Skip to main content

फोटोग्राफीचा प्रयत्न

लेखक स्मिता. यांनी बुधवार, 04/05/2011 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे कलादालन नेहमीच बहरलेले असते. मिपाकरांनी काढलेले सुरेख फोटो बघून मलाही स्फूर्ती झाली की आपणही फोटो काढून बघावेत. त्याच प्रयत्नात असताना केलेले काही प्रयोग इथे मांडतेय. मला असलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान जवळपास शून्यच आहे. तीच स्थिती फोटोशॉप बद्दल! त्यामुळे जे कॅमेराने पाहिले तेच येथे दाखवले आहे. अज्ञानाचे आणखी प्रदर्शन करायचे झालेच तर मला यातल्या फुलांची नक्की नावंही माहिती नाहीत. जे सुंदर दिसलं त्याला टिपलं, एवढंच! जाणकारांनी माहितीत भर घातल्यास उत्तम :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5295
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मला असलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान जवळपास शून्यच आहे म्हनुनच फोटो इतके सुन्दर आले आहेत मस्त ,भारि, लै आवड्ले मला :)

In reply to by यशोधरा

वरुन तिसरा आणि शेवटून दुसरा भारी आलेत. शेवटून दुसरा पाहताना तर असं वाटतंय की मी भुंगा झालोय आणि आता त्या फुलावर बसणार आहे.

काय सुंदर फोटो आले आहेत. आधी तिसरा आवडला मग चौथा आवडला, पाचवा खासंच खुप छान :)

वा छान! कॅमेरा कोणता आहे ?

विचार करत बसू नको. आपल्याला फोटो काढायला येतात की नाही याचा. असेच आणखी फोटो काढत चल!

उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार! शेवडून दुसरा फोटो माझाही आवडता आहे :) शुचिताई, मला कोणत्याच फुलाचं नाव माहिती नाहिये :( अशोकराव, SONY चा DSC-W320 कॅमेरा वापरला आहे. प्यारे१, कधीही या हो फोटो काढायला... पण काढलेला फोटो तुम्ही सोबत घेऊन जाणारच याची गॅरंटी काय?

In reply to by स्मिता.

>>>>प्यारे१, कधीही या हो फोटो काढायला... पण काढलेला फोटो तुम्ही सोबत घेऊन जाणारच याची गॅरंटी काय? अधोरेखित प्रश्नाचा काय रोख असू शकेल ते उमगले नाही. निरागस पराला निरागसपणे विचारावे काय? ;)

In reply to by प्यारे१

अधोरेखित प्रश्नाचा काय रोख असू शकेल ते उमगले नाही. रोख-बिख काही नाही हो. मी ते अगदी सरळ लिहिलं होतं. मला वाटलं की मी काढलेला फोटो तुम्हाला आवडायचा नाही आणि तुम्ही तो नेणार नाही. बाकी कुणाला काय विचारायचं ते तुमच्या जबाबदारीवर विचारा ;)

छान् ..