✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली

प — पाषाणभेद, Wed, 05/11/2011 - 03:16
नाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली
मागे माझ्या एका नाट्यगीतास एकदम झकास चाल लावणारे येथील सदस्य"निल्या१" (Nile नव्हे. ते वेगळे.) याही नाट्यगीताला चाल लावतील काय?
अशी कशी ही पिढी नेटावली हो..... अशी कशी ही पिढी नेटावली इंटरनेटी जाळ्यात अडकली अशी कशी ही पिढी नेटावली ||धृ|| पुरत नाही दिवस काही रात्रीही तीच कथा होई डोके राहूनी स्क्रिन समोरी किबोर्ड सतत बडवती ||१|| खाणे नाही नाही पिणे नाही आईबापा संगे बोलणे नाही बंधूभगीनी संगे बोलणे नाही हेडफोन लावूनी कानी आ आ आ आ आ आ आ हेडफोन लावूनी कानी गाणे कसले गुणगुणती ||२|| फेसबुक नका म्हणू तुम्ही अहो ट्विटर नका म्हणू तुम्ही मिसळपाव म्हणू नका तुम्ही या सार्‍या सोशल मेडीया सायटी मिळोनी सारे मित्र येथे हो..... मिळोनी सारे मित्र येथे एकमेकासंगे चॅटती ||३|| त्यातच तो स्मार्टफोन आला इंटरनेटला कनेक्ट झाला हातामध्ये नवे शत्र जणू वापरीत रस्त्याने चालती ||४|| एसेमेस ठरले लघूलीपी बोलणे हसण्या, रूसण्या स्मायली पाठवणे एमेन्सी, आयटीत नोकरी करणे ऑनलाईनी सामान मागवणे काय तर्‍हा एकेके सांगू पाषाणाची मती गुंगली ||५|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १०/०५/२०११

प्रतिक्रिया द्या
1265 वाचन

💬 प्रतिसाद (1)

वाचुन गंमत वाट्ली. चाल

नरेशकुमार
Wed, 05/11/2011 - 11:53 नवीन
वाचुन गंमत वाट्ली. चाल लाव्ल्यावर ऐकायला अजुन मज्जा ईल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा