क्रिकेट नामक खेळाचा वाढता प्रसार आणि भारतीय तरूणांचे ढासळते शरीर सौष्ठव!
क्रिकेट नामक खेळाचा वाढता प्रसार आणि भारतीय तरूणांचे ढासळते शरीर सौष्ठव!
'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा मासिकाच्या शंभराव्या अंकाचे पाहुणे संपादकत्व आमचे कडे आले असतांना चौसष्ट साली आम्ही हा लेख लिहिला. त्यावर अनुकूल-प्रतिकूल मतांचा पाऊस पडला. आज अनेक वर्षांनीसुद्धा परिस्थिती निराशाजनकच आहे असे पाहून लेख येथे टंकित केला आहे. सूज्ञांच्या अभिप्रायांचे स्वागतच आहे.
आजकाल पाहतो तर क्रिकेटचा प्रचार वाढतोच आहे. अशा बश्या खेळावरील लोकांचे वाढते प्रेम हे त्यांच्या कल्पनाशक्तीच्या दिवाळखोरीचेच लक्षण आहे असे आता आमचे पक्के मत बनले आहे.
अनेक दिवस मी या खेळाचे अवलोकन करितो आहे. एक लहानसे उदाहरण म्हणून कालचाच प्रसंग पाहा. काल मी एका मैदानाजवळून चाललो होतो. मैदानावर लहान पोरांचा एक जथ्था जात होता. आता पोरे जमून मस्त दंगा घालतील या अपेक्षेने मी थोडा काळ माझ्या फिरण्याच्या व्यायामातून सवड घेऊन उभा राहिलो. पण पाहतो तर काय ! सर्व
जण जमले, कवायतसवयीने जागोजागी विखुरले आणि खेळ चालू झाला. बारा पंधरा पोरांतील फक्त चार पोरे एका कोठल्याही वेळेस धावपळीत होती. बाकी निरिक्षकाप्रमाणे जागच्या जागीच.
हा काय खेळ झाला? या खेळामध्ये श्रम होतात हे मान्य केले तरी लहान वयाच्या, तरूण वयाच्या सर्व मुलांनी वाढीच्या वयात व्यायामासाठी खेळावा असा हा खेळ नाही असे आमचे दिवसेंदिवस मत बनत चालले आहे. मैदानी सांघिक खेळामध्ये जो दंगा, धिंगामस्ती असते, मातीने अंग माखून जाते तो प्रकार या खेळात खचितच नाही. साहेबाने पोषाखी खेळ निर्माण केला आणि आम्ही तो डोक्यावर घेतला.
मुलांनी मैदानावर हुतुतु खेळावे, लगोरी, फुटबॉल असे दमसासाचे धिंगामस्तीचे खेळ खेळावेत तरच पुढल्या पिढीचे तेज टिकून राहील. हिंदच्या पुढल्या पिढीचे तेज कमी असावे, बुळी पोषाखी पिढी निपजावी म्हणूनच की काय साहेबाने हे वेड इकडे आणले आणि रुजवले असा आम्हांस दाट संशय येऊ लागला आहे.
सर्व पालकांनी आता आपल्या मुलांना मैदानी दमसासाचे खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे असे मी या निमित्ताने आवाहन करतो. समाजधुरीणांनो आता रणमैदानातून मुक्त झाला आहा तर खेळाच्या मैदानाकडे या, आणि आपल्या नव्या पिढीला पोषाखी-बुळे होण्यापासून वाचवा!
आपला
-- लिखाळ.वर्गीकरण
प्रतिक्रिया
'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा
हेहेहे!
छान!
लोकशाहीचा जमाना असल्यामुळे
अन आपण ऐदी स्वभावाचे असल्याने
काहीही..
मालक
हाहा
दंडवत हो आजोबा!
:-)
है शाब्बास!
मान्य ...
तरी म्हटल अजुन हा
मजेशीर
असंच म्हणतो...
अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादांचे
आँ ?
मस्त आणि खुसखुशित....
सनातन प्रभात वाचला की काय
काय हो लिखाळाजोबा*, तुम्ही
मागे चतुरंगांनी तब्येतीविषयी
हा प्रकृतीविषयी काही संकेत
६४ साली मुलेच क्रिकेट खेळत
६४ साली देखील डान्या सारखी
:)
बरेच मासे गळाला लागले की