मे महिन्याच्या सुट्टीत सुध्दा ते त्याला लवकर उठवतात
भराभरा आवरुन सात वाजता नेहरुस्टेडियम गाठतात
रिक्षाने घरी परत येण्यासाठी त्याच्या खिशात २० रुपये कोंबतात
घरी त्याच्या साठी बोर्नेव्हीटा तयार ठेउन घाईघाईने ऑफीसला जातात
या सगळ्या मेहनतीच फळ अजुन त्यांना मिळायचय
होय, त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय
आई बाबा सांगतात म्हणुन,
तो रविवारी सुध्दा सकाळी प्रॅक्टीसला जातो,
दिवाळीच्या सुट्टीतही फटाक्यां ऐवजी चेंडुच फोडतो,
ई.एस्.पी.एन., स्टार क्रिकेट नियमाने पाहतो,
आपण हे सगळे का करतोय हेही त्याला अजुन कळायचय,
पण, त्यांना मात्र त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय
बर, हा सचिन फक्त क्रिकेटच खेळतो का?
नाही नाही, शाळा सुटल्यावर रोज तो अॅबॅकसच्या क्लासला जातो,
सोमवार आणि बुधवार त्याचा ड्रॉईंगचा क्लास असतो,
स्विमिंग तर यायलाच पाहिजे म्हणुन रोज संध्याकाळी तो पोहतो,
आई बाबांच्या इशार्यावर त्याला नुसते पळायचय,
कारण, त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय
परीक्षेत मार्क कमी झाले म्हणुन आता तो रोज सकाळी शिकवणीला जातो,
स्टॅमीना टिकावा म्हणुन तो रोज दोन अंडीपण खातो,
च्यवनप्राश, शतावरी, ब्राम्ही आणि अजुनही कसली कसली औषध आणि काढे घेतो,
आईच्या मनात आता त्याला तबल्याच्या क्लासलाही घालायचय,
तर काय हो, त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकर करायचय
पण त्याचे काय?
त्याला आईच्या कुशीत शिरुन गुडुप झोपायचे आहे,
आजी कडुन छान छान गोष्ट ऐकायची आहे,
बाबा बरोबर खुप खुप खेळायचे आहे,
दादाची सायकल चोरुन चालवायला शिकायची आहे,
मित्र जमवुन त्यांच्या बरबरीने खुप खुप दंगा करायचा आहे,
खेळता खेळता त्यांच्या बरोबर कडकडुन भांडायचे पण आहे,
त्याला काय हवे आहे याच्याशी कोणाला काय करायचय,
आहो अजुनही कळले नाही का?
त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकरच करायचय
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5955
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
हृदयविदारक वास्तव हृदयस्पर्शी
शोषण?
In reply to हृदयविदारक वास्तव हृदयस्पर्शी by नगरीनिरंजन
वा!
सहमत
In reply to वा! by पिवळा डांबिस
:-)
वास्तव कवितेच्या रुपकातुन छान
अत्यंत खरं.
सुपर्ब कविता...
वा भौ मस्त
रोज पहातो मी हे तेंडुलकर
बर, हा सचिन फक्त क्रिकेटच
लहानांना काय हवे
In reply to बर, हा सचिन फक्त क्रिकेटच by लिखाळ
शर्यत
In reply to बर, हा सचिन फक्त क्रिकेटच by लिखाळ
मस्त.
आवडलं.
विचार करायला लावणारी कविता..
उत्तम कविता, माझ्या आणि
माझ्या माहितीप्रमाणे
प्रत्येक पालक हा सुज्ञच असतो.
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by चौकटराजा
अचानक ही कविता वाचण्यात आली..