✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

क्रिकेट नामक खेळाचा वाढता प्रसार आणि भारतीय तरूणांचे ढासळते शरीर सौष्ठव!

ल
लिखाळ यांनी
Mon, 04/25/2011 - 20:39  ·  लेख
लेख
क्रिकेट नामक खेळाचा वाढता प्रसार आणि भारतीय तरूणांचे ढासळते शरीर सौष्ठव!
'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा मासिकाच्या शंभराव्या अंकाचे पाहुणे संपादकत्व आमचे कडे आले असतांना चौसष्ट साली आम्ही हा लेख लिहिला. त्यावर अनुकूल-प्रतिकूल मतांचा पाऊस पडला. आज अनेक वर्षांनीसुद्धा परिस्थिती निराशाजनकच आहे असे पाहून लेख येथे टंकित केला आहे. सूज्ञांच्या अभिप्रायांचे स्वागतच आहे. आजकाल पाहतो तर क्रिकेटचा प्रचार वाढतोच आहे. अशा बश्या खेळावरील लोकांचे वाढते प्रेम हे त्यांच्या कल्पनाशक्तीच्या दिवाळखोरीचेच लक्षण आहे असे आता आमचे पक्के मत बनले आहे. अनेक दिवस मी या खेळाचे अवलोकन करितो आहे. एक लहानसे उदाहरण म्हणून कालचाच प्रसंग पाहा. काल मी एका मैदानाजवळून चाललो होतो. मैदानावर लहान पोरांचा एक जथ्था जात होता. आता पोरे जमून मस्त दंगा घालतील या अपेक्षेने मी थोडा काळ माझ्या फिरण्याच्या व्यायामातून सवड घेऊन उभा राहिलो. पण पाहतो तर काय ! सर्व जण जमले, कवायतसवयीने जागोजागी विखुरले आणि खेळ चालू झाला. बारा पंधरा पोरांतील फक्त चार पोरे एका कोठल्याही वेळेस धावपळीत होती. बाकी निरिक्षकाप्रमाणे जागच्या जागीच. हा काय खेळ झाला? या खेळामध्ये श्रम होतात हे मान्य केले तरी लहान वयाच्या, तरूण वयाच्या सर्व मुलांनी वाढीच्या वयात व्यायामासाठी खेळावा असा हा खेळ नाही असे आमचे दिवसेंदिवस मत बनत चालले आहे. मैदानी सांघिक खेळामध्ये जो दंगा, धिंगामस्ती असते, मातीने अंग माखून जाते तो प्रकार या खेळात खचितच नाही. साहेबाने पोषाखी खेळ निर्माण केला आणि आम्ही तो डोक्यावर घेतला. मुलांनी मैदानावर हुतुतु खेळावे, लगोरी, फुटबॉल असे दमसासाचे धिंगामस्तीचे खेळ खेळावेत तरच पुढल्या पिढीचे तेज टिकून राहील. हिंदच्या पुढल्या पिढीचे तेज कमी असावे, बुळी पोषाखी पिढी निपजावी म्हणूनच की काय साहेबाने हे वेड इकडे आणले आणि रुजवले असा आम्हांस दाट संशय येऊ लागला आहे. सर्व पालकांनी आता आपल्या मुलांना मैदानी दमसासाचे खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे असे मी या निमित्ताने आवाहन करतो. समाजधुरीणांनो आता रणमैदानातून मुक्त झाला आहा तर खेळाच्या मैदानाकडे या, आणि आपल्या नव्या पिढीला पोषाखी-बुळे होण्यापासून वाचवा! आपला -- लिखाळ.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4586 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा

रेवती
Mon, 04/25/2011 - 20:47 नवीन
'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा मासिकाच्या शंभराव्या अंकाचे पाहुणे संपादकत्व आँ? बरं बरं.....;) खेळाच्या मैदानाकडे या, आणि आपल्या नव्या पिढीला पोषाखी-बुळे होण्यापासून वाचवा! छान संदेश हो आजोबा!:) तुमचे इतके कमी लिखाण आम्हाला मान्य नाही.
  • Log in or register to post comments

हेहेहे!

प्रियाली
Mon, 04/25/2011 - 20:56 नवीन
मस्त!
'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा मासिकाच्या शंभराव्या अंकाचे पाहुणे संपादकत्व आमचे कडे आले असतांना चौसष्ट साली आम्ही हा लेख लिहिला.
लिखाळआजोबांनी पुनरागमन केलेले दिसते. उरलेसुरले भेळेचे कागद आहेत का रे कुणाकडे? ;)
  • Log in or register to post comments

छान!

