाम म्हणतो. तळल्यावर दीड सेंटीमीटर व्यासाचे असलेले आणि गरमागरम पाकात भिजून तीन सेंटीमीटर व्यासाचे झालेले, लाल आणि काळ्याच्या मधला रंग असलेले, तर्जनी आणि अंगठ्यात धरून उचलले असता फुटण्याच्या भीतीने लपलपणारे आणि तोंडात टाकल्यावर अलवारपणे विरघळणारे खूप गोड नसलेले गुलाबजाम. त्यांच्यापुढे इतर मिठाया तुच्छ आहेत. खव्याचे असले तरी पेढे-बर्फी या रांगेत त्यांना बसवणे हा त्यांचा अपमान वाटल्याने रसगुल्ल्याला मत दिले. गुलाबजाम हा स्वतंत्र पर्याय नसल्याने कौलकर्त्याने आधी 'मिठाई कशाला म्हणावे' असा काथ्याकूट काढायला हवा होता असे वाटते. असो.

In reply to by मुलूखावेगळी

हे मुलुखा भगिनि, असे डोक्यात २रे, ३रे, भलते, सलते आनु नकोस. . . . आनि हो, माझी ओळख खुप वर पर्यंत आहे, बरं का!

In reply to by नरेशकुमार

असे डोक्यात २रे, ३रे, भलते, सलते आनु नकोस
मला फक्त वटले कि तुम्हाला हलाहल मह्नाय्चे. तुम्हीच भल्तेसलते आनु नका

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म! असा आपला एकूणच अ‍ॅप्रोच असल्यामुळे खाणे हा आपला वीक पॉइण्ट त्यात मिठाई वीक्केस्ट. सगळ्या ऑप्शन्सना एकाच वेळी मत देता येत नसल्याने बासुंदी या इर्रीप्लेसेबल व्यंजनाला मत दिलेले आहे.

मिसळ-पाव धर्मास जागून "गोड न घेता तयार फरसाण, चिवडा" या प्रकारास पसंती दिली आहे (इथे ट्रेड-मिलवर पृथ्वी प्रदक्षिणा करतोय , त्यामुळे गोड सध्या वर्ज विचार कारण पण)

आमच्या संगमनेर (नगर जिल्हा) येथे मिळणारी मसाला शेव आणि गरम गरम जिलेबी. पण तुम्ही तिखट आणि गोड असे एकत्र दिलेले नाही. तो पर्याय हवा होता.

आणि तो ऑप्शन न दिल्यामुळे निनादचा निषेध!!!!!

In reply to by पिवळा डांबिस

जिलेबी, इमरत्ती,गुलाबजामून, बुंदी, हे पर्याय नसल्यामुळे मी पिडा प्रमाने निनाद यांचा निषेध व्यक्त करतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुंदी? मोतीचूर वगैरे प्रकारात धरले आहे ना. पण जिलेबीचे खरे आहे, जिलेबी आणि इमरती हा ऑप्शन यायला हवा होता. पण मला संपादन करता येत नाही. सर तुम्हीच टाकता का ते? गुलाबजाम हा प्रकार खव्याची मिठाई या प्रकारातच मोडतो म्हणून स्वतंत्र धरले नव्हते. पण हे संस्थान बरेच मोठे असल्याने तसा ऑप्शन बहुदा हवा असे लक्षात आले.

In reply to by निनाद

>>>>> बुंदी? मोतीचूर वगैरे प्रकारात धरले आहे ना. निनाद, मला बुंदी आणि मोतीचूराचे लाडू यात जरा फरक वाटतो. नेमकेपणाने सांगता येणार नाही पण, दोन्ही आपापल्या ठिकाणी हटके आहेत. असो, आपण भारतात आल्यावर कळवा. मस्त बुंदी हादाडू. :) -दिलीप बिरुटे

अर्थातच बंगाली मिठाइ जास्त आवडते.... पण सर्वात आवडती मीठाइ म्हणजे..... आता नाव कसं घ्यायचं.. एका नावात बंदीस्त राहणारी ती गोश्टच नाही मूळी ;) ..... हिंट म्हणून इतकच विचारेन कि "और मिठेमे क्या है ?" ;)

कौलात मत देता येत नाही कारण एकाचवेळी एकाहून अधिक पर्याय निवडता येत नाहीत. उत्तर: बंगाली मिठाई सोडून सर्व मिठाई व फरसाण आवडते. गुलाबजाम व बासुंदी घरी बनते. बाकी कुठलीच मिठाई घरी कशाही प्रकारे बनवण्याचा विचारही करत नाही.

सर्वच पर्याय. भेदभाव नाही. सर्वभक्षी