Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 05/05/2011 - 07:03
हरवली आहे एक किल्ली मनाच्या कपाटात बंद केलेली गुपिते ओरखडे न पाडता बाहेर काढणारी हरवली आहे एक किल्ली बंद केलेल्या कानांचे कुलूप उघडून वादविवादात मूकपणे आक्रोशणारे सत्य ऐकणारी हरवली आहे एक किल्ली अपचनानंतर देखील उफ़ाळलेली भूक शमवून दयेची कोठारे उघडणारी हरवली आहे एक किल्ली अन्यायाच्या वणव्यात विझलेली वाणी चेतवून क्रांतीचा वणवा धडधडा बाहेर पाडणारी हरवली आहे एक किल्ली प्रौढत्वाच्या बेडयांमधे जखडलेले शैशवाचे निरागसपण मुक्त करणारी

Submitted by स्पंदना on गुरुवार, 05/05/2011 - 09:43

Permalink

अशी गुरुकिल्ली हरवुन बसलो

अशी गुरुकिल्ली हरवुन बसलो आपण? मग शोधा स्वस्थता, स्ट्रेस्स रिलिफ सेशन्स मध्ये, योगा मध्ये !! सुन्दर काका! फार छान रचना आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on गुरुवार, 05/05/2011 - 11:45

Permalink

मी digital lock वापरतो,

मी digital lock वापरतो, त्यामुळे किल्लि हरवायच्या प्रशन्च येत नायी.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 05/05/2011 - 13:36

Permalink

nice

nice
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 05/07/2011 - 02:04

Permalink

क्या बात है!! सुंदर!

क्या बात है!! सुंदर!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1559 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com