पिवळा डांबिस
Mon, 04/25/2011 - 23:26 नवीन
हा लेखनशार्दूल लिखाळ पुन्हा विक्रिडित झाला याचा आनंद वाटला!!! :) ("आरे किरकेट किरकेट क्या लगा रख्खा है, जरा हाकी खेलो, हाकी!!!!" - आमचे पीटीटीचर रणबीरसिंग बलवा, रिटायर्ड हवलदार, इंडियन आर्मी)
  • Log in or register to post comments

लोकशाहीचा जमाना असल्यामुळे

पाषाणभेद
Mon, 04/25/2011 - 23:58 नवीन
लोकशाहीचा जमाना असल्यामुळे क्रिकेटविरोधी या धाग्याला फाट्यावर मारले जाईलच पण सत्या परिस्थीती लिखाळ म्हणतात तशीच आहे. क्रिकेट हा दमछाक न होणारा खेळ असल्याने अन आपण ऐदी स्वभावाचे असल्याने हा खेळ आपल्याकडे जास्त फोफावला आहे हे सत्य आहे. त्यात आताशा पैसा हा पाण्यासारखा मिळतो असल्याने अन राजकारणी व बॉलीवूडी थोबडेही त्यात आल्याने तो अधिकच चमकू झाला आहे. हा सांघीक खेळ निश्चितच आहे का यावर चर्चा व्हावी. अवांतर: सैन्यात ह्या खेळाला स्थान नाही.
  • Log in or register to post comments

अन आपण ऐदी स्वभावाचे असल्याने

गणपा
Tue, 04/26/2011 - 00:59 नवीन
अन आपण ऐदी स्वभावाचे असल्याने हा खेळ आपल्याकडे जास्त फोफावला आहे हे सत्य आहे.
कै च्या कैच तुझं पाषाण्या.
त्यात आताशा पैसा हा पाण्यासारखा मिळतो असल्याने अन राजकारणी व बॉलीवूडी थोबडेही त्यात आल्याने तो अधिकच चमकू झाला आहे.
यात थोडा बदल करुन म्हणतो की यात मिळणार्‍या झटपट प्रसिद्धीच्या मोहा पायी, राजकारणी व बॉलीवूडी थोबडेही त्यात आपापले हात धुवुन घेत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

काहीही..

ज्ञानेश...
Tue, 04/26/2011 - 00:45 नवीन
चौसष्ट सालानंतर किमान सहा-सात पिढ्या लिखाळ आजोबांच्या डोळ्यासमोरून गेल्या असतीलच. त्यापैकी किती पिढ्या 'बुळ्या' निपजल्या याचा काही विदा आजोबांकडे आहे काय? चौसष्ट साली हा लेख जितका टाकाऊ होता तितकाच आजही वाटला. ४७ वर्षे आपला टाकाऊपणा टिकवून राहणे ही साधी गोष्ट नाही. अभिनंदन करितो !
  • Log in or register to post comments

मालक

श्रावण मोडक
Tue, 04/26/2011 - 02:14 नवीन
मालक, दंडवत. भेटा एकदा. प्रत्यक्ष दंडवत घालतो. बादवे, 'सप्तरंग' सिरियसली वाचताय? त्यातल्या एका लेखात अशीच सुरवात होती काही दिवसांपूर्वी हे आठवतं. तसेच असेल तर, त्याची खिल्लीही उडवावीशी वाटल्याबद्दल आणखी एक दंडवत.
  • Log in or register to post comments

हाहा

धनंजय
Tue, 04/26/2011 - 02:29 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

दंडवत हो आजोबा!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 04/26/2011 - 14:51 नवीन
दंडवत हो आजोबा!
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Tue, 04/26/2011 - 14:59 नवीन
हा हा हा!
  • Log in or register to post comments

है शाब्बास!

चतुरंग
Tue, 04/26/2011 - 18:51 नवीन
लै भारी हो लिखाळाजोबा! ;) अग्रलेखी शैली मस्त जमली आहे. (मैदानावर जाऊनही एका जागी स्वस्थ उभे राहण्याचा अपरवाद पदरी येऊ नये म्हणून मी मैदानावर जातच नाही! ;) ) -(बैठा)रंगा
  • Log in or register to post comments

मान्य ...

