बाळ्या,
"बघता बघता तू किती मोठा झालास. माझा अजूनही विश्वास बसत नाही की कालपरवा पर्यंत अंगणात खेळणारं माझं बछडं आज नोकरीनिमित्ताने दुसरीकडे भुर्र उडून गेलं आहे.", असं बोलत डोळे टिपून तुझी आई मला बोर करत असते. पण होईल नीट हळूहळू. तुझा प्रवास चांगला झाला असेलच. जायच्या आधी तुझ्या आईच्या बडबडीमुळे काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्या लिहितोय.
मानापमान - नोकरीत बॉसच्या मानापमानाच्या भावना फार तीव्र असतात, पण बॉसने दिलेल्या शिव्यांनी आपला अपमान होत नसतो हे लक्षात ठेव.
संस्कार -एखाद्या दिवशी पार्टीत जास्त प्यालास तरी जेवण करायला चुकू नकोस.
फेरविचार - कुठल्याही मैत्रिणीबरोबर खरेदी करायला जायच्या आधी हजारदा फेरविचार कर आणि तरीही गेलास तर पाकीट घरी ठेवून जा.
स्तुती - जो पर्यंत हातात काही पडत नाही तोपर्यंत कोणी कितीही कौतुक केले तरी काहीही उपयोग नाही हे तुला माहितीच आहे.
कष्ट - ऑफिसमधल्या कामाव्यतिरिक्त चार-सहा महिन्यांतून तुझ्या राहत्या जागेत एखादा झाडू मारत जा. कपडे धुवायला बाई लावलीस तर कपडे धुवायला टाकायचे कष्ट घे.
वाचा -शिवीला उत्तर शक्यतो शिवीनेच दे. उगाच हाणामार्या करू नको. तुझ्या आईला महिन्या-दोनमहिन्यांनी तरी फोन करत जा.
बाबा.
ता.क.: तुझी आई मागं लागली म्हणून पत्र लिहीले. चिडू नको. फाडून टाक.
वाचने
7815
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्र्याक्टीकल ... पत्र आवडलं.
स्तुतीवाला प्वॉईंट
आता
:)
शीर्षक वाचून वाटलं टारझनने
नीलकांता वाचतो आहेस ना रे?
अगदी बरोबर
In reply to नीलकांता वाचतो आहेस ना रे? by मृत्युन्जय
+१
In reply to अगदी बरोबर by चिंतामणी
हात्तीच्या
(No subject)
In reply to हात्तीच्या by विनायक प्रभू
=)) =)) हे प्रभो! त्यासाठी
In reply to हात्तीच्या by विनायक प्रभू
_/\_
In reply to =)) =)) हे प्रभो! त्यासाठी by नगरीनिरंजन
प्रभू आणि नगरीनिरंजन
In reply to =)) =)) हे प्रभो! त्यासाठी by नगरीनिरंजन
खर्च
In reply to =)) =)) हे प्रभो! त्यासाठी by नगरीनिरंजन
नो, धीस शुद गो तु
In reply to खर्च by विनायक प्रभू
=)) =)) =)) =))
In reply to हात्तीच्या by विनायक प्रभू
'पा' मध्ये असा काही विनोद आहे
In reply to हात्तीच्या by विनायक प्रभू
बाबौ!
In reply to 'पा' मध्ये असा काही विनोद आहे by रेवती
अहो...
In reply to 'पा' मध्ये असा काही विनोद आहे by रेवती
मलाही कळेना इतके हास्याचे
In reply to 'पा' मध्ये असा काही विनोद आहे by रेवती
'पा' शिनेमा मलाही आठवत नाहिये
In reply to मलाही कळेना इतके हास्याचे by माझीही शॅम्पेन
कोटाकोटी
In reply to 'पा' शिनेमा मलाही आठवत नाहिये by रेवती
गप येड्या!
In reply to कोटाकोटी by आनंदयात्री
हो, कोटाकोटी बंद करते पण काकू
In reply to कोटाकोटी by आनंदयात्री
सोळ्ळा
In reply to हो, कोटाकोटी बंद करते पण काकू by रेवती
फेरविचार
आज पत्रदिन आहे की काय? अजून
छान.
संस्कार -
चांगलीय संकल्पना....
पत्र आवडलं बुवा.
खूपच आटोपत घेतलात पत्र.मी