छोटा डॉन
Tue, 04/26/2011 - 19:11 नवीन
>>मुलांनी मैदानावर हुतुतु खेळावे, लगोरी, फुटबॉल असे दमसासाचे धिंगामस्तीचे खेळ खेळावेत तरच पुढल्या पिढीचे तेज टिकून राहील. हांग्गाश्शी !!! कसे एकदम सोळा आणे चोख बोललात लिखाळआजोबा, एकदम सहमत आहे बघा. ह्या भिकारड्या क्रिकेटने देशाचे आणि देशातल्या युवकांच्या युवाशक्तीचे पार वाट्टोळे केले आहे असे आमचे अगदी लहानपणापासुन मत आहे ;) - (क्रिकेटद्वेष्टा)छोटा डॉन
  • Log in or register to post comments

तरी म्हटल अजुन हा

गणपा
Tue, 04/26/2011 - 20:27 नवीन
तरी म्हटल अजुन हा क्रिकेटद्वेष्टा बोलला कसा नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मजेशीर

मुक्तसुनीत
Tue, 04/26/2011 - 20:19 नवीन
लेखाचे बेअरिंग "जमले" आहे. मात्र हे फारच त्रोटक झाले. अजून जरा मज्जा येऊ द्या की.
  • Log in or register to post comments

असंच म्हणतो...

राजेश घासकडवी
Tue, 04/26/2011 - 21:25 नवीन
असंच म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादांचे

लिखाळ
Tue, 04/26/2011 - 23:05 नवीन
अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादांचे स्वागत आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार. :) (काल लेख टाकल्यापासून 'मिपा ऑफ लाईन' आहे असे दिसत असल्याने प्रतिसाद देण्यास विलंब लागला.)
  • Log in or register to post comments

आँ ?

मुक्तसुनीत
Tue, 04/26/2011 - 23:10 नवीन
मिपाबी ऑफलाईन था , अपन बी ऑफलाईन था. इस्सलिये लिखाईच नईं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

मस्त आणि खुसखुशित....

मन१
Sat, 04/30/2011 - 17:01 नवीन
--मनोबा.
  • Log in or register to post comments

सनातन प्रभात वाचला की काय

भडकमकर मास्तर
Sat, 04/30/2011 - 21:35 नवीन
सनातन प्रभात वाचला की काय नुकताच?
  • Log in or register to post comments

काय हो लिखाळाजोबा*, तुम्ही

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 04/30/2011 - 21:42 नवीन
काय हो लिखाळाजोबा*, तुम्ही नक्की काय व्यायाम करता? तुमच्या आरोग्याचं रहस्य काय? या वयातही एवढं (कमीतकमी) टंकलेखन करण्याची शक्ती तुम्ही कुठून आणता? * हे नामकरण केल्याबद्दल चतुरंगकाकांचे खास आभार.
  • Log in or register to post comments

मागे चतुरंगांनी तब्येतीविषयी

लिखाळ
Sat, 04/30/2011 - 22:08 नवीन
मागे चतुरंगांनी तब्येतीविषयी जे संपादकीय लिहिले होते, त्याला प्रतिसाद देताना मी माझ्या आवडत्या व्यायाम प्रकारांचा उल्लेख केला होता. जिज्ञासूंनी शोध घ्यावा. बाकी सर्व क्षेम कुशल !! व्यायामाचा विषय निघाला म्हणजे हा प्रकृतीविषयी काही संकेत असावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रकृतीविषयी काही संकेत

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 04/30/2011 - 23:38 नवीन
हा प्रकृतीविषयी काही संकेत असावा का?
उजव्या बाजूची का डाव्या बाजूची प्रकृती? हे विश्व डावखुरं आहे असा काही सिद्धांत असल्याचं अंधुकसं आठवतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

६४ साली मुलेच क्रिकेट खेळत

अविनाशकुलकर्णी
Sun, 05/01/2011 - 00:19 नवीन
६४ साली मुलेच क्रिकेट खेळत होति..आता मुलिंची पण भर पडली आहे..... आता पुढे मिस्क्स एलेव्हन ट्वेन्टी ट्वेन्टी सामने भरु शकतात
  • Log in or register to post comments

६४ साली देखील डान्या सारखी

परिकथेतील राजकुमार
Mon, 05/02/2011 - 14:06 नवीन
६४ साली देखील डान्या सारखी क्रिकेट कंटक जळजळी माणसे अस्तित्वात होती हे पाहून शरम वाटली.
  • Log in or register to post comments

:)

प्राजक्ता पवार
Mon, 05/02/2011 - 18:21 नवीन
मस्तं
  • Log in or register to post comments

बरेच मासे गळाला लागले की

प्यारे१
Tue, 05/03/2011 - 11:53 नवीन
बरेच मासे गळाला लागले की ! सुंदर!